Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर ब्रेकिंग: नई कुणबी प्रमाणपत्र से चुनाव मैदान में उभरेंगी महिलाएं!

VBVAIBHAV BALKUNDE
Sept 11, 2025 10:37:59
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- ज्यांच्याकडे आधीपासून कुणबीचे सर्टिफिकेट होते त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण आता नवीन कुणबी सर्टिफिकेट घेऊन ज्या ‘नवर्‍या’ झाल्या आहेत त्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नक्कीच लढवणार आहेत. जर त्यांनी या निवडणुका लढवल्या तर ओबीसी समाजामध्ये ही आरक्षण संपल्याची भावना निर्माण होईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल आहे. बाईट ::- प्रकाश आंबेडकर 
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 11, 2025 13:07:48
Kalyan, Maharashtra:२७ गावांना केडीएमसीत राहायचेच नाही निवडणूक आयोगाला केडीएमसी आयुक्तांनी सांगावे प्रभाग रचना हरकती सुनावणी दरम्यान खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी Anc कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना संदर्भात २६५ हरकती आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली होती. मात्र फक्त २७ गावातून ३ हजार ६४२ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेतली नव्हती असा आरोप करीत कल्याण ग्रामीण २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीच्या नेतत्वात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांनी सुनावणीस हजर राहून आयुक्तांसोबत चर्चा केली. या वेळी समितीची एकच मागणी आहे. २७ गावे वगळून प्रभाग रचना तयार करण्यात यावी. २७ गावात निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी २७ गावांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. याविषयी आयुक्तांनी माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देत या विषयाची मागणी देणार असल्याचे देखील खासदार l सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांनी सांगितले बाईट सुरेश म्हात्रे, खासदार भिवंडी लोकसभा
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 11, 2025 13:04:14
Kalyan, Maharashtra: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून ६ बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला घेतलं ताब्यात तपासादरम्यान धक्कादायक खुलासा १३ दिवसात बांगलादेशी महिलेकडे आधारकार्ड.. Anc..बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांसह एका बांगलादेशी इसमाला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Vo..कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाची गस्त सुरू असताना सहा महिलांसह एक इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले .पोलिसांनी त्यांना हटकले असता काही महिलांकडे बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र ,नॅशनल आय कार्ड असे कागदपत्र सापडली .तपासादरम्यान या महिला बांगलादेशहुन छुप्या मार्गाने भारतात आले आणि ट्रेन ने मुंबईत आल्याची माहिती समोर आली .यामधील रॉकी बादशाह या सहा महिलाना कल्याण मध्ये घेऊन आला होता .रॉकी काही महिन्यांपासून कल्याणमध्ये वास्तव्यास होता .त्याने विरारच्या एका इस्माकडून शिमा पठाण हिला अवघ्या 13 दिवसात आधारकार्ड बनवून दिल्याची माहिती आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून देणाऱ्या इसम देखील पोलिसांच्या रडारवर असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. बाईट... कल्याणी घेटे साहाय्य्क पोलीस आयुक्त
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 11, 2025 12:45:43
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ---- मंत्री नितेश राणे byte पॉईंटर ऑन भुजबळ --- कोणी कुणाचा हक्क हिरावून घेत नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला जे आरक्षण किंवा जे अधिकार द्यायचे आहेत. त्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय आहे. भुजबळ साहेबांच्या मनात काही गैरसमज असतील तर ते काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूर करतील. ऑन कर्नाटक रेल्वे स्थानक --- जिथे जिथे काँग्रेसच सरकार आहे. ते हिंदू द्वेषी आहेत. ते शिवाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. आणि जिहादला समर्थन करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच नाव बदला अस लोकप्रतिनिधी सांगत आहेत. आणि मुख्यमंत्री त्याला दुजोरा देत आहेत. हे दुर्दैव म्हणावं. ह्याबाबत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उत्तर द्याव.. जरांगे पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केलीय ती चांगलीच आहे. शिवाजी महाराजांचं नाव बदला या मागणीला आपला विरोध आहे हे सांगण्याच धाडस महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते करतील का??? आणि करत नसतील तर ते सगळे औरंग्याचे औलादी आहेत ऑन दहशद वादी अटक ---- आमचे देशाचे पंतप्रधान आणि कार्यतत्पर गृहमंत्री यांच्या कारकीर्दीत दहशवादाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणले गेले आहे. काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोटाची आपल्याला सवय झालेली. तेवढं आता सोप राहिलेलं नाही. आता कुठलाही अतिरेकी आमच्या देशाकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही. ऑन ठाकरे बंधू --- कुटुंब म्हणून त्यांनी एकत्र यावं. त्याच कौतुकच आहे. पतपेढीच्या निमित्ताने ते एकत्र आलेले. सगळ्या विरोधकांचा धुव्वा उडून दिलेला. 21 / 0 झालेलं परत एकत्र येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ऑन ठाकरे गटाला बाजूला ठेवून काँग्रेस निवडणुका --- काँग्रेस मध्ये काय चालले हे त्यांच्या नेत्यांना विचारा ऑन m 2 m --- आम्ही शुभ दिवसांची वाट पाहत आहोत सगळी तयारी झालेली आहे. On राजकोट --- सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाने तो निर्णय घेतला असेल. जी गोष्ट घडली ती पुन्हा घडू नये... ऑन ubt आंदोलन ( भारत पाकिस्तान ) -- माहिती घेऊन बोलेन ऑन अवैध धंदे --- जिल्हा पोलिस आपल्या माध्यमातून काम करत आहेत. आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे. थोडा वेळ द्या. कोणालाही आम्ही सोडणार नाही चुन चुन के मारेंगे ऑन मराठे ( कुणबी विरोध ) --- कोणावर शक्ती केली जाणार नाही. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवय त्यांना ते मिळणार. सरकार ने सक्ती केलेली नाही. ज्यांना मराठा म्हणून राहायचं आहे ते मराठे म्हणून राहतील ऑन कुडाळ ( निलंबन ) --- पक्षाच्या नियमात राहून जिल्हाध्यक्षांनी ते निलंबन केले आहे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख आणि आमचे ते नेते आहेत. म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि आमच त्याला समर्थन आहे. पक्ष शिस्त सर्वांना लागू आहेत. जे नियमांच भंग करतील त्यांच्यावर कारवाई होणार. Byte --- मंत्री नितेश राणे feed on desk
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 11, 2025 12:21:57
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 1109ZT_BARAMATIOBCKALU BYTE 1 बारामतीतील ओबीसी मोर्चा मध्ये लक्ष्मण हाके सह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आणि तो अजित पवारांच्या सांगण्यावरून _ काळुराम चौधरी... Anchor_बारामती पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चा संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवरती बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांचा देखील समावेश आहे.मात्र हा गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटल आहे. या संदर्भात आपण राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करणार असून माझ्यावर दाखल झालेला गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून आकसाने दाखल झाला आहे.अजित पवार यांनी घेतलेल्या गोपनेतेची शपथ आणि त्यांच्या पदाचा त्यांनी भंग केला आहे या विरोधात आपण त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटल आहे. जर राज्यपालांनी दखल घेतली नाही तर आपण न्यायालयात अजित पवारांच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचंही काळुराम चौधरी यांनी म्हटलं आहे. बाईट_ काळुराम चौधरी प्रदेश महासचिव बहुजन समाज पार्टी
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 11, 2025 12:01:18
Nashik, Maharashtra:nsk_malegaon . Anchor - मालेगावातील बोगस जन्म दाखला प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी आज छावणी, किल्ला पोलिस ठाणे अधिकाऱ्यांसह अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेत जन्म दाखला घोटाळा प्रकरणी चर्चा करत पुरावे सादर केले..या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १५०० पानांचे पुरावे सादर केले असून या पुराव्यांच्या माध्यमातून किमान ५०० जणांवर येत्या आठवड्याभरात गुन्हे दाखल होतील असा दावा सोमैया यांनी केला..पोलिसांचे काम व्यवस्थितरीत्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले..दरम्यान, आज नव्याने ७५० पानांचे पुरावे अपर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंधू यांच्याकडे किरीट सोमैया यांनी सुपूर्द केले..जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणी अजूनही व्याप्ती वाढतच चालली असून यापूर्वी मालेगावातून बोगस जन्म दाखले घेऊन फरार झालेल्यांची संख्या देखील अधिक असून त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही..दरम्यान, SIT चौकशी प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याचे सोमैया यांनी टाळले.. *बाईट - किरीट सोमैया, माजी खासदार..*
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 11, 2025 12:00:25
Virar, Maharashtra:Date-21sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR THAKRE Feed send by 2c Type-AvB Slug- विरार मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराला विरोध अँकर - वसई विरार महानगरपालिकेत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार आयोजित करण्यात आला होता, या दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळया फिती बांधून निषेध व्यक्त केला ...यावेळी पन्नास खोके एकदम ओके, ओम भट स्वाहा असा घोषणा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या... वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्यालयासोबत निषेध व्यक्त करण्यात आला... Byte : किरण चेंदवणकर, शिवसेना ठाकरे गट .
