Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळमध्ये भोंदू महादेवचा धाडसी पर्दाफाश, महिला व मुलीला सात महिने कैद!

SRSHRIKANT RAUT
Jul 08, 2025 13:33:23
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळ मध्ये एक महिला व तिच्या अल्पवयीन मुलीला घरात सात महिने डांबून त्यांच्यावर अघोरी उपचार करणाऱ्या एका भोंदू चा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी भोंदू महादेव पालवे याच्या घरी धाड मारली असता पोलिसही हादरले. कारण घरात जादूटोण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे दुकानाच सापडले. VO 1 : यवतमाळच्या वंजारी फैल मध्ये राहणारा हा आहे महादेव उर्फ माऊली पालवे. शववाहिणीवर चालक असलेला महादेव हा भोंदूगिरी करायचा. त्याच्यासोबत त्याची पत्नी व मुलीचे वास्तव्य असून पोलिसांच्या धाडीत शेजारीच असलेल्या टीनाच्या शेड मध्ये एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी गंभीर अवस्थेत दिसून आल्या, सात महिन्यांपासून त्यांना शौच व लघुशंकेसाठीही बाहेर जाण्यास मनाई होती. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हा विधी त्यांना उरकावा लागत होता. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी तेथे होती. उपचाराच्या नावावर दोघींना गरम सळाखीचे चटके दिल्या जायचे. त्यामुळे दोघींच्याही शरीरावर अनेक जखमा आढळल्या. शिवाय घरात शेकडो बाहुल्या, धागे, गंडे, दोरे, नवरत्न, अंगठ्या देवी-देवतांचे फोटो व मूर्ती, एक शवपेटी व अनेक आक्षेपार्ह वस्तूंसह सात लाख रुपयांची रोकड पोलिसांना मिळाली. बाईट : रामकृष्ण जाधव : पोलिस निरीक्षक VO 2 : पती पासून विभक्त असलेल्या या महिलेला दृष्टात्म्याची करणी झाल्याची बतावणी करून भोंदू महादेवने तिला जाळ्यात ओढले, तिला व तिच्या मुलीला उपचाराच्या बहाण्याने घरी आणून डांबले, घरातच खड्डे देखील खोदलेले आहे, गुप्तधनासाठी गुरु पौर्णिमेला या दोघी मायलेकींचा बळी देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा मारताच भोंदू महादेवने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर पीडित महिला व तिच्या मुलीला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. समाजात अजूनही भोंदूगिरी करणारे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे देखील कमी नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा बुवा बाबा भोंदूंपासून सावध राहणे गरजेचे आहे. बाईट : कुमार चिंता : पोलीस अधीक्षक शशिकांत फेंडर : अनिस कार्यकर्ता VO 3 : पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार महादेव पालवे विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सरकारने 2013 साली जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला. मात्र बोटावर मोजण्या इतकेच गुन्हे दाखल झालेत त्यामुळे या कायद्या विषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top