Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
दिव्या देशमुखने जिंकला FIDE महिला विश्वचषक २०२५, इतिहास रचला!
MKManoj Kulkarni
Jul 30, 2025 14:47:05
Mumbai, Maharashtra
अँकर --जागतिक बुद्धिबळ  FIDE महिला विश्वचषक २०२५ चॅम्पियन महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख जिंकल्यानंतर आज दुपारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. FIDE महिला विश्वचषक २०२५ चॅम्पियन जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. विमानतळावर तिच विमानतळ अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं. अवघ्या १९ व्या वर्षी, दिव्याने प्रतिष्ठित FIDE महिला विश्वचषक २०२५ चॅम्पियन जिंकून ग्रँडमास्टर किताब मिळवून इतिहासात आपले नाव कोरले, ती भारताची ८८ वी ग्रँडमास्टर आणि ही उल्लेखनीय कामगिरी करणारी फक्त चौथी भारतीय महिला बनली. तिचा विजय जागतिक बुद्धिबळात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच उदाहरण आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तिच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यात आला. मनोज कुळकर्णी  फोटो २C
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Jul 31, 2025 12:37:23
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3107ZT_CHP_GHUGGUS_BRIDGE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घग्गुस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त, 16 ऑगस्टपासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा दिलाय इशारा अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस एक औद्योगिक शहर आहे. कोळसा, वीज, रेल्वेवाहतुक यामुळे शहरात वाहनांची आणी त्यातही अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेले चार वर्षापासून राजीव रतन रुग्णालयापाशी रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल बांधकाम सुरू आहे.  सततचे अपघात आणि वारंवार फाटक बंद राहत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागरिक आंदोलक झाल्यानंतर प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून आंदोलकांनी रेल रोको तात्पुरते  स्थगित केले आहे. मागण्या मान्य  न झाल्यास आता 16 ऑगस्ट पासून त्रस्त महिला व नागरिकांनी रेल रोको करण्याचा इशारा दिलाय. बाईट १) माला मेश्राम, आंदोलक महिला आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 31, 2025 12:37:06
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3107ZT_JALNA_KHOTKAR_BYTE(2 FILES) जालना : गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांची प्रतिक्रिया मला गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला अगोदर याचे या लोकांशी अनैतिक संबंध होते, आता याने घरोबा केला महापालिकेत याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ,ही चौकशी लपवण्यासाठी याने हा डाव टाकला एकटं लढण्याची घोषणा याने केली आमचीही तयारी आहे दानवे,गोरंटयाल यांची तुलना केली खाटीक आणि बोकडाशी गोरंटयाल यांच्या भाजप पक्षप्रवेशात नावं घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहे,खोटा प्रचार करण्याची यांची सवय -खोतकर अँकर | गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मला शिवसेना प्रवेशावेळी गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला अशा शब्दांत खोतकर यांनी गोरंटयाल यांचा समाचार घेतला आहे.अगोदरच याचे या लोकांशी अनैतिक संबंध होते, आता याने त्यांच्याशी घरोबा केला अशी टीकाही खोतकर यांनी भाजप आणि गोरंटयाल यांच्यावर केली.महापालिकेत याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ,ही चौकशी लपवण्यासाठी याने हा डाव टाकला असल्याचं खोतकर म्हणाले. एकटं लढण्याची घोषणा याने केली आमचीही तयारी आहे अस म्हणत खोतकर यांनीही महापालिका निवडणुकीत एकला चलो रे चे संकेत दिलेत.रावसाहेब दानवे आणि गोरंटयाल यांची तुलना खोतकर यांनी खाटीक आणि बोकडाशी केली असून खाटिक आधी बोकडाला आणतो.नंतर खाऊ घालतो आणि नंतर कापतो असं म्हटलं आहे.गोरंटयाल यांच्या भाजप पक्षप्रवेशात नावं घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहे,खोटा प्रचार करण्याची यांची सवय  असल्याचा निशाणा खोतकर यांनी गोरंटयाल यांच्यावर लावला आहे. बाईट अर्जुन खोतकर
0
Report
KJKunal Jamdade
Jul 31, 2025 12:34:54
Shirdi, Maharashtra:
Anc - नाशिक येथे होणा-या 2027 च्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु होणार असल्याची मोठी घोषणा उत्तरखंड येथिल जोगेश्वरधामचे महंत महादेव दास महाराज यांनी शिर्डीत केलीये.. सध्या देशात तेरा आखाडे प्रचलित आहेत.. यात आता शिर्डी साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु केला जाणार असून याच काम अंतिम टप्प्यात आल्याच मंहत महादेव महाराज यांनी म्हटलंय.गेल्या काही दशकांपासून शिर्डीच्या साईबाबा बाबत हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करणा-यासाठी ही मोठी चपराकच असणार आहे.मंहत महादेव महाराज यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या पुजाविधी तसेच दैनंदिन कार्यबद्दल कौतूक करत येत्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबा नावाने नवीन आखाडा सुरु केला जाणार असून याबाबतचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याच स्पष्ट केलय.. Bite - मंहत महादेव दास , जोगेश्वरधाम उत्तराखंड
0
Report
SGSagar Gaikwad
Jul 31, 2025 12:34:22
Nashik, Maharashtra:
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_kirrit_sommya *नाशिक : किरीट सोमय्या byte point* - ऑन भोंगे - भोंगा मुक्त मुंबई झाली आता भोंगा मुक्त महाराष्ट्र होणार - सकाळी संभाजी नगर येथे गेलो होतो आता उर्वरित ठिकाणी जाऊन भेट घेणार - नाशिक पोलिसांनी सांगितलं सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे - नाशिकमध्ये बॉंगेवरून आवाज बंद झाला आहे - काही आठवड्यात पुढील भोंगे काढणार आहेत - पुढच्या आठवड्यात नाशिक भोंगे मुक्त होणार - देशात ध्वनी प्रदूषण कायदा आहे रात्री अकरा ते सकाळी ६ पर्यंत भोंगे वापरता येत नाही - कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चालेल मात्र त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे - राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यातून धडा घेतला पाहिजे - निकाल लागल्यानंतर टीका केल्याचे धाडस करत आहे - आज निकाल आला आहे - खरे आरोपी कोण होतेब्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही - काँग्रेसने हे हिंदू आतंकवाद म्हणून ही दृश्य उभे केले होते त्यांना अजून पश्चात्ताप नाही झालेला - कधी तरी कोणी तरी गांधी परिवाराला आणि सरकारच्या एजनसीला प्रश्न विचारता - त्यांनी जे लव्ह जिहाद केले लेंड जिहाद केले त्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत दिसून आली
0
Report
HPHARSHAD PATIL
Jul 31, 2025 12:33:37
Palghar, Maharashtra:
पालघर - पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी . विरार वरून डहाणूसाठी सुटलेल्या 3:45 च्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी. वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानका दरम्यानची घटना . सफाळे आणि पालघर येथील प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्याने हाणामारी झाल्याची माहिती .
0
Report
JJJAYESH JAGAD
Jul 31, 2025 11:48:52
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत असलेल्या वाडेगाव येथे एका लाल तोंडाच्या माकडाने गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून धुमाकूळ घातला होता, या लाल तोंडाच्या माकडाने गावातील अनेक नागरिकांना चावा घेत त्यांना गंभीर जखमी सुद्धा केले होते..या घटनेबाबत गावकऱ्यांनी माहिती अकोला वन विभागाला माहिती देताच अकोला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने वाडेगाव येथे पोहोचून सदर उपद्रव घालणाऱ्या लाल माकडाला ट्रँक्युलाईज करून बेशुद्ध केले व त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले..
7
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 31, 2025 11:47:33
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत आज्ञातांकडून वाहने जाळण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांचा फेसबुक पोस्टद्वारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सुपुत्रावर आरोप - बार्शीत ओबीसी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांचे दोन वाहन जाळण्याचा प्रकार. - राजकीय सुडातून माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांच्यावर आमदार रोहित पवार यांचे फेसबुक पोस्टद्वारे आरोप - 'जहागिरी गेली मात्र फुगिरी गेली नाही' असे म्हणत राजेंद्र राऊत यांनी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर राजकीय द्वेषा पोटातून शांताराम जाधव यांच्या गाड्या जाण्याचा आरोप. - रणवीर राऊत यांनी एक महिना अगोदर शांताराम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आला होता समोर. - जाधव यांची गाडी कोणी जाळी याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं, असे म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची केली मागणी.. - बार्शी शहरात शांताराम जाधव यांच्या दोन गाड्या जाळल्या, अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग आली विझवण्यात - बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल.
7
Report
AKAMAR KANE
Jul 31, 2025 11:47:25
kolhapur, Maharashtra:
नागपूर Ngp Divya Deshmukh Pc live u ने फीड मिळेल ------- फीडे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये विजेती ठरलेली वर्ल्ड चॅम्पियन बुद्धीबळपटू दिव्या देशमुखची प्रेस कॉन्फरन्स होतेय live फ्रेम दिलीय
7
Report
SGSagar Gaikwad
Jul 31, 2025 11:34:31
Nashik, Maharashtra:
feed send by 2c and mozo reporter-sagar gaikwad slug-nsk_kirrit_somya नाशिक ब्रेकिंग... - *माजी खासदार किरीट सोमय्या आज घेत आहे नाशिक पोलीस आयुक्तांची भेट...* - किरीट सोमय्या नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल - नाशिक मधील भोंग्यांच्या प्रकरणी सोमय्या पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा... - पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर माजी खासदार किरीट सोमय्या माध्यमांशी संवाद साधणार...
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 31, 2025 11:16:13
Ambernath, Maharashtra:
चोरीला गेलेल्या दोन दुचाकीसह तीन आरोपींना अटक ! अंबरनाथ पोलिसांची कामगिरी Amb bike theft Anchor अंबरनाथमधून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत करत तीन आरोपीना अटक केली आहे. हितेश शंकरलाल मालविया, जाहिद हुसेन मेहबूब अली, दानेश अवन्वर हळदे शेख अश्या या तीन आरोपींची नाव आहेत.   अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 25 जुलै रोजी फॉरेस्ट नाका येथून दुचाकी चोरीला गेली होती. यासंदर्भात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपींचा शोध घेत होते.  पोलीस शिपाई राजकुमार राठोड आणि वसुदेव दराडे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाठपुरावा सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी हितेश शंकरलाल मालविया, जाहिद हुसेन मेहबूब अली आणि दानेश अवन्वर हळदे शेख याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सुझुकी कंपनीची ॲक्सेस 125 आणि गुन्ह्यांत वापरलेले दुचाकी बजाज प्लसर गाडी क्र अशा दोन गाड्या जप्त करण्यात आहेत.  चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
8
Report
AKAMAR KANE
Jul 31, 2025 11:04:01
kolhapur, Maharashtra:
नागपूर विश्व हिंदू परिषद ची प्रेस कॉन्फरन्स गोविंद शेंडे केंद्रीय सहमंत्री pc घेताय -------------- 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जो निर्णय आला त्याचे स्वागत करतो -सर्व हिंदूंचे अभिनंदन -सत्य बाहेर --षडयंत्र करून साध्वी आणि एकूण सात लोकांना खोटे आरोप लावून.. खोट्या साक्ष घेऊन अटकवण्याचा प्रयत्न झाला -- तत्कालीन गृहमंत्री शिंदे यांनी भगवा आतंकवाद हा शब्द न्यायालय ने निरसत केला --आता ब्लास्ट करनार्यांना शोधले पाहिजे --ज्यांनी हिंदू आतंकवाद रुजवला त्यांनी हिंदुची माफी मागावी --- त्यांनी राजकारण केले -- त्यावेळी शिंदेनी केलेले वक्तव्य हे नियोजनबद्ध षडयंत्र आहे
10
Report
KPKAILAS PURI
Jul 31, 2025 10:48:50
Pune, Maharashtra:
वॉकी टॉकी वापरून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक..! - मोबाईल ट्रेस होऊ नये म्हणून टोळीने वापरले वॉकी टॉकी...! pimpri daroda kailas puri Pune 31-7-25 feed by 2c for web also...! Anchor - पिंपरी चिंचवड मधल्या शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात उद्योजकाच्या घरात घुसत त्याचे हातपाय बांधून पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल ६.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलंय. राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी या दरोड्यातील आरोपीला अटक केलीय ..दरोड्यात सहभागी असलेल्या स्थानिक आरोपीला तळेगावहून पकडण्यात आले आहे. या टोळीने मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याच समोर आलंय ..! निगडी प्राधिकरण मध्ये १९ जुलै रोजी एका उद्योजकाच्या बंगल्यात या टोळीने प्रवेश करत तोंडावर चिकटपट्टी लावली त्यांचे हातपाय बांधले त्यानंतर घरातील कपाटे उचकून ६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा ऐवज त्यांनी लंपास केला होता. तपासासाठी बनवण्यात आलेल्या पथकान सुमारे १२०० किलोमीटर प्रवास करत. २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपीला जेरबंद केलं... जयपूरमधून सुरेश लादुराम ढाका आणि त्याचा साथीदार यांना शामनगर, जयपूर मधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय... या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हिपाल रामलाल विष्णोई याला तळेगाव मधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली. राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. वाईट - शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 31, 2025 10:45:47
Ambernath, Maharashtra:
बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने मविआकडून जुन्या सरकत्या जिन्यांची पोलखोल झी 24 तास ने दाखवली होती सर्वात प्रथम बातमी MRVCकडून रेल्वे प्रवाशांची घोर फसवणूक Bdl escalator Anchor - बदलापूर रेल्वे स्थानकात MRVCने जुनेच सरकते जिने लावून प्रवाशांची घोर फसवणूक केलीय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या जुन्या सरकत्या जिन्यांची पोलखोल करत  कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. झी 24 तास ने सर्वात प्रथम ही बातमी दाखवली होती त्यानंतर आज महाविकास आघाडीने रेल्वे स्थानकावर जाऊन या सरकत्या जिन्यांची पाहणी केली       बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन ते तीन वर्षापासून विकासकामे सुरू आहेत. याच विकासकामांचा भाग म्हणून सरकते जिने लावण्याचं काम सुरू आहे. मात्र इथं जुने, गंजलेले जिने लावले जात असल्याचा प्रकार झी 24 तासने समोर आणला होता . त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेल्वे स्थानकात जाऊन या सरत्या जिन्याची पाहणी केली. तेव्हा हे जिने कुठेतरी वापरलेले असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला असून दोषी अधिकाऱ्यांवर तसच कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. Byte - अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष Byte - किशोर पाटील, शहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट) चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
Report
MNMAYUR NIKAM
Jul 31, 2025 10:35:24
Buldhana, Maharashtra:
मारहाणीच्या व्हिडिओत शिवीगाळ सुद्धा केलेली आहे... कृपया म्युट कराल बुलढाणा ब्रेकिंग.. स्टोरी - खामगाव तालुक्यातील पाळा येथील घटना .. अजून एका तरुणाला बेदम मारहाण.. पोलिसांत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल .. मारहाण करतानाच व्हिडिओ व्हायरल .. Anchor - बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पाळा येथिल एका 24 वर्षीय तरुणाला तीन चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय .. अजय सोनटक्के असे या तरुणाचे नाव असून या जखमी तरुणावर खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचे प्रकृती गंभीर आहे.. मारहाण करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .. पीडित तरुण ट्रॅक्टरने इतरांच्या शेतात मशागतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो .. पैशाच्या देवाण चे वादातून वाद होऊन खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे तीन ते चार जणांनी या तरुणाला बेदम मारहाण केली.. तर जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देत शिवीगाळ करत या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मात्र यातीलही आरोपी अद्याप फरार आहेत..
14
Report
KJKunal Jamdade
Jul 31, 2025 10:34:11
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash *अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर -* *ऑन साईबाबा 9 नाणी वाद -* अरुण गायकवाड याच्यावर कारवाई झाली पाहिजे... ग्रामस्थांच्या भावनांशी मी सहमत... साईबाबांच्या नाण्यांवर काही लोकांनी बऱ्याच काळ धंदा केलाय... मिळालेल्या पैशांतूनच आता मुक्ताफळे उधळली जाताय... कुणीही नाणे दाखवून धंदा करायचा, हा भाविकांच्या श्रद्धेचा अवमान... दावे प्रतिदावे करणाऱ्यांकडील नाणी जमा करून पुरातत्व विभागाकडून शहानिशा करावी... अरुण गायकवाड यांनी साईबाबांविषयी जे वक्तव्य केलंय त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे... *ऑन जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा -* शासनाकडून युरियाचा मुबलक पुरवठा... मात्र मध्ये कुठेतरी घोटाळा होतो... व्यापारी लिंकिंग करत असल्याच्या तक्रारी... साठेबाजार आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत सूचना... जिल्ह्यात युरिया खते तुटडवड्याबाबत चौकशी करू... जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालावे अशा सूचना करणार... *ऑन शनी शिंगणापूर देवस्थान अपहार आणि अधिकारी आत्महत्या -* शनी देवाच्या नावाने पैसे खाणाऱ्यांना शनी देवच शासन करताय... भीतीपोटी काहीलोक आत्महत्या करताय... आत्महत्या करून कुणीही जबाबदारीतून मुक्त होणार नाही... भ्रष्टाचार केला असेल तर सामोरे जा, आत्महत्या हे उत्तर नाही... कुटुंब कशाला उध्वस्त करताय... घोटाळ्याची चौकशी निःपक्षपाती होणार... याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले हे मी बोलण्याची गरज नाही... कारवाई झाली पाहिजे... *जिल्ह्यातील धरणांची परिस्थिती -* अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत... भंडारदरा, निळवंडे धरणं भरली आहेत... जायकवाडी धरणात गेल्यावेळी शून्य टक्के साठा होता... यावेळी ते पूर्ण भरून वाहतंय... नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण... *ऑन लम्पी आणि पशू अधिकारी निलंबन -* लम्पी आजाराबाबत असंवेदनशील रहाणे योग्य नव्हेत... जनावरे दगावणे हा अक्षम्य हलगर्जीपणा होता... मोठ्या प्रमाणात पथक पाठवून लसीकरणाची प्रक्रिया सुरू... दोषी अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही, तर थेट गुन्हे दाखल झाले पाहिजे...
12
Report
Advertisement
Back to top