Back
नाशिकमध्ये मान्सूनची दमदार सुरुवात, पाणीतंटा टळला!
Nashik, Maharashtra
nsk_jaykavadi
feed by 2C
Anhcor नाशिक जिल्ह्यात वेळेवर मान्सूनने दिलेल्या दमदार सलामीने यंदा मराठवाडाविरुद्ध नाशिक विभागात पाणीतंटा निर्माण होणार नाही. गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समूहातून १ जूनपासून आतापर्यंत, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १४ हजार १५२ दशलक्ष घनफूट म्हणजेच १४.१५२ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे वाहून गेले आहे. याबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातून मराठवाड्याकडे पाणी प्रवाही होत असल्याने जायकवाडी धरणात ९८९ दलघमी म्हणजेच ४५.५६ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दरम्यान या धरणात केवळ ४.४० टक्के इतकाच साठा होता.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे पदाधिकाऱ्यांची उद्याच्या जल्लोष मेळाव्याची तयारी..
उद्या मुंबई वरली डोम येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजय मेळाव्यासाठी कल्याण मधील उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिक हे दोघे एकत्र येत शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये उद्याच्या जल्लोष मेळाव्याची तयारी करताना नियोजन व तयारी सुरू असताना दोन्ही पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
चौपाल..मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे गट..
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग -पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातल्या डॉक्टर महिलेची हाताच्या नसा कापून आत्महत्या.
अँकर - सांगलीच्या इस्लामपूर नजीक पुण्यातील एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.शुभांगी वानखडे,वय 44 असे या डॉक्टर महिलेचे नाव असून स्वतःच्या गाडीत ब्लेडने हाताचे नस कापून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.पुणे-बंगळुरू महामार्गावरील विठ्ठलवाडी येथे शुभांगी वानखडे,या गाडीच्या शेजारी मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत या प्रकरणी तपास सुरू केला होता.
ज्यामध्ये शुभांगी वानखडे यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगितलं आहे.शुभांगी वानखडे,या पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत होत्या,घटनेच्या दिवशी त्या पुण्यातून हॉस्पिटलला जाण्यासाठी घरातून निघाल्या,यानंतर त्या थेट कोल्हापूरच्या निपाणी पर्यंत आल्या,त्यानंतर पुन्हा पुण्याकडे जात असताना,त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी येथे पुणे बंगळूर महामार्गावर त्यांनी आपल्या गाडीत स्वतःच्या हाताच्या नसा ब्लेडने कापून आणि मानेवर वार करून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी सांगितला आहे.
बाईट - संजय हरुगडे - पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे,इस्लामपूर.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर-परभणीच्या जिंतूर तालुक्यातील उखळी - झरी रस्त्याचे मजबुतीकरणाच काम सुरू आहे. पण पक्क काम अद्याप झाले नसल्याने या रस्त्यावर मोठा चिखल झालाय, या चिखलात परभणी उखळी ही बस रुतल्याने प्रवाश्यांना तास भर ताटकळत पडावे लागले होते. या मार्गावर अनेक गाव आहेत, हा मार्ग हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ गावाकडे ही जात असतो. त्यामुळे यामार्गावर चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची सतत वर्दळ असते. या चिखलात महामंडळाची बस फसली होती,सदर बसला ट्रॅक्टरव्दारे ओढून काढण्याची वेळ आली होती,
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0407ZT_WSM_DAM_WALL_TREE
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कुकसा लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे प्रकल्पाच्या भिंतीला धोका निर्माण झाला असून, भिंतीला तडा गेल्यास कुकसा, जोगेश्वरी, अंचळ, तपोवन, जायखेडा आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशा सनाला वारंवार निवेदने देऊनही भिंतीवरील झाडे काढण्यात आले नसल्यानं याकडे सिंचन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या पाच वर्षांत कुकसा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला,मात्र प्रकल्पाच्या भिंतीवर झाडे आणि झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे प्रकल्पात आधीच पाण्याचा साठा जास्त आहे.अशा परिस्थितीत भिंत फुटल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, त्यामुळे ग्रामस्थांकडून यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकारी,लघु सिंचन विभाग व पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले असून अनदोलनाचा इशारा दिला आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- एकीकडे राज्यांमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब होत आहे कांद्यावर जाहीर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नसताना कांदा दरात देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे या संदर्भात नाफेड मार्फत कांदा खरेदी न करता भावंतर योजना राबवावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालय येवला येथे निवेदन देण्यात आले याप्रसंगी येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. प्रसंगी येवला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Share
Report
Beed, Maharashtra:
FEED : Cow's life saved 01,02
बीड : तहसील आवारात गायीची तडफड... तलाठ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी
Anc : पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तलाठी मित्रांनी आवारात एका गाईला अर्धमरणावस्थेत पाहिलं… आणि चालत पुढे न जाता थांबले. तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. काही वेळातच गायीची प्रकृती सुधारली. ही केवळ मदत नव्हती, तर सामाजिक जाणीव आणि माणुसकीचं जिवंत उदाहरण होतं. आज एक गाय वाचली... आणि समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
उद्धवराज एकत्रित येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष....
बुलढाण्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना
अँकर - अनेक वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. ठाकरे एकत्रित यावेत हीच जनमानसाची भावना आहे असा मानस बाळगून कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत आहेत... दरम्यान मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतले आहेत आमची प्रतिनिधी मयूर निकम यांनी.....
Wkt - मयूर निकम, प्रतिनिधी
कार्यकर्ते
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0407ZT_JALNA_MARHAN(1 FILE)
जालना | मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण,चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल,2 संशयीतांना अटक
अँकर: जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडीलाला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn khaire byte
feed by 2 c
*ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पॉइंटर*
- मी मातोश्रीचा सैनिक आहे. बाळासाहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालोय, दोन्ही भाऊ एकत्रित यावे सर्वांचीच इच्छा आहे.
- आज महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्रात बदल पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र येत आहे याचा आनंद आहे.
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या नेतृत्वात मी काम केले आहे..
- ठाकरे ब्रँड राहणार आहे. तो दिसून येईल.
- राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते चिमण्यांनो परत या...
- उदय सामंत दोन्ही भावासमोर कचरा आहे, तो संभ्रम निर्माण करतो.
ऑन राणेवर गंभीर आरोप...
- भाई कोळेकर हा शिवसेनेचा कार्यकर्त्या होता, त्याची हत्या झाली. तेंव्हा संपूर्ण गावात चर्चा होती राणेंनी त्यांची हत्या केली.. त्यावेळी मी कणकवलीच्या निवडणुकीत राणेंच्या विरोधात प्रचाराला गेलो होतो....
- आम्ही कणकवलीला गेलो होतो तेव्हा राणेंचा मुलगा जो बडबड करतो त्या नितेश राणेला मी धमकावले होते... त्यावेळी तो पोलिसांची गाडी घेऊन फिरत होता....
- राणे मुख्यमंत्री असताना नारायण राणे मला काढणार होते मात्र त्यावेळी राज ठाकरे आणि बाळासाहेबांनी मला काढू दिले नाही... मातोश्री आणि ठाकरे परिवाराचे माझ्यावर उपकार आहे.म्हणून मी एकनिष्ठ आहे.
- तुम्ही आणि तुमचे पोट्टे काय म्हणतात ते पाहा... मनोहर जोशींना बाजूंना करून राणेंना केले होते...
- देवा भाऊ यांना दोन भाऊ एकत्र यावं असे वाटत नव्हते... आतून त्यांना वाटत होते दोघे भाऊ एकत्र येऊ नये...
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SENA_MNS_WKT दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासाठी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र; जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते गहिवरले
अँकर :- मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू उद्या प्रथम मुंबईत एकत्र येत आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्ध केल्यानंतर ठाकरे बंधू मुंबईत विजय जल्लोष सभा करणार आहे. यासाठी अनेक शिवसैनिक आणि मन सैनिक अमरावतीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. त्यापूर्वी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले आहे. दरम्यान जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी गहिवरल्याचे पाहायला मिळाले आहे. याविषयी शिवसैनिक आणि मनसैनिकांशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
चौपाल
0
Share
Report