Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

मालेगांव में जन्म प्रमाण पत्र घोटाला: किरीट सोमैया ने रखे ठिकाने

YKYOGESH KHARE
Sept 11, 2025 12:01:18
Nashik, Maharashtra
nsk_malegaon . Anchor - मालेगावातील बोगस जन्म दाखला प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी आज छावणी, किल्ला पोलिस ठाणे अधिकाऱ्यांसह अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेत जन्म दाखला घोटाळा प्रकरणी चर्चा करत पुरावे सादर केले..या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १५०० पानांचे पुरावे सादर केले असून या पुराव्यांच्या माध्यमातून किमान ५०० जणांवर येत्या आठवड्याभरात गुन्हे दाखल होतील असा दावा सोमैया यांनी केला..पोलिसांचे काम व्यवस्थितरीत्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले..दरम्यान, आज नव्याने ७५० पानांचे पुरावे अपर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंधू यांच्याकडे किरीट सोमैया यांनी सुपूर्द केले..जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणी अजूनही व्याप्ती वाढतच चालली असून यापूर्वी मालेगावातून बोगस जन्म दाखले घेऊन फरार झालेल्यांची संख्या देखील अधिक असून त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही..दरम्यान, SIT चौकशी प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याचे सोमैया यांनी टाळले.. *बाईट - किरीट सोमैया, माजी खासदार..*
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Sept 11, 2025 14:15:41
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 1109ZT_DAUNDCCTV FILE 1 दौंडच्या कुरकुंभमध्ये हायवा डंपरचा थरार.... कुरकुंभ मधील रहदारीच्या चौकात डंपरची शाळकरी विद्यार्थिनीला धडक... जखमी विद्यार्थिनीचे थोडक्यात वाचले प्राण.... घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद..... Anchor_ पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात निघालेल्या एका हायवा डंपरने कुरकुंभ मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शाळकरी विद्यार्थिनीच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. ही मुलगी धडक बसल्यानंतर थेट पुढे दुचाकीसह रस्त्यावरती आपटली गेल्याचं व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत असून सुदैवानं या मुलीचा जीव वाचला गेलाय. ही घटना घडताच चौकातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालकाला वाहन पाठीमागे घ्यायला लावत मुलीला बाहेर काढलं. या घटनेत ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या पायाच हाड देखील मोडलं आहे.श्रावणी जाधव असं या जखमी मुलीचं नाव आहे. या अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले असून, ग्रामस्थांनी गर्दीच्या भागात अवजड वाहनांचा प्रवेश रोखावा अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 11, 2025 14:00:55
Nashik, Maharashtra:feed send by TVU 51 reporter-sagar gaikwad slug-nsk_uday_samat_byte *नाशिक @ उदय सामंत, उद्योगमंत्री* *बाईट मुद्दे* *ऑन ओबीसी मोर्चा* - आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे - देवेंद्र साहेबांनी धोरण सांगितले आहे - हैद्राबाद गॅझेट आणि सरसकटबाबत बोलले आहे - मराठा आणि ओबीसी उपसमिती केली आहे *ऑन भुजबळ* - काय करावे हा त्यांचा विषय - त्यांवही भाषणे आहे - दबाव आणून काहीही होणार नाही *ऑन जीआर बदल* - चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष आहे - भुजबळ साहेब आहे - यात चर्चा होऊ शकते - विखे पाटील साहेब यामध्ये मार्ग काढतील *ऑन स्टेशन नाव बदल* - काँग्रेसचा शिवाजी महाराज यांच्याबदल काय विचार आहे - ते दिसत आहे *ऑन माने पोस्ट* - काहींच्या पोस्ट अश्या असतात - फडणवीस साहेब, शिंदे साहेब दुश्मन आहे - ज्यांना पोस्ट टाकायच्या त्यांना शुभेच्छा - आकस ठेऊन काही पोस्ट करतात
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 11, 2025 13:47:01
Akola, Maharashtra:Anchor : 2023 मध्ये अकोला शहरातील जुने शहर भागात झालेल्या दंगलीत जखमी पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.अकोला येथे झालेल्या जातीय हिंसाचारात जखमी झालेल्या मोहम्मद अफझल मोहम्मद शरीफ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.न्यायालयाने हा खटला "एफआयआर नोंदवण्यासाठी योग्य" असल्याचे म्हंटले आहे, आणि आतापर्यंत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर) च्या मदतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पोलिसांच्या तपासात घोर निष्काळजीपणा झाला आहे आणि याचिकाकर्त्याच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. याचिकाकर्त्याने आरोप केला आहे की दंगलीत डोक्याला गंभीर दुखापत झाली असूनही पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवली नाही. हा खटला रुग्णालयात वैद्यकीय कायदेशीर खटला म्हणून नोंदवण्यात आला होता, परंतु पोलिसांनी तो गांभीर्याने घेतला नाही.या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.त्याच प्रमाणे एसआयटीची स्थापना करत न्यायालयाने निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.त्याच प्रमाणे स्थापन केलेल्या एसआयटीला तीन महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात आपला तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या प्रकरणात तपासात निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता पीडितेला न्यायाची आशा पल्लवित झाली आहे. Byte : एड.शोएब इनामदार , वकील
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 11, 2025 13:17:44
kolhapur, Maharashtra:Ngp OBC Meet shots live u ने फीड पाठवले ---------- नागपूर - मराठा समाजाला न्याय देताना काढण्यात आलेल्या जीआर विरोधात *सकल ओबीसी संघटना, वकील संघटनाची बैठक 13 सप्टेंबरला नागपुरात होणार आहे*... - या बैठकीला *कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी असणार आहे*.. - बैठकीत *ऑक्टोबर महिन्यात ओबीसीचा महामोर्चा काढण्याची तयारीचा अनुषंगाने चर्चा होईल*, शिवाय कोर्टात जाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या चार खंडपीठात मराठा समाजाला दिलेल्या जीआर विरोधात याचिका टाकली जाणार आहे...त्यावरही चर्चा होणार आहे... - या बैठकीला ओबीसी समाजाचा पदाधिकारी असणार आहे..तयारीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून चार ते पाच लोक येणार आहे...रूपरेषा ठरवणार आहे, लोकांमध्ये जनजागृती करावी, अधिकार मागण्याचे नियोजन करावे यासह आगामी काळात ओबीसी ताकद दाखवण्याच्या अनुषंगाने तयारी केली जाणार आहे...
4
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 11, 2025 13:17:35
Ambernath, Maharashtra:गणपती दर्शनाला गेला, किडनॅप झाला बदलापूर ग्रामीण पोलिसांकडून अपहरण झालेल्या मुलाची सुटका पाच दिवस तरूणाच्या सुटकेचा थरार Bdl kidnapped Anchor – गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलंय. तब्बल 5 दिवस या मुलाच्या सुटकेचा थरार सुरू होता. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुजरामधील 3 आरोपींना अटक केलीय. वांगणीत वास्तव्यास आलेल्या एका महिलेचा अल्पवयीन मुलगा 1 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये गणपती दर्शनसाठी गेला होता. त्यावेळी तिथं तीन जणांनी त्याचं अपहरण केलं आणि फोनवरून त्याच्या आईकडे 12 लाख रूपयांची मागणी केलीय.संबंधित महिलेनं बदलापूर ग्रामीण पोलिसांत याची तक्रार नोंदवताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. मोबाईल सीडीआरच्या आधारे पोलिसांची एक टीम गुजरातच्या दिशेनं रवाना केली तसच गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत 3 आरोपींना ताब्यात घेतलं. दरम्यान आरोपींनी घाबरून अपहरण केलेल्या अल्पवयीन तरूणाची सुटका केली. मात्र त्यानं सुटका होताच घाबरून मोबाईलमधी सिमकार्ड बदलल्यानं त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या, अखेर पोलिसांनी IMEI नंबरवरून त्याच्या नव्या नंबरचा ट्रेस घेत त्याला शोधून काढलं.  Byte – गोविंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भुयार , बदलापूर
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 11, 2025 13:15:15
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1109ZT_CHP_GATES_OPEN ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहर -जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पावसाने धरणे आणि नद्या यांच्यात मोठा पाणी संचय, चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण भरल्याने सर्व 7 दारे पाव मीटरने उघडली      अँकर:--चंद्रपूर शहर -जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पावसाने धरणे आणि नद्या यांच्यात मोठा पाणी संचय झालाय.  चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण भरल्याने दुपारी 3.30 वाजता पासून नदीत मोठा जलविसर्ग करण्यात येत आहे. धरणाची सर्व 7 दारे पाव मीटरने उघडण्यात आली आहेत. नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या 24 तासात चंद्रपूर शहर जिल्ह्यात 28 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे.  यंदा आजपर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 96.2% एवढा पाऊस नोंदला गेलाय.  सध्याही शहर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 11, 2025 13:07:48
Kalyan, Maharashtra:२७ गावांना केडीएमसीत राहायचेच नाही निवडणूक आयोगाला केडीएमसी आयुक्तांनी सांगावे प्रभाग रचना हरकती सुनावणी दरम्यान खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी Anc कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना संदर्भात २६५ हरकती आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली होती. मात्र फक्त २७ गावातून ३ हजार ६४२ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेतली नव्हती असा आरोप करीत कल्याण ग्रामीण २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीच्या नेतत्वात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांनी सुनावणीस हजर राहून आयुक्तांसोबत चर्चा केली. या वेळी समितीची एकच मागणी आहे. २७ गावे वगळून प्रभाग रचना तयार करण्यात यावी. २७ गावात निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी २७ गावांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. याविषयी आयुक्तांनी माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देत या विषयाची मागणी देणार असल्याचे देखील खासदार l सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांनी सांगितले बाईट सुरेश म्हात्रे, खासदार भिवंडी लोकसभा
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 11, 2025 13:04:14
Kalyan, Maharashtra: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून ६ बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला घेतलं ताब्यात तपासादरम्यान धक्कादायक खुलासा १३ दिवसात बांगलादेशी महिलेकडे आधारकार्ड.. Anc..बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांसह एका बांगलादेशी इसमाला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Vo..कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाची गस्त सुरू असताना सहा महिलांसह एक इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले .पोलिसांनी त्यांना हटकले असता काही महिलांकडे बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र ,नॅशनल आय कार्ड असे कागदपत्र सापडली .तपासादरम्यान या महिला बांगलादेशहुन छुप्या मार्गाने भारतात आले आणि ट्रेन ने मुंबईत आल्याची माहिती समोर आली .यामधील रॉकी बादशाह या सहा महिलाना कल्याण मध्ये घेऊन आला होता .रॉकी काही महिन्यांपासून कल्याणमध्ये वास्तव्यास होता .त्याने विरारच्या एका इस्माकडून शिमा पठाण हिला अवघ्या 13 दिवसात आधारकार्ड बनवून दिल्याची माहिती आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून देणाऱ्या इसम देखील पोलिसांच्या रडारवर असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. बाईट... कल्याणी घेटे साहाय्य्क पोलीस आयुक्त
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 11, 2025 12:45:43
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ---- मंत्री नितेश राणे byte पॉईंटर ऑन भुजबळ --- कोणी कुणाचा हक्क हिरावून घेत नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला जे आरक्षण किंवा जे अधिकार द्यायचे आहेत. त्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय आहे. भुजबळ साहेबांच्या मनात काही गैरसमज असतील तर ते काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूर करतील. ऑन कर्नाटक रेल्वे स्थानक --- जिथे जिथे काँग्रेसच सरकार आहे. ते हिंदू द्वेषी आहेत. ते शिवाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. आणि जिहादला समर्थन करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच नाव बदला अस लोकप्रतिनिधी सांगत आहेत. आणि मुख्यमंत्री त्याला दुजोरा देत आहेत. हे दुर्दैव म्हणावं. ह्याबाबत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उत्तर द्याव.. जरांगे पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केलीय ती चांगलीच आहे. शिवाजी महाराजांचं नाव बदला या मागणीला आपला विरोध आहे हे सांगण्याच धाडस महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते करतील का??? आणि करत नसतील तर ते सगळे औरंग्याचे औलादी आहेत ऑन दहशद वादी अटक ---- आमचे देशाचे पंतप्रधान आणि कार्यतत्पर गृहमंत्री यांच्या कारकीर्दीत दहशवादाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणले गेले आहे. काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोटाची आपल्याला सवय झालेली. तेवढं आता सोप राहिलेलं नाही. आता कुठलाही अतिरेकी आमच्या देशाकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही. ऑन ठाकरे बंधू --- कुटुंब म्हणून त्यांनी एकत्र यावं. त्याच कौतुकच आहे. पतपेढीच्या निमित्ताने ते एकत्र आलेले. सगळ्या विरोधकांचा धुव्वा उडून दिलेला. 