Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

महिला IPS अधिकाऱ्यांकडे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळाचा तपास सोपवण्याची मागणी!

Mahendrakumar Mudholkar
Jul 01, 2025 04:01:35
Beed, Maharashtra
बीड : विद्यार्थिनीवरील लैंगिक छळाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्या, विद्यार्थिनी बचाव संघर्ष समितीची मागणी Anc : बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवरील लैंगिक छळ प्रकरणात तपासावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थिनी बचाव संघर्ष समितीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे पिंक पथकाकडून तपास काढून महिला IPS अधिकाऱ्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तपास, सीडीआरचा तपशील पीसीआरमध्ये नमूदच नाही. त्यामुळे तपास पारदर्शक होण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याची भूमिका घेतली गेली आहे. आरोपींना मदत करणाऱ्यांचाही तपास व्हावा, मुलींशी गुप्तपणे संवाद साधावा आणि प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये दोन महिला कर्मचारी नेमावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement