Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

कोंडाईबारी घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प! कारण जाणून घ्या!

PPPRASHANT PARDESHI
Jul 08, 2025 11:02:17
Dhule, Maharashtra
ANCHOR - नागपूर सुरत या राष्ट्रीय महामार्गवर कोंडाईबारी घाटात दरड कोसळली, त्याने वाहतूक ठप्प झाली. पर्यायी मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. दरड कोसळल्यामुळे दहिवेलहून विसरवाडी कडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात दगड व माती रस्त्यावर आल्याने वाहने अडकली होती , रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दहिवेलकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, या मार्ग दोन्ही बाजुचे वाहने जात असल्याने वाहनांची गती अत्यंत मंदावली आहे. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, महामार्ग प्राधिकरण विभाग महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे का? असा सवाल वाहनधारक यांनी उपस्थित केला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही . पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महामार्गाची बिकट अवस्था असल्याने यां मार्गांवर अपघातांचे सत्र सुरूच आहे. या भागात सतत अपघात, दरडी कोसळणे, रस्त्याला मोठाले खड्डे पडणे, पुलांमध्ये भगदाड निर्माण होणे व रस्त्याच्या मधोमध चिरा पडणे यामुळे लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या तक्रारीनंतर देखील या घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top