Back
गडचिरोलीमें आत्मसमर्पित नक्सलियों के लिए दस दिन का साक्षरता वर्ग शुरू
AAASHISH AMBADE
Sept 11, 2025 11:32:19
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1109ZT_GAD_NOVEL_CLASS_1_2_3
( 3 file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सुरू करण्यात आला अनोखा शिक्षा वर्ग ,106 आत्मसमर्पित नक्षल महिला आणि पुरुष घेत आहेत साक्षरतेचे धडे, आत्मसमर्पित नक्षल्याना शासकीय कौशल्य योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी पाचवी पास करणे होते आवश्यक, या गरजेतून निर्माण झाला आहे दहा दिवसीय साक्षरता वर्ग, मात्र या साक्षरता वर्गात आत्मसमर्पित नक्षल्याना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड औत्सुक्य आले दिसून, कित्येकांना दहावी व उच्च शिक्षणही घ्यायचे असल्याने या संपूर्ण योजनेबाबत पोलीस दल व्यक्त करत आहे समाधान
अँकर:-- गडचिरोली पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचे धोरण असलेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत गेली काही वर्षे शेकडो नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण शक्य केले आहे. या आत्मसमर्पित नक्षल्याना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेली साक्षरता मिळवून देण्यासाठी पोलिसांनी चक्क आत्मसमर्पित नक्षल्यांचे साक्षरता वर्ग सुरू केले आहेत. या वर्गातून आयुष्य जंगलात काढलेल्या या सर्वांना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड औत्सुक्य दिसून आले आहे.
व्ही. ओ. १) गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्हा. या जिल्ह्यात उत्तर- दक्षिण पसरलेल्या निबीड अरण्यात 80 च्या दशकापासून नक्षल चळवळीचे हिंसक रूप या ना त्या प्रकारे दिसून येते. गेली काही वर्षे उत्तम नियोजनामुळे गडचिरोली पोलिसांनी यावर अंकुश आणला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे गेल्या काही वर्षात गडचिरोलीत मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले आहे. या आत्म समर्पित नक्षलवाद्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक होते. मात्र हे नक्षल महिला- पुरुष साक्षर नसल्याने अडचणी भासल्या. शासकीय कौशल्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी किमान पाचवी पास असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षर करण्यासाठी जिल्हा पोलीस दल आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांनी एकत्र योजना आखली. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य स्वभागृहात दहा दिवस चालणारा साक्षरता वर्ग सुरू झालाय. या सर्व नक्षलवाद्यांना पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये पाचवीच्या परीक्षेला बसविले जाणार आहे. त्यांना शिवणकाम, वेल्डर , बाईक मेकॅनिक व अन्य कौशल्य योजना अनुदान दिले जाणार आहे.
बाईट १) निलोत्पल, पोलीस अधिक्षक, गडचिरोली
व्ही. ओ. 2) आत्मसमर्पण योजना स्वीकारल्यानंतर गडचिरोली जिल्हा व शहरात हाताला कुठलेही काम नसलेल्या या सदस्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी घरकुलांची योजना आखण्यात आली आहे. मात्र बारमाही रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक साक्षरता वर्गाची कल्पना सर्वांनीच उचलून धरली. या सर्वांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी हे आवश्यक होते. वर्गात येणाऱ्या बहुतांश आत्मसर्पित सदस्यांनी 20 ते 25 वर्षाचा काळ हिंसक चळवळीत घालविला आहे. त्यांना अक्षरांची -आकड्यांची लिखित ओळख नाही. या वर्गात सामील झालेला व जून 2024 मध्ये आत्मसमर्पण केलेला गिरिधर तुमरेटी हा कमांडर त्यातलाच एक. त्याला हे संपूर्ण जग समजून घेण्यासाठी शिक्षण आवश्यक वाटत आहे. याशिवाय नक्षल्यांच्या प्रेस टीम मध्ये दीर्घकाळ काम केलेल्या अंजू जाडले हिला केवळ पाचवी दहावीच नव्हे तर आगामी काळात उत्तम संगणक शिक्षण घ्यायचे आहे. या प्रयत्नामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शिक्षणाप्रती असलेले प्रचंड आकर्षण दिसून आले आहे.
बाईट २) गिरीधर तुमरेटी, आत्मसमर्पित नक्षली
बाईट ३) अंजु जाडले, आत्मसमर्पित नक्षली
व्ही. ओ. ३) गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यात तेलुगु- गोंडी -मराठी -हिंदी अशा भाषा बोलल्या जातात. मात्र अक्षर ओळख नसलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी थेट पाठ्यपुस्तके व त्यातील अभ्यास कठीण विषय होता. मात्र शिक्षकांनी 106 विद्यार्थ्यांपैकी पहिली -दुसरीची अक्षर ओळख असलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात पाचवी च्या परीक्षेला बसवून त्यांना साक्षर करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी गडचिरोलीच्या शिक्षण विभागाने उत्तम शिक्षक देखील नियुक्त केले असून पुढील दहा दिवसात खेळीमेळीच्या वातावरणात या 50, 60 प्रसंगी 65 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख व नंतर गृहपाठ देत परीक्षेला बसवायचे आहे.
बाईट ४) किशोर सुरपाम, शिक्षक
व्ही. ओ. ४) खरंतर ही शून्यातून सुरुवात आहे. सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण फार सोपे व सहज वाटते. मात्र अर्धे आयुष्य काट्याकुट्यात ,जंगलात व बंदुकीच्या, भीतीच्या छायेत काढलेल्या आणि आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी जीवाची धडपड करणाऱ्या या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या आयुष्यात आता ज्ञानज्योत पेटली आहे. ही कायम राखत इतरांसाठी ते आदर्श व्हावेत हीच या साक्षरता वर्गाची फलनिष्पत्ती राहणार आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 13:47:010
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 13:17:440
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 11, 2025 13:17:350
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 13:15:150
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:07:481
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:04:140
Report
UPUmesh Parab
FollowSept 11, 2025 12:45:430
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 12:21:572
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 12:21:05kolhapur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे
----
डॉ सुनील गुप्ता,
-----
नागपुरात दही जप्त केले.... अतिशय खराब अवस्थेत ठेवण्यात आलेले दही शरीरास किती अपायकारक आहे त्या संबंधित तज्ञ डॉक्टरांचा पाहिजे
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 11, 2025 12:15:593
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 11, 2025 12:01:182
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 11, 2025 12:00:251
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 11:46:140
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 11, 2025 11:36:202
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 11:35:32Chandrapur, Maharashtra:pkg ची ही file 200 MB ची मर्यादा असल्याने attach झाली नाही. ही स्वतंत्र पाठवत आहे
1
Report