Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना निधी मिळण्यास होतोय विलंब!

GMGANESH MOHALE
Jul 15, 2025 06:31:38
Washim, Maharashtra
वाशिम: File:1507ZT_WSM_MRGS_WELL रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असून अनेक विहिरींची कामं पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.2023-24 वर्षामध्ये 614 विहिरींसाठी शासनाकडून 7 कोटी 37 लाख 85 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता.मात्र, 2024-25 आणि 2025-26 या कालावधीत दीड हजारांहून अधिक लाभार्थ्यांना अजूनही निधी मिळालेला नाही.या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि गती देण्याची  मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top