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 11, 2025 11:46:14
Shirdi, Maharashtra:Anc - ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता खैर नाही.. कारण साईबाबासंस्थाने AI तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली कार्यान्वित केली आहे.. या प्रणालीमुळे साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे.. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या प्रणालीत संग्रहित केला जाणार असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच सीसीटीव्हीच्या आधारे साई संस्थानला तातडीने अलर्ट मिळणार आहे.. एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन AI प्रणाली संस्थानने कार्यान्वित केली आहे.. साईभक्तांच्या सुकर दर्शनासह मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रणाली अंत्यंत महत्वाची ठरणार आहे.. याचाच आढावा घेतलाय आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.. tiktak kunal jamdade with ceo gorksh gadilkar
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 11, 2025 11:36:20
2
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 11, 2025 11:32:45
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: DHARA_MP_LETTER तुळजापुरातील वादग्रस्त डिवायएसपी निलेश देशमुख यांची मुदत वाढ रद्द करा खासदार ओमराजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि बोगस मतदार नोंदणी प्रकरणात योग्य तपास न केल्याचा आरोप निलेश देशमुख यांच्या काळातच तुळजापूर ड्रग्ज आलं आणि फोफावलं, मग त्यांना मुदतवाढ का असा सवाल ? Anc: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची देशभर चर्चा झाली. या प्रकरणातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पोलिस अधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला. तुळजापूरचे डीवायएसपी निलेश देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ सरकारकडून देण्यात आली. त्यावर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेत ही मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. ज्यांच्या काळात तुळजापुरात ड्रग्ज आलं फोफावल त्यांच्यावर सरकार कारवाई करणार की बक्षीस देणार असा सवाल ओमराजे यांनी केला. तसेच ड्रग्ज प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय यंत्रणाकडे सोपवावा अशी मागणी ही त्यांनी केली. Byt: ओमराजे निंबाळकर, खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 11, 2025 11:32:19
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1109ZT_GAD_NOVEL_CLASS_1_2_3 ( 3 file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सुरू करण्यात आला अनोखा शिक्षा वर्ग ,106 आत्मसमर्पित नक्षल महिला आणि पुरुष घेत आहेत साक्षरतेचे धडे, आत्मसमर्पित नक्षल्याना शासकीय कौशल्य योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी पाचवी पास करणे होते आवश्यक, या गरजेतून निर्माण झाला आहे दहा दिवसीय साक्षरता वर्ग, मात्र या साक्षरता वर्गात आत्मसमर्पित नक्षल्याना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड औत्सुक्य आले दिसून, कित्येकांना दहावी व उच्च शिक्षणही घ्यायचे असल्याने या संपूर्ण योजनेबाबत पोलीस दल व्यक्त करत आहे समाधान अँकर:-- गडचिरोली पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचे धोरण असलेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत गेली काही वर्षे शेकडो नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण शक्य केले आहे. या आत्मसमर्पित नक्षल्याना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेली साक्षरता मिळवून देण्यासाठी पोलिसांनी चक्क आत्मसमर्पित नक्षल्यांचे साक्षरता वर्ग सुरू केले आहेत. या वर्गातून आयुष्य जंगलात काढलेल्या या सर्वांना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड औत्सुक्य दिसून आले आहे. व्ही. ओ. १) गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्हा. या जिल्ह्यात उत्तर- दक्षिण पसरलेल्या निबीड अरण्यात 80 च्या दशकापासून नक्षल चळवळीचे हिंसक रूप या ना त्या प्रकारे दिसून येते. गेली काही वर्षे उत्तम नियोजनामुळे गडचिरोली पोलिसांनी यावर अंकुश आणला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे गेल्या काही वर्षात गडचिरोलीत मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले आहे. या आत्म समर्पित नक्षलवाद्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक होते. मात्र हे नक्षल महिला- पुरुष साक्षर नसल्याने अडचणी भासल्या. शासकीय कौशल्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी किमान पाचवी पास असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षर करण्यासाठी जिल्हा पोलीस दल आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांनी एकत्र योजना आखली. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य स्वभागृहात दहा दिवस चालणारा साक्षरता वर्ग सुरू झालाय. या सर्व नक्षलवाद्यांना पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये पाचवीच्या परीक्षेला बसविले जाणार आहे.  त्यांना शिवणकाम, वेल्डर , बाईक मेकॅनिक व अन्य कौशल्य योजना अनुदान दिले जाणार आहे. बाईट १) निलोत्पल, पोलीस अधिक्षक, गडचिरोली व्ही. ओ. 2) आत्मसमर्पण योजना स्वीकारल्यानंतर गडचिरोली जिल्हा व शहरात हाताला कुठलेही काम नसलेल्या या सदस्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी घरकुलांची योजना आखण्यात आली आहे. मात्र बारमाही रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक साक्षरता वर्गाची कल्पना सर्वांनीच उचलून धरली. या सर्वांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी हे आवश्यक होते. वर्गात येणाऱ्या बहुतांश आत्मसर्पित सदस्यांनी 20 ते  25 वर्षाचा काळ हिंसक चळवळीत घालविला आहे. त्यांना अक्षरांची -आकड्यांची लिखित ओळख नाही. या वर्गात सामील झालेला व जून 2024 मध्ये आत्मसमर्पण केलेला गिरिधर तुमरेटी हा कमांडर त्यातलाच एक. त्याला हे संपूर्ण जग समजून घेण्यासाठी शिक्षण आवश्यक वाटत आहे. याशिवाय नक्षल्यांच्या प्रेस टीम मध्ये दीर्घकाळ काम केलेल्या अंजू जाडले हिला केवळ पाचवी दहावीच नव्हे तर आगामी काळात उत्तम संगणक शिक्षण घ्यायचे आहे. या प्रयत्नामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड आकर्षण दिसून आले आहे. बाईट २) गिरीधर तुमरेटी, आत्मसमर्पित नक्षली बाईट ३) अंजु जाडले, आत्मसमर्पित नक्षली व्ही. ओ. ३)  गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यात तेलुगु- गोंडी -मराठी -हिंदी अशा भाषा बोलल्या जातात. मात्र अक्षर ओळख नसलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी थेट पाठ्यपुस्तके व त्यातील अभ्यास कठीण विषय होता. मात्र शिक्षकांनी 106 विद्यार्थ्यांपैकी पहिली -दुसरीची अक्षर ओळख असलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात पाचवी च्या परीक्षेला बसवून त्यांना साक्षर करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी गडचिरोलीच्या शिक्षण विभागाने उत्तम शिक्षक देखील नियुक्त केले असून पुढील दहा दिवसात खेळीमेळीच्या वातावरणात या 50, 60 प्रसंगी 65 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख व नंतर गृहपाठ देत  परीक्षेला बसवायचे आहे. बाईट ४) किशोर सुरपाम, शिक्षक व्ही. ओ. ४) खरंतर ही शून्यातून सुरुवात आहे. सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण फार सोपे व सहज वाटते. मात्र अर्धे आयुष्य काट्याकुट्यात ,जंगलात व बंदुकीच्या, भीतीच्या छायेत काढलेल्या आणि आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी जीवाची धडपड करणाऱ्या या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या आयुष्यात आता ज्ञानज्योत पेटली आहे. ही कायम राखत इतरांसाठी ते आदर्श व्हावेत हीच या साक्षरता वर्गाची फलनिष्पत्ती राहणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 11, 2025 11:15:19
Mumbai, Maharashtra:अँकर -- मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे.त्यानुसार मुंबईतील वॉर्डची प्रारूप पूणर्रचना झाली आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने ही प्रारूप पूणर्रचना करण्यात आली आहे.या रचनेवर हरकती सूचना मागवण्यात आल्या आहे.मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये तीन दिवस निवडणूक आयोगाचे अधिकारी हरकती आणि सूचना ऐकण्यासाठी बसले आहेत. कुर्ल्यातील माजी नगरसेवक कप्तान मलिक जे माजी मंत्री नवाब मलिक यांचे धाकटे बंधू आहेत यांनी आणि कुर्ल्यातील माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी आपल्या वॉर्डातील हरकती नोंदवल्या आहेत. वोट चोरीसाठी काही इमारती दुसऱ्या वॉर्ड मध्ये टाकण्यात आल्याचा आरोप युबिटी च्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी केला आहे.तर  कप्तान मलिक माजी नगरसेवक यांनी  कुर्ला विभागातील  २०१७ मध्ये  वॉर्ड १७० मधील मधे जी baundri होती ती बदलण्यात आली तसे दीड हजार मतदार बदलल्या गेलेत गोल्डन प्लाझा सारखे ५ इमारती वॉर्ड १६९ मधे टाकण्यात आल्या.यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. आज निवडणूक आयोगाकडे हरकत घेतली.आयोगाने त्यावर विचार करू, आमची हरकत बरोबर आहे असे सांगितले. मी काम करणारा माणूस आहे.लोकांमध्ये रोष आहे त्याची बाजू मांडण्यासाठी आलो. Byte -- कप्तान मलिक माजी नगरसेवक Byte -- प्रविणा मोरजकर  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४८ Slug -- BMC hearing 
2
comment0
Report
Advertisement
Back to top