Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

जख्मी चितळ को वनविभाग ने जीवनदान देकर फिर से जंगल छोड़ा

PTPRAVIN TANDEKAR
Sept 20, 2025 04:03:03
Bhandara, Maharashtra
जखमी चितळाला वनविभागाने दिले जीवनदान... Anchor :- लाखनी तालुक्यातील सामेवाडा येथील दिपक बोळणे यांच्या शेत शिवारात चितळ जखमी अवस्थेत आढळून आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली व जखमी चितळला लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. औषध उपचार झाल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले आले आहे...
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 20, 2025 05:46:43
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे संपर्क मंत्री अशोक उईके यांनी बाभूळगाव तालुक्यात देखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार पाडले आहे. बाजार समितीचे संचालक आशिष सोळंके आणि काँग्रेसचे नेते प्रल्हाद डगवार यांचे सह मविआच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत भाजपात प्रवेश केला. कळंब, राळेगाव नंतर आता बाभुळगाव येथूनही कार्यकर्ते भाजपात गेल्याने काँग्रेस नेते, माजी मंत्री वसंत पुरके यांना झटका मानल्या जात आहे. भाजपात जुने आणि नवे कार्यकर्ते असा भेद नसून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून कार्यकर्ते भाजपात येत आहेत त्यामुळे भाजप परिवार मजबूत झाल्याचे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. भाजप सोबत जो कोणी बेईमानी करेल त्याचे राजकारण संपल्या शिवाय राहणार नाही असे सांगून पक्षातील विरोधकांचे देखील त्यांनी कान टोचले. बाईट : अशोक उईके , मंत्री आदिवासी विकास
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 05:36:23
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - तडीपारीच्या नोटिशीला आव्हान देणे पडले महागात, सोलापुरातील एका गुन्हेगाराला हायकोर्टाकडून एक लाखाचा दंड - सोलापुरातील एका गुन्हेगाराला तडीपरीच्या नोटिशीला आव्हान देणे पडले महागात - इब्राहिम खाजासाब कुरेशी या गुन्हेगाराने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या तडीपारीच्या नोटीस विरोधात घेतली होती उच्च न्यायालयात धाव - हायकोर्टाने अमूल्य वेळ वाया घालवण्याचा निष्कर्ष काढून ठोठावला तब्बल एक लाखांचा दंड - सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून शहरातील गुंडांची सुरू आहे साफसफाई - इब्राहिम कुरेशी याच्यावर 2009, 2015, 2016, 2018, 2021, आणि 2025 या कालावधीत विविध गंभीर गुन्हे दाखल - रिट पिटीशन दाखल करताना याचिकाकर्त्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवल्याचे समोर - सदरच्या आरोपीकडून एक लाख दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत भरणे बंधनकारक अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना महसूल कायद्याने रक्कम वसूल करण्याचे आदेश
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 20, 2025 05:36:12
Ratnagiri, Maharashtra: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संतापले, सुनावले खडे बोल गृहराजमंत्री योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघातील कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातील आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती योगेश कदम चांगले संतापले महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत तुमचं नक्की चाललंय काय असा खडा सवाल करत पुढच्या सहा दिवसात मला सगळ्यांचे अर्ज निकाली काढून मला अहवाल सादर करा असे आदेशच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत घरकुल योजनेच्या कामासंदर्भात रखडलेल्या लाईट कनेक्शन बाबतही महावितरणच्या अधिकाऱ्यांना योगेश कदम यांनी चांगलेच झापले
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 20, 2025 05:35:40
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या माजी नगरसेवकांची मोर्चे बांधणी भाजपच्या माजी नगरसेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सेवा पंधरवडा निमित्त माजी नगरसेवकांकडून आज रत्नागिरी नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता साहित्याचं वाटप फावडं, गमबूट, हँडग्लोज, घमेलं, खुरपं आदी साहित्याचं वाटप आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही नेहमीच तयार भाजपच्या माजी नगरसेवकांची प्रतिक्रिया Byte-
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 20, 2025 05:35:29
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_RestHouse Feed on - 2C ---------------------------- Anchor - नांदेडच्या शासकीय विश्रामगृहातील सेवेवर मंत्री चंद्रकांत पाटील खुश झाले आणि जाताना कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये बक्षीस देऊन गेले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते नांदेडच्या शासकीय विश्रामगृहावर मुक्कामास होते. रात्री आराम पूर्ण झाल्यावर सकाळी ते नियोजित कार्यक्रमासाठी निघाले. गाडीत बसल्यावर त्यांनी अचानक ड्रायव्हर ला थांबण्याचा इशारा केला. विश्रामगृह व्यवस्थापकांना बोलवून घेतले त्यांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले अन् टीप म्हणून संपूर्ण टीमला एकूण 5 हजार रुपयांची बक्षिस दिले. महत्वाचे म्हणजे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतःच्या खिशातून हे पैसे काढून दिले. यामुळे विश्रामगृह कर्मचारी मात्र आश्चर्यचकित आणि खुश झाले. --------------------------
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 20, 2025 05:35:08
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_RANI_LOSS सात फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 नुकसानाची दखल न घेतल्याने शेतकऱ्याचा अनोखा निषेध; अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याने पिकात रोटाव्हेटर फिरविण्याच्या कार्यक्रमाचे छापले निमंत्रण पत्रक, कृषी विभागावर संतापाचा उद्रेक अँकर :- या वर्षी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीसाठी सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र अतीवृष्टीमुळे परिस्थिती पालटली आणि सोयाबीन पिकांवर ‘येलो मोझॅक सारखा रोग आल्याने शेकडो शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः उद्‌ध्वस्त झाले. तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्यावर या आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांची संपूर्ण शेतीतील सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. यासंदर्भात त्यांनी आणि गावातील इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदने दिली, भेटी घेतल्या परंतु कुठलाही अधिकारी बांधावर फिरकला नाही. त्याचे पंचनामे देखील केले नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने शेतातील पिकावर रोटावेटर फिरवून पीक नष्ट करण्याचे ठरविले मात्र या करिता शेतकरी दयाराम राठोड यांनी कृषी विभागाचा निषेध करीत एक निमंत्रण पत्रिका छापली व ती कृषी विभागातील अधिकारी महसूल अधिकारी व गावातील सर्व नागरिक यांना वाटली व थेट अधिकाऱ्यांनाच पिके नष्ट करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं. बाईट :- दयाराम राठोड, शेतकरी रोटावेटर कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रक व्हायरल* दयाराम राठोड यांनी छापलेल्या पत्रिकांमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की कार्यक्रम : नष्ट झालेल्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरविणे दिनांक : 22 घटस्थापनेच्या दिवशी वेळ : सकाळी ११ ते दुपारी २ स्थळ : दयाराम राठोड यांची शेती, सुजातपूर विशेष : पाहुण्यांसाठी अल्पोपहाराची सोय उपलब्ध!
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 04:49:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: Sng_band स्लग - गोपीचंद पडळकरांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही संताप, इस्लामपूर शहर बंद ठेवत निषेध.. अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टिकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर बंद पाळण्यात येत आहे.जयंत पाटील समर्थकांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे.या बंदला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने त्याचबरोबर छोटे-मोठे व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले आहेत.भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे संतप्त पडसाद दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे पाहायला मिळत आहेत.
5
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 04:47:25
Yeola, Maharashtra:येवला /नाशिक ब्रेक नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक–संभाजीनगर महामार्गावर जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील सडक्या कांद्याची माळ घालून निषेध... एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन सुरू. प्रहार संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा. कांद्याच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान आणि हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळे वस्त्र बांधून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 20, 2025 04:47:14
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_KARAD_DEATH कराड:-कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानात ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीत अखिलेश नलवडे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे. तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित नसल्याने त्याबाबतची विचारणा करण्यासाठी गेलेल्या युवकांचा वादावादीत मृत्यू झाला आहे. यावेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरू असताना ग्राहक अखिलेश नलवडे चप्पलची घाण दुकानतील फरशीवर आल्याने वाद झाला अन त्यात अखिलेश जमिनीवर पडला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे अखिलेशला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणात अजीम मुल्ला या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 20, 2025 04:31:22
Beed, Maharashtra:बीड : सराईत गुन्हेगार गोट्या गीतेसह पाच आरोपींवरील मकोका रद्द, दोघांवर कायम Anc : परळीतील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघु फड गॅंगवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. या टोळीत सात जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र आता अपर पोलिस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गितेचाही समावेश आहे. परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या गोट्या गितेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे १० ते १५ गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्याप फरार आहे. गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द झाला आहे. तर टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि धनराज गिते या दोघांवरच मकोका कायम ठेवण्यात आला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top