Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

निफाड बस स्टॉप में बड़े खड्डे, अधिकारी चुप, नागरिकों की आग उफान

SKSudarshan Khillare
Sept 14, 2025 01:00:11
Yeola, Maharashtra
अँकर निफाड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे एस टी महामंडळाचे अधिकारी डोळेझाक करत असून या संदर्भात वारंवार सांगून देखील कुठलाही फरक पडत नसल्याने आज निफाडकर नागरिकांनी एकत्र येत निफाड बस स्थानकामध्ये यासंदर्भात निवेदन दिले आहे एका गेट समोर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे बस एकाच गेट नाही येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे त्यामुळे यात जर फरक पडला नाही तर निफाडकर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 03:34:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn rain av Feed attached छत्रपती संभाजी नगरात शनिवारी सायंकाळी चार वाजता पासून  धो-धो पाऊस पडला. पाच वाजेपर्यंत म्हणजे केवळ अर्धा तासात ९ मिमी पर्जन्यमान झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली, तर रात्री साडेआठ वाजेपर्यंत ११ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. ऑगस्टअखेर जोरदार पाऊस पडला होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे हलका ते मध्यम तर काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गत तीन दिवसांपासून आकाश निरभ्र राहून तापमान ३३ अंश उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. पावसाच्या पुनरागमनासाठी वाढलेले तापमान पोषक ठरले. समुद्रावरील बाष्प वेगाने आपल्याकडे वाहून येत आहेत. कमी हवेचा दाब तयार होतो. त्यामुळे काहीच वेळेत धो-धो पाऊस पडत आहे. शहर परिसरासह जिल्ह्यात रविवार- सोमवारी जेथे पोषक वातावरण राहील तेथे वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. अनेक भागात मध्यरात्रीनंतरही पावसानं जोरदार हजेरी लावली...
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 14, 2025 03:33:18
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या पावसामुळे शेती पिके अक्षरशहा झोपली आहेत. तूर,मूग,उडीद,सोयाबीन,कापुस या पिकाचे मोठे नुकसान झालंय. पूर्णा तालुक्यात थुना नदीला पूर आला असून अनेक नावकी गावातील काही घरात पुराचे पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र काढलीय. आता रात्री पासून पंपावसाने उघडीप दिल्याने पाणी पातळी कमी होतेय. पण नदीला आलेल्या पुरामुळे सर्व पीक पाण्याखाली गेलीयेत. नावकी गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... WKT गजानन देशमुख पावसाने पिकांचे मोठे नुकसान नदी नाले ओढ्याकाठची पीक गेली पाण्याखाली, नावकी गावातील काही घरात पाणी शिरून नुकसान,चौपाल
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 14, 2025 03:19:18
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- अपघात फीड 2C Anc :- अहिल्यानगरच्या नगर-संभाजीनगर महामार्गावरील एसपी ऑफिसजवळ शनिवारी रात्री 11:30 च्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. हरियाणा पासिंग असलेल्या कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्याने समोर उभ्या असलेल्या तब्बल नऊ चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. ही वाहने एसपी ऑफिसजवळील एका हॉटेलसमोर उभी होती. एसी ऑफिस शेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यालगत पार्क केली होती. त्याचवेळी संभाजीनगरहून पुण्याकडे जात असलेला कंटेनर अनियंत्रित झाला आणि या गाड्यांना उडवत गेला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नऊ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
1
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 03:18:46
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..... स्किप्ट ::- किल्लारी पोलिसांची मोठी कारवाई... उसाच्या शेतातून ७१ किलो गांजा जप्त....७ लाखांचा मुद्देमाल हि केला जप्त... AC ::- लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा तांडा शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेला तब्बल ७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा, ७१ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. किल्लारी पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम पवार आणि रामराव पवार अशी आरोपीची नावे आहेत. या दोघांनी आपल्या ऊसाच्या शेतात गांजाची झाडं लावली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून गांजाची झाडं जप्त केली असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. ही संपूर्ण कारवाई किल्लारी पोलीस आणि लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 03:17:16
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 14, 2025 03:17:01
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_watergres_contro नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ… अँकर - नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा ठेका घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या ठेकेदारांनी कामगारांवर अन्याय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वेतनातून रोख स्वरूपात जवळपास नऊ हजार पाचशे रुपये महिन्याला वसूल केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. विरोध करणाऱ्यांना कामावरून काढून टाकत शिवीगाळ केल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कामगारांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे धाव घेतली असून, या आर्थिक लुटीविरोधात लढा उभारणार असल्याचं सांगितलं आहे. रस्त्यावरील सफाई, गटारी साफ करणाऱ्या कामगारांचा छळ होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून, पोलिस आणि मनपा प्रशासन सहकार्य करत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली आहे. यामध्ये ठेकेदार पोलिसांच्या दप्तरी फरार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. महिन्याकाठी १ कोटी रुपयांचा जवळपास भ्रष्टाचार होत असल्याचा संशयही आमदार फरांदे यांनी व्यक्त केलाय. बाईट - १) देवयानी फरांदे - भाजप आमदार २) सचिन जाधव - सफाई कामगार ३) संदीप नागरे - सफाई कामगार
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 14, 2025 03:15:10
Nashik, Maharashtra:Feed  send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_murder प्रियकराच्या साथीने पतीच्या खुनाचा कट अँकर प्रेमाच्या त्रिकोणात काटा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने मारल्याची ठार धक्कादायक घटना नाशकात  उघडकीस आलीये...काल सकाळी पांडवलेणीच्या पायथ्याशी गरवारे हाउसजवळ रस्त्यालगत संतोष अशोक काळे या बिगारी काम करणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास करत अहिल्यानगर येथून संशयित प्रफुल्ल कांबळे याच्यासह संतोषची पत्नी संशयित पार्वती हिला ताब्यात घेतले आहे.संतोष काळे हा मद्यप्राशनाचे व्यसन होते. तो अनेकदा दारूच्या नशेत परिसरात झोपून राहायचा. शुक्रवारी रोजी दुपारी तो परिसरातील पाण्याच्या टाकीखालील शेडमध्ये झोपलेला होता. त्यानंतर दुपारपासून रात्रीपर्यंत तो घरात परतला नाही. रात्री उशिरापर्यंत संतोष घरी न आल्याने कुटुंबीयांना शंका आली. त्यांनी शोधाशोध सुरू केली. शनिवारी गरवारे बस थांब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी गुन्हे शोध पथकासोबत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला... यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 14, 2025 03:04:10
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 03:03:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn drug racket av Feed attached मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेसाठी 'कोडेन फॉस्फेट' या खोकल्याच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस आयुक्तांचे विशेष पथक, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, १२ जणांना अटक करून ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ३ महिने मागावर राहून हे रॅकेट उघडकीस आणले आहे. पोलिसांचे पथक गेल्या ३ महिन्यांपासून या रॅकेटवर बारीक लक्ष ठेवून होते. पोलिसांनी एका पेडलरला पकडल्यानंतर चौकशीत आरोपी रुपेश पाटील याचा फोन नंबर मिळाला. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर, १२ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हा वाळूज येथील व्हीआरएल लॉजिस्टिक्सच्या गोदामातून औषधांचे पार्सल घेण्यासाठी येणार होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १३ जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक पेडलर्सचे नेटवर्क चौकशीत समोर आले आहे... Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 14, 2025 03:03:36
3
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 14, 2025 03:01:29
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 1409_BHA_MOHADI_NP FILE - 10 VIDEO भंडाऱ्याच्या मोहाडीत नगरपरिषदेच्या अनधिकृत कचरा संकलन केंद्राने वाढला आरोग्याचा धोका......दुर्गंधीने परिसरातील स्थानिक हैराण.... नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाची दुर्लक्ष.... ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे नगरपरिषदेकडून शहराच्या मध्यवर्ती भागात, राष्ट्रीय महामार्गालगत, अनधिकृत डंपिंग यार्ड तयार करून अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो. कचरा व्यवस्थापनासाठी अधिकृत जागा वेगळी असतानाही शहरातील संपूर्ण कचरा या ठिकाणीच साचवला जातो. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून फक्त ५० मीटर अंतरावर शाळा व नागरिकांची घरे असल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा धोका तातडीने थांबवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. BYTE :- पिंटू तरारे, नगर सेवक
2
comment0
Report
Advertisement
Back to top