Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

सिंधुदुर्ग में नवरात्र: 171 मूर्तियों की प्राणप्रतिष्ठा आज

UPUmesh Parab
Sept 22, 2025 07:33:57
Oros, Maharashtra
हिंदू परंपरेनुसार गणेशोत्सवानंतर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे नवरात्रोत्सव. तळकोकणात नवरात्रोत्सव हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी सिंधुदुर्गात 171 देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यात 131 सार्वजनिक तर 40 खाजगी ठिकाणी मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. पुढील 9 दिवस तळकोकणात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल पहायला मिळणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी Wkt --- उमेश परब, सिंधुदुर्ग
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Sept 22, 2025 10:21:50
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Pankaja Feed on - 2C ----------------------- Anchor - दरवर्षी मी रेणूका मातेच्या दर्शनासाठी येते. रेणुका माता माझी कुलदैवत आहे त्यामूळे मुलासह दर्शनाला आले अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. Byte - पंकजा मुंडे - पर्यावरण मंत्री ----------------------- On - आरक्षण संकट - आरक्षनाचे संकट मानव निर्मित आहे. मी देवाचा धावा करेन पन यासाठी नाही, अतिवृषीमुळे शेतक-यांचं मोठ नुकसान झालं आहे. त्या लोकांना धीर द्यावा. त्यांना मदत करण्यासाठी सरकारला देवीने शक्ती द्यावी हे महत्त्वाचं आहे बाकी आपण माणसं मानस भांडत राहणार , त्यासाठी देवाला का त्रास द्यायचा अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. On बंजारा आरक्षण - त्यांच्या मागणीत न्याय आहे .. त्यांना वाटतं गॅझेट एका समाजाला लागु होत असेल तर आम्हालाही लागू कराव , ही त्यांची मागणी आहे . जे होइल ते संविधानिक पद्धतीने होईल .. भाषण करुन, वक्तव्य करुन काही होणार नाही .. जे संवैधानिक आहे तेच होणार .. त्यांची मागणी रास्त आहे... On धनंजय मुंडे मला संधी द्या - मी त्यावर काय बोलणार, त्या दोघात बोलणे झाले आहे. ------------------
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 22, 2025 10:21:04
Vasai-Virar, Maharashtra: Date-22sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI CAR Feed send by 2c Type -AV Slug- वसईच्या कळंब समुद्रात भरतीवेळी स्कॉर्पिओ कार अडकली किनाऱ्यावर कार उतरवणे कारमालकाच्या अंगलट अडकलेली गाडी गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश वारंवार ग्रामस्थांच्या सूचनेनंतरही पर्यटकांचा हुल्लडपणा अँकर - नालासोपारा पश्चिम येथील कळंब समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या लाटांमध्ये एका पर्यटकाची चारचाकी गाडी समुद्रात अडकल्याची घटना घडली आहे...समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकाने आपली गाडी किनाऱ्याजवळ उभी केली होती. मात्र भरतीचे पाणी वेगाने वाढल्याने गाडी पाण्याच्या प्रवाहात अडकली. काही वेळातच गाडी समुद्रात खोलवर वाहून गेली. ही घटना पाहताच स्थानिक ग्रामस्थ आणि अन्य पर्यटक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी रस्ते व दोऱ्यांच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोठ्या परिश्रमानंतर अखेर गाडी समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पर्यटकाचीही मोठी धावपळ झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याआधी देखील अशा प्रकारच्या घटना या किनाऱ्यावर घडल्या आहेत. ग्रामस्थांकडून वारंवार सूचना करूनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने असे अपघात वाढत चालले आहेत...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 22, 2025 10:20:43
Yavatmal, Maharashtra:दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या यवतमाळच्या दुर्गोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला असून पुढचे १० दिवस देवीचा जागर होणार आहे. साक्षात देवीच भूतलावर उतरली आहे इतका जिवंतपणा असलेल्या मुर्त्या, भव्य दिव्य मंडप, मनोहारी देखावे, रोषणाई, संपूर्ण नवरात्रात अन्नदान, आणि माताभक्तांचा उदंड उत्साह हे यवतमाळच्या दुर्गोत्सवाचे वैशिष्ट्य असून यंदाही हा वैभवी वारसा जपला जात आहे. तमाम यवतमाळवासियांसाठी श्रद्धास्थान असलेल्या हिंदुस्तानी दुर्गोत्सव मंडळाने घटस्थापने सोबतच दुर्गादेवीची स्थापना केली. भजनी मंडळ आणि फुलांची उधळण करीत मिरवणुकींद्वारे आई दुर्गेची सार्वजनिक मंडळांनी स्थापना केली. यवतमाळ मधील मूर्तिकारांनी साकारलेल्या देखण्या मुर्त्या विदर्भ व तेलंगणा मध्येही नेण्यात आल्या.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 22, 2025 10:05:08
Nanded, Maharashtra:Slug - Ned_MahurTemple Feed on - 2C ------------------------------------ Anchor - देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्हयातील माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला आज पासुन सुरूवात झाली. आज दुपारी साडे बारा वाजता घट स्थापना करण्यात आली. घट स्थापनेपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालीये. अभिषेक , कुमारिका पूजन करुन घट स्थापना करण्यासात आली. संपूर्ण मंदीर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आलीये. पहिल्या दिवशी भाविकांची देखिल दर्शनासाठी गर्दी होत आहे. नऊ दिवस माहुर गडावर नवरात्र उत्सव चालणार आहे नऊ दिवस विवीध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Byte - चंद्रकांत भोपी - विश्वस्त तथा मुख्य पुजारी Byte - भाविक Byte - भाविक ---------------------------
