Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

सरकार अगर किसान हक नहीं सुनेगा, रस्तों पर उतरेंगे किसान ब्रिगेड के नेता

JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 02:30:20
Akola, Maharashtra
Anchor : शेतक-यांना त्रास देण्याचे प्रकार सरकार तर्फे थांबविण्यात आले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा किसान ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी दिला आहे.अकोला येथील किसान ब्रिगेडच्या मध्यवर्ती कार्यालयाल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या नुकसान भरपाई साठी किंवा पिकविमा योजनेसाठी सुरू असलेली ई-पिक पाहणी ही दोष पुर्ण असुन अनेक शेतक-यांना यामुळे नाहक त्रास सहम करावा लागत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि पुढील काळात येणारे आव्हान या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी किसान ब्रिगेड च्या वतीला 19 सप्टेंबरला किसान सभेचे आयोजन करण्यात आले आहे, तर या सभेकरिता शेतकरी चळवळीचे नेते राकेश टीकेत , शेतकरी नेते रविकांत तुपकर, प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित राहणार आहे.सरकारी विविध योजनेच्या नावाखाली सुरू असलेली फसवणुक थांबविण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असा गंभीर इशारा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी दिला आहे.
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Sept 12, 2025 07:32:12
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_baner_wkt मोर्चात ठाकरे ब्रँडची चर्चा अँकर थोड्याच वेळात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे.... या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारो शिवसैनिक आणि मनसैनिक नाशिकच्या बेडी भालेकर मैदानात पोहोचत आहे.... या मोर्चात विशेष लक्ष केंद्रित होतंय त्या एका बॅनर या बॅनरवर संपूर्ण ठाकरे कुटुंब दिसत आहे... या बॅनरच्या मध्ये बाळासाहेब ठाकरे तर आजूबाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे अमित ठाकरे  दिसत आहे.... यानिमित्ताने नाशकात ठाकरे ब्रँड ची चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे... बिडी भालेकर मैदानावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 12, 2025 07:15:46
kolhapur, Maharashtra:नागपूर उच्च न्यायालयाचे संग्रहित Shots वापरावे ---------- राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करत लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचा आर्थिक नुकसान होत असल्याचे आरोप फेटाळून लावले आहे.. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजना तसेच लाभार्थ्यांना रोख रक्कम दिली जाते अशा इतर योजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे आरोप करत नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली होती.. त्यात लाडकी बहीण योजना आणि त्यासारख्या रोख रकमेचा लाभ देणाऱ्या इतर योजना बंद करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली होती... त्याच याचिके संदर्भात राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचे अर्थव्यवस्थेला कुठलाही नुकसान होत नाही असा दावा केला आहे.. तसेच राज्य सरकारची वित्तीय तूट मर्यादेत असल्याचा दावाही केला आहे... वडपल्लीवार यांनी केलेल्या याचिकेत "फायनान्शिअल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट" चा उल्लेख करत त्यामध्ये राज्याची वित्तीय तूट नेहमीच 3% च्या खाली असायला हवी असा उल्लेख ही करण्यात आला होता... त्याला उत्तर देताना राज्य सरकारने 2024-25 मध्ये राज्याची वित्ती तूट 3% पेक्षा खाली म्हणजेच 2.69% असल्याचा दावा करण्यात आला आहे..
3
comment0
Report
Sept 12, 2025 07:05:32
Yavatmal, Maharashtra:बहुजन रयत परिषदेच्या मागण्यांना प्रतिसाद देत अण्णा भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. मणिष सांगोळे यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. मातंग समाजातील तरुणांना २ ते ५ लाखांच्या कर्जासाठी केवळ एकच जामीनदार घ्यावा, नोंदणीकृत बँड दुकानदार व कलाकारांची जिल्हानिहाय यादी तयार करावी, थांबवलेली ऑनलाईन वेबसाईट त्वरित सुरू करावी तसेच उद्योजक प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज, जिल्ह्यात स्थायी व्यवस्थापक नेमणे अशा मागण्या मंजूर करण्यात आल्या. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अँड. कोमलताई साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर क्षिरसागर, विदर्भ जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे, महिला आघाडी अध्यक्ष हिराताई खडसे आदींसह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
6
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 12, 2025 07:03:23
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 12, 2025 06:17:20
Nashik, Maharashtra:नाशिक - *बाळा नांदगावकर बाईट पॉईंट्स* - नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आमचा संयुक्त मोर्चा - या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय - ज्या नाशिकला तुम्ही दत्तक घेतलय त्या नाशिककडे मंत्रिमंडळाच किती लक्ष आहे? - नाशिकमध्ये नेमकं काय चालू आहे? त्यासाठी हा संयुक्त मोर्चा शिवसेना उबाठा आणि मनसेने काढलेला आहे - नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, दिवसागणिक खून सत्र सुरू आहे - एमडी ड्रग्स टपऱ्यांवर विकले जात आहेत - शाळा, कॉलेजच्या आजुबाजूला ड्रग्स विकले जात असतील आणि सरकारच त्याकडे लक्ष नसेल तर सरकार म्हणून काय भूमिका घेणार - हनीट्रॅप प्रकरणाचं पुढे काय झालं? - शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न - आदिवासी शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं - राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक - नाशिकवर राज ठाकरेंच प्रेम - मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेलं असलं तरी राज ठाकरेंच प्रेम कमी झालेलं नाही - नाशिकचा विकास होत नाही, स्वतःला कर्तबगार समजणाऱ्या गिरीश महाजन काय करताय - छगन भुजबळ, दादा भुसे काय करत आहेत - सरकारला जाग आणण्यासाठी आजचा मोर्चा - कुणाला काय टीका करायची करू द्या, तुम्ही काम केलं असतं तर मोर्चा काढायची वेळ आली असती का? - नाशिक दत्तक घेऊन काय केलं? नाशिककरांच्या तोंडाला पानं पुसली - नाशिकची लोकं तुम्हाला विचारत आहेत, सिंहस्थ कामाच काय झालं? - प्रकल्प उद्ध्वस्त झाले - जबाबदार कोण? मुख्यमंत्री राज्याचे पालक असतात - नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली - राज ठाकरेंनी केलेली कामं तरी टिकवली का? - आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे - लोकांनी आम्हाला नाकारलं ते ही चांगलं केलं - ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केलं? हे लोकांना कळलं - हनीट्रॅप प्रकरण तडीस नेणे गरजेचं, शहराची नाचक्की झाली - कारवाई होणे गरजेचं - सरकारच्या नाकर्तेपणाचा आजचा आक्रोश मोर्चा -आयुक्तांना विनंती, भारताच भविष्य ड्रग्सच्या माध्यमातून उद्ध्वस्त होतंय - तुम्ही त्याकडे लक्ष द्यायला हवं - ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच काय होईल, हे मला आता सांगता येणार नाही - मी शिवसेनेचा घटक होतो आणि मनसेचा घटक - आम्हाला संघर्ष करायची सवय - सर्वपक्षीय लोकांनी आजच्या मोर्चात सहभागी व्हावे - आजचा मोर्चा जनतेचा, सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे - निवडणुकीच पुढे पाहता येईल - कुंभमेळ्याची तयारी अजून दिसत नाही - राज्यसरकारने यात लक्ष घातलं पाहिजे - प्रवीण गेडाम उत्तम अधिकारी, ते उत्तम काम करतील अशी अपेक्षा - अजूनही मुख्यमंत्र्यांना सर्व व्यवस्थित करण्याची संधी *ऑन आरक्षण* - राज ठाकरेंनी सुरुवातीच्या काळात भूमिका स्पष्ट केलीय - घटनेप्रमाणे कुणालाही धक्का न लागता आरक्षणहोतं द्यायला हरकत नाही - मात्र आमची सुरुवातीपासूनची भूमिका आर्थिक निकषावर आरक्षण हवं - मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला हवं - सर्वच बाबतीत राजकारण केलं जातंय - आरक्षणाच्या बाबतीतही राजकारण - फक्त राज ठाकरे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या पोटात आणि ओठात एकच आहे
13
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 06:16:29
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे.काही दिवसांपूर्वी अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता,त्यामुळे अकोल्यात सामाजिक तसेच राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती.आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी केली होती यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी अकोला पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे.आरोपीचा शोध घेण्यासाठी अकोला पोलिसांनी विविध राज्यांमध्ये पथके पाठवली होती.अखेर पोलिसांना यश मिळाले असून, मध्यप्रदेश येथील इंदौर येथून फरार आरोपीला तौहीद समीर बेदला अटक करण्यात आली आहे.फरार आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधात चार राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये शोध घेतला तर इंदौर येथील सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी सुद्धा केली.आता या अटकेनंतर पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Byte : अर्चित चांडक , पोलीस अधीक्षक , अकोला.
13
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 12, 2025 06:02:12
Junnar, Maharashtra:Feed 2C Slug: Junnar Kedkar Tamasha Badnam Rep: Hemant Chapude(Junnar) *कला केंद्रातील घटनांमुळे तमाशाला बदनाम करू नका...!* तमाशा आणि कला केंद्राचं नातं जोडणं चुकीचं कला केंद्रात "बैठक" नावाचा शो होतो, तो कोण बंद करणार? कला केंद्रात जाणारे लोक राजकारणी, पुढारी, पैसेवाले आणि मोठे अधिकारी असतात. त्यांच्याशी पंगा आम्ही कसा घेणार?” रघुवीर खेडकर - Anc :- कला केंद्रात घडणाऱ्या घटनांमुळे तमाशाला बदनाम केलं जात असल्यामे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आक्रमक झाले आहेत. Vo :- तमाशा आणि कला केंद्राचा काहीही संबंध नाही. कला केंद्राच्या बा-या एका जातीपुरत्या आहेत, पण तमाशा हा अठरापगड जातींचा आहे असं स्पष्ट करत आमच्या पोटावर पाय आणू नका अशी हात जोडुन विनवनी रघुवीर खेडकरांनी केलीय तमाशात खाजगी बैठक किंवा शो होत नाही. कला केंद्राची कला चार भिंतींच्या आत दाखवली जाते. त्यामुळे तमाशा आणि कला केंद्राचं नातं जोडणं चुकीचं असुन कला केंद्रात "बैठक" नावाचा शो होतो, तो कोण बंद करणार? आम्ही तमासगिरांनी तो बंद करायचा का? मग त्यांच्याशी आमचं वाईट व्हायचं का? असे सवाल करत कला केंद्रात जाणारे लोक राजकारणी, पुढारी, पैसेवाले आणि मोठे अधिकारी असतात. त्यांच्याशी पंगा आम्ही कसा घेणार?”, असा थेट प्रश्नही रघुवीर खेडकर यांनी उपस्थित केला. Byte :- रघुवीर खेडकर - अध्यक्ष आखिल भारतीय तमाशा परिषद... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
8
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 12, 2025 05:34:21
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतील तिहेरी खून प्रकरणातील जयगड पोलिसात दाखल केलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खुनाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एक वर्ष उलटूनही राकेश जंगम याच्या बेपत्ता प्रकरणाचा उलगडा जयगड पोलिसांना करता आला नव्हता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार दोन्ही खुनांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात संशयित आरोपी दुर्वास मयेकर याने सीताराम लक्ष्मण वीर व राकेश अशोक जंगम या दोघांचा खून केल्याची कबुली दिली होती. दुर्वास आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीत सीताराम यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेचा साक्षीदार असलेला राकेश जंगम बेपत्ता होता. मात्र त्याचाही खून केल्याची कबुली दुर्वासने दिली होती..
13
comment0
Report
Advertisement
Back to top