Back
प्रवीण गायकवाड हल्ला: सम्राट अशोक सेनेचा तीव्र निषेध!
JJJAYESH JAGAD
FollowJul 15, 2025 11:38:45
Akola, Maharashtra
Anchor : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सम्राट अशोक सेनेने जाहीर निषेध केलाय...अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सम्राट अशोक सेना व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी
संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविला..यावेळी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत अशा घटना पुन्हा घडू नये , यासाठी प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना टाळाव्या अशी मागणी करण्यात आलीय..
1
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 15, 2025 18:00:39Parbhani, Maharashtra:
अँकर- पुणे येथून परभणीकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करत असलेल्या १९ वर्षीय विवाहितेची झाली,प्रसुती नंतर ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून पुरुष जातीचे अर्भक महामार्गावर फेकले. ही घटना तालुक्यातील देवनांद्रा शिवारात काल घडली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतलय. पाथरी सेलू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वर शहरापासून दोन किमी अंतरावर देवनांद्रा शिवारात हा प्रकार उघडकीस आला. शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने सदर प्रकार पाहिल्या बरोबर ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. गाडीतून प्रवास करणारी १९ वर्षीय तरुणी आणि २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधितां विषयी
मिळालेली अधिक माहिती अशी की, सदर दोघांनी अंतरजातीय प्रेम संबंधातून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे पुणे येथे कामाला होते. सोमवारी तरुणीच्या पोटात वेदना होत असल्याने पुण्याहून परभणीला खाजगी ट्रॅव्हल्सने येत होते. ट्रॅव्हल्समध्ये या तरुणीने बाळाला जन्म दिला. सदर बाळ मृत जन्मले,त्यानंतर हे अर्भक चालत्या गाडीतून महामार्गावर फेकून दिले होते. संबंधित दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 94 आणि 3(5) नुसार पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 15, 2025 17:02:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मराठी भाषेचे नावाखाली दादागिरी करू नये,दादागिरी करायची असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा - मंत्री रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला..
अँकर - मराठी भाषेच्या नावाखाली राज ठाकरेंनी दादागिरी करू नये,दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना आर्मी मध्ये पाठवावे,असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना दिला आहे.मराठी ही आपली भाषा आहे,पण एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी बोलण्याबाबत सक्ती करू नये,देशाच्या अनेक राज्यात मराठी बांधव राहतात,त्यामुळे राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या नावाखाली कोणावरही दादागिरी करू नये आणि दादागिरी करायची तसे तर त्यांच्या मनसैनिकांना आर्मी मध्ये पाठवावं असा खोचक सल्ला मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला आहे की सांगलीच्या वाळवा येथे पण मोशन नागनाथांना नायकोडी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
साऊंड बाईट - रामदास आठवले - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 15, 2025 16:34:00Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जयंत पाटलांनी महायुती सोबत यावं, आपण मध्यस्थी करू - मंत्री रामदास आठवलेंची जयंत पाटलांना ऑफर..
अँकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती मध्ये येण्याची जाहीर ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे,जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत.त्यांनी राजीनामा दिला असेल तर आणि विकास करायचा असेल, तर सत्ते सोबत आले पाहिजे.राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुती मध्ये आणायला तयार आहे,असे देखील मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे, ते सांगलीच्या वाळवा येथे पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती निमित्त आयोजित समारंभ प्रसंगी बोलत होते.
बाईट - रामदास आठवले - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.
11
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 15, 2025 16:04:53Nashik, Maharashtra:
Breaking News -
- नाशिकच्या वडाळारोडवर भीषण अपघात
- अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू
- आयशर ट्रकने विद्यार्थ्यांनीला चिरडले
- ट्रक चालकाने मद्यपान केल्याचा प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं
- मुंबई नाका पोलिसांकडून तपास सुरू
14
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 16:04:46Yeola, Maharashtra:
येवला परिसतील हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिलेला पोलिसांच्या विशेष पथकाने घेतले ताब्यात
पकडलेली महिला बांगलादेश असल्याची पोलीस सूत्रांची माहिती...
अँकर:-भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नाशिकच्या येवला शहरात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक बांगलादेशी महिला येवला शहर व परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करून अवैधरित्या देहविक्री सारखे व्यवसाय करण्यास आली असून पोलिसांनी छापा टाकून या महिलेला ताब्यात घेतलं दरम्यान सदरची महिला ही बांगलादेशी असून तिच्या ताब्यात मेड इन बांगलादेश असलेला एक फोन देखील मिळून आला आहे त्या फोनमध्ये असलेल्या कागदपत्रावरून ही महिला बांगलादेशी असल्याचा निष्पन्न झाला आहे दरम्यान आणखी कोणी आहे का याचा पोलीस शोध घेत आहे.
14
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 15:33:10Yeola, Maharashtra:
अँकर:-येवला शहर व परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करून अवैधरित्या देहविक्री सारखे व्यवसाय करणाऱ्या एका परप्रांतीय महिलेला रायते शिवारातून मालेगाव पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे यावेळी दोन पंचा समक्ष या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 15, 2025 15:31:56Kalyan, Maharashtra:
मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पडणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
झटपट पैसे मिळवण्यासाठी हॉटेल कर्मचारी बनला चोर
परेश घावरी असे चोरट्याचे नाव
Anchor :- सकाळी मोकळ्या हवेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील लाखोंची चैन हिसकावून पळून गेलेल्या चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. परेश घावरी असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून त्याने चोरी केलेला एक लाख 80 हजाराची सोन्याची चैन, दोन महागड्या दुचाकी असा साडे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . परेश कडून डोंबिवली ,उल्हासनगर येथील तीन उकल करण्यात आली आहे.परेश घावरी एका हॉटेलमध्ये काम करत होता मात्र झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने चोरीचा मार्ग पत्करला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
Byte :- सुहास हेमाडे ( एसीपी)
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 15:30:14Dhule, Maharashtra:
Anchor - कौटुंबिक वादातून मित्राची हत्या केल्याप्रकरणी धुळे सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धुळे शहरातील मिल परिसरात राहणाऱ्या निखिल पाटील याचा त्याचा मित्र मयूर सोवत वाद झाला होता. या वादात झालेल्या मारहाणीत निखिल पाटील यांचा मृत्यू झाल्याने धुळे शहर पोलीस ठाण्यात तिघां विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून प्रकरणी शवविच्छेदन अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे याच्या आधारावर जिल्हा सत्र न्यायालयाने मयूरसह तिघांना दोषी ठरवत प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 15:05:36Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ 18 तारखेला अक्कलकोट बंदची हाक
- संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकारांनी मराठा समाज आक्रमक
- मराठा समाजाच्या वतीने 18 तारखेला अक्कलकोट तालुका बंदची हाक
- दोशी आरोपींवर जोपर्यंत मोक्का लागणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा
- मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या हाणामारीनंतर समाजातील नेत्यांची सारवा सारव
बाईट -
माऊली पवार ( मराठा समन्वयक )
बाईट -
दिलीप कोल्हे ( मराठा क्रांती मोर्चा )
14
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 15:01:55Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे शहराचे एम आय एम चे माजी आमदार डॉक्टर फारुक शहा यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे पार पडला. प्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री हसनमुश्री यांची उपस्थिती होते. शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने एम आय एम ला मोठा धक्का बसला आहे. 2019 ला धुळे शहर विधानसभा मतदार संघातून फारुक शहा विजयी झाले होते. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष धुळे शहर विधानसभा निकालने वेधून घेतला होतं. धुळे शहरात अल्पसंख्यांक भागात राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकद वाढली असून, धुळ्यात भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहा यांच्या प्रवेशामुळे युतीत राहून भाजपाला शह दिल्याचे बोलले जातं आहे. या पक्षप्रवेशाचा महानगरपालिका निवडणूकितही परिणाम दिसून येणार आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 15, 2025 15:01:28Ambernath, Maharashtra:
कात्रप परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली
रस्त्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली
शेकडो लिटर पाणी वाया , नागरिकांचा रस्ता बंद
Bdl water pipe line
Anchor बदलापूर शहरातील कात्रप परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेलं , या परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबी ने रस्ता खणत असताना ही पाईपलाईन फुटली, त्यामुळे सर्व पाणी हे रस्त्यावर आल्याने पूर्णतः रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे अष्टविनायक संकुलाकडे जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता बंद झाला त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही पाईपलाईन फुटल्याचा नागरिकांचे म्हणन आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
1
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 14:35:10Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मराठा समाजाच्या बैठकीत रोहित फावडे यांच्या भाषणादरम्यान उडाला गोंधळ
- वकील रोहित फावडे यांच्या भाषणानंतर उडाला गोंधळ..
- जन्मजयराजे भोसले, अमोल राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे कार्यकर्त्यांनी केला गोंधळ..
- रोहित फावडे याच्या भाषणाच्या मुद्द्यांवरून मराठा समाजाच्या बैठकीत फिल्मी स्टाईल हाणामारीचा प्रकार...