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 10:03:37
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव - DHARA_GHAT_TULJ घटस्थापनेने तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात. मंदिरात पुढील नऊ दिवस सुरू राहणार आई तुळजाभवानीचा जागर Anchor महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची आज विधिवत सुरुवात झाली आहे. तुळजापूरच्या मंदिरात सकाळी पारंपरिक पद्धतीने, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी-अनुष्ठानांच्या गजरात मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, भाविकांचा जयजयकार आणि 'जय भवानी… जय शिवराय' या घोषणांनी संपूर्ण तुळजापूर नगरी दुमदुमून गेली. सकाळपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून मंदिर परिसरात उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील नऊ दिवस देवीची विशेष पूजा, आरती आणि महापूजा होणार असून मंदिर समितीकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भाविकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था, रांगा व्यवस्थापन, सुरक्षा आणि आरोग्य सुविधा देखील करण्यात आल्या आहेत. शारदीय नवरात्रात देशभरातून लाखो भाविक तुळजापूरात दर्शनासाठी दाखल होणार असल्याने तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. देवीच्या जयघोषांनी नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस अतिशय मंगलमय वातावरणात सुरू झाला आहे. Byte कीर्ती किरण पुजा मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 22, 2025 09:47:35
Beed, Maharashtra:बीड : सिंदफणा धरण ओव्हरफ्लो; शिरूर कासार शहराला पुराचा वेढा, माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले... जिल्ह्यात पावसाचा हाहाकार wkt Anc : मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने शिरूर कासार तालुक्यातील महत्त्वाचं मानलं जाणार सिंदफणा धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याचा विसर्ग आता नदीमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे शिरूर शहराला नदीच्या पुराने वेढा घातला आहे..अर्धे शहर पाण्याखाली गेले आहे. तर माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाटोदा तालुक्याला देखील अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. अनेक नद्यांना पूर आला आहे.. दरम्यान सिंदाफना नदी काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी... Wkt
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 09:36:49
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव : DHARA_R2_FLOOD परंडा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर – आर्मी व NDRF कडून बचावकार्य सुरू हेलिकॉप्टर च्या साह्याने 50 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अँकर स्क्रिप्ट धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय. अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोठ्या संख्येने नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 100 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. यामध्ये एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्मी व एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने ५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र दोन गावांतील अजूनही दहा कुटुंबे अडकलेली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारी यांनी दिली आहे. दरम्यान, या पुरात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असून प्रशासन, आर्मी व एनडीआरएफचे जवान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. “आतापर्यंत ५० नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अजूनही काही कुटुंबे अडकली असून त्यांना बाहेर काढण्यासाठी आर्मी आणि एनडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.” Byte कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 22, 2025 09:36:09
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2209ZT_CHP_GST_BENEFIT ( single file sent on 2C)  टायटल:-- देशभरात जीएसटी दर कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ऑटोमोबाईल क्षेत्रात आनंदाचे वातावरण ,दुचाकी, चारचाकी शोरूम मध्ये मोठ्या संख्येत ग्राहकांची गर्दी ,कंपन्यांनी थेट कमी केलेले दर जाहीर करून किंमत केल्याने आनंदले ग्राहक अँकर:-- घटलेल्या जीएसटी चा मुद्दा ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरला आहे. आता देशात केवळ दोन जीएसटी स्लॅब राहणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात यामुळे आनंदाचे वातावरण आहे. आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त वाहन खरेदी शुभ मानली जाते. अशा स्थितीत चंद्रपूरसह राज्य व देशातील दुचाकी -चारचाकी वाहनांच्या शोरूम मध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. त्यातच कंपन्यांनी थेट जीएसटी मुळे कमी झालेले दर प्रसिद्ध केल्याने ग्राहकांना हे कमी झालेले दर निश्चितपणे माहीत झाले आहेत. परिणामी काही दुचाकी गाड्यांवर सात ते दहा तर काही चारचाकी गाड्यांवर सुमारे लाखभरांपर्यंत किंमत कमी झाली आहे.परिणामी सणांच्या काळात वाहन खरेदीसाठी मोठ्या संख्येत ग्राहक दाखल होत आहेत. याचा कंपन्या, डीलर आणि ग्राहकांना मोठा फायदा होताना दिसत आहे. बाईट १) रोहन अंजीकर, संचालक, अंजीकर आटोमोबाईल्स बाईट २),३) ग्राहक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 22, 2025 09:32:47
