Back
साताऱ्यातील दत्ता पवारच्या आलिशान गाड्या आणि बंगल्यांची रहस्ये उघड!
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_DATTA_PAWAR
सातारा _ साताऱ्यातील दत्ता पवार या मुंबईचा माथाडी कामगारांचा चक्क दोन ,तीन आलिशान गाड्या त्याच बरोबर जावली तालुक्यात दोन टोलेजंग बंगले अशी अफाट संपत्ती असल्याचे समोर आले आहे.भाते आणि कालेवाडी या ठिकाणी हे बंगले आणि मुंबईत देखील अनेक प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली आहे.दत्ता पवार आणि वादग्रस्त अधिकारी दिनेश दाभाडे यांनी काही कंपन्यांना लुटल्याचा आरोप होतो आहे.भाजप आमदार प्रवीण दटके यांनी हा आरोप केला आहे.दत्ता पवार यांच्यावर दोन पॅनकार्ड असल्या प्रकरणी मुंबईच्या पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे.या प्रकरणी कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी SIT चौकशीचे दिले आहेत.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Raigad, Maharashtra:
स्लग - जिओ टॅगिंग प्रणालीला ठेकेदारांचा विरोध ...... नेटवर्क आणि इंटरनेटअभावी अडसर .......जिओ टॅगिंग रद्द करण्यासाठी निदर्शने ....... जलजीवनची बिले रखडल्याने कर्जाचा बोजा .... बिले तातडीने अदा करण्याची मागणी .....
अँकर - जिओ टॅगिंग विरोधात रायगड जिल्हा परिषदेतील ठेकेदार आक्रमक झाले आहेत. जिओ टॅगिंग प्रणाली रद्द करावी या मागणी साठी आज ठेकेदार संघटनेने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. जिओ टॅगिंग प्रणाली बंधनकारक केल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. इंटरनेट आणि नेटवर्क अभावी दुर्गम डोंगराळ भागात जिओ टॅगिंग होत नाही त्यामुळं कामांची बिलं अडकून पडतात. जलजीवन मिशन च्या कामांची कोट्यवधी रुपयांची बिलं अडकून पडली आहेत त्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालोय. ती तातडीने अदा करावीत अशी मागणी ठेकेदार संघटनेने केलीय.
बाईट - ठेकेदार
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Hostel
Feed on - 2C
--------------------------
Anchor - वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील आनंदनगर भागात ही घटना घडली. वैभव पांचाळ अस मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहे. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. आठ दिवसा पूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे ठेवले होते. आज सकाळी सहा च्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. तात्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरून पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जातं आहे. वैभवचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला विमानातळ पोलिसांकडून याबाबत तपास केला जात आहे.
-----------------
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0407ZT_WSM_CROP_DAMAGE_RAIN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले आहेत. सुरुवातीला पावसाने दडी मारली, त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची पेरणी अयशस्वी ठरली.सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांकडे खते, बियाणे व आर्थिक साधनसंपत्तीचा अभाव आहे.अडोळी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व कृषी विभागाला निवेदन देऊन मोफत किंवा अनुदानित दराने खते व बियाणे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
बाईट:सतीश पाटील,शेतकरी आडोळी
0
Share
Report
Thane, Maharashtra:
हिंदी सक्ती दोन्ही धोरण महायुती सरकारने रद्द केल्यानंतर...उद्याच्या विजयी मेळाव्या निमित्त आज पासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मध्ये जल्लोष..
ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या हरी निवास सर्कल या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र येऊन जल्लोष करत आहे...
मराठी माणसांमध्ये लाडू वाटप करत उद्याच्या विजय मेळाव्याचे आता पासूनच आमंत्रण देत आहे..
तर दुसरी कडे ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील एकवीरा देवी मंदिरात देवीची आरती करत देवीला गाऱ्हाणे देखील घालण्यात आले आहे. .
