Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर के गांव में बाढ़: बैलगाड़ी से मरीज पहुंचाने की तस्वीर

AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 11:46:10
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : गावात रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने बैलगाडीवरून रुग्णाला घेऊन जायची वेळ - अक्कलकोट तालुक्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थिती. - पुराच्या पाण्यात रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. - आंदेवाडी गावात पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू न शकल्याने रुग्णाला गावातील ओढयाचा पूल बैलगाडीने पार करावा लागल्याचे पाहायला मिळाले. - बोरी नदीच्या पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील मार्ग झाले बंद . - गावातील वृद्ध महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने नागरिकांनी बैलगाडीने रुग्णवाहिके पर्यंत नेले. - अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (जहागीर ) गावातील धक्कादायक घटना.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 14:03:18
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 15, 2025 14:03:07
Kalyan, Maharashtra:खड्डे प्रश्नी शिवसेना आक्रमक हात जोडून विनंती करतोय रस्ते दुरुस्त करा अन्यथा हात सोडून आंदोलन करू कल्याण डोंबिवली मध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण चालणं झाली आहे .नागरिकांसह विरोधी पक्षांनी खड्डयां विरोधात अनेकदा आंदोलने केली . मात्र केडीएमसी कडून आश्वासन पलीकडे काहीच कारवाई झाली नाही आजमीतिला रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे .आता सत्ताधारी शिवसेना देखील आक्रमक झालेआहे.शिवसेने चे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी रस्त्यांसदर्भात अनेकदा पाठपुरावा केला मात्र प्रशासनाकडून काहीच कारवाई झाली नाही . खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत जाब विचारला.आयुक्तांना खड्डे बुजवणार कधी ?आयुक्तांनी पाहणी करून पाच दिवस झाले मात्र त्यानंतर खड्डे बुजवण्याची कामे सुरू झालेली नाहीत या शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत रस्ते दुरुस्त करा ही हात जोडून विनंती करतोय अन्यथा हात सोडून आंदोलन करू असा इशारा देखील शहर प्रमुख शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिला Byte... निलेश शिंदे कल्याण शहर प्रमुख.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 13:51:50
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्हात सलग तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय, जिल्ह्यातील पूर्णा,करपरा आणि गोदावरी नदी भरून वाहत असल्याने अनेक ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे गंगाखेड तालुक्यातील खळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने खळी गावाचा शहरापासून संपर्क तुटलाय,ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. ओढ्याला वाढलेल्या पाण्यातून ऑटो ढकलत नेण्याची वेळ ग्रामस्थानवर आलाय. सोनपेठ तालुक्यातील शिरशी गावाला गोदावरीचे पाणी भिडलय,जिल्ह्यातील प्रमुख नदी नाले आणि ओढ्यांकाठच्या पीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेली आहेत...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 13:51:36
Akola, Maharashtra:Anchor : सन 2024 मध्ये नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले जन्माचे दाखले रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सर्वपक्षीय सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले आहे.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, तहसीलदार यांना न्यायालयाचा अधिकार देऊन जन्माचे दाखले देण्याचा अधिकार देण्यात आला होता. याच अधिकाराचा वापर करत तहसीलदारांनी नायब तहसीलदारां मार्फत गरजू लोकांना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जन्म दाखले देण्याचे आदेश दिले होते. अनेक नागरिकांचे जन्म घरी झाल्यामुळे नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे हेच एकमेव अधिकृत माध्यम होते. मात्र, या प्रक्रियेवर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, 2024 मध्ये मिळालेले दाखले रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिकांनी घेतले असल्याचा आरोप केला.अकोला जिल्हाधिकारी यांनी ‘एसआरटी कमिटी’ स्थापन करून चौकशी केली मात्र सर्व संबंधित नागरिकांची कागदपत्रे तपासली आणि कोणताही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक आढळून आला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले असल्याच आंदोलकांनी म्हंटलय.मात्र तरीही शासनाकडून जन्माचे दाखले रद्द करण्यात आले.या निर्णयामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे कठीण झाले असून शाळा, कॉलेज, आरोग्य, निवडणूक नोंदणी यांसारख्या बाबतीत देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने हे दाखले रद्द करू नयेत, अशी मागणी मूर्तिजापूरकरांनी केली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 13:35:27
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 15, 2025 13:35:16
Mumbai, Maharashtra:अँकर -- मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देणार महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे.आज मुंबई बँकेत मच्छीमार बांधवांची मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी बैठक घेतली. मच्छीमार बांधवांनाही शेतकऱ्यांप्रमाणे शंभर टक्के भरपाई देण्यात येणार आहे त्या संदर्भात लवकरच जीआरही काढण्यात येणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं आहे.  *मंत्री नितेश राणे* - यासंदर्भात प्रविण दरेकरांच्या माध्यमातून जिल्हा बँक व मस्त्य खाते म्हणून मच्छिमारांच्या आयुष्यात कसा बदल करू याबाबत ते चर्चा करतात - या १० महिन्यात कामकाज पाहिले तर मच्छिमारांबाबत सर्वात जास्त प्रश्न प्रविण दरेकरांनी विचारले असतील - त्यांच्या सातत्याने सूचना मिळतात - आपला महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मस्त्य शेतीला १०० टक्के कृषीचा दर्जा दिला आहे -  ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो, त्यात किसान क्रेडिट कार्ड, ४ टक्के सवलत, शेतकऱ्यांसाठी पॅकेज देतो - मच्छिमारांना मदत देताना स्पेशल केस करावी लागायची - पण आता शेतकऱ्यांना जशी मदत देतो त्याच चौकटीत मच्छिमारांना देता येणार आहे. -  जीआर काढला तर आता अंमलबजावणी कशी होणार?  - तर *वित्त विभागात ही अमलबजावणी बाबत निर्णय अंतिम टप्प्यात आहे* - त्यात नुकसान भरपाई बाबतही निर्णय असेल. - *सरकार म्हणून जी जी मदत शेतकऱ्यांना करतो, तीच मदत मच्छिमारांना देता येईल* - एवढी ताकद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे - पहिले तुम्ही आला, मग आम्ही आलो. - म्हणून तुमचा विकास हा गरजेचा आहे. - मुंबई बँकेने १०० कोटींची तरतूद केली आहे. - जिल्हा बँकेने १ हजार कोटींची तरतूद केली आहे. - *एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय* - देशात प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना सुरु आहे. - *तशीच मुख्यमंत्री मस्त्य संपदा योजना जानेवारी २०१६ मध्ये सुरु करणार आहोत* - आईस फॅक्टरी टाकायची असेल किंवा कुठलाही. याबाबत प्रकल्प करायचा असेल, तर त्यासाठी ही मदत होईल. - अमेरिकेने लावलेल्या टारिफ पैकी ६० टक्के हा मस्त्य व्यवसायावर लावला आहे. - त्यामुळे आपल्या देशातच जास्तीत जास्त मार्केट उपलब्ध करून द्यावे लागेल. - ऑन विरोधक आंदोलन त्यांच्या राजकीय नुकसानभरपाईची वेळ आली आहे त्यांना पॅकेज हवे आहे, म्हणून ते आंदोलन करत आहेत Byte -- नितेश राणे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री. मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४८  slug -- nitesh rame byte 
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 13:06:12
Parbhani, Maharashtra: अँकर- परभणी जिल्ह्यात जुलै, ऑगष्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये मोठया प्रमाणावर अतीवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन,उडीद मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज पर्यंत जिल्ह्यात ६५० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालाय. काही मंडळात दीडशे पेक्षा अधिक मिलिमीटर एवढा पाऊस कोसळलाय, पण प्रत्यक्ष बांधावर जाऊन आतापर्यंत कोणत्याच नुकसानीचे पंचनामे झाले नसून प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत नसल्याचा आरोप करीत आज प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकार्यांना सोयाबीनचे सडलेले धान भेट देत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये अर्थिक मदत तात्काळ देऊन देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांचा आधार शासनाने बनण्याची मागणी केलीय,शेतकर्यांना वेळीच मदत न दिल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा ईशारा ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलाय... बाईट- शिवलिंग बोधने- जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 15, 2025 13:03:34
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या पटेल मार्ट मध्ये मराठी बोलण्यावरून वाद मराठी बोलायची सक्ती आहे का महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्यासोबत आरेरावी 15 ऑक्टोबर पर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन करणार Anc कल्याणमध्ये पटेल मार्ट या दुकानात मराठी बोलण्यावरून वाद झाला. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर याठिकाणी खरेदी करण्यासाठी गेले होते, यादरम्यान दुकानातील एका महिला कर्मचारी सोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून वाद झाला. घाणेकर यांनी सांगितले तू मराठी का नाही बोलत, यांवर महिला कर्मचारी संतापत जोराने टेबलवर हात आपटले. मराठी बोलण्याची सक्ती आहे का मी मराठी नाही बोलणार. कर्मचारी महिला असल्याने घाणेकर यांनी पटेल मार्ट च्या मॅनेजरला ही घटना सांगितली. याच दरम्यान मनसेचे कार्यकर्ता देखील दुकानात पोहोचले. मॅनेजर मनीषा धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. घाणेकर यांनी पटेल मार्ट ला इशारा दिला आहे, 15 ऑक्टोबर पर्यंत मार्ट मधील सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आली पाहिजे. असे नाही झाले तर मी दुकानाबाहेर उभं राहून येथून खरेदी करू नका असे आवाहन लोकांना करणार असल्याचे सांगितले. मार्ट मधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार मॅनेजर मनीषा धस यांनी आश्वासन दिला आहे.. बाईट.. श्रीनिवास घाणेकर सामाजिक कार्यकर्ते बाईट..मोनिका धस पटेल मार्ट मॅनेजर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 12:31:13
Akola, Maharashtra:Anchor : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करत ओबीसी समाजातील नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. अकोल्यामध्ये सकल ओबीसी संघटनाच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.उपोषणकर्त्यांचा स्पष्ट आक्षेप आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून आरक्षण देणे म्हणजे मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणे आहे त्यामुळे सरकारने अशा निर्णयापासून मागे हटावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.ओबीसी आरक्षण हे ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर मिळालेले आहे. या आरक्षणामध्ये कोणतीही दुसरी जात सामील झाल्यास आमच्यावर अन्याय होईल असे मतही आंदोलकांनी व्यक्त केले आहे.अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू असून, विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षणासाठी वेगळा मार्ग शोधण्याची मागणी केली आहे.दरम्यान, सरकारने या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेऊन गोंधळ दूर करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातही या मुद्द्यावरून चांगलाच कलगट सुरू असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Byte : शंकर पोरेकर , ओबीसी आंदोलक.