Latur, Maharashtra:*लातूर ब्रेकिंग.* स्किप्ट ::- तालुका कृषी अधिकाऱ्याच्या दालनातच शेतकऱ्याचा आत्महत्याची प्रयत्न. फाशी घेतात आत्महत्याचा प्रयत्न. अहमदपूर येथील घटना.... AC ::- अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकार्‍यावर कारवाई करा, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना पिक विमा द्या. मागणीसाठी लातूरच्या अहमदपूर मध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. अहमदपूर येथील तालुका कृषी अधिकार्‍याच्या दालनात चक्क निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी फाशी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान वेळीच नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने हा अनर्थ टाळला आहे. मात्र अतिवृष्टी आणि पिक विमा, या विषयाला धरून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी शेतकरी अहमदपूर तहसील कार्यालयात गेले होते.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 09:32:36
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव : DHARA_R1_FLOOD परंडा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर – आर्मी व NDRF कडून बचावकार्य सुरू हेलिकॉप्टर च्या साह्याने 50 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अँकर स्क्रिप्ट धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय. अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोठ्या संख्येने नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 100 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. यामध्ये एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्मी व एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने ५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र दोन गावांतील अजूनही दहा कुटुंबे अडकलेली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारी यांनी दिली आहे. दरम्यान, या पुरात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असून प्रशासन, आर्मी व एनडीआरएफचे जवान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. “आतापर्यंत ५० नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अजूनही काही कुटुंबे अडकली असून त्यांना बाहेर काढण्यासाठी आर्मी आणि एनडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.” Byte कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 22, 2025 09:32:27
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एका वाईनबार मध्ये काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिण्यावरून वाद झाल्याने ही मारामारी झाली. या संपूर्ण प्रकाराची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. Byte : नितीन लेव्हलकर, पोलीस निरीक्षक, जुनेशहर पोलीस स्टेशन
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 22, 2025 09:19:18
Kolhapur, Maharashtra:Kop Amababai Prasad 121 Feed:- Live U Anc:- करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईला नवरात्रोत्सवाच्या काळात विशेष नैवद्य केल जात. गेल्या तीन पिढ्यांपासून बोंद्रे कुटुंबीय हे नैवेद्य करतात. हा नैवेद्य करत असताना बोंद्रे कुटुंबीय ऋतू आणि काळानुसार देवीला आहार देतात. नवरात्रोत्सवाच्यात दरम्यान देवीला पहाटेच्या आरतीला लोणी - खडी - साखर, साडेनऊच्या आरतीला दही, पोहे, खीर दुपारी साडेबाराला महानैवद्य दिले जाते. नवरात्रोत्सव काळात आणि सणासुदीला देवीचा नैवैद्य कसा असतो हे बोंद्रे कुटुंबीय याच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play 121 Byte:- प्रियंका बोंद्रे Byte:- प्रफुल्ल बोंद्रे
5
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 22, 2025 09:05:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सीना नदीला पूर आल्याने ग्रामस्थांवर स्थलांतरित होण्याची वेळ, झी २४ तासशी बोलताना महिलेला अश्रू अनावर ( WKT ) - सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पूरस्थिती - मोहोळ तालुक्यातील पोफळी गावात नागरिकांचे स्थलांतर सुरू - घरातील संसारोपयोगी साहित्य घेऊन जाताना महिलेला अश्रू अनावर - पोफळे साखरेवाडी गावातील नागरिक सर्व उपयोगी वस्तू घेऊन स्थलांतरित होताना पाहायला मिळत आहेत - साबळेवाडी गावातील सोयाबीन, तूर, कांदा, ऊस पिकं पाण्याखाली गेली - प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम काम वेगाने सुरु याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
comment0
Report
Advertisement
Back to top