Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: मराठा आंदोलनकारियों ने गुणरत्न सदावर्ते की गाड़ी पर दगडफेक

NMNITESH MAHAJAN
Sept 21, 2025 10:31:36
Jalna, Maharashtra
FEED NAME ::2109ZT_JALNA_SADAVARTE(10FILES) जालना  : मराठा आंदोलकांनी केला गुणरत्न सदावर्ते यांना रोखण्याचा प्रयत्न जालन्यातील नागेवाडी टोलनाका येथील घटना मराठा आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट गाडीवरही दगडफेक गुणरत्न सदावर्ते जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाला भेट देण्यासाठी येत असताना घडली घटना अँकर : अँड गुणरत्न सदावर्ते आज जालन्याच्या दौर्यावर होते.या दौऱ्यात सदावर्ते यांनी धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट दिली.बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी अँड गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर दगडफेक केली यात गाडीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 21, 2025 12:31:44
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबार शहराला नागरिकांची पाणी ताईंचाईपासून सुटका झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात ९७ टक्के पाणीसाठा झालासून, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधिवत पूजा करत धरणाला साडीचोळी अर्पण केली. नंदुरबार शहरावरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न वर्षभरासाठी मिटल्याने विरचक धरणाच्या स्थळी जाऊन विधिवत पूजा करत दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाबारी धरण पूर्ण क्षमतेने भरला तर विरचक धरण ९७% भरलेला आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या संकट वर्षभरासाठी मिटलं असल्याने, शहरवासीयांना मोठा दिलासा मिळालेला असल्याने शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधिवत जलपूजन करत विरचक धरणाला साडीचोळी अर्पण केली आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 21, 2025 12:31:27
Dhule, Maharashtra:ANCHOR - नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तान्तनासाठी जात असलेल्या पत्रकारणवर झालेल्या हल्ल्याचा निषेध धुळ्यात करण्यात आला. पार्किंग वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिक मधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले आहेत. किरण ताजणे यांना उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करीत आहोत. हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आपल्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे करन्याय आली. यावेळी गुंड प्रवृत्तीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषीवर कठोर कारवाई करून, पुढे समाजकार्य करणाऱ्या पत्रकारवर हल्ले होणार नाहीत यासाठी सरकारणे कठोर पाऊल उचलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 21, 2025 12:17:14
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2109ZT_JALNA_SADAVARTE_PC(FEED SEND BY LIVE LINK ) जालना : सदावर्ते प्रेस पाॅईंटर काही महत्वाची गोष्ट करायला निघाल्यानंतर अडथळे समाजकंटक , अतिरेकी विचाराचे लोक जरांगेचे दलाल ज्यांना संविधानच माहित नसतात नालायक विचाराचे लोक असे भ्याड हल्ले करतात हे दिवस काँग्रेसचे दिवस नाहीत. अशा जरांगेंच्या दलालाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात आंदोलन करायचं रेतीचे उपसे उचलायचे त्याच्यापैकी गुणरत्न, जयश्री पाटील नाहीये त्यालगुलगुल्यांना सांगायचंय गुणरत्न राॅयल आहे जातीत जन्मला म्हणून कुणी राॅयल होत नाही राजेश टोेपे शिक्षणाने राॅयल होनं असतं खानदानी राॅयल आहे मी जरांगे बघ मीझा जोडा पण लंडनहून आला आहे माझी गाडी कुणाकडे नसेल त्या राॅयल गाडीत फिरतोय मराठा मागासच ठरत नाही हे सुनवायला जालन्याला आलो जरांगे तुला सांगून चाललो लकरच गाठ अंतरवाली सराटीत आहे तु तर सासुरवाडी वासी आहेस मुली नांदायला पाठवतात मात्र हा नांदायला सासरवाडीत आला या पुढे जशाच तस उत्तर देणार जरांगेंचं दोन समाजाच तेढ निर्माण करणारं सत्र आहे मुख्यमंत्र्यांना जरांगे हानूनपाडून बोलला मग शरद पवारांना झळ का नाही लागली पडळकर बोलले तेव्हा तुमचा फोन कसा उचलला मकरंद तु कलाकार आहे ठिक आहे गावकी काय आहे रे गावकी म्हणू नको संविधान म्हण आरेला कारे उत्तर दिलं जाईल आॅन राजेश टोपे सुप्रिया ताई वोट धनगर के चाहिए सबके चाहिए इसलिए राजनितीक बाते करती है राजेश टोपे यांनी उदार अंतकरणाने सांगावे जरांगेच्या आंदोलनात किती टक्के सहभागी आहेत जरांगे नावाचं जे आर्टिकल आहे तेव्हडंच बोलण्यापूर्त आहे का राजेश टोपे शासन निर्णय काहीच देवू शकत नाही तिळपापड आहे ही खालून लागलेली आग आहे माझ्या मराठ्यांची जरांगे यांनी फसवणूक केलेली आहे.. जरांगे राज्य का तुझ्या बापाचा आहे का तु तर स्वतन: सासुरवाडीवासी आहेस
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 21, 2025 12:16:21
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2109ZT_JALNA_JARANGE_PC(3 FILES) FEED NAME | 2109ZT_JALNA_JARANGE_PC जालना :मनोज जरांगे Pc पॉईंटर आज बैठक नव्हती, पण त्याला बैठक स्वरूप आले. नोंदी शोधणारे यांना बोलावले होते, जीआर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज कसे करावे याबाबत चर्चा झाली...कुणबी प्रमाणपत्र निघालेला आणि कुणबी प्रमाणपत्र नाही त्यांचा व्यवसाय एकच आहे... ऑन सदावर्ते-जाऊ द्या तिकडे सुप्रीया सुळे आम्ही ओबीसीमधून घेणार आहे, आणि ते घेत आलो आहेत.... ऑन हाके क्लिप.. त्याला महत्व देत नाही, लोक त्याला त्याचा समाज समजवूब घेतात, त्याला मोजत देखील नाही ऑन बैठक ज्या 58 लाख नोंदी सापडल्या त्या सरकारी साईडवर आहे, त्या शोधा, ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकींनी कुणबी प्रमाणपत्र काढले पाहिजे... ऑन गडकरी नितीन गडकरी असे म्हणाले, गडकरी हे जातपात मानत नाही अशी त्यांची ओळख आहे, पण आता त्यांच्या तोंडून जात निघत असेल तर अवघड आहे.. ऑन बंजारा समाज ज्यांना आपण दिले आता त्यांनी बरबाद केलं असे बंजारा समाजाच्या लक्षात आले आहे. त्यांनी एकत्र लढा दिल्यास त्यांना यश मिळेल, एकहाती लढा दिल्यास यश मिळेल.... ऑन ओबीसी आक्रमक निवडणूक मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे, आपण आरक्षण मिळत आहे, गुरगुर करणाऱ्या पेक्षा दूर राहावे... कुणी पोस्ट टाकेल, ओरडेल त्याला चिल्लर समजा...गुरगुर करणाऱ्याचा हिशोब करू, बदला घेऊ .... ऑन दसरा मेळावा तयारीला 20 -22 दिवस उरले फक्त, छोटा मोठा होईल, पण होणार आहे, मराठा समाजाने एकजूट दाखवली पाहिजे....
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 21, 2025 12:15:31
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी यांनी केली आहे. काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्ष देखील स्वबळावर निवडणूक लढण्याच्या नारा देत आहेत. याचा लाभ भाजपला मिळू शकतो. जिल्हात होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत मात्र पक्षाच्या आदेशाच्या पालन करणार परंतु स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयारी देखील केली जात आहे, असं शिवसरणा ठाकरे गटाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढणार आहे मात्र पक्षाने आदेश दिल्यास पक्षाच्या समान करणार आहेत परंतु शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढणार असं परिपत्रक काढण्यात आलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार अशीच काहीशी परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात उद्भवली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडी नसेल तर याच्या फायदा इतर पक्षाच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे मात्र महाविकास आघाडीत समन्वय नसल्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागले आहेत. byte - अरुण चौधरी, जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 21, 2025 12:15:22
Washim, Maharashtra:वाशिम: File:2109ZT_WSM_BOY_DEATH_IN_RIVER रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील गीरोली येथील १२ वर्षीय अश्विन उर्फ सोनू दिलीप आमटे हा निरागस मुलगा काल २० सप्टेंबर रोजी गावाजवळून वाहणाऱ्या गोखी नदीच्या पुरात वाहून गेला. गावकऱ्यांनी रात्रीपर्यंत जीव तोडून शोध घेतला,पण यश आले नाही.घटनानंतर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे संत गाडगे बाबा शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.पहिल्या दिवशी मृतदेह हाती लागला नाही.मात्र आज सकाळी पुन्हा सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर अश्विनचा मृतदेह पाण्यात आढळला.पथकाने मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.या दुर्दैवी घटनेमुळे गीरोली गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 21, 2025 12:00:49
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:lधाराशिव DHARA_TULJ_AI तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात वापरले जाणार एआय कॅमेरे नवरात्र उत्सवात होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी होणार पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्याचा वापर तुळजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या फोटोसह इतर माहिती एआय सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती चेहऱ्याची ओळख पटविण्यासाठी, गर्दीचे नियोजनासाठीही एआय कॅमेऱ्याचा वापर होणार, नवरात्र महोत्सवात किती भाविकांनी दर्शन घेतले याचीही नोंद होणार दर्शन मंडप , तुळजाभवानी मंदिर, शहरात महत्वाच्या ठिकाणी एआय कॅमेरे बसवले जाणार एआय कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात येणार यश तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा काळात शहरात 102 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार Byt: एजाज शेख, आयटी इंजिनियर
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 21, 2025 12:00:40
Dhule, Maharashtra:ANCHOR - सातपुड्याचा देवगोई घाटात दरड कोसळण्याच्या घटनांना ब्रेक लागणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देवगोई घाटात संरक्षण जाळीचं काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट हा सातपुड्यातील महत्त्वाचा घाट असून दुर्गम भागाला जिल्ह्याची आणि गुजरात राज्याला कमी अंतरात जोडणारा हा घाट असून, गेल्या अनेक वर्षांपासून या घाटात पावसाळ्यात मोठ्या दरडी कोसळण्याचा घटना घडत होत्या. अचानक पने भूस्खलन होऊन अनेक वेळा घाट मार्ग बंद होऊन वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढले होते. यावर आता सरकारनं कायमस्वरूपी तोडगा काढला असून देवगोई घाटात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षण जाळी बसवण्याचं काम केलं जात आहे. हे कामं आता अंतिम टप्प्यात आहे. संरक्षण जाळी मुळे आता घाटातील दरड कोसळणाऱ्या घटनेला आता ब्रेक लागणार असून, देवगोई घाट हा प्रवासासाठी आता सुरक्षित होणार आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 21, 2025 11:47:19
Palghar, Maharashtra:ANCH - बोईसर तारापूर एमआयडीसीत प्रदूषण वाढत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज बोईसर मधील स्थानिक तरुणांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोईसर यांच्या कार्यालयाचा श्राद्ध घातल . सर्वपित्री अहवासाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा श्राद्ध घालत या तरुणांनी अनोखा आंदोलन केलं . सध्या बोईसर तारापूर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रदूषणकारी कारखान्यांना पाठीशी घालत असल्याने या तरुणांनी श्राद्ध घालताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर गंभीर आरोप केले . बाईट _आदोलक
2
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 21, 2025 11:46:53
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या नव्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद.....216 निवेदन झाली प्राप्त......डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते 'पालकमंत्री जनता दरबार' पोर्टलचेही केले उद्घाटन..... ANCHOR :- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी भंडारा येथे पहिला जिल्हास्तरीय जनता दरबार आज पार पडला. या दरबारात 216 निवेदन प्राप्त झाले होते. जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांनी समस्या, निवेदन घेउून पोलीस बहुददेशीय सभागृहात गर्दी केली होती. यापूर्वी पालकमंत्री यांच्या निर्देशान्वये 8 व 15 संप्टेबर रोजी तहसील पातळीवर दोन जनता दरबार आयोजित करण्यात आले होते. आज जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या समस्येचा निराकरण करण्यात आले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 21, 2025 11:31:10
Beed, Maharashtra:बीड:पाटोदा येथे मंत्री पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत..! Anc: बीडच्या पाटोदा येथे आयोजित राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या. त्यांच्या आगमनावेळी कार्यकर्ते व नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत स्वागत केले. पंकजा मुंडे यांचे आगमन होताच शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. खास रथ सजवून त्यामध्ये बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. रथावरून हात हलवून पंकजा मुंडे यांनी नागरिकांचे अभिवादन स्वीकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दुमदुमून टाकला. संत भगवान बाबा जयंती उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक व नागरिक पाटोद्यात जमले होते. सजवलेल्या रथातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि आकर्षक सजावट यामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 21, 2025 11:18:54
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2109ZT_MAVAL_TRACTR_POLA Total files : 02 Headline : मावळात बैलपोळ्यानंतर ट्रॅक्टर पोळा… -AI तंत्रज्ञानाच्या साथीने आधुनिक शेतकऱ्यांचा नवा उत्सव साजरा Anchor : ज्याप्रमाणे गावागावांत पारंपरिक पद्धतीने भाद्रपद बैलपोळा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मावळात ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला. बैल पोळ्यानंतर आता AI च्या माध्यमातून आधुनिक शेतीचा साथीदार ठरलेल्या ट्रॅक्टरलाही शेतकऱ्यांनी सजवून, फुलांच्या तसेच फुग्यांच्या तोरणांनी नटवून, आरती करून मान दिला. हे रंगीबेरंगी सजवलेले ट्रॅक्टरची पूजा घरातील महिलांकडून करण्यात आली. मावळ तालुक्यात देखील शहरीकरण झाल्याने बैल ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक शेतकरी हे बैलांऐवजी शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात. मावळ मधील वडगाव मावळ येथील शेतकरी विशाल वहिले यांनी बैलपोळा सणाच्या निमित्ताने थेट शेतीत राबणाऱ्या ट्रॅक्टरची पूजा केली. या शेतकऱ्याने परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवत ट्रॅक्टरला बैलांसारखाच शेतकऱ्यांचा खरा सोबती म्हणून गौरविले. परंपरेला आधुनिकतेची सांगड घालत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला दिलेला मान हा सण केवळ श्रद्धेचा नव्हे, तर कष्टाच्या साथीदाराबद्दलच्या प्रेमाचा अनोखा उत्सव ठरल्याची चर्चा सध्या मावळ तालुक्यात सुरू आहे.. बाईट : विशाल वहिले, आधुनिक शेतकरी (File no.02)
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 21, 2025 11:17:09
Bhandara, Maharashtra:मराठा समाजाला मिळालेल्या शासन निर्णयाच्या विरोधात, त्याचप्रमाणे मराठ्यांना आणि धनगरांना ओबीसी जागा देऊ नये या मागण्या घेऊन गोंदिया जिल्हा विविध ओबीसी संघटनेच्या वतीने काढण्यात आली भव्य रॅली ... Anchor : राज्यातील आरक्षणाच्या वादाला पुन्हा उधाण आलं असून, मराठा समाजासाठी राज्य सरकारने काढलेल्या अलीकडील शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत मराठा आणि धनगर समाजांना ओबीसी मध्ये सामील न करण्याच्या मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्यात हजारोच्या संख्ये ओबीसी बांधव उतरले रस्त्यावर. भव्य रॅली काढून मराठ्यांना मिळालेला जीआरच्या नोंदविला निषेध . मराठा प्रमाणे धनगर समाजाला सुद्धा ओबीसील मध्ये सामील करू नये, या मागणीला घेऊन जय ओबीसी नारे लावत मोठ्या संख्येत ओबीसी बांधवांनी बाईक रॅली काढत भव्य मोर्चा या निमित्ताने करण्यात आला. हजारो च्या संकेत ओबीसी महिला तसेच पुरुषांनी इथे आपली उपस्थिती नोंदणी
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 21, 2025 11:16:58
Baramati, Maharashtra:JAVED MUALNI SLUG 2109ZT_INDAPURBHRNEBYTE BYTE 1 इंदापूर_*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बाईट पॉईंटर* *ऑन_स्वच्छ नारी सशक्त परिवार अभियान* भिगवण मध्ये आज स्वस्त नारी सशक्त नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात आज करत आहोत.  यात स्त्रियांच्या विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे.  घरातील स्त्रीचे आरोग्य चांगलं असेल तर त्या कुटुंबाचं आरोग्य वेगळा आनंद असतो.  त्यामुळे स्वस्त नारी आणि सशक्त परिवार या अभियानाला हे नाव दिले आहे *ऑन_अतिवृष्टी* शेतकऱ्यांची अजिबात चूक नाही.  हे निसर्गाचे संकट आहे. वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पाऊस पडत आहे.  त्यामुळे नद्या नाल्यांना पूर येत आहे.  याचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 64 ला 55 हजार एकर क्षेत्राला राज्यात पावसाचा फटका बसला आहे.  मी चा शेवटच्या आठवड्यात ते आज पर्यंत काही पिकांचा पाऊस थांबायचा नाव घेत नाही.  राज्यातील शेतकऱ्यांचा खूप मोठे नुकसान झालं आहे.  या महिन्यात सर्वात जास्त नुकसान बीड जिल्ह्यामध्ये झाले.  या महिन्यात बीड जिल्ह्यात सहा लाख एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अहिल्यानगरचे नुकसान झाले आहेत. काही ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे.  *ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाला आहे त्यांच्या शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील, ज्याची जमिनीची माती वाहून गेली आहे पशुधन असेल किंवा जे काही फळबागाच नुकसान असेल त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिले आहेत* पावसामुळे काही ठिकाणी अडचण येत आहे.  शासनाच्या वतीने नुकसान भरपाई दिली जाईल.  अपूर्ण पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. *ऑन_मे महिन्यातील नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही* सर्वांना निश्चित प्रकारे मदत मिळणार आहे.  सर्वात जास्त नुकसान नांदेड मध्ये झाले आहे.  ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडला आहे.  या दोन महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत.  सर्व पंचनामे लवकरात लवकर करू.  *दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल* *ऑन_विरोधकांकडून ओला दुष्काळाची मागणी* याबाबतीत काही अटी आहेत नियम आहेत ते अजून राहून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेतील.  *ऑन_कर्जमाफी* शेतकरी आज खूप अडचणीत आहे.  कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी कधी गारपीट होत आहे.  *शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणं काही ना काही त्यांना आर्थिक पाठबळ देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे* *कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील* *मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे ज्येष्ठ आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतील* *ऑन_भिगवण विकास कामे* कोणतीही इमारत बांधताना आरोग्याचे मनुष्यबळ आपण तिथे दिले आहे.  आवश्यक असणार फर्निचर च काम चालू आहे.  भिगवन ट्रॉमा केअर आणि भिगवण पोलीस ठाण्याची इमारत लवकर मार्गी लावण्याचा काम करू.  मागील पंधरा दिवसापूर्वी कोट्यावधी रुपये निधी आपण या ठिकाणी दिला आहे.  बस स्थानकाचा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे बस स्थानक देखील वाढवत आहोत.  अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण दीपावलीच्यापूर्वी त्या कामाला सुरुवात करत आहोत.  *ऑन_जयंत पाटील गोपीचंद पडळकर टीका* कोणीही असुद्या कोणी कोणावरती वैयक्तिक टीका राजकारणात करू नये.  राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं.  मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी याबाबत खुलासा केला आहे.  *ऑन_रोहित पवार आमसभा अधिकारी उद्धटपणे बोलणे* मी काल अकोला वाशिम हिंगोली नांदेड दौऱ्याच्या दौऱ्यावर होतो.  अधिकारी असतो कामकाज करताना थोडं होत असेल  मी ते जास्त ऐकलेलं नाही.  एखादा अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजेत.  *ऑन_अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना भरपाई ची मदत किती* सरकारी नियमाप्रमाणे मदत दिली जाईल.  जिरायत बागायत आणि बोलायचं याची रक्कम शासनाने जाहीर केली आहे त्या त्याप्रमाणे आपण देऊ.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 21, 2025 11:15:08
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_GR_WAAD काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून नवा वाद मराठा क्रांती मोर्चाचा निषेध हिम्मत असेल तर हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा, मराठ्यांची ताकद दाखवतो — मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांचा इशारा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी "हैदराबाद गॅझेटनुसार काढलेला मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा" असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावरून आता नवीन वाद पेटला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी वडेट्टीवारांवर कडाडून टीका डोंगरे म्हणाले — वडेट्टीवार हे लक्ष्मण हाके यांना सांभाळत आहेत तसेच, डोंगरे यांनी वडेट्टीवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यात आता उफाळला नवा वाद... Byte महेश डोंगरे राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा
0
comment0
Report
Advertisement
Back to top