Back
आग लागली: पूर्णा तालुक्यातील ट्रॅव्हल्सचा थरारक अनुभव!
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 16, 2025 05:30:22
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माखणी पाटी शिवारात नांदेडहून पोकणी तालुका पूर्णाकडे जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सला बस ला अचानक आग लागली. सदर ट्रॅव्हल्स नांदेड येथील गॅरेजचे काम आटोपून पोकणीकडे निघाली होती. गाडीमध्ये केवळ चालकासह दोघेजण प्रवास करत होते. माखणी पाटी परिसरात आल्यानंतर अचानक गाडीच्या इंजिनमधून धुर येऊ लागला. काही क्षणातच गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत तिघांनी तात्काळ गाडी बाहेर उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्राथमिक अंदाजानुसार या बसचे वायरिंगचे काम झाले होते, त्यातून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झालीह,
4
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowJul 16, 2025 17:32:19Mumbai, Maharashtra:
anchor : टागोर नगर विक्रोळी मार्केट मध्ये असलेल्या लकी मेडिकल शॉप मध्ये काम करणाऱ्या प्रेमसिंग देवडा
या तरुणाने मराठी आणि महाराष्ट्र बाबत अपशब्द स्टेटस ला ठेवले होते. या वर मनसेचे नेते विश्वजीत ढोलम आणि पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी या दुकानदाराला दुकानाच्या बाहेर बोलवून माफी मागण्यास भाग पाडले. त्याला दुकानातून पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आले. या ठिकाणी त्याला माफी मागण्यास सांगितली. मात्र या मुळे विक्रोळी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
बाईट विश्वजीत ढोलम मनसे कार्यकर्ते
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 16, 2025 17:04:15Kalyan, Maharashtra:
काम धंदा नाही पैसै पण नाहीत घर चालवायचे कसे?
कल्याणमधून रिक्षा चोरी करुन तिच रिक्षा चालवित करीत होता उदरनिर्वाह
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी रिक्षासह आरोपी आशिष मोरेला केली अटक
Anc काही काम धंदा नाही. पैसेही नाहीत. घर कसे चालवायचे. या विवंचनेतून एका तरुणाने चोरीचा मार्ग निवडला. कल्याणमधील रस्त्यात उभी असलेली रिक्षा चोरी केली. रिक्षा चोरी केल्यानंतर कल्याणमध्ये चोरी केलेली रिक्षा चालवून प्रवासी भाडे भरत होता. अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आशीष मोरे या २३ वर्षीय तरुणाला रिक्षासह रंगेहात अटक केली आहे. आशिष हा कर्जतनजीक भिवपूरी येथे राहतो या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलिस करीत आहे.
byte... कल्याणजी घेटे
सहाय्यक पोलीस आयुक्त
1
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 16, 2025 16:32:45Ambernath, Maharashtra:
बदलापूर पूर्व पोलिसांनी मिळवून दिले २० नागरिकांचे मोबाईल!
हरवलेले, चोरी झालेले मोबाईल नागरिकांना सुपूर्द
नागरिकांनी मानले पोलीस दलाचे आभार
Bdl police mobile
Anchor : बदलापूर पूर्व पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले, चोरी झालेले २० मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले. यानंतर या नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.
Vo : बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याकडून नागरिकांच्या हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाईल्सचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय. या पथकाने मागील काही दिवसात हरवलेल्या २० नागरिकांचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून हस्तगत केले. हे मोबाईल बुधवारी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी आम्हाला हे मोबाईल परत मिळतील अशी अपेक्षा नव्हती, परंतु पोलिसांनी आम्हाला ते मिळवून दिले, अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले. बदलापूर पूर्व पोलिसांच्या विशेष पथकाच्या माध्यमातून दर महिन्याला असे २० ते २५ मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत केले जात असल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.
