Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

नारायणगडावर महंतांचा गंभीर आर्थिक लुटाचा आरोप! काय आहे सत्य?

MMMahendrakumar Mudholkar
Jul 16, 2025 09:35:39
Beed, Maharashtra
बीड: "नारायणगडावरच ‘दसरा’ नंतर ‘गोंधळ’! महंतांचा थेट आरोप – ट्रस्टमध्ये आर्थिक लुट!" Anc- "मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा पहिला दसरा मेळावा बीडच्या पवित्र नारायणगडावर भव्य स्वरूपात पार पडला… पण मेळाव्यानंतर गडावर काहीतरी बिनसल्याची चाहूल लागली होती… आणि ती आता स्पष्ट झालीय... "महंत शिवाजी महाराजांनी थेट पत्रकार परिषद घेऊन दोन ट्रस्ट सदस्यांवर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केलेत! आणि त्यामुळे एकदा पुन्हा नारायणगड चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय!" पाहुयात यासंबंधी एक सविस्तर रिपोर्ट...!! Opening BITE - महंत शिवाजी महाराज... ----- बीड जिल्हा आणि गैरव्यवहार हे समीकरण काही नवीन नाहीये... मात्र वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नारायण गडावरील विकासकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या महंत शिवाजी महाराज यांच्या आरोपानंतर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील संप्रदाय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. गडाचे विश्वस्त बळीराम गवते आणि भानुदास जाधव "या दोघांनी गडाचं नाव खराब केलं... मला नाहक त्रास दिला... दोन दिवस मी जेवलो नाही, इतका मानसिक धक्का बसला... २५ कोटींच्या विकास आराखड्यावर टेंडर मागितलं, मिळालं नाही म्हणून कोर्टात खोटं बोलले!" असाही गंभीर आरोप महंतांनी केलाय... बाईट: महंत शिवाजी महाराज, नारायणगड ------ "दिवंगत विनायक मेटेंनी आणलेला २५ कोटींचा निधी, आणि त्यावरील टेंडरचा वाद आता गडावर थेट ट्रस्टमधल्या सत्ता संघर्षात रुपांतरीत झालाय.. महंतांच्या आरोपामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खळबळ उडालीय! ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळख असलेला गड आता चर्चेच्या केंद्रस्थानी आरोपांच्या गदारोळात आलाय. महंतांनी लावलेले आरोप तपासले गेले पाहिजेत. आम्ही लवकरच व्हिडिओ-ऑडिओ पुरावे सादर करणार आहोत. सत्य बाहेर येणारच असा दावा आरोप झालेले गडाचे विश्वस्त बळीराम गवते यांनी केला आहे. बाईट: बळीराम गवते, आरोप झालेले विश्वस्त ------ ज्यांच्यावर आरोप झालेले हे आहेत दुसरे नारायण गडाचे दुसरे विश्वस्त भानुदास जाधव... भानुदास जाधव हे सीए आहेत. त्यामुळेच त्यांना गडाच्या ऑडिटचे काम दिले होते. मात्र 2022 पासून त्यांनी गडाचे ऑडिट केलेच नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ऑडिट केल्यानंतर महंत शिवाजी महाराज यांनी ऑडिटवर स्वाक्षरी केलीच नाही. संपूर्ण काम चोख आणि पारदर्शकतेने केल्याचा यांनीही दावा केलाय.. बाईट: भानुदास जाधव, आरोप झालेले विश्वस्त ------ अडीचशे वर्षे वारकरी संप्रदाय विचार करत अठरा पगड जातीना समतेचा विचार घेऊन नारायण गड अध्यात्म प्रबोधन करतो आहे .संत ज्ञानेश्वर पासूनची गुरु परंपरा असलेला हा गड धाकटी पंढरी म्हणून लौकिक आहे. मात्र गड वेगळ्याच कलहाने चर्चेत आहे. स्वर्गीय महंत महादेव बाबांच्या पुण्यतिथी दिवशी वर्तमान महंत शिवाजी महाराजांनी विश्वस्त बळिराम गवते व सीए भानुदास जाधव यांच्यावर आर्थिक घोळ केल्याचा आरोप केला आहे. यामुळे भाविकांत विश्वस्त विरोधात संताप व्यक्त केला जातोय. बाईट: भागवत तावरे, सामाजिक विश्लेषक ----- End vo गडाच्या पवित्र भूमीत राजकारण, टेंडर वाद आणि आरोप-प्रत्यारोपांची धूळ उडतेय... आता चौकशी होणार की आरोपच निव्वळ वादळी ढग ठरणार? याकडेच राज्याचं लक्ष आता नारायणगडावर खिळलेलं आहे!
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top