21 / 0 झालेलं परत एकत्र येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ऑन ठाकरे गटाला बाजूला ठेवून काँग्रेस निवडणुका --- काँग्रेस मध्ये काय चालले हे त्यांच्या नेत्यांना विचारा ऑन m 2 m --- आम्ही शुभ दिवसांची वाट पाहत आहोत सगळी तयारी झालेली आहे. On राजकोट --- सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाने तो निर्णय घेतला असेल. जी गोष्ट घडली ती पुन्हा घडू नये... ऑन ubt आंदोलन ( भारत पाकिस्तान ) -- माहिती घेऊन बोलेन ऑन अवैध धंदे --- जिल्हा पोलिस आपल्या माध्यमातून काम करत आहेत. आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे. थोडा वेळ द्या. कोणालाही आम्ही सोडणार नाही चुन चुन के मारेंगे ऑन मराठे ( कुणबी विरोध ) --- कोणावर शक्ती केली जाणार नाही. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवय त्यांना ते मिळणार. सरकार ने सक्ती केलेली नाही. ज्यांना मराठा म्हणून राहायचं आहे ते मराठे म्हणून राहतील ऑन कुडाळ ( निलंबन ) --- पक्षाच्या नियमात राहून जिल्हाध्यक्षांनी ते निलंबन केले आहे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख आणि आमचे ते नेते आहेत. म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि आमच त्याला समर्थन आहे. पक्ष शिस्त सर्वांना लागू आहेत. जे नियमांच भंग करतील त्यांच्यावर कारवाई होणार. Byte --- मंत्री नितेश राणे feed on desk
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 11, 2025 12:21:57
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 1109ZT_BARAMATIOBCKALU BYTE 1 बारामतीतील ओबीसी मोर्चा मध्ये लक्ष्मण हाके सह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आणि तो अजित पवारांच्या सांगण्यावरून _ काळुराम चौधरी... Anchor_बारामती पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चा संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवरती बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांचा देखील समावेश आहे.मात्र हा गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटल आहे. या संदर्भात आपण राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करणार असून माझ्यावर दाखल झालेला गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून आकसाने दाखल झाला आहे.अजित पवार यांनी घेतलेल्या गोपनेतेची शपथ आणि त्यांच्या पदाचा त्यांनी भंग केला आहे या विरोधात आपण त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटल आहे. जर राज्यपालांनी दखल घेतली नाही तर आपण न्यायालयात अजित पवारांच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचंही काळुराम चौधरी यांनी म्हटलं आहे. बाईट_ काळुराम चौधरी प्रदेश महासचिव बहुजन समाज पार्टी
2
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 11, 2025 12:00:25
Virar, Maharashtra:Date-21sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR THAKRE Feed send by 2c Type-AvB Slug- विरार मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराला विरोध अँकर - वसई विरार महानगरपालिकेत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार आयोजित करण्यात आला होता, या दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळया फिती बांधून निषेध व्यक्त केला ...यावेळी पन्नास खोके एकदम ओके, ओम भट स्वाहा असा घोषणा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या... वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्यालयासोबत निषेध व्यक्त करण्यात आला... Byte : किरण चेंदवणकर, शिवसेना ठाकरे गट .
1
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 11, 2025 11:46:14
Shirdi, Maharashtra:Anc - ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता खैर नाही.. कारण साईबाबासंस्थाने AI तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन " पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन " प्रणाली कार्यान्वित केली आहे.. या प्रणालीमुळे साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे.. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या प्रणालीत संग्रहित केला जाणार असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच सीसीटीव्हीच्या आधारे साई संस्थानला तातडीने अलर्ट मिळणार आहे.. एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन AI प्रणाली संस्थानने कार्यान्वित केली आहे.. साईभक्तांच्या सुकर दर्शनासह मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रणाली अंत्यंत महत्वाची ठरणार आहे.. याचाच आढावा घेतलाय आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.. tiktak kunal jamdade with ceo gorksh gadilkar
0
comment0
Report
Advertisement
Back to top