Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

आरक्षण विवाद शाळा तक: मराठा-ओबीसी पालकों ने टीसी बंदी के खिलाफ मोर्चा खोल दिया

SMSATISH MOHITE
Sept 13, 2025 09:09:24
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_SchoolContro Feed on - 2C ----------------------------------- Anchor - आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमध्ये सुरु झालेला सुप्त संघर्ष आता चक्क शाळेच्या प्रांगणात पाहोचलाय. त्याचे कारण म्हणजे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल करणाऱ्या संस्थालचालकाच्या शाळेतून आपल्या मुलांची टी सी काढण्याचा अर्ज 21 पालकांनी दिलाय. तर मराठा समाजाच्या संस्थाचालकाच्या शाळेतून आपली मुले काढण्याचा पवित्रा ओबीसी समाजाने घेतलाय. पाहुयात नेमकं काय घडलंय. Vo - कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने काढलेल्या जी आर विरोधात अखिल भारतीय विरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धोंडे यांची नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे मीनाताई ठाकरे निवासी आश्रम शाळा आहे. या शाळेतून आपल्या मुलांच्या टी सी द्याव्यात असा सामूहिक अर्ज 21 पालकांनी दिलाय. हे सर्व पालक मराठा समाजाचे आहेत. या शाळेत आपल्या मुलांना पाठवणार नसल्याचा निर्णयही या पालकांनी घेतलाय. कोणताही जातभेद न करता धोंडे यांच्या शाळेत मुलांना प्रवेश दिलाय. पण संस्थाचालक धोंडे यांनी मराठा आरक्षणा विरोधी याचिका दाखल केली. त्यामुळे आमच्या मुलांना त्यांच्या शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा या पालकांनी घेतलाय. Byte - Byte - Byte - Byte - Vo - टीसी काढून घेण्याच्या मराठा पालकाच्या निर्णयाचे पडसाद गावात उमटले. मराठा संस्था चालकाच्या जय महाराष्ट्र विद्यालय या शाळेतुन आपल्या मुलांना काढून घेण्याचा निर्णय ओबीसी समाजातील काही पालकांनी घेतलाय. Byte - ओबीसी पालक Byte - ओबीसी पालक Byte - ओबीसी पालक vo - दरम्यान शाळेतून मुलांना काढण्याचा निर्णय माघे घ्यावा यासाठी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मीनाताई ठाकरे निवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. Byte - लक्ष्मण येवते. मुकध्याध्यापक. Vo - संस्थाचालकाने याचिका टाकली म्हणून मराठा समाजाने आपली मुले त्यांच्या शाळेतून काढण्यासाठी अर्ज दिला. त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसी समाजाने मराठा संस्था चालकाच्या शाळेतून मुले काढण्याचा पवित्रा घेतलाय. पण या सगळ्यामुळे आरक्षणाचा वाद विद्येचे मंदिर असलेल्या शाळेच्या प्रांगणात पोहोचलाय. ही बाब नक्कीच दोन्ही जमाजासाठी भूषणावह नाही. दोन्ही समाजाने मनाचा मोठेपणा दाखवून आरक्षणाच्या या विषयातून विद्येच्या मंदिराला दूर ठेवावे ही अपेक्षा. ---------------------------
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 13, 2025 11:37:06
Kalyan, Maharashtra:कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात MRI मशीन धुळ खात ! मे महिन्यात आणलेली लाखोंची अत्याधुनिक मशीन अजूनही बंद Anc...कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्याधुनिक MRI मशीन मे महिन्यात दाखल करण्यात आलं. लाखो रुपये खर्च करून हे मशीन आणलं असलं, तरी अजूनही ते इंस्टॉल करण्यात आलं नाही. परिणामी, गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून हे MRI मशीन रुग्णालयाच्या खोलीत धूळ खात पडलेलं आहे. दररोज १ हजार ते १२०० बाह्यरुग्ण (ओपीडी) या रुग्णालयात तपासणीसाठी दाखल होतात. तसेच खाटांच्या संख्येपेक्षा अधिक रुग्ण येथे भरती असतात. अपघात किंवा इतर आपातकालीन वैद्यकीय परिस्थितीत MRI तपासणी तितकीच महत्त्वाची असते. पण रुग्णालयात सुविधा बंद असल्याने गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. MRI तपासणीसाठी ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतात आणि त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.मनसे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर MRI मशीन सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. Byte:- पुरुषोत्तम टिके ( कल्याण रुक्मिणीबाई हॉस्पिटल आरोग्य अधिकारी)
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 13, 2025 11:36:07
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 13, 2025 11:07:24
Nashik, Maharashtra: अँकर नाशिक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटलमागे २०० ते २५० रुपयांची घसरण झालीये. शेतकऱ्यांनी कांद्याचे भरलेले १०० ते १५० ट्रॅक्टर मानूर प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभे करून प्रशासनाचा निषेध केला. याच ठिकाणी व्यापाऱ्यांना बोलवून कांद्याचे लिलाव करत प्रशासनाला कांदे भेट देत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. Vo 1 नाशिक जिल्ह्यातील ही कळवण बाजार समिती...यामध्ये लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये असा नीचांकी दर मिळत आहे. असे असताना सरकार नाफेडद्वारे माध्यमातून किरकोळ बाजारपेठेमध्ये कांदा विक्रीसाठी आणत असल्याचे कळाल्याने शेतकरी आक्रमक झाले,विविध बाजारसमैत्यांमध्ये आंदोलन करून वैतागलेला कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करताना दिसतोय Byte *बाईट: सागर अंबाडे शेतकरी GFX ४ दिवसांत घसरलेले दर (क्विं.) सोमवार ११०० ते १२५० मंगळवार १००० ते १२०० गुरुवार ९५० ते ११०० शुक्रवार ९०० ते १००० Vo 2एकीकडे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टेरिफ लावलेला असताना दुसरीकडे श्रीलंकेने देखील कांद्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यावरून थेट 50 टक्के केले तिकडे बांगलादेशासह इतर देशात कांदा निर्यात मंदावलीचा आहे याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहेकांद्याचे भाव 1500 वरुन 1200 रुपये प्रती क्विंटलवर आले. या अगोदर जो भाव मिळत होता त्यातून पिकांवर केलेला खर्च निघत नव्हता आता क्विंटल मागे 300 रुपयाची घसरण झाल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. कांद्याला किमान 2500 ते 3000 पर्यंत भाव द्यावा किंवा आम्हाला क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. * *बाईट: संदीप थेटे, शेतकरी* VO 2: दरम्यान कांद्याच्या भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीकडे सरकारने वेळीच लक्ष देऊन काहीतरी मार्ग काढावा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्ह्यात निर्माण होऊ शकतो
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 13, 2025 11:01:24
Baramati, Maharashtra:JAVED MULANI SLUG 1309ZT_INDAPURBHRNRE BYTE 1 *इंदापुरात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अडकले ट्राफिक मध्ये..... एवढं तेवढं होत असतं म्हणत मंत्री भरणेंची सावध प्रतिक्रिया....* सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे माझ्यापासून सुरुवात करतो : मंत्री भरणे Anchor राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूरच्या दौऱ्यावर होते या दरम्यान दत्तात्रय भरणे यांना इंदापूर शहरात ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागलाय. दत्तात्रय भरणे इंदापूर न्यायालय परिसरात आले असता भरणे यांचा ताफा बराच काळ त्या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे अडकून पडला होता. शेवटी पोलिसांना गाडीच्या खाली उतरून मंत्री भरणे यांना वाट काढून द्यावी लागली आहे. मात्र एवढं तेवढं चालत असतं कधीतरी असं होत असतं सर्वांनीच शिस्त पाळली पाहिजे. मी मंत्री असलो तरी माझ्यापासून शिस्तीची सुरुवात झाली पाहिजे अशी सावध प्रतिक्रिया मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली आहे..... *बाईट —कृषी मंत्री दत्तात्रय भरणे*
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 10:49:32
Jalna, Maharashtra:FEED NAME | 1309ZT_JALNA_BOYS_DEATH(15 FILES) जालना | मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी खदानीत गेलेल्या चार पैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू जालना शहरातील वडारवाडी खदानीतील घटना दोघांचेही मृतदेह वर काढण्यात स्थानीक नागरिकांना यश घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू अँकर | फोटो काढण्यासाठी खदानीतील पाण्यात गेलेल्या चार पैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. जालन्यातील वडारवाडी येथील खदानीत ही घटना घडली.फोटो काढण्यासाठी आलेले चारही जण पाण्यात उतरुन फोटो काढू लागले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं चार पैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.16 वर्षीय सिद्धार्थ हरबळे आणि 18 वर्षीय जस्मित रेहाल अशी मयत झालेल्या दोघांची नाव आहेत.यातील दोघांना पोहता येत असल्यानं त्यांचा जीव मात्र वाचला आहे.ही घटना आसपासच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.दरम्यान तालुका पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. बाईट |अमोल जाधव, स्थानिक नागरीक
4
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 13, 2025 10:49:20
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पंचनामे प्राप्त होताच शेत नुकसानीची संपूर्ण मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यात घरांचे व शेतीचे नुकसान झालेल्यांनाही मदत देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात यापूर्वी आदिवासींचा विचार कधीही झाला नव्हता तो आता मोदीजी च्या सरकारमध्ये झाला आहे. असेही त्यांनी सांगितले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ यावेळी झाला.. बाईट: देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 13, 2025 10:47:56
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे खासदार संजय रावतांवर सडकून टीका LIVE LINK ((( https://www.facebook.com/share/v/1C486DbfB9/ ))) ज्योती वाघमारे ऑन प्रणिती शिंदे --- 15 वर्ष आमदार राहिलेल्या, ज्यांचे वडील मुख्यमंत्री राहिले, केंद्रीय गृहमंत्री राहिले त्यांनी सत्ता असताना चांगला काम केलं असतं तर आज एवढा राग येण्याचं कारण नव्हतं आधी आपण सत्तेत असताना काय काम केली हे प्रणिती ताईंनी स्वतःला विचारलं पाहिजे केवळ प्रसिद्धीमध्ये राहण्याचा देशाच्या बांधवाचा, सैन्याचा अपमान करायचा ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायचं राहुल गांधीना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची विधाने करायची त्यांनी थांबावावं ज्या भागात 15 वर्ष तुम्हीच आमदार होता तिथं आज घराघरात पाणी घुसलं ज्या भागात लोकप्रतिनिधी होता तिथं शौचालाय नाहीत आपण स्वतः काय केलं हे आधी तपासाव मग हा आकांडतांडव करावा आम्ही या आकांडतांडवला आम्ही जास्त महत्व देतं नाही बाईट - ज्योती वाघमारे ( live Link )
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 13, 2025 10:07:33
2
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 13, 2025 09:52:17
Kolhapur, Maharashtra:Kop Trafic Issue Feed:- Live U ANC:- कोल्हापूर शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बाहेरून आलेले पर्यटक असो वा शहरवासीयांना गाड्या पार्क करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे पर्यटकांसह कोल्हापूरकर हैरान झालेत. जिथे जागा दिसेल गाडी लावली तर लगेच ट्राफिक पोलीस कारवाई करून दंड आकारतात. अशा परिस्थितीत गाड्या लावायच्या कुठं असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत. त्यातच आता 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवामुळे राज्य आणि देशभरात मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापुरात दाखल होतात. अशावेळी कोल्हापूर प्रशासन पार्किंगचे नियोजन कसं करणार हा खरा सवाल आहे. Byte:- संतोष सरनोबत, पर्यटक Byte:- राकेश तटकरी, कोल्हापूरकर
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 13, 2025 09:07:09
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1309ZT_CHP_FLOOD_RAIN_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात रोज रात्री मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण- शहरी भागात पूरस्थिती, धरणाची सर्व दारे एक मीटरने उघडल्याने ईरई-वर्धा नदी फुगली, ग्रामीण भागातील कित्येक मार्ग बंद      अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात रोज रात्री मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण- शहरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.  चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारे एक मीटरने उघडल्याने ईरई-वर्धा नदी फुगली आहे. ग्रामीण भागातील कित्येक मार्ग बंद झाले आहेत. आजवर जिल्हा वार्षिक सरासरीच्या 102% एवढा पाऊस पडून गेलाय. जिल्ह्यातील दोन मोठे आणि आठ सिंचन प्रकल्प 100% भरले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 15 पैकी 3 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. चंद्रपूर शहराच्या बाहेरच्या पठाणपुरा भागातील जमनजट्टी  मार्ग पुराच्या पाण्याने ठप्प झाला असून या पुढच्या भागातील स्मशानभूमी पाण्यात बुडाली आहे. जिल्ह्याच्या वरच्या भागात असलेल्या वरोरा ,भद्रावती तालुक्यातही वर्धा नदीच्या पाण्याने पात्र सोडल्याने वरोरा तालुक्यातील सोईट मोठ्या पुलावर पाच फूट पाणी आल्याने  यवतमाळ मार्ग ठप्प झाला आहे. या भागात निमसडा गावातील शाळेत जाणारे विद्यार्थी अडकल्याने त्यांची तात्पुरती व्यवस्था खाजगी वीज केंद्र परिसरात करण्यात आली आहे. याशिवाय चिमूर भागातही कित्येक अंतर्गत मार्ग बंद आहेत. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
3
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 13, 2025 09:06:56
kolhapur, Maharashtra:नागपूर:- *नागपूरच्या समता नगर परिसरात स्थानिक नागरिकांकडून खड्ड्यांचा 'वाढदिवस' साजरा करून अनोख्या पद्धतीने आंदोलन*! गेल्या एका वर्षापासून रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी मिळून या खड्ड्यांचा "पहिला वाढदिवस" साजरा केला. यावेळी खड्ड्यांवर केक कापण्यात आला, मेणबत्त्या पेटवण्यात आल्या आणि पोस्टर-बॅनरद्वारे प्रशासनाकडे जबाबदारी पार पाडण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या, पण संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचते, ज्यामुळे रस्ते अपघात होतात. अनेक दुचाकीस्वार आधीच जखमी झाले आहेत. 2c ला shots आणि बाईट जोडले आहे ---- नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. बाईट आंदोलक
6
comment0
Report
Advertisement
Back to top