4
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 15, 2025 12:19:15
Thane, Maharashtra:शहापूर...... श्रमजीवी संघटनेचे एकाच दिवशी चार शासकीय कार्यालयावर धरणे आंदोलन... आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आंदोलन तीव्र करू..... श्रमजीवीच्या प्रशासनाला इशारा... ॲंकर.... शहापूर तालुक्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने एकाच दिवशी चार शासकीय कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. पिढ्यान् पिढ्या राहणारे आदिवासी आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. वन विभागाने रस्त्यांसाठी जागा नाकारल्यामुळे अनेक पाड्यांना अजूनही पक्के रस्ते मिळालेले नाहीत. उलट आजही खाजगी मालकांच्या जमिनीतून वाड्या-पाड्यांनाला जोडणारे फक्त वहिवाटीचे रस्ते वापरले जातात, पण ते अधिकृत वा कायमस्वरूपी नसल्याने जनतेला प्रचंड हाल सोसावे लागतात. याबाबत आम्ही मागील वर्षी 17 डिसेंबर 2024 रोजी आयोजित मोर्चामध्ये ठोस आमच्या मागण्या मांडल्या होत्या. तसेच कातकरी वस्तीस्थान मोजणी करणार व हद्द कायम करून देणार असे सांगितले होते. आदिवासी आणि कातकरी समाजाला आधार कार्ड व रेशनकार्ड नाहीत तसेच जन्म मृत्यू दाखले नाहीत. नगरपंचायत शहापूर हद्दीतील आदिवासी बांधवांना शासकीय घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वीज नाही, गावठाण व स्मशानभूमी यांचा अभाव आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक आदिवासी समाजात तीव्र नाराजी आहे. आजही अनेक पाड्यांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ते वाहून जातात. एखादा रुग्ण झाल्यास दवाखान्यात पोहोचवणे ही जीवाशी खेळण्यासारखी परिस्थिती आहे. गावठाण हक्क अद्यापही मिळालेले नाहीत. वनहक्क कायद्यामुळे आदिवासीला स्वतःच्या जमिनीवरही अधिकार नाही. मृत व्यक्तीला सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा योग्य स्मशानभूमी उपलब्ध नाही या बाबतीत जर आपल्या स्तरवरुन पुर्तात झाली नाही तर यापुढे आपल्या कार्यालया समोर संघटने मार्फत तिव्र आंदोलन करण्यात येईल यांची आपण दखल घ्यावी.
5
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 12:02:13
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_ST_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:अनुसूचित जमातीमध्ये(आदिवासींमध्ये) इतर जातींचा समावेश कोणत्याही परिस्थितीत होऊ नये,अशी ठाम भूमिका आदिवासी समाजाने मांडली असून या मागणीसाठी आज वाशीमच्या मंगरूळपीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आदिवासी बांधवांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन सादर केले.निवेदनात आदिवासी समाज हा भारताचा मूळ रहिवासी असून त्यांची स्वतंत्र संस्कृती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.आजही आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यात राहतो, त्यामुळे मूलभूत विकासापासून वंचित असल्याचेही निदर्शनास आणले आहे.सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जमातींमध्ये एकूण ४५ जमातींचा समावेश आहे.त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ नये, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.अन्यथा आदिवासी समाज संविधानिक मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्याने आदिवासी महिला,पुरुष व युवक सहभागी झाले होते.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 15, 2025 12:01:56
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Haveli 20 Family Rain Damage File:05 Rep: Hemant Chapude(Haveli) Anc: पुण्याच्या थेऊर परिसरात मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने गाठ झोपेत असताना पुराच्या पाण्यात २० कुटुंब अडकली जीवाच्या आकांताने टाहो फोडत असताना तब्बल 70 नागरिकांना रेस्क्यू करत वाचवण्यात आलं मात्र या पुरामध्ये 46 शेळ्या एक गाय एक म्हैस यांचा दुर्दैव रित्या मृत्यू झालाय,तर घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य पुराच्या पाण्यात उध्वस्त झालं,आमच कुटुंब संसार उघड्यावरती आलाय आम्ही जगायचं कसं याच्या चिंतेने नुकसानग्रस्त कुटुंबांना अश्रू अनावर झालेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: हेमंत चापुडे To नुकसान ग्रस्त महिला प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया हवेली पुणे...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 15, 2025 11:48:40
5
comment0
Report
Advertisement
Back to top