- जन्मजेयराजे भोसले, अमोल राजे भोसले यांना महाराज म्हणणार नसल्याचाही केला भाषणात उल्लेख..
- अमोलराजे भोसले यांनी आरोपीला पोलीस गाडीत घातल्यानंतर राजे भोसले यांचा मुलगा काय बोलत होता असाही सवाल रोहित फावडे यांनी उपस्थित केला..
- रोहित फावडे यांच्या भाषणानंतर संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते आणि जन्मजय राजे भोसले कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्यानंतर मारहाण पर्यंत गेलं प्रकरण..
Sound bite : रोहित फावडे, वकील
*( याच व्यक्तीच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला )*
14
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 14:34:23Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग- सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत झाली हाणामारी
- सोलापुरातील प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ..
- स्वामी समर्थ अन्नछत्र महामंडळाचे अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांचे समर्थक आणि संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांमध्ये हाणामारी..
- अमोल राजे भोसले यांच्या विरोधात एकेरी उल्लेख केल्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांकडून फिल्मी स्टाईल हाणामारी...
- जन्मजय राजे भोसले यांनी बैठकीच्या येथून घेतला काढता पाय..
- प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व समाजाच्या बैठकीचे करण्याचा होता आयोजन..
Byte : जन्मजय राजे भोसले, स्वामी समर्थ अन्नछत्र अध्यक्ष
Byte : माऊली पवार , मराठा समन्वयक
4
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 15, 2025 14:31:10Beed, Maharashtra:
बीड:मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झालेल्या नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार..! महंत शिवाजी महाराजांचा ट्रस्टवरच्या दोन पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप...!
Anc:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडावर भव्य स्वरूपात पार पडला होता. त्यानंतर नारायण गडाची राज्यात चर्चा झाली. आता याच नारायण गडावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय..
ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महाराजांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी केली. मला प्रचंड नाहक त्रास दिला. मी अस्वस्थ झालो होतो. दोन दोन दिवस या तणावात असताना मी जेवण देखील केले नाही. गडावर पंचवीस कोटीच्या विकास कामाचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधी दिवंगत नेते विनायक मेटे यांनी आणला होता. आणि याचेच टेंडर आम्हाला द्या. म्हणून या दोन पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यांना टेंडर मिळालं नाही म्हणून यास दोन पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी करत कोर्टात चुकीची माहिती दिली. असा आरोप देखील महंत शिवाजी महाराजांनी केला आहे.
बाईट: महंत शिवाजीमहाराज, नारायणगड
दरम्यान या संपूर्ण गंभीर आरोपावर ट्रस्टचे सदस्य बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. या उलट महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिले याचे सर्व पुरावे व्हिडिओ ऑडिओ यासह आम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा ट्रस्टीचे सदस्य बळीराम गवते यांनी केला आहे.
बाईट: बळीराम गवते - आरोप झालेले सदस्य
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण गडावरच आता जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यानंतर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. आता या गैर व्यवहार प्रकरणात नेमकी काय चौकशी होईल याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे..
3
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 15, 2025 14:31:00Beed, Maharashtra:
बीड: मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झालेल्या नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार..! महंत शिवाजी महाराजांचा ट्रस्टवरच्या दोन पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप...!
Anc:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडावर भव्य स्वरूपात पार पडला होता. त्यानंतर नारायण गडाची राज्यात चर्चा झाली. आता याच नारायण गडावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय..
ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महाराजांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी केली. मला प्रचंड नाहक त्रास दिला. मी अस्वस्थ झालो होतो. दोन दोन दिवस या तणावात असताना मी जेवण देखील केले नाही. गडावर पंचवीस कोटीच्या विकास कामाचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधी दिवंगत नेते विनायक मेटे यांनी आणला होता. आणि याचेच टेंडर आम्हाला द्या. म्हणून या दोन पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यांना टेंडर मिळालं नाही म्हणून यास दोन पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी करत कोर्टात चुकीची माहिती दिली. असा आरोप देखील महंत शिवाजी महाराजांनी केला आहे.
बाईट: महंत शिवाजीमहाराज, नारायणगड
दरम्यान या संपूर्ण गंभीर आरोपावर ट्रस्टचे सदस्य बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. या उलट महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिले याचे सर्व पुरावे व्हिडिओ ऑडिओ यासह आम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा ट्रस्टीचे सदस्य बळीराम गवते यांनी केला आहे.
बाईट: बळीराम गवते - आरोप झालेले सदस्य
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण गडावरच आता जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यानंतर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. आता या गैर व्यवहार प्रकरणात नेमकी काय चौकशी होईल याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे..
2
Share
Report