Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

ठाकरे गटाची गांधीगिरी: ओला-उबेर चालकांना दिला हार-श्रीफळ!

ABATISH BHOIR
Jul 17, 2025 13:35:18
Kalyan, Maharashtra
कल्याण मध्ये ठाकरे गटाचा गांधीगिरीतून ओला-उबेर बंद न मानणाऱ्यांना चालकाचा हार-श्रीफळ देत गांधीगिरी मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा Anc..पंधरा तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर ओला उबेर कंपनीच्या मनमानी विरोधात चालकांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलन दरम्यान ओला उबेर चालकानी राज्यभरात बंदचा इशारा देखील दिला आणि या आंदोलनात सर्व चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही चालकांनी या बंदला पाठिंबा दिला नाही आणि अधिक पैसे मिळतात म्हणून रस्त्यावर आपली वाहने चालवत आहे अशाच चालका विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाले असून , आज ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेने आगळ्यावेगळ्या प्रकारे आंदोलन केले. यावेळी ओला-उबेरच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी न झालेल्या चालकांना त्यांनी हार आणि श्रीफळ देऊन 'सत्कार' केला. मात्र हा सत्कार वाटत असला तरी, तो गांधीगिरीतून दिलेला एक कडक इशारा होता.उबेर चालकांच्या आत्महत्या झाल्या आहेत. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते हा बंद तुमच्यासाठीच आहे आज हाल आणि श्रीपत देऊन आपले सत्कार करत आहोत उद्यापासून आमचा आंदोलन तीव्र होईल असा इशारा ओला चालकांना ठाकरे गटांनी दिलेला आहे त्याचबरोबर आज जरी गांधीगिरीने या चालकांचे 'स्वागत' झाले असले, तरी जर आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र होईल. या सर्व परिस्थितीची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर राहील, असा स्पष्ट इशाराही देखील यावेळेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे . Byte :- निलेश भोर ( गटाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष )
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top