Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

मावल से बापू भेगडे का भाजपा प्रवेश, मुंबई में शक्ति प्रदर्शन

CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 15, 2025 05:31:41
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1509ZT_MAVAL_BHEGDE_PRAVESH Total files : 04 Headline: मावळ मधील बापू भेगडे यांचा आज शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश सोमाटने येथून शक्ती प्रदर्शन करत बापू भेगडे मुंबई कडे रवाना Anchor: मावळ तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला मोठा राजकीय बदल आता प्रत्यक्षात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापू भेगडे हे आज शेकडो समर्थकांसह भाजप प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत बापू भेगडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्यासह विधानसभा निवडणुकीत भेगडे यांना मदत करणाऱ्या पदाधिकारी यांची हकालपट्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातून केली होती. त्यानंतर आता कोणत्याच पक्षात नसलेले बापू भेगडे हे अखेरीस भाजपा प्रवेश करत आहेत. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत बापू भेगडे हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेशासाठी मुंबई कडे रवाना झाले आहेत. बाईट : बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री (file.no.03) बाईट : बाबुराव वायकर (file no.04)
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 08:00:17
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_CHP_POTHOLES_1_2 ( 2 file sent on 2C)   टायटल :---- चंद्रपूर-नागपूर व हैद्राबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांना वाव, सात दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा  अँकर :  चंद्रपूर शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. महामार्ग शहरातून गेल्याने वाहतूक कोंडी व खड्ड्यांमुळे धुळकणजन्य प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र झाली आहे. या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जनविकास सेनेने केली आहे. पुढील सात दिवसांत खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आठव्या दिवसापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. बाईट १) अक्षय येरगुडे, शहर अध्यक्ष, जनविकास सेना आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 07:51:03
Nashik, Maharashtra:Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* ... Anc: नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सगळ्या शेतकरी संघटना कांद्याच्या प्रश्नी एकत्र येत बागलाण मध्ये रस्त्यावर उतरल्या आणि रास्ता रोको केला. सर्व वाहतूक यावेळी ठप्प झाली असून डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, बागलाण शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकरी संघटना या चार संघटना एकत्र येत कांद्याला कमी दर, नाफेड nccf कडून शेतकऱ्यांची फसवणूक अशा विविध मागण्यासाठी रास्ता रोको केला. *तर ट्रक टार्न्सपोर्ट युनियनला यांना विनंती केली की तुम्ही नाफेड आणि nccf चा कांदा लोड करून नका अन्यथा ट्रक जाळण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.* *बाईट: शेतकरी*
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 15, 2025 07:49:51
Nala Sopara, Maharashtra:Date-15sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NSP SLAB Feed send by 2c Type-AVB Slug- नालासोपाऱ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही अँकर - नालासोपारा पश्चिमेच्या ओरेज हाईटस या ९ मजली इमारतीच्या पहिला माळ्यावरील रूम नबर १०६ चा स्लॅप कोसळा आहे .. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी नाही मात्र गुप्ता कुटुंबातील बारा वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला आहे नालासोपारा पश्चिम फन फिस्ट यशवंत गौरव फेज टू या परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे .. निगा गुप्ता (वय ३१),आयन गुप्ता ( वय १२ ) हे दोन आई आणि मुलगा या घरात राहत होते ...पालिकेने घटना स्थळावर जाऊन पाहणी केली आहे ...बिल्डर आणि पालिकेच्या निष्काळजी पणा मुळे ही घटना घडली असल्याचा आरोप केला जात आहे
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 07:49:23
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यातील काही भागात काल रात्री मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे काही मार्ग बंद पडले असून औंढा तालुक्यातील गोजेगाव भागातील ओढ्याला पुर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडलाय. तर अंजनवाडी गोळेगाव मधिल पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने जवळा कौंडशी अंजनवाडी गोळेगाव गावाचा संपर्क तुटलाय. अनेक भागात झालेल्या अतीमुसळधार पावसामुळे पीक अक्षरशहा झोपली आहेत. सलग दोन दिवस पीक पाण्यात राहिल्याने हाता तोंडाशी आलेली पीक सडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे... बाईट- मंचक सावंत- शेतकरी बाईट- राजू सावंत - शेतकरी
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 07:49:09
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_CHP_SUDHIR_BHAJAN_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- भाजपचे दिग्गज नेते आ. सुधीर मुनगंटीवार रंगले भजनात, चंद्रपुरात भाजपच्या दुर्गापूर शाखेच्या वतीने भजन साहित्याचे वितरण करण्याचा होता सोहळा, येणारा नवरात्रोत्सव भक्ती भावाने साजरा व्हावा यासाठी भाजपचे आहे आयोजन अँकर:-- भाजपचे दिग्गज नेते व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार चक्क भजनात रंगले. कार्यक्रम होता चंद्रपूर भाजपच्या दुर्गापूर शाखेच्या वतीने आयोजित केलेला भजन साहित्याचे वितरण सोहळा.  या सोहळ्यात दुर्गापूर, उर्जानगर आणि आसपासच्या भजन मंडळांना विविध भजन साहित्याचे वितरण करण्यात आले.  येणारा नवरात्र उत्सव भक्ती भावाने साजरा व्हावा यासाठी भाजपने हे आयोजन केले. या सोहळ्याचा प्रारंभ आ.  मुनगंटीवार यांच्या भजनाने व्हावा अशी इच्छा आयोजकांनी व्यक्त केली आणि भजन गात या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दरवर्षी गणेशोत्सवात स्वतःच्या घरी मुनगंटीवार भजनात दंग होतात. त्याचाच प्रत्यय त्यांनी या कार्यक्रमातही दिला. बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 15, 2025 07:45:25
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 15, 2025 07:37:17
Kolhapur, Maharashtra:Kop Maratha PC Feed:- Live U Anc:- मराठा - कुणबी एकच आहेत या मुद्यासाठी कोल्हापुरात आंदोलन सुरू होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमधील भवानी मंदिरात खंडेनवमी निमित्त पेन आणि कोल्हापूर गायझेटचे पूजन करून आंदोलनाला सुरवात होणार आहे. कोल्हापूर गायझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाज समन्वयक दिलीप देसाई आणि बाबा इंदुलकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिलीय. एक आक्टोंबरला होणाऱ्या गॅजेट् पूजनला काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती देखील उपस्थित राहणार आहेत असा दावा सकल मराठा समन्वयकानी केलाय. Byte:- दिलीप देसाई, समन्वयक सकल मराठा समाज Byte:-Adv. प्रवीण इंदुलकर, समन्वयक सकल मराठा समाज
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 07:37:10
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यातील काही भागात काल रात्री मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे काही मार्ग बंद पडले असून औंढा तालुक्यातील गोजेगाव भागातील ओढ्याला पुर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडलाय. तर अंजनवाडी गोळेगाव मधिल पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने जवळा कौंडशी अंजनवाडी गोळेगाव गावाचा संपर्क तुटलाय. अनेक भागात झालेल्या अतीमुसळधार पावसामुळे पीक अक्षरशहा झोपली आहेत. सलग दोन दिवस पीक पाण्यात राहिल्याने हाता तोंडाशी आलेली पीक सडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे... बाईट- मंचक सावंत- शेतकरी
2
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 15, 2025 07:33:07
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Savidan Geet Record Feed:- Live U Anc:- भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल सायंकाळी कोल्हापुरात 'हम भारत के लोग' संविधान गीताचा विश्वविक्रम करण्यात आला. मराठी, आसामी, इंग्रजी, संस्कृत, मैथिली, भोजपुरी, ओडिशा, पंजाबी, सिंधी, राजस्थानी, बंगाली, कोकणी, गुजराती, पाली, कन्नड, तेलगू, उर्दू, नेपाळी, हिंदी भाषेत संविधान प्रास्ताविकेचं गायनाद्वारे सादरीकरण झालं.. कोल्हापुरातील गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची होती. दसरा चौकात झालेल्या या विश्वविक्रमात १६०० जण सहभागी झाले होते. प्रास्ताविकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करून याबाबतचे प्रशस्तीपत्र मंत्री आठवले यांनी कार्यक्रमाचे संयोजक कबीर नाईकनवरे यांना प्रदान केले.. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
0
comment0
Report
Advertisement
Back to top