Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

झाडांची छाटणी: ४५ पक्षांचा मृत्यू, २८ जखमी!

SKShubham Koli
Jul 17, 2025 15:05:28
Thane, Maharashtra
खाजगी ठेकेदाराकडून बिल्डिंगच्या आवारात झाडांची छाटणी केल्यामुळे पक्ष्यांच्या घरट्यासोबत पक्षी खाली पडून अंदाजे ४५ पक्षांचा मृत्यू तर २८ पक्षी जखमी.. घोडबंदर रोड  ऋतू इन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात खाजगी ठेकेदाराकडून झाडांची छाटणी केल्यामुळे अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली पडले होते व झाडांच्या फांद्याखाली अडकून पडले होते. *सदर घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे कर्मचारी (WWA), माय पाल क्लबचे कर्मचारी(MYPALCLUB), वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १ पिकअप वाहनासह उपस्थित होते. *सदर घटनास्थळी अंदाजे गाय बगळा व बगळा प्रजातीचे ४५ पक्षांचा मृत्यू झाला आहे व पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये असलेली असंख्य अंडी देखील फुटली आहेत तसेच २८ जखमी पक्षांना झाडांच्या फांद्या खालून बाहेर काढून उपचारासाठी खाजगी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे... सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधीत विभागाला लवकरात लवकर कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे.
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top