Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये कानटोपी गॅंगने धुमाकूळ, लाखोंचा ऐवज लंपास!

YOGESH KHARE
Jul 01, 2025 06:31:52
Nashik, Maharashtra
*Breaking.... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* nsk_baglan feed by 2C vidoe 5 Anc: नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आनंदपूर व आसखेडा परिसरातील शेतात वस्ती करून राहणाऱ्या कष्टकरी नागरिकांच्या घरावर मध्यरात्री कानटोपी गॅंगने धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आनंदपूर येथील तीन व आसखेडा येथील दोन घरांमध्ये धारदार शस्त्रांच्या जोरावर चोरट्यांनी जबरदस्ती प्रवेश करत रोख रक्कम, सोनं व मोबाईल असा लाखोंचा माल चोरून नेला. किरण कापडणीस, गंगाधर भामरे, समाधान भामरे, प्रकाश भामरे आणि पप्पु वळवी या शेतकऱ्यांना "माल निकालो वरना जानसे मार देंगे!" अशा धमक्या देत घरफोडी करण्यात आली. मध्यरात्री १ ते ३ दरम्यान घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून, दरवाजे फोडून आणि मोबाईल तोडून टोळीने दहशत माजवली. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले आहे. "आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रात्रीच्या गस्तीत वाढ करून पोलीस प्रशासनाने या टोळ्यांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. *बाईट: किरण कापडणीस, नागरिक*
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement