Back
राजस्थानचे राज्यपाल म्हणतात: बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी 16 भाषांचा अभ्यास आवश्यक!
SMSATISH MOHITE
FollowJul 15, 2025 07:03:50
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_Language
Feed on - 2C
--------------------------
Anchor - बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या असे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. काल नांदेड मधील नेताजी सुभाषाचंद्र बोस म्हविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तिसरी भाषा नको म्हणता असा सवालाही हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना जेव्हढं शिक्षण घेता येतं ते घ्यावे त्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असे राज्यपाल बागडे म्हणाले.
Sound Byte - हरिभाऊ बागडे - राज्यपाल राजस्थान
------------------
1
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowJul 15, 2025 11:39:01Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, मालेगाव*
nsk_protest
feed by 2C
vidoe 5
-
Anc: मालेगावात बनावट जन्म दाखला प्रकरणी मालेगावातील मुस्लिम बांधवांना रोहिंग्या बांगलादेशी ठरवून विनाकारण मुस्लिम बांधवांवर अन्याय करत आहे म्हणून मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे माजी आमदार असिफ शेख, भाजी नगरसेवक नुसतं डिग्निटी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले... आंदोलकांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले...
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 15, 2025 11:38:45Akola, Maharashtra:
Anchor : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सम्राट अशोक सेनेने जाहीर निषेध केलाय...अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सम्राट अशोक सेना व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी
संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविला..यावेळी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत अशा घटना पुन्हा घडू नये , यासाठी प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना टाळाव्या अशी मागणी करण्यात आलीय..
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 15, 2025 11:07:12Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - तासगावच्या वज्रचौंडे मध्ये
शेतकरयांनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी बंद पाडली..
अँकर - सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विरोध कायम आहे.तासगाव तालुक्यातल्या वज्रचौंडे या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी शक्तीपीठची मोजणी बंद पाडली आहे.नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी प्रशासन आणि पोलीस हे वज्रचौंड गावामध्ये सकाळी दाखल झाले होते,मात्र शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोजणीला तीव्र विरोध केला.यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मध्ये वादावादीचा प्रकार देखील घडला,
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाला मोजणी थांबवावी लागली आहे,तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी घेतलेली आहे.
बाईट - महेश खराडे - जिल्हाध्यक्ष - स्वाभिमानी शेतकरी संघटना,सांगली.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 15, 2025 11:06:59Ambernath, Maharashtra:
मुरबाड मध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित
जागेला योग्य मोबदला द्या शेतकऱ्यांची मागणी
Murbad farmer
Anchor मुरबाड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 61 च्या कल्याण माळशेज घाट रस्ताच्या रुंदीकरणाच काम सुरू आहे. मात्र या भूसंपादनात बाधित
शेतक-यांच्या वरील अन्याया विरोधात मुरबाड टोकावडे येथे बाधीत शेतकरी संघर्ष समिती कडून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. म्हणाला आमच्या जागेचा मोबदला द्या आणि नंतरच आमच्या जागेत रस्ताचे काम करावे या मागणीसह रस्ता बाधीत शेतकऱ्यांनी महत्वाच्या आठ मागण्याही त्यांनी केल्या आहेत. या उपोषणाला अनेक सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 11:06:37Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_GIRL_SUICIDE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: माझ्या सोबत फोन वर बोल म्हणत वेळोवेळी दबाव टाकल्याने वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील अंबापूर गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.या प्रकरणी मंगरूळपीर पोलीस स्टेशन मध्ये पाल्याने दिलेल्या तक्रारी नंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आरोपी आतिश चवरे , अमोल टोणे यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी एक अनोळखी व्यक्ती फरार असून पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.गेल्या सहा महिन्या पासून पीडित मृतक युवतीला फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकत धमकी देत होते.आरोपींनी 'तू आमच्याशी फोनवर बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारू,' अशी धमकी देत पीडित मुलीच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने दोन दिवसा पूर्वी आत्महत्या केली असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.घटनेचा तपास सुरु असल्याचे मंगरूळपीर पोलीसांनी सांगितले..
बाईट: वडील
बाईट : किशोर शेळके,पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, मंगरूळपीर,वाशिम.
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 11:06:00Yeola, Maharashtra:
अँकर:- भटक्या विमुक्त समाजाला घरकुल योजना, रेशन कार्ड सह इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येवल्यातील भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
बाईट :शरद राऊळ
बाईट: धीरज परदेशी
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 15, 2025 11:05:49Nashik, Maharashtra:
nsk_malegaon
feed by 2C
vidoe 5
Anchor - नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी गुन्हेगारांना आळा बसावा या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका पोलिस ठाणे यांनी केलेल्या कारवाईत चोरीच्या साडेपाच लाख रुपये किमतीच्या १० दुचाकी, १ पिस्तूल व दरोड्याचे विविध साधने हस्तगत करत वेगवगेळ्या गुन्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.. यातील समाधान मोरे, सागर मोरे या चोरट्यांनी मालेगाव, चांदवड, जायखेडा, वडनेर खाकुर्डी या परिसरातून ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यात सायने शिवारात गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे व धारधार चाकू बाळगणाऱ्या दरेगाव येथील रोहन कुंवर या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले..
*बाईट - प्रीतम चौधरी, पोलिस निरीक्षक, मालेगाव तालुका*
1
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 15, 2025 11:05:35Nashik, Maharashtra:
nsk_kongress
feed by 2C
vidoe 5
अँकर - नाशिकमध्ये महाविकास आघाडीला गळती सुरुच
आहे. गेल्या काही दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेला अनेकांनी राम राम ठोकला होता आणि आज भारतीय राष्ट्रीय अदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव वैभव ठाकूर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा हात सोडला असून सायंकाळी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि सरपंच देखिल राष्ट्रवादी सोबत जाणार आहेत. दुपारी ईगतपुरीतून आपल्या वाहनांचा ताफा आणि अजित दादांचं भव्य पोस्टर्स झळकत ठाकूर यांचा ताफा मुंबईकडे निघाला असून पक्ष जी जबाबदारी देईल ति आपण योग्यरित्या पार पाडू अशी प्रतिक्रिया वैभव ठाकूर यांनी दिली आहे.
बाईट - वैभव ठाकूर, प्रदेश सचिव, राष्ट्रीय अदिवासी काँग्रेस
4
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 15, 2025 11:04:30Belagavi, Karnataka:
Story :- Bel Kannad Sakti
Feed :- 2C
Anc :- बेळगावसह सीमा भागातील 865 खेडी मराठी बहुभाषिक असल्यामुळे या भागात कन्नड भाषा सक्तीची करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. तेंव्हा कन्नड सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी बेळगाव मधील मराठी भाषिकांनी केली आहे. कन्नड सक्ती मागे घेतली नाही तर बेळगाव मधील मराठी भाषिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देखील देण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सदस्यांनी बेळगावचे महापौर मंगेश पवार याची भेट घेत निवेदन दिले. मागील आठवड्यात पार पडलेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मराठीसह इतर भाषेतील फलक तसेच शासकीय कामकाजात कन्नड सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सीमा भागातील मराठी जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Byte :- शुभम शेळके, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 15, 2025 11:04:11Nashik, Maharashtra:
नाशिक
- *भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस*
- *मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाठवली मानहानी ची नोटीस*
- मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे याना नोटीस जारी
- निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर viral केलेले सगळे विडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी
- मराठी लोकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी उर्दू,तामिळ आणि तेलगू भाषिकांना मारून दाखवण्याचे केले होते वक्तव्य
- 7 दिवसात नोटीस ला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार आणि दावा दाखल होणार
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 15, 2025 11:01:04Kalyan, Maharashtra:
डोंबिवली मधील रस्त्यात साचलेल्या पाण्यात बसून अनोळखा आंदोलन
पेंढारकर कॉलेज महाविद्यालय बाहेरील रस्त्यावर पाणी साचून तळे झाल्याने म्हात्रे यांनी केले आंदोलन....
साचलेल्या पाण्यात बसून आणि स्विमिंगची ऍक्शन करत उपरोधीक आणि अनोखे आंदोलन केले...
Anc..डोंबिवली मधील पेंढारकर कॉलेज येथील काँक्रिट रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासून पाणी साचत आहे, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिक आणि प्रवासी यांना याच साचलेल्या पाण्यात मार्ग काढावा लागत आहेत. सदर रस्त्याचे काँक्रिट करण्यात आले होते, मात्र तो रस्ता योग्य रित्या न केल्याने येथे पाणी साचत आहे. अखेर 27 गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी या साचलेल्या घाण पाण्यात बसून आणि स्विमिंगची ऍक्शन करत उपरोधीक आणि अनोखे आंदोलन केले
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 15, 2025 11:00:53Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, सटाणा ( नाशिक )*
- नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तरुणाची पुणे येथे हत्या...
- बागलाणच्या ठेंगोडा गावातील ग्रामस्थांनी रात्री काढला कॅन्डल मार्च तर सकाळी काढला निषेध मोर्चा...