Byte : किरण बालवडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
Byte : शर्मिला सांगल / शामली खरात / साईराज पावसकर (मोबाईलचे मूळ मालक)
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 16, 2025 15:36:10Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: ओला उबेर कार चालकांचा संप, संपकऱ्यांनी रस्त्यावर उतरत संप असताना सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांना अडवले.
ola,uber ,taxi stric
ftp slug - nm ola taxi strke
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: ओला, उबर कंपनीचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा तसेच बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर कारचालकांनी राज्यात संप पुकारलाय. या संपाची झळ आज नवी मुंबईत देखील बसली. ओला उबेर चालकांनी कोपरखैरणे येथे रस्त्यावर उतरत ओला उबेरची सेवा सुरु ठेवणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या अडवल्या ज्यामुळे प्रवश्यांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. सरकारी मीटर रिक्षा व कॅब परमिट दर करण्यासोबतच रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा, महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करा अशा प्रमुख मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून सलग दुस्र्या दिवशी संप सुरु असल्याने नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय.
gf-
============================
1
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 16, 2025 14:34:39Pandharpur, Maharashtra:
16072025
Slug - PPR_TEMBHURNI_KIDNAP
feed on 2c
file 02
-----
Anchor - माढा तालुक्यातील अरण गावातून शाळकरी मुलाचे अपहरण
अरण येथील कार्तिक बळीराम खंडागळे हा दहा वर्षांचा मुलगा शाळेच्या मैदानावर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या पालकांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
टेंभुर्णी पोलिस मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत आहेत.
-----
Byte - नारायण पवार, पोलिस निरीक्षक टेंभुर्णी पोलिस स्टेशन
1
Share
Report
BABASHIR AHMED MIR (Sagar)
FollowJul 16, 2025 14:34:22Gulmarg, :
Continuous rains in Kashmir Valley for two days of continuous rainfall.The water level in the rivers is steadily rising
Rains have also dropped in temperatures
Department Meteorological predicted that 24 hours have also been red alert to most areas here where floods may be at risk.
People have been asked not to go to the river drains
Visual and PTC B A Sagar location GULMARG BARMULLA
3
Share
Report
KAKHURSHEED AALAM
FollowJul 16, 2025 14:33:23Kulgam, :
Kulgam..
Anchor... Rainfall continuously in South Kashmir flood like situation in River Vishow of Kulgam
3
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 16, 2025 14:33:10Akola, Maharashtra:
1 फाईल आहे..AVB
Anchor : आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहेय.. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली..भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युतीची घोषणा केलीय तर ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य बाब म्हणून वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहेय..गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधानाला न मानणारे आणि आता संविधान बदलणारे आरएसएस-बीजेपी यांच्याबरोबर कधीही युती केली नसल्याचा वंचितने म्हंटलय..
आत्तापर्यंत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला व त्यांच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहेय.. मात्र,आता वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला आहे, यापुढे आनंदराज आंबेडकर यांना व त्यांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा देणार नाही अस जाहीर केलंय...
Byte : सिद्धार्थ मोकळे, प्रमुख प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी.
4
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 16, 2025 14:07:45Pandharpur, Maharashtra:
16072025
Slug - PPR_PRAKSHAL_PUJA
feed on 2c
file 01
-----
Anchor-आषाढी वारीच्या काळात भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठूरायाची आज झाली प्रक्षाळ पूजा, विठुरायाच्या राजोपाचारास सुरुवात , १८ दिवसा नंतर आज थकलेल्या विठूरायाला मिळणार शांत निद्रा
आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना गेले १८ दिवस २४ तास दर्शन देवून थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा झाली .आज दुपारी १२ नंतर देवाला गरम पाण्याने अभ्यंग स्नान घालण्यात आले . याचवेळी संपूर्ण मंदिरही धुवून घेण्यात आले .
यापूर्वी देवाचा शिणवटा घालविण्यासाठी पायाला पिठीसाखर लिंबू लावतात. दुपारी नंतर देवाला दुध दही सह सुगंधी केशर पाण्याने श्री विठ्ठला ला ब्रम्ह वृंदानीं वेद मंत्रांसह पवमान अभिषेक करण्यात आला . यांनतर देवाला सुंदर पोशाख केला मौल्यवान पारंपरिक दागिने परिधान करण्यात आले होते. थकवा जाण्यासाठी शेजारती वेळी आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा दाखवला जातो.
या प्रक्षाळ पुजेची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु असून आजचा दिवस पंढरपुरातील घराघरात साजरा केला जातो . आज देवाला पुरणपोळी सह पंचपक्वानांचा महानेवैद्य दाखविण्यात येतो .
8
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 13:38:35Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_CHP_AHIR_VISIT_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अरबिंदो कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, आंदोलनस्थळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांनी घेतली जनसुनावणी, नियमभंग करणाऱ्या कंपनी प्रशासनाची काढली खरडपट्टी
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या टाकळी, जेना, बेलोरा, पानवडाळा, डोंगरगाव (खडी), किलोनी, कान्सा, शिरपूर अशा गावांमधील अनेक शेतकरी अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे प्रभावित झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे, या आंदोलन ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी जनसुनावणी केली. राज्याच्या भूमी अधिग्रहण व पुनर्वसन कायद्याचे पालन न करता, तसेच प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आणि भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता, कोणताही मोबदला किंवा जमिनीचा दर निश्चित न करता प्रशासनाने कंपनीला उत्खननाची परवानगी दिली आहे. २४ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, हा आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या शपथपत्रावर आधारित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे, या प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त आणि न्यायालयाची दिशाभूल झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमीन अधिग्रहण व मोबदला त्वरीत निश्चित करावा, एकमुश्त अधिग्रहण करून रोजगार (नोकऱ्या) देण्याचे करार व्हावेत, सर्व निर्णय प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन घ्यावेत आणि सरकारच्या अधिनियमाची संपूर्ण अंमलबजावणी न होईपर्यंत उत्खनन थांबवावे—या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सरकारने कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी झाल्याशिवाय कोळसा उत्खनन परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी पुढे रेटण्यात आली आहे.
बाईट १) हंसराज अहीर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 13:33:38Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_GAD_FIRST_ST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अतिदुर्गम मरकनार ते अहेरी बस सेवेला सुरुवात, नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात केले बसचे स्वागत , मरकनार, फुलनार, कोपर्शी, पोयारकोटी सारख्या अनेक अतिदुर्गम गावांना मिळणार बस सेवेचा लाभ
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सिमेपासून अवघ्या 6 किमी. अंतरावर असलेल्या अतिदुर्गम मरकनार ते जिल्हा उपमुख्यालय अहेरी येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस सेवेची सुरुवात करण्यात आली. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा-या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात.
मरकनार गावात बस आल्यामुळे नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचे स्वागत केले. पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. मरकनार ग्रामस्थानी 9 फेब्रुवारी 2025 रोजी नक्षल गावबंदी ठराव पारीत करुन नक्षल्याना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असे घोषित केले होते. या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी गतवर्षी पोलीस संरक्षणामध्ये कोठी ते मरकनार रस्ता तयार करण्यात आला असून मरकनार ते मुरुमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मरकणार गावात एअरटेल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे. बससेवा सुरु झाल्यामुळे याचा लाभ मरकनार, मुरुमभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही या गावातील जवळपास 1200 हुन अधिक नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी यांना होणार आहे. एस.टी बसच्या सुविधेमुळे ग्रामस्थांना वर्षभर सहज प्रवास करता येईल, तसेच पोलीस व जनता यांचे संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल.
याच वर्षी 01 जानेवारी 2025 रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी बस सेवा तसेच दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी कटेझरी ते गडचिरोली बस सेवा देखील सुरु करण्यात आली होती. दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये 420.95 कि.मी. लांबीच्या एकूण 20 रस्त्यांसोबतच एकूण 60 पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
2
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 16, 2025 13:09:14Ambernath, Maharashtra:
बदलापूरच्या ग्रामीण भागात भात लावणीच्या कामाला वेग
पाऊस लवकर आल्यानं यंदा जुलै महिन्यातच भात लावणी
पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा
Bdl rice crop
Anchor - गेल्या दहा दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात भात लावणीच्या कामाला वेग आलाय. यंदा पाऊस लवकर आल्यामुळे जुलै महिन्यातच सर्वत्र भात लावणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतय.
बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात बेंडशीळ चिंचवली, कोपऱ्याची वाडी, चामटोली, कासगाव, राहटोली, मुळगाव, येवे, पिंपळोली, आंबेशिव या भागात भातशेती केली जाते. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे या भागातील शेतकरी राजा सुखावलाय. जुलै महिन्यातच चिखलणीसोबत भात लावणीची कामं सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ही शेती केली जातीय. मजुरांची संख्या घटल्यामुळे बहुतांश शेतकरी कुटुंब एकत्रितपणे एकमेकांच्या शेतीला हातभार लावत असतात. या शेतीतून मिळणारं उत्पन्न फारसं नसलं तरी शेतकरी कुटुंबाच्या वर्षभराच्या भाताची सोय या शेतीतून होत असते. पावसाने चांगली साथ दिली तर येत्या दोन महिन्यात दमदार पीक हाती येईल असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय.
Byte - शेतकरी, बेंडशीळ
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 16, 2025 12:32:09Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - खारघर वासीयांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन
पाणी के लीये ठिय्या आंदोलन
FTP slug - nm cidco water aandolan
Shots-
Reporter– swati naik
Navi mumbai
Anchor - खारघर मद्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने नवीन बांधकामांना सी सी ओसी देऊ नये अशी मागणी करत खारघर मधील माजी नगरसेवकांनी
सिडको मद्ये ठिय्या आंदोलन केले आहे।
जोपर्यत पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यत हलणार नसल्याचा इशारा यावेळी दिला ।जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन केले।
Gf
1
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 16, 2025 12:30:15Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमधील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षणं जाहीर
प्रांत अधिकारी, तहसीलदारांकडून आरक्षणांची सोडत
Amb resevation
Anchor : अंबरनाथ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षणं जाहीर झालीयेत. उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात सोडत काढून ही आरक्षणं जाहीर करण्यात आली. यानंतर तालुक्यात कही खुशी, कही गम असं वातावरण आहे.
Vo : या आरक्षणांमध्ये साई ग्रामपंचायतीसाठी SC, बुर्दुल ग्रामपंचायतीसाठी SC महिला, मांगरूळ ग्रामपंचायत ST, डोणे ग्रामपंचायत ST महिला, सागाव ग्रामपंचायत ST, ढवळे-कुडसावरे ग्रामपंचायत OBC महिला, गोरेगाव ग्रामपंचायत OBC महिला, खरड ग्रामपंचायत OBC महिला, काकोळे ग्रामपंचायतीसाठी OBC महिला आरक्षण जाहीर झालंय.
Byte : अमित पुरी, तहसीलदार
hi
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
3
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 16, 2025 12:08:26Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1607ZT_GAD_STUDENT_CANCER
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढल्याने व्यक्त होत आहे चिंता, 309 विद्यार्थ्यांना तपासणीत पूर्व मुख कर्करोग निदान झाल्याची आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांची विधान परिषदेत माहिती, आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळातील विद्यार्थ्यांची एका अभियानात करविली होती तपासणी
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक आकडेवारी पुढे आली आहे. विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी या संदर्भात विधान परिषदेत हा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी 2022 -23 ते 2024- 25 यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील आरोग्य तपासणीचे आकडेच पुढे ठेवले.
गडचिरोली आदिवासी उपविभागात 769 पैकी 304
भामरागड उपविभागात 1778 पैकी 487 तर
अहेरी उपविभागात 2163 पैकी 189 विद्यार्थी व्यसनाधीन आढळले
यापैकी एकूण 309 विद्यार्थ्यांना पूर्व मुख कर्करोग निदान झाले आहे. या सर्वांवर विभागाच्या वतीने उपचार करण्यात येत असून सर्वच आदिवासी आश्रम शाळांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे डॉ. उईके म्हणाले.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
2
Share
Report