Back
चंद्रपुर में रातोंरात मुसलाधार बारिश: बाढ़ का कहर
AAASHISH AMBADE
Sept 13, 2025 09:07:09
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1309ZT_CHP_FLOOD_RAIN_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात रोज रात्री मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण- शहरी भागात पूरस्थिती, धरणाची सर्व दारे एक मीटरने उघडल्याने ईरई-वर्धा नदी फुगली, ग्रामीण भागातील कित्येक मार्ग बंद
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात रोज रात्री मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण- शहरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारे एक मीटरने उघडल्याने ईरई-वर्धा नदी फुगली आहे. ग्रामीण भागातील कित्येक मार्ग बंद झाले आहेत. आजवर जिल्हा वार्षिक सरासरीच्या 102% एवढा पाऊस पडून गेलाय. जिल्ह्यातील दोन मोठे आणि आठ सिंचन प्रकल्प 100% भरले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 15 पैकी 3 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. चंद्रपूर शहराच्या बाहेरच्या पठाणपुरा भागातील जमनजट्टी मार्ग पुराच्या पाण्याने ठप्प झाला असून या पुढच्या भागातील स्मशानभूमी पाण्यात बुडाली आहे. जिल्ह्याच्या वरच्या भागात असलेल्या वरोरा ,भद्रावती तालुक्यातही वर्धा नदीच्या पाण्याने पात्र सोडल्याने वरोरा तालुक्यातील सोईट मोठ्या पुलावर पाच फूट पाणी आल्याने यवतमाळ मार्ग ठप्प झाला आहे. या भागात निमसडा गावातील शाळेत जाणारे विद्यार्थी अडकल्याने त्यांची तात्पुरती व्यवस्था खाजगी वीज केंद्र परिसरात करण्यात आली आहे. याशिवाय चिमूर भागातही कित्येक अंतर्गत मार्ग बंद आहेत. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 11:37:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 11:36:070
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 13, 2025 11:07:240
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 11:01:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 10:51:223
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 10:49:322
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 13, 2025 10:49:200
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 10:47:561
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 10:31:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 13, 2025 10:20:132
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 10:07:332
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 09:52:172
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 09:09:247
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 09:06:566
Report