Anc: बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील तरुण आर्यन साळवे हा त्याच्या मामाकडे पुणे येथील धनकवडीमधील आंबेगाव पठार येथे राहण्यासाठी आलेला होता. रात्री तो साई सिद्धी चौकात गेला होता. चौकातील एका पानटपरीवर तो पान खाण्यासाठी गेला. त्याच वेळी आर्यनचा धैर्यशील मोरे यांच्याशी वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोरेने थेट कोयताच काढला.
धैर्यशील मोरेने रागात कोयत्याने आर्यन साळवेवर सपासप वार केले. कोयत्याचा वार आर्यनने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा वार हातावर झाला आणि त्याची बोटं तुटली. त्यानंतर मोरेने कोयता त्याच्या डोक्यात मारला. त्यात आर्यन गंभीर जखमी झाला. कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला नंतर आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धैर्यशील मोरेला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ ठेंगोडा गावातील ग्रामस्थांनी रात्री कॅन्डल मार्च काढला तर सकाळी निषेध मोर्चा काढत आरोपीवर कठोर कारवाई करावी करावी अशी मागणी देखील करण्यात आली.
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 15, 2025 10:07:40Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- पाऊस
फीड 2C
Anc- अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तब्बल 25 दिवसाच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे मान्सूनचा पाऊस एक आठवडाभर झाल्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खरिपाची पेरणी केल्यानंतर 25 दिवसापासून पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती मात्र आज जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाला आहे त्याबरोबरच राहिलेल्या खरिपाच्या प्रेरणांना देखील आता गती मिळणार असून जिल्ह्यात राहिलेली खरिपाची 30% पेरणी पूर्ण होईल
4
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 15, 2025 09:42:03Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_ghodke_byte
*सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याविरोधातील तक्रार मतभेद विसरून मागे घेतले.*
अँकर:
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तक्रारदार गजू घोडके यांनी सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. सुनील बागुल आणि मामा राजवडे हे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे हिंदू धर्मासाठी हिंदू राष्ट्रासाठी कोणी आमच्यासोबत येत असेल तर आम्ही मतभेद विसरून जातो. आमच्यात काही मतभेद आहे ते विसरून मी हे सगळे गुन्हे मागे घेतले आहे. मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतो वेळप्रसंगी आम्ही जीव द्यायला देखील राष्ट्रासाठी तयार असतो. संघाची प्रतिमा ही संयमी आहे ही बाब चुकीची वेळप्रसंगी आम्ही गोरक्षा हत्या रोखत असताना दोन खुनाच्या जबाबदाऱ्या देखील याआधी घेतली आहे त्यामुळे मी सर्व मतभेद विसरून हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे तक्रारदार गजू घोडके यांनी म्हटले आहे.
बाईट: गजु घोडके, तक्रारदार.( पॉइंटर)
- *गुन्हे मागे घेण्यापेक्षा आम्ही धर्माचे काम करतो त्यामुळे सामाजिक, राजकीय काम करताना मतभेद होत असतात
- आमच्या परिवारावर आले त्यावेळी आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले
- सर्व गोष्टी बोलता येत नाही , हिंदू राष्ट्र बनावे ही इच्छा सुनील बागुल यांच्यासारखे लोक पक्षात येत आहेत म्हणून भूमिका घेतली
- ते आता कुठल्या पक्षात जातील महित नाही
- मी भाजपचे नाही rss चे काम करत असतो
- राजकीय सूडबुद्धीने काही नाही मतभेद असतात त्यातून होते
- हल्ला झाला आले सुनील बागुल यांच्या संदर्भात मी पोस्ट टाकली त्यातून क्लेश निर्माण झाला
- संघाची प्रतिमा शांत प्रिय नाही संघ सांगतो आमच्याकडे यायचे असेल तर वेळ प्रसंगी मरावं ही लागेल
- संघ हा शांत प्रिय ही चुकीची गोष्ट
- गो रक्षा करत असताना दोन हत्या झाल्या त्याची जबाबदारी आम्ही घेतली होती.
- धर्मासाठी आम्ही जीव द्यायला ही तयार ...
-
13
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 09:41:18Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_RAIN_15JULY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:मागील दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात वातावरण उघडं होतं.मात्र,आज पुन्हा मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.या नव्या पावसामुळे आधीच पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालं असलं, तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही रखडल्या आहेत.शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पेरणीचे काम थांबले असून, यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे. वेळेवर पेरणी करता न आल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
0
Share
Report