Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421306

कल्याण-डोंबिवली के खड्डे: शिवसेना का आक्रामक प्रदर्शन, आयुक्त से जवाब मांगा

ABATISH BHOIR
Sept 15, 2025 14:03:07
Kalyan, Maharashtra
खड्डे प्रश्नी शिवसेना आक्रमक हात जोडून विनंती करतोय रस्ते दुरुस्त करा अन्यथा हात सोडून आंदोलन करू कल्याण डोंबिवली मध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण चालणं झाली आहे .नागरिकांसह विरोधी पक्षांनी खड्डयां विरोधात अनेकदा आंदोलने केली . मात्र केडीएमसी कडून आश्वासन पलीकडे काहीच कारवाई झाली नाही आजमीतिला रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे .आता सत्ताधारी शिवसेना देखील आक्रमक झालेआहे.शिवसेने चे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी रस्त्यांसदर्भात अनेकदा पाठपुरावा केला मात्र प्रशासनाकडून काहीच कारवाई झाली नाही . खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत जाब विचारला.आयुक्तांना खड्डे बुजवणार कधी ?आयुक्तांनी पाहणी करून पाच दिवस झाले मात्र त्यानंतर खड्डे बुजवण्याची कामे सुरू झालेली नाहीत या शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत रस्ते दुरुस्त करा ही हात जोडून विनंती करतोय अन्यथा हात सोडून आंदोलन करू असा इशारा देखील शहर प्रमुख शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिला Byte... निलेश शिंदे कल्याण शहर प्रमुख.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 15:31:49
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात आज सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या सुमारे एक तासापासून धुवाधार पावसाची संततधार सुरू आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या या पावसामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे काही भागांत पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली असून, वाहतुकीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. हवामान खात्याने आधीच पावसाचा अंदाज वर्तवला होता, जो अचूक ठरला आहे.सतत एक तासाच्या या पावसामुळे उन्हाच्या झळांपासून त्रस्त नागरिकांना काहीसा आराम मिळाला आहे. आगामी काही तासांत आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 14:31:46
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_CHP_PARTY_RAID ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य भवनात अभियंता दिवसानिमित्त जिल्हा परिषद अभियंत्यांची ओली पार्टी ,आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कक्ष क्रमांक 107 मध्ये धडक देत उघडकीस आणला प्रकार     अँकर:-- आज 15 सप्टेंबर अभियंता दिन. चंद्रपूर जिल्हा परिषदेत नियुक्तीला असलेल्या काही अभियंत्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात जटपुरा गेट परिसरात असलेल्या वसंत भवन सदस्य निवास येथील कक्ष क्रमांक 107 मध्ये ओली पार्टी केली. या पार्टीची कुणकुण लागताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कक्षात धडक देत हा प्रकार उघडकीस आणला. तेव्हा येथे उपस्थित 7 अभियंते कक्षातील प्रसाधन गृहात लपण्यासाठी पळताना दिसले. वसंत भवन सदस्य निवास अन्य कुणालाही देण्यासाठी सतत नकार दिला जातो.  मात्र अभियंत्यांनी केलेल्या या ओल्या पार्टीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.  आम आदमी पक्षाने या प्रकरणाची माहिती जि प सीईओ पुलकित सिंग यांना दिली. यावर सीईओंनी माहिती व्हाट्सअप वर पाठवा अशी सूचना केली.  या प्रकरणाची चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. बाईट १) मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 14:18:15
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर रेल्वे स्थानकावर एका धक्कादायक घटनेने प्रवाशांचे लक्ष वेधले.अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून उतरताना एक 50 वर्षीय प्रवशी रेल्वेच्या पायरी आणि प्लॅटफॉर्म मधील अरुंद जागेत अडकला. तब्बल 55 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याची सुटका करण्यात आली.मुस्ताक मोईन खान हे मूर्तीजापूर येथे नातेवाईकाच्या निधनानिमित्त आले होते. ट्रेन थांबल्यानंतर उतरताना त्यांचा तोल जाऊन पाय प्लॅटफॉर्मवर न पडता थेट रेल्वेच्या पायरीखाली व प्लॅटफॉर्मच्या अरुंद जागेत अडकला. त्यामुळे ते पूर्णपणे अडकून गेले आणि हालचाल करणे अशक्य झाले.घटनेनंतर उपस्थित प्रवासी, रेल्वे कर्मचारी, व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेतली. गाडीच्या पायऱ्या कटरने कापण्यात आल्या तसेच प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडून अखेर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रक्रियेत त्यांचा उजवा पाय गंभीर जखमी झाला.प्राथमिक उपचारासाठी त्यांना मूर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, व पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.ही घटना सावधगिरी न बाळगल्याने किंवा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेतील जागेच्या अपुऱ्या डिझाइनमुळे घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रेल्वे प्रशासनाने याबाबत चौकशी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 14:03:18
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 13:51:50
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्हात सलग तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय, जिल्ह्यातील पूर्णा,करपरा आणि गोदावरी नदी भरून वाहत असल्याने अनेक ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे गंगाखेड तालुक्यातील खळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने खळी गावाचा शहरापासून संपर्क तुटलाय,ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. ओढ्याला वाढलेल्या पाण्यातून ऑटो ढकलत नेण्याची वेळ ग्रामस्थानवर आलाय. सोनपेठ तालुक्यातील शिरशी गावाला गोदावरीचे पाणी भिडलय,जिल्ह्यातील प्रमुख नदी नाले आणि ओढ्यांकाठच्या पीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेली आहेत...
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 13:51:36
Akola, Maharashtra:Anchor : सन 2024 मध्ये नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले जन्माचे दाखले रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सर्वपक्षीय सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले आहे.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, तहसीलदार यांना न्यायालयाचा अधिकार देऊन जन्माचे दाखले देण्याचा अधिकार देण्यात आला होता. याच अधिकाराचा वापर करत तहसीलदारांनी नायब तहसीलदारां मार्फत गरजू लोकांना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जन्म दाखले देण्याचे आदेश दिले होते. अनेक नागरिकांचे जन्म घरी झाल्यामुळे नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे हेच एकमेव अधिकृत माध्यम होते. मात्र, या प्रक्रियेवर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, 2024 मध्ये मिळालेले दाखले रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिकांनी घेतले असल्याचा आरोप केला.अकोला जिल्हाधिकारी यांनी ‘एसआरटी कमिटी’ स्थापन करून चौकशी केली मात्र सर्व संबंधित नागरिकांची कागदपत्रे तपासली आणि कोणताही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक आढळून आला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले असल्याच आंदोलकांनी म्हंटलय.मात्र तरीही शासनाकडून जन्माचे दाखले रद्द करण्यात आले.या निर्णयामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे कठीण झाले असून शाळा, कॉलेज, आरोग्य, निवडणूक नोंदणी यांसारख्या बाबतीत देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने हे दाखले रद्द करू नयेत, अशी मागणी मूर्तिजापूरकरांनी केली आहे.
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 13:35:27
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 15, 2025 13:35:16
Mumbai, Maharashtra:अँकर -- मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देणार महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे.आज मुंबई बँकेत मच्छीमार बांधवांची मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी बैठक घेतली. मच्छीमार बांधवांनाही शेतकऱ्यांप्रमाणे शंभर टक्के भरपाई देण्यात येणार आहे त्या संदर्भात लवकरच जीआरही काढण्यात येणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं आहे.  *मंत्री नितेश राणे* - यासंदर्भात प्रविण दरेकरांच्या माध्यमातून जिल्हा बँक व मस्त्य खाते म्हणून मच्छिमारांच्या आयुष्यात कसा बदल करू याबाबत ते चर्चा करतात - या १० महिन्यात कामकाज पाहिले तर मच्छिमारांबाबत सर्वात जास्त प्रश्न प्रविण दरेकरांनी विचारले असतील - त्यांच्या सातत्याने सूचना मिळतात - आपला महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मस्त्य शेतीला १०० टक्के कृषीचा दर्जा दिला आहे -  ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो, त्यात किसान क्रेडिट कार्ड, ४ टक्के सवलत, शेतकऱ्यांसाठी पॅकेज देतो - मच्छिमारांना मदत देताना स्पेशल केस करावी लागायची - पण आता शेतकऱ्यांना जशी मदत देतो त्याच चौकटीत मच्छिमारांना देता येणार आहे. -  जीआर काढला तर आता अंमलबजावणी कशी होणार?  - तर *वित्त विभागात ही अमलबजावणी बाबत निर्णय अंतिम टप्प्यात आहे* - त्यात नुकसान भरपाई बाबतही निर्णय असेल. - *सरकार म्हणून जी जी मदत शेतकऱ्यांना करतो, तीच मदत मच्छिमारांना देता येईल* - एवढी ताकद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे - पहिले तुम्ही आला, मग आम्ही आलो. - म्हणून तुमचा विकास हा गरजेचा आहे. - मुंबई बँकेने १०० कोटींची तरतूद केली आहे. - जिल्हा बँकेने १ हजार कोटींची तरतूद केली आहे. - *एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय* - देशात प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना सुरु आहे. - *तशीच मुख्यमंत्री मस्त्य संपदा योजना जानेवारी २०१६ मध्ये सुरु करणार आहोत* - आईस फॅक्टरी टाकायची असेल किंवा कुठलाही. याबाबत प्रकल्प करायचा असेल, तर त्यासाठी ही मदत होईल. - अमेरिकेने लावलेल्या टारिफ पैकी ६० टक्के हा मस्त्य व्यवसायावर लावला आहे. - त्यामुळे आपल्या देशातच जास्तीत जास्त मार्केट उपलब्ध करून द्यावे लागेल. - ऑन विरोधक आंदोलन त्यांच्या राजकीय नुकसानभरपाईची वेळ आली आहे त्यांना पॅकेज हवे आहे, म्हणून ते आंदोलन करत आहेत Byte -- नितेश राणे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री. मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४८  slug -- nitesh rame byte 
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 13:06:12
Parbhani, Maharashtra: अँकर- परभणी जिल्ह्यात जुलै, ऑगष्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये मोठया प्रमाणावर अतीवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन,उडीद मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज पर्यंत जिल्ह्यात ६५० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालाय. काही मंडळात दीडशे पेक्षा अधिक मिलिमीटर एवढा पाऊस कोसळलाय, पण प्रत्यक्ष बांधावर जाऊन आतापर्यंत कोणत्याच नुकसानीचे पंचनामे झाले नसून प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत नसल्याचा आरोप करीत आज प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकार्यांना सोयाबीनचे सडलेले धान भेट देत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये अर्थिक मदत तात्काळ देऊन देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांचा आधार शासनाने बनण्याची मागणी केलीय,शेतकर्यांना वेळीच मदत न दिल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा ईशारा ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलाय... बाईट- शिवलिंग बोधने- जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष
2
comment0
Report
Advertisement
Back to top