Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

चिपळूण डी.बी.जे. कॉलेज के बाहर फ्री स्टाइल मारपीट वायरल वीडियो

PPPRANAV POLEKAR
Sept 21, 2025 08:30:37
Ratnagiri, Maharashtra
चिपळूणमध्ये डी.बी.जे. कॉलेजसमोर विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी – व्हिडिओ व्हायरल चिपळूणमधील डी.बी.जे. महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये उघड्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजमधील अंतर्गत वादाचा फटका सुटल्यानंतर रस्त्यावर बसला. सुरुवातीला एका गटाने दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावल्याने वाद वाढला आणि त्याचे रूपांतर थेट फ्री स्टाईल मारामारीत झाले. काही विद्यार्थ्यांनी मोबाइलवर टिपलेला या भांडणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 21, 2025 10:48:45
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2109ZT_JALNA_BORHADE(7 FILES) जालना : ब्रेकींग 24 तारखेनंतर सरकार खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा,धनगर उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचं वक्तव्य ज्या दिवशी दिपक बोऱ्हाडेचा श्वास बंद होईल त्या दिवशी धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाका,बोऱ्हाडे यांचं चिथावणीखोर वक्तव्य सरकार खबरदार-धनगर उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचा राज्य सरकारला ईशारा माझा श्वास चालू आहे तोपर्यंत धनगर समाजाला ST आरक्षण द्या, 24 तारखेचा ईशारा मोर्चा होईपर्यंत मि मरणार नाही अँकर : जालन्यात गेल्या 5 दिवसांपासून धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरु आहे धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे.आज या उपोषणाला अँड गुणरत्न सदावर्ते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.यावेळी उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी उपस्थित असणाऱ्यांना मार्गदर्शन करताना चिथावणीखोर वक्तव्य केलं. माझा श्वास 24 तारखेपर्यत सुरू राहील.24 तारखेला धनगर समाजाचा ईशारा मोर्चा आहे.या मोर्चा नतंर देखील सरकार खबरदार झालं नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाका अस आवाहन बोऱ्हाडे यांनी केलं आहे शिवाय 24 तारखेनंतर नेपाळमध्ये झालं नाही ते त्या पलीकडे महाराष्ट्रात घडवा असंही बोऱ्हाडे म्हणाले बाईट दीपक बोऱ्हाडे(भाषणातील बाईट आहेत)
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 21, 2025 10:48:36
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 2109ZT_INDAPURBHRNE BYTE 1 राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलपोळा साजरा; बळीराजाच्या सुखासाठी आणि पिकांना चांगला भाव मिळावा, अशी प्रार्थना... Anchor:— भाद्रपद महिन्यात साजरा होणारा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा उत्सव, त्यांचा बैलांबद्दलचा स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. यावर्षी, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलाला रंग लावत उत्साहात बैलपोळा साजरा केला. Vo:— बैलपोळा हा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. बैल वर्षभर शेतीत काम करतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. भाद्रपदी बैलपोळा निमित्ताने आज घरोघरी बैलाची पूजा आणि उत्सव साजरा होत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, परमेश्वराला एवढेच साकडे, की येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांना सुख, समृद्धी आणि त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळो; माझा बळीराजा सुखी व्हावा... बाईट:— दत्तात्रय भरणे (कृषिमंत्री)
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 21, 2025 10:46:06
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात पूर आणि अति पावसाने आर्णी, महागाव तालुक्यात दाणादाण उडविल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. मात्र या संकट समयी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करणारी महसूल यंत्रणाच सहलीवर गेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करून पूर्ण मदत देण्याची घोषणा केली, जिल्ह्याचे पालकमंत्री व अन्य मंत्री पंचनामाचे आदेश दिल्याचे सांगत असले तरी प्रशासन मात्र जागेवर नाहीं. आर्णी तालुक्यातून पाच मंडळ अधिकारी, सहा तलाठी आणि महागाव तालुक्यातून दोन मंडळ अधिकारी व पाच तलाठी पाँडेचरी टूर वर गेल्याचे फोटो त्यांनीच सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊ असे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. तर पंचनामाचे सोंग सोडून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. बाईट : अशोक उईके: मंत्री मनीष जाधव : शेतकरी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 21, 2025 10:31:36
Jalna, Maharashtra: FEED NAME ::2109ZT_JALNA_SADAVARTE(10FILES) जालना  : मराठा आंदोलकांनी केला गुणरत्न सदावर्ते यांना रोखण्याचा प्रयत्न जालन्यातील नागेवाडी टोलनाका येथील घटना मराठा आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट गाडीवरही दगडफेक गुणरत्न सदावर्ते जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाला भेट देण्यासाठी येत असताना घडली घटना अँकर : अँड गुणरत्न सदावर्ते आज जालन्याच्या दौर्यावर होते.या दौऱ्यात सदावर्ते यांनी धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट दिली.बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी अँड गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर दगडफेक केली यात गाडीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल आहे
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 21, 2025 10:26:31
Ratnagiri, Maharashtra: गुहागर : गुहागरमध्ये रंगला जाखडी नृत्य कलेचा जागर...लोप पावत चालेल्या जाखडी नृत्याला नवसंजीवनी देण्यासाठी तरुणाई सरसावली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुहागर मध्ये जाखडी नृत्य महोत्सवाचे आयोजन. तालुक्यातील विविध गावातून जाखडी नृत्य कला सादर करण्यासाठी तरुणांसह वयोवृद्ध व्यक्तींचा सहभाग ठरला लक्षणीय. वारकरी पोशाखासह पारंपरिक पद्धतीचे वाद्य आणि वेशभूषा साकारत तालबद्ध पद्धतीने जाखडी नृत्य करणाऱ्या संघांना गुहागर वासियांकडून जोरदार प्रतिसाद. सुमारे पंधरा ते वीस संघांचा सहभाग. लोप पावत चाललेली जाखडी नृत्य कला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली.........गुहागर तालुका भाजपा कडून जाखडी नृत्य कलेचा महोत्सव. रसिकांची मोठी गर्दी. लोकेशन : गुहागर
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 21, 2025 10:17:36
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri press kailas puri Pune 21-9-25 feed by 2c Anchor - पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या दरम्यान अजित पवार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरें गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे आणि मुलगा ऋषी वाघेरे यांनी भेट घेतली. त्यानंतर संजोग वाघेरे पक्षात येणार का असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिले... संजोग उबठा मध्ये आहे, उषा आमच्या बरोबर आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा मिश्किल सवाल अजित पवारांनी केला...! संजोगला ती विचारसरणी पटली म्हणून तो तिकडे आहे उशाला माझी विचारसरणी पटली म्हणून ती माझ्या बरोबर आहे *अस अनेकांच्या घरात आहे, खूप उदाहरण देता येतील आमच्या सहित खूप उदाहरण देता येतील* अस उत्तर पवारानी देताच एकच हशा पिकला...! महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत असल्याचं सांगतानाच आम्ही ही तयारी करत आहोत, महायुती सक्षम करण्याकडे आमचा प्रयत्न असल्याच पवार म्हणाले. महापालिका निवडणुका आधी होतायेत की जिल्हा परिषद यावर बोलताना मी ज्योतिषी नाही अस स्पष्ट केले. निवडणुकांना स्वबळावर लढायचे की नाही याबाबत निवडणुका झाल्यावर स्थानिक पातळीवर ची परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊ अस स्पष्टीकरण त्यांनी दिलं. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या जाण्यावर बोलताना अशा घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत, ठोकशाही केली जाऊ नये अस ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दसऱ्याच अल्टिमेटम दिल्याच्या प्रश्नावर बोलताना कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ज्या मागण्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीत बसवत न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे दादा म्हणाले. सदा सरवणकर यांनी निधी बाबतीत केलेल्या प्रश्नावर बोलताना मला त्या बद्दल माहिती नसल्याचे ते म्हणाले.... बाईट - अजित पवार, उपमुख्यमंत्री
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 21, 2025 10:16:36
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2109ZT_MAVAL_POLA_INJAN Total files : 01 Headline : 80 बैलगाडा शर्यत जिंकलेल्या इंजन या बैलाची भाद्रपदी पोळ्यात मानाची पूजा -इंजान बैलाने राज्यभरात गाजवले ८० घाटातील विजय Anchor: मावळातील शेतकऱ्यांचा आवडीचा भाद्रपदी पोळा उत्साहात साजरा होत असून, इंदोरी गावातील शेतकरी प्रशांत भागवत यांच्या इंजान, डमरू, पाखऱ्या, हीरा, सरपंच आणि घोड़ी पदमा या बैलजोडींची पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली. शेतकऱ्यांच्या या सोहळ्याला महिलावर्गाने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि औक्षण करून अधिक मंगलमय रंग चढवला. पोळ्याच्या परंपरेनुसार बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालणे, तेल लावणे, शिंगांना रंग देणे, गोंडे बांधणे, फुलांचे हार चढवणे आणि वाजतगाजत मिरवणूक काढणे अशा पारंपरिक विधींचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, भागवत कुटुंबियांचा इंजान हा बैल आतापर्यंत राज्यभरातील बैलशर्यतींमध्ये तब्बल ८० घाट जिंकून मालकाला नगदी, सोनं, दुचाकी आणि आलिशान चारचाकी अशा बक्षिसांचा वर्षाव करून दिला आहे. इंजानच्या या कामगिरीमुळे तो बैलशौकिनांच्या मनात मानाचा तारा ठरला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 21, 2025 10:15:49
Kalyan, Maharashtra: पत्रिपुल नंतर पलावा पूलाची चर्चा राज्यभर.. काही महिन्यात पुन्हा नवीन पुलाचे खोदकाम करून डांबरीकरणाला काम सुरू. Anc : कल्याण शीळ रोडवरील पलावा पूल सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे. कारण काही महिन्यापूर्वीच शिवसेने कडून घाई घाईत पुलाचे उदघाटन शिवसेना आमदार राजेश मोरे. यांनी केलं होते. यावर दुसऱ्यादिवशी खड्डे पडले पडल्यामुळे रील, व्हिडिओ व्हायरल झाले. असल्याने विरोधकांनी टिकेची झोड उडवली. आता याच पुलावरील रस्त्याचे खोदकाम केला जात आहे. पुन्हा एकदा डांबरीकरणं केलं जातंय. खोदकाम करीत पुन्हा एकदा डांबरीकरण केल्यामुळे याचा खर्च वाढला असल्यामुळे विरोधकांमध्ये मोठी चर्चा,सुरु आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 21, 2025 09:49:44
Parbhani, Maharashtra:अँकर- सततच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणांत येत असलेला अतिरिक्त पाणीसाठा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून मागच्या आठ दिवसांपासून दुधना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय, यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे, याविसर्गामुळे मानवत तालुक्यातील नीलवर्ण टाकळी या गाव परिसरात असलेल्या पूलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे नीलवर्ण टाकळीचा इतर गावांशी सहा दिवसांपासून संपर्क तुटतोय, यामुळे विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होतंय, शाळेत जायचं असल्यास विद्यार्थ्यांना असा पुरातून मार्ग काढावा लागतोय.काल शनिवारी विद्यार्थ्यांना अस पुरातून घरी परताव लागलं. त्यामुळे येथे अधिक उंचीचा पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. शिवाय नदीकाठची सगळी पिकं पाण्याखाली असल्याने पीक सडून जाऊन शेतकऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे... बाईट- मुकुंद देशमुख- सरपंच,निलवर्ण टाकळी
2
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 21, 2025 09:33:24
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2109ZT_MAVAL_DEHU_INDRAYNI Total files : 02 Headline : इंद्रायणी घाटावर गोधड्यांची रंगबिरंगी उधळण घटस्थापना तयारीची महिलांची लगबग Anchor: श्रीक्षेत्र देहूगावात घटस्थापना आणि दुर्गामाता उत्सवाच्या तयारीला वेग आला असून आज इंद्रायणी घाटावर वेगळच चित्र पाहायला मिळाला. इतर वेळी वारकऱ्यांनी फुलून जाणारा इंद्रायणी घाट आज रंगबिरंगी गोधडयांनी फुलून गेला होता. पावसामुळे उशीर झालेल्या गोधड्या धुण्याच्या परंपरेसाठी महिलांनी सकाळपासूनच घाटावर गर्दी केली. गोधड्या, चादरी, अंथरुणं पांघरुणं धुतल्यानंतर घाटावर वाळत टाकण्यात आल्याने संपूर्ण घाटच रंगीबेरंगी दिसू लागला. वारकऱ्यांच्या श्रद्धेचा साक्षीदार असलेल्या या पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर मात्र गोधड्यांच्या ‘रंगीबेरंगी’ झालरीने सजलेले रूप धारण केले. महिलांचा उत्साह, पारंपरिक गडबडगोंगाट आणि डोळ्यांना सुखावणारा देखावा यामुळे इंद्रायणी घाटावर उत्सवी वातावरण निर्माण झाले.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 21, 2025 09:33:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गोपीचंद पडळकरां विरोधात राज्यातील राष्ट्रवादी सांगलीत उतरणार रस्त्यावर.. अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा विरोधात 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गट सांगलीमध्ये रस्त्यावर उतरणार आहे.गोपीचंद पडळकरांकडुन जयंत पाटलांवर करण्यात आलेली जहरी टीकेचा निषेध व अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे राज्यातील खासदार-आमदार सहभागी होणार आहेत,यामध्ये आमदार खासदार निलेश लंके,अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड,बजरंग सोनवणे,रोहित पवार यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी व राज्यातील कार्यकर्ते तसेच अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बाईट - देवराज पाटील - जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( SP ) सांगली.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 21, 2025 09:32:50
Yeola, Maharashtra:अँकर:-त्रंबकेश्वर येथे वृत्तांकन करण्यासाठी केलेल्या झी 24 तास चे पत्रकार योगेश खरे, व त्यांच्या सहकाऱ्यांवर पार्किंगची वसुली करणाऱ्या गावगुंडांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस स्टेशन येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन या गावगुंडांवर पत्रकार हल्ला विरोधी कलम लावून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. याप्रसंगी येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने हजर होते त्यावेळी या पत्रकारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 21, 2025 09:05:35
Beed, Maharashtra:बीड: पूर परिस्थितीत मदत मिळाली नाही, रस्ताच नसल्याने रुग्णाला बाजावरून दीड किलोमीटर नेले... दुर्दैवाने उपचाराआधीच मृत्यूने गाठले...आष्टी तालुक्यातील घटनेने प्रशासनाचे पितळ उघडे..! Anc : बीडच्या आष्टीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे माळेवाडी-वनवेवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. चोहीबाजूंनी पाण्याने वेढल्यामुळे गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला. याच पुरात अडकलेल्या शेंडे कुटुंबातील आजारी शंकर कुंडलिक शेंडे यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तब्बल चार दिवसांपासून घरात अडकलेल्या या रुग्णाला अखेर कुटुंबियांनी बाजेवरून दीड किलोमीटर अंतर कापत बाहेर काढलं. मात्र रुग्णालयात नेऊन उपचार मिळण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे शेंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ताच नसल्याने एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या विदारक घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेवर सवाल उपस्थित होतोय. बाईट: नातेवाईक
3
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 21, 2025 09:04:47
Nala Sopara, Maharashtra: Date-21sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA MURDER Feed send by 2c Type-AV अँकर - नालासोपाऱ्यात एका नायजेरियन नागरिकाची त्याच्याच साथीदारांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे... लकी उइझे असे या मयत नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.. नालासोपारा पूर्व प्रगती नगर येथील रोशन अपार्टमेंट जवळ तीन नायजेरियन इसम आपापसात बोलत असताना लकी उइझे आला असता त्याला पूर्वविमानातून तिघांनी लाथा बुक्के व काचेच्या बाटलीने मारून जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला..तुळींज पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही तासात पोलिसांनी हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे... त्यांवर हत्येचा गुन्हा नोंद करून आज न्यायालयात हजर करण्यात आले असून या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ड्रग्स विक्री च्या वादातून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 21, 2025 09:04:39
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Shirur Kolhe Onion Price File:02 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: गेली काही दिवसापासून वखारीत साठवलेला कांदा सडूव खराब होतोय तर दुसरीकडे खरीप हंगामातील पिके ही अतिवृष्टीने हातातून गेल्याने शेतकरी पुरता उध्वस्त झालाय अशा परिस्थितीत शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी निकषांचं कारण सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याच काम सरकार करत असल्याचा घणाघात शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला असून शासनाच्या कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे आज शेतकरी पुरता उध्वस्त झालाय सरकारने खाणाऱ्यासोबत पिकवणाय्राचा ही विचार करणे गरजेचे असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगत पत्रकारांवरील हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध केलाय याच संदर्भात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी एक्सक्लिझीव बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... 121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To खासदार डॉ अमोल कोल्हे प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top