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - जे एन पी टी ची वाहतूक सुरळीत ,तर वाहतूक संघटनेचा बंद चा इशारा
चक्का जाम आंदोलन पर जेएनपीटी पर कारोबर सही
FTP slug - nm jnpt transport
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor: अवजड वाहतूकदार संघटनांनी ई-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंड आणि विविध मागण्यांसाठी मंगळवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. मात्र जेएनपीए बंदर परिसरात या संपाचा परिणाम दिसत नसून, येथील वाहतूक सुरळीत सुरू आहे अशी माहिती जे ऐन पी टी च्या वाहतूक विभागाचे प्रमुख एस के कुलकर्णी यांनी सगीतेल, वाहतूक नेहमी प्रमाणे सुरू असून रोज 17 हजाराच्या आसपास कंटेनर आवक - जावक सुरुर असल्याची माहिती दिली ,मात्र जेएनपीए बंदर परिसरात लाखो जड कंटेनर वाहतूक करतात या संदर्भात जेएनपीटी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी वाहतूक 70 टक्के बंद असल्याचा दावा केला असून , लवकर 100 टक्के कंटेनर वाहतूक बंद राहणार असल्याचे सगीतेल
बाईट - प्रवीण पैठणकर - जेएनपीटी वाहतूक संघ आद्यक्ष
---------------
0
Share
Report
Thane, Maharashtra:
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आज छत्री आंदोलन करण्यात आले. मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष सवलतींविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
वर्षानुवर्षे काम करूनही कंत्राटदारांची ₹९०,००० कोटींची बिले थकीत असताना नव्याने उगम पावलेल्या इन्फ्रा कंपन्यांना तत्काळ बिले अदा केली जात आहेत. याविरोधात आंदोलकांनी पाऊस नसतानाही छत्र्या उघडून प्रतीकात्मक आंदोलन केले.
आंदोलनात राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने कामे वाटल्याचा आरोप करत थकीत बिले त्वरीत अदा करावीत, विकासकामांसाठी आर्थिक तरतूद निश्चित करूनच मंजुरी द्यावी, कंत्राटदारांना संरक्षण देणारा कायदा करावा, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या
bYT:- मंगेश आवळे कंत्राटदार
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
अँकर -- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं यावर मनसेच्या वतीने मनोज चव्हाण यांनी खरपूस टीका केली असून आज खऱ्या अर्थाने खरी लाचारी बघितली. महाराष्ट्रामध्ये अमित शाह यांना बरं वाटावं म्हणून जय गुजरात बोलले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जी गोष्ट बोलायची आहे ते विचार करूनच बोलायला पाहिजे. ही लाचारी कुठल्या लेव्हलला चालली आहे हे दिसून येते.
Byte -- मनोज चव्हाण मनसे प्रवक्ते
मनोज कुळकर्णी
byte attach
२C
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संस्थानकालीन ऐतिहासिक ठेवा असलेल्या सावंतवाडी येथील कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील तीन दिवस संततधार पाऊस कोसळतोय. आणि अशातच दगडी भिंतीवर सिमेंट चे बांधकाम केल्याने भिंत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. कारागृहाच्या चारी बाजूच्या तटबंदीला धोका असल्याने सावंतवाडी कारागृहात असलेल्या कैद्यांना ओरोस येथील कारागृहात हलविण्यात येणार आहे. ऐतिहासिक ठेवा जमीनदोस्त होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - नोकरी मिळाली नाही म्हणून एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने शेतात केली आत्महत्या
नोकरी मिळाली नाही म्हणून एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने शेतात केली आत्महत्या
नातेवाईक आणि ग्रामस्थांचे एनटिपीसीच्या समोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरु
अँकर :- दक्षिण सोलापूर येथील फताटेवाडी गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे मृतदेह सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून संतप्त नागरिकांकडून आंदोलन देखील केलं जातंय. मिथुन राठोड असे आत्महत्या केलेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याचे नावं आहे. सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी येथे एनटीपीसी प्रकल्प स्थापित झाल्यानंतर अनेकांच्या जमिनी अधिगृहीत करण्यात आल्या होत्या. या अधिग्रहणचे वाढीव पैसे मिळावेत, तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून एनटीपीसीमध्ये नोकरी मिळावी या साठी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यात त्यांना यश आले नाही यामुळेही ते त्रस्त होते. त्यातूनच त्यांनी आज आपल्या शेतात आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. मिथुन राठोड याच्या आत्महत्याला एनटीपीसी जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आणि मृताच्या नातेवाईकांनी एनटीपीसी प्रकल्पासमोरचं आंदोलन सुरु केलंय. मिथुन राठोड यांचे मृतदेह एन्टीपीसीच्या प्रवेशाद्वारासमोर ठेवूनं आंदोलनाला करण्यात येतंय.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0407ZT_JALNA_RAIN_PRBLM(3 FILES)
जालना | 15 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप, खरीप पिकं संकटात(वाक थ्रू)
अँकर | जालना जिल्ह्यातील खरीप पिकं पावसाअभावी संकटात आलीयत. गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस नाही.त्यामुळे सोयाबीन, कपाशी,मका ही पिकं पावसाअभावी संकटात आलीयत. आणि या पिकांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नीतेश महाजन यांनी
वाक थ्रू+ चौपाल विथ शेतकरी
0
Share
Report