Back
राजुरा में 6853 मतदाताओं के नाम जोड़े-फिर हटाए, बड़ा विवाद
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 08:39:34
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1809ZT_CHP_RAJURA_ISSUE
( single file sent on 2C)
टायटल:-- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा केला पुढे , या खेपेस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील 6853 मतदारांची नावे आधी जोडली व नंतर वगळल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने खळबळ, काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधी याबाबत संशय व्यक्त केल्यावर प्रशासनाने ही नावे तपासून होती वगळली
अँकर:--काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा पुढे केलाय. या खेपेस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील 6853 मतदारांची नावे आधी जोडली व नंतर वगळल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधी याबाबत संशय व्यक्त केल्यावर प्रशासनाने ही नावे तपासून वगळली होती.
व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणी करीता अर्ज प्राप्त झाले होते. अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही नावे वगळण्यात आली. मात्र या व्यतिरिक्त या क्षेत्रात किती बोगस मतदार आहेत या संदर्भात कुठलाही खुलासा झालेला नसल्याचे या भागात पराभूत झालेले उमेदवार व या क्षेत्राचे माजी आमदार काँग्रेस नेते सुभाष धोटे यांनी म्हटले आहे.
बाईट १) सुभाष धोटे, माजी आमदार, काँग्रेस, राजुरा
व्ही. ओ. २) दरम्यान चुकीच्या पध्दतीने नोंदणी केलेल्या 6853 मतदारांच्या नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आलेला नाही. दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पोलिस विभागाला दिले. संशयास्पद नोंदणी अर्जाची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. या सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून सदरचे सर्व अर्ज नाकारण्यात आले असून त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. ऑनलाईन सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे फॉर्म ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बाईट २) विनय गौडा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर
व्ही. ओ. ३) राहुल गांधी यांनी गेले काही दिवस देशात मतचोरी संदर्भात मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात आता राजुरा क्षेत्राचाही उल्लेख केल्याने या पुढच्या काळात हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 18, 2025 10:16:370
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 10:00:410
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 09:53:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:52:510
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 09:37:162
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 09:34:500
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 09:33:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 09:32:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 09:32:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:31:300
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 09:19:212
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 18, 2025 09:18:082
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 18, 2025 09:17:390
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 08:45:342
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 08:45:251
Report