Back
गोरगरिबांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला नांदेड पोलिसांनी अटक केली!
SMSATISH MOHITE
FollowJul 08, 2025 12:32:47
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_FrodCase
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - शासनाची अन्न धान्य योजना असल्याचा बनाव करून एका बंटी आणि बबलीने आपल्या साथीदारांसोबत मिळून हजारो गोरगरिबांना गंडा घातला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षांपासून हे बंटी बबली फरार होते अखेर त्यांना नांदेड पोलिसांनी अटक केली.
Vo - महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या आणि अशा शासनामान्य योजना असल्याचा बनाव करून गोरगरिबांची फसवणूक करण्यात आली. केवळ अकराशे ते बाराशे रुपयात भरघोस अन्नधान्य, शिलाई मशीन, विधवाना वर्षभर 10 हजार रुपये प्रतिमाहीना पेन्शन, 30 हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कुटी असे अमिष दाखवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या ठगानी दुकाने थाटली. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नेमून गरिबांना जाळ्यात ओढले. शासनाची योजना असल्याचा समज झाल्याने हजारोच्या संख्येने गोरगरीबानी पैसे दिले.
ग्राफिक्स
:: 1100 रुपयांच्या मोबदल्यात 30 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 10 किलो साखर, 10 किलो पोहा
:: 1200 रुपयात 60 किलो गहू, 25 किलो तांदूळ
:: 2200 रुपयात शिलाई मशीन
:: 1200 रुपये भरल्यानंतर विधवा महिलांना एक वर्ष प्रतिमाहीना 10 हजार रुपये
:: 30 हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कुटी
असे अमिष दाखवण्यात आले.
Vo - पैसे दिल्यानंतर तीन महिन्यांनी लाभ मिळणार असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात मोबदला देण्याची वेळ आली तेव्हा सुतारे आणि त्याचे सहकारी गायब झाले. या सर्व रॅकेट चा सूत्रधार आहे बाबासाहेब सुतारे. गुन्हा दाखल झाल्यावर दोन वर्षांपासून सुतारे त्याची पत्नी सोनालीला घेऊन फरार होता. स्वतःची ओळख लपवून नाव बदलून हे बंटी बबली लातूरमध्ये राहत होते. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना लातूरमधून अटक केली.
Byte - उदय खंडेराय - पोलीस निरीक्षक, एलसीबी. (सिव्हिल ड्रेस वर असलेला byte)
Vo - पैसे देऊन तीन महिने उलटूनही अन्न धान्य मिळत नसल्याने तक्रारी वाढल्या. हजारो लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. गोरगरिबांची फसवणूक झाल्याने काही संघटनानी मोर्चेही काढले. अखेर या प्रकरणी जून 2023 मध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 1 कोटी 85 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली. प्रत्यक्षात चौदा हजार लोकांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गोरगरिबांना ठगनाऱ्या बाबासाहेब सुतारे आणि त्याची पत्नी सोनाली या बंटी बबली पोलिसांनी अटक केलीये. त्यांची मलमत्ता आणि बँक अकाउंट सील करून पैसे वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
Byte - अबिनाशकुमार - पोलीस अधीक्षक,नांदेड. (युनिफॉर्म वरील byte)
Vo - शासनाची कुठलीही योजना असेल तर त्याची प्रसिद्धी शासन अधिकृत वर्तमाणपत्र अधिकृत माध्यमाद्वारे करते. महसूल यंत्रणा योजना राबवते. त्यामुळे कोणत्याही योजनेला बळी पडण्यापूर्वी नागरिकांनी खात्री करून घेणे आवश्यक आहे. नाहीतर असे बंटी आणि बबली गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेत राहतील.
सतीश मोहिते
झी 24 तास, नांदेड.
-------------------------
टीप - पती पत्नीचा फोटो टाकला आहे. महिला असल्याने पत्नीचा फोटो ब्लर करायचा का ठरवावे. ही फसवणूक ज्यावेळी झाली त्यावेळचे फाईल फुटेज 2 फाईल टाकल्या आहेत. त्याला फाईल वापरावे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement