Back
लातूरच्या शेतकऱ्याची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी: 'शेती विकणे आहे'!
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 17, 2025 09:40:46
Latur, Maharashtra
लातूर स्टोरी....
exclusive pkg.......
AC ::- लातूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आता समोर आली आहे… गेल्या 30 दिवसापासून पाऊस नाही… कर्ज काढून पेरणी केली…पण बियाणे वापलंच नाही म्हणून पुन्हा दुबार पेरणी केली पण आता डोळ्यांदेखत पावसाअभावी पीक वाळून जात आहे. मशागतीसाठी खिशात पैसे नाहीत… म्हणूनच एका बैलासोबत स्वतःला औताला जुंपून शेतात राबणाऱ्या या शेतकऱ्याने शेती विक्रीसाठी थेट फलक लावला आहे… खाजगी सावकाराच्या सावटाखाली अडकलेल्या या शेतकऱ्याची वेदनादायक कहाणी आता ZEE 24 TAAS ने समोर आणली आहे. पाहुयात याच संदर्भातील एक Zee 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट....
VO 01 ::- औसा तालुक्यातील नागरसोगा गावातील हे आहेत ७० वर्षीय गोरोबा आडसुळे… गोरोबा आडसुळे यांना चार एकर जमीन आहे. त्याची एक एकर जमीन हि त्यांच्या तळ्यात गेली आहे. त्याचा मोबदला हि त्यांना मिळाला नाही. शेती करण्यासाठी त्याने गावातील काही लोकांकडून खाजगी कर्ज घेतलं त्यासोबतच एका बँकेतून ही त्यांनी कर्ज घेतलं पण सततच्या नापिकीमुळे त्यांनी ते कर्ज फेडू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे असलेला बैल जोडीतील एक बैल त्याने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी विकला. पण पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने तो प्रश्न तसाच राहिला मग त्या शेतकऱ्याने पेरणीसाठी खाजगी सावकाराकडून पैसे व्याजाने घेतले…मात्र आता तेही पेरणी केलेले पीक पावसाअभावी वाळून जात आहे… खिशात मशागतीसाठी पैसे नाहीत…
म्हणून एका बैलाबरोबर स्वतःलाच औताला जुंपून हे वयोवृद्ध शेतकरी शेतात राबत आहेत…
बाईट::- 1 टु 1 शेतकरी आणि रिपोर्टर
VO 02 ::- शेती परवडत नाही… कर्जबाजारीपणाचा फास घट्ट होत चाललाय… आणि म्हणूनच गोरोबा आडसुळे यांनी आपल्या शेताच्या बांधावर थेट 'शेती विकणे आहे' असा फलक लावला… या फलकासह त्यांची वेदना संपूर्ण लातूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे…बँकेच्या आणि खाजगी सावकाराच्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आता शेती विकण्या शिवाय त्यांच्या हाती काहीच उरलेलं नाही.
सरकार दरबारी अनेक वेळेस अवैद्य सावकारी आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात विरोधक आवाज उठवतात पण सरकारकडून मात्र त्यावर कसलाही ठोस उपाय केला जात नसल्याचा आरोप आता होत आहे. माजी मंत्री अमित देशमुख यांनी अधीवेशनात विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकाच्या पातळीवरून अवैध सावकारकी रोखण्यासाठी चौकशी आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे
साऊंड बाईट ::- आमदार अमित देशमुख
बाईट ::- राजीव कसबे ( क्रांतिकारी शेतकरी संघटना )
VO 03 ::- दुष्काळ, महागाई, खाजगी सावकारी, आणि शासनाच्या आश्वासनांची फसवणूक…
या सगळ्यांनी शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे… लातूर जिल्ह्यात अवैध सावकारी ने डोके वरी काढल्यामुळे चित्रपटातील मुळशी पॅटर्नसारखी परिस्थिती लातूर जिल्ह्यातही निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने वेळीच या शेतकऱ्यांच्या वेदना ऐकाव्यात अशी मापक अपेक्षा शेतकरी करत आहेत....
.............................................................
वैभव बालकुंदे
ZEE 24 TAAS Latur
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement