Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला के जंगल में 15-फुट अजगर: रेस्क्यू टीम ने सुरक्षित जंगल भेजा

SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 03:17:37
Yeola, Maharashtra
अँकर :-येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या एका ओढ्यामध्ये महाकाय सर्प असल्याची बातमी वन विभागाला मिळाली होती वन विभागाच्या पथकाने येवल्यातील सर्पमित्र दीपक सोनवणे व सोनू लाहोरे यांना सोबत घेऊन सर्च ऑपरेशन केले या ठिकाणी एक दुर्मिळ असलेला 15 फुट लांब अजगर आढळून आला यावेळी सर्पमित्रांनी व वन विभागाच्या पथकाने या अजगराला रेस्क्यू करून मानवी वस्ती पासून त्याच्या नैसर्गिक अधिवासात दूर सोडून दिले आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 04:49:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: Sng_band स्लग - गोपीचंद पडळकरांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही संताप, इस्लामपूर शहर बंद ठेवत निषेध.. अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टिकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर बंद पाळण्यात येत आहे.जयंत पाटील समर्थकांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे.या बंदला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने त्याचबरोबर छोटे-मोठे व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले आहेत.भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे संतप्त पडसाद दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे पाहायला मिळत आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 04:47:25
Yeola, Maharashtra:येवला /नाशिक ब्रेक नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक–संभाजीनगर महामार्गावर जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील सडक्या कांद्याची माळ घालून निषेध... एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन सुरू. प्रहार संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा. कांद्याच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान आणि हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळे वस्त्र बांधून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 20, 2025 04:47:14
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_KARAD_DEATH कराड:-कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानात ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीत अखिलेश नलवडे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे. तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित नसल्याने त्याबाबतची विचारणा करण्यासाठी गेलेल्या युवकांचा वादावादीत मृत्यू झाला आहे. यावेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरू असताना ग्राहक अखिलेश नलवडे चप्पलची घाण दुकानतील फरशीवर आल्याने वाद झाला अन त्यात अखिलेश जमिनीवर पडला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे अखिलेशला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणात अजीम मुल्ला या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 20, 2025 04:31:22
Beed, Maharashtra:बीड : सराईत गुन्हेगार गोट्या गीतेसह पाच आरोपींवरील मकोका रद्द, दोघांवर कायम Anc : परळीतील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघु फड गॅंगवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. या टोळीत सात जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र आता अपर पोलिस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गितेचाही समावेश आहे. परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या गोट्या गितेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे १० ते १५ गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्याप फरार आहे. गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द झाला आहे. तर टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि धनराज गिते या दोघांवरच मकोका कायम ठेवण्यात आला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 20, 2025 04:03:13
Kolhapur, Maharashtra:Kop Chori Feed:- 2C Anc:- कोल्हापूर पोलिसांनी न्यू शाहूपुरी मध्ये झालेल्या 55 लाखाच्या घरफोडीचा छडा लावण्यात यश मिळविले आहे.. पोलिसांनी कर्नाटक टोळीला या प्रकरणी अटक जेरबंद केलय. या टोळीकडून 25 तोळे दागिने, डायमंड दागिने आणि चोरीच्या पैशातून घेतलेल्या चार चाकी दुचाकी असा 37 लाखांचा मुद्देमान जप्त करण्यात आलाय. व्यंकटेश रमेश, गिरीश व्यंकटेश, रणजीत रमेश अशी अटक केलेल्या बेंगलोर आणि चलकेरे येथील आरोपींची नावे आहेत. यातील व्यंकटेश रमेश याच्यावर कर्नाटक मध्ये घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत, व्यंकटेश हा कोणत्याही परिसरात वास्तव करत नाही, त्यामुळे त्याला जेरबंद करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होतं
4
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 20, 2025 04:02:54
kolhapur, Maharashtra:नागपूर - *जिल्हा परिषदांचे सर्कल नवीन रोटेशन बदलला आव्हान देणाऱ्या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली..* - *त्यामुळे आता निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..* - याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या आणि राज्य सरकारचा निर्णय अवैध नसल्याचे जाहीर केले. - रोटेशनसाठी ही पहिली निवडणूक ग्राह्य धरली जाणार आहे. नागपूर, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील राजकीय कार्यकर्त्यांनी याचिका टाकली होती... - . - याचिकेत केवळ काल्पनिक मुद्दे मांडले आहेत. जागेच्या आरक्षणाबाबत कोणीही कोणताही हक्क सांगू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत याचिका फेटाळली...
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 20, 2025 03:45:55
Yavatmal, Maharashtra:WKT यवतमाळ जिल्ह्यात झालेला अति पाऊस आणि पुरामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस अशी प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्याने ही पिके सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या काड्या दिसत असून शेतशिवारांची अवस्था अतिशय भयानक झाल्याचे दृश्य आहे. मोठे परिश्रम करून आणि खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केलेली आणि आता हातातोंडाशी आलेली ही पिके मातीत गेल्याने तसेच शेतजमिनी ही खरडून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.
0
comment0
Report
Advertisement
Back to top