Back
गडचिरोलीत बस सेवा सुरू, दुर्गम गावांना मिळणार प्रवासाची सोय!
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 13:33:38
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 1607ZT_GAD_FIRST_ST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अतिदुर्गम मरकनार ते अहेरी बस सेवेला सुरुवात, नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात केले बसचे स्वागत , मरकनार, फुलनार, कोपर्शी, पोयारकोटी सारख्या अनेक अतिदुर्गम गावांना मिळणार बस सेवेचा लाभ
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सिमेपासून अवघ्या 6 किमी. अंतरावर असलेल्या अतिदुर्गम मरकनार ते जिल्हा उपमुख्यालय अहेरी येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस सेवेची सुरुवात करण्यात आली. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा-या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात.
मरकनार गावात बस आल्यामुळे नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचे स्वागत केले. पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. मरकनार ग्रामस्थानी 9 फेब्रुवारी 2025 रोजी नक्षल गावबंदी ठराव पारीत करुन नक्षल्याना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असे घोषित केले होते. या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी गतवर्षी पोलीस संरक्षणामध्ये कोठी ते मरकनार रस्ता तयार करण्यात आला असून मरकनार ते मुरुमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मरकणार गावात एअरटेल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे. बससेवा सुरु झाल्यामुळे याचा लाभ मरकनार, मुरुमभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही या गावातील जवळपास 1200 हुन अधिक नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी यांना होणार आहे. एस.टी बसच्या सुविधेमुळे ग्रामस्थांना वर्षभर सहज प्रवास करता येईल, तसेच पोलीस व जनता यांचे संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल.
याच वर्षी 01 जानेवारी 2025 रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी बस सेवा तसेच दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी कटेझरी ते गडचिरोली बस सेवा देखील सुरु करण्यात आली होती. दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये 420.95 कि.मी. लांबीच्या एकूण 20 रस्त्यांसोबतच एकूण 60 पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement