Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

भोसे के किसान: 33 महीने से बिल नहीं मिला, आंदोलन तेज

SKSACHIN KASABE
Sept 17, 2025 08:00:58
Pandharpur, Maharashtra
Anchor - पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कृषिराज ऍग्रो गुळ पावडर कंपनीने 2022 आणि 23 वर्षातील माढा आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला होता. 33 महिने झाले तरी त्याचे बिल मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भोसे गावात आंदोलन केले
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Sept 17, 2025 09:50:09
Raigad, Maharashtra:स्लग - मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे महत्व पूर्ण विधान ..... आमचा शत्रू भाजप नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच ...... राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आगामी निवडणुकीत एकला चलो रे ...... अँकर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी एक महत्वपूर्ण विधान केलंय. विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमचा शत्रू भाजप नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करताना विकास गोगावले यांनी ठाकरे सरकारच्या काळातील आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आम्हालाही खंजीर खुपसावा लागेल. आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका एकला चलोची असेल मात्र एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मान्य असेल असंही ते म्हणाले. बाईट - विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 09:49:52
Akola, Maharashtra:Anchor : सामनाच्या अग्रलेखात “नरेंद्र मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नसून महाराष्ट्राचे शत्रू आहेत” असे विधान करण्यात आले आहे, यावर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.फुंडकर म्हणाले, “सामनाच्या मेंदूवर परिणाम झाल्याने अशा प्रकारची लिखाणं केली जात आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याबाबत अशा प्रकारची घृणास्पद भूमिका घेणे योग्य नाही.”दरम्यान, बुलढाणा येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा विडंबन करण्यात आल्याच्या घटनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “पुतळे बसवण्याची मागणी सर्वजण करतात, मात्र त्याची देखरेख करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. अशा प्रकारे पुतळ्यांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे मत त्यांनी स्पष्टपणे नोंदवले.त्यामुळे सामनाच्या अग्रलेखावरून आणि बुलढाणा येथील घटनेवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. Byte : आकाश फुंडकर , कामगार मंत्री
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 09:23:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत पालिकेचा निषेध. अँकर - सांगली महापालिका शहरातल्या रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.शहरातील माधवनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्याजवळ असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने अपघाताचे प्रकार देखील घडत आहेत,मात्र महापालिका प्रशासनाकडुन दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ रस्त्यामध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 17, 2025 09:22:08
Nashik, Maharashtra:Nashik breaking मंत्री गिरीश महाजन byte points On मीनाताई ठाकरे - अतिशय दुर्दैवी घटना आहे ही विकृती आहे - याचा तपास केला जाईल जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करायचा आहे का याबाबत देखील तपास केला जाईल - यातून कुठेही ताण तणाव निर्माण होऊ याबत काळजी घ्यावी On ठाकरे ब्रँड - इंदिरा गांधी ब्रँड होते आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का8 ब्रँड - बाळासाहेब ठाकरे यांची गोष्ट वेगळी होती - *त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होत आहे* - मुंबई महापौर आता महायुती चा असेल - मागच्या वेळी देखील ते शक्य नव्हेत पण आम्ही ते केले - बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुर्णपणे तिलांजली देण्यात आली आहे On कुंभ काम मोर्चा आरोप - कुंभमेळा ची काळजी करू नका ते व्यवस्थित होईल - सरकार म्हणून आमी शेतकऱ्यांना मदत करत आहोत - सत्तेत असताना तुम्ही घरातून बाहेर पडले नाही - मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तुम्ही केले आहेत - आता निवडणुका आहेत म्हणून तुम्ही मोर्चा काढत आहात On जारांगे मागणी - त्यांना जे पाहिजे होते ते त्यांना दिले आहे - कायद्याच्या चौकटीत त्यांना ते दिले आहे - काहीजण कोर्टात देखील गेले आहेत - याबत देखील आम्ही सरकार म्हणून आम्ही ताकतीने उभे राहू On राज ठाकरे - राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी काढले असतील On अजित पवार वक्तव्य - त्यांचा पक्ष महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे - आमचा पक्ष राष्ट्रीय आहे त्यामुळे आम्हाला दिल्ली ला जावं लागत On कुंभ काम भ्रष्टाचार - कुंभमेळा कामात कुठेही भ्रष्टाचार झाले नाही सगळे काम व्यवस्थित सुरू आहे On मुख्यमंत्री समोर घोषणाबाजी - ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही On सुप्रिया सुळे मंत्री इशारा - आपण सत्तेत असताना आरक्षण आणि कर्जमाफी बाबत काय केले - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार असताना आम्ही अनेक निर्णय घेतले - त्यांना बोलण्याचा अधिकार नाही
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 17, 2025 09:05:31
Navi Mumbai, Maharashtra:story slug - जेएनपीए बंदरावर डीआरआय ची मोठी कारवाई, 28 कंटेनर भरून आलेला 800 मेट्रिक टन पाकिस्तानी माल केला जप्त. FTP slug - nm jnpt port shots- photo reporter- swati naik navi mumbai Anchor -: पहलगाम हल्ल्यानंतर मे 2025 पासून पाकिस्तानी मालाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर भारताने बंदी घातली असतानाही यूएईच्या नावाने पाठवलेल्या 800 मेट्रिक टन पाकिस्तानी मालाच्या आयातीचा पर्दाफाश करण्यात आलाय. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेय. सदर कारवाई मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआय च्या पथकाने जेएनपीए बंदरात केलेय. कारवाईदरम्यान 28 कंटेनरमधील 12 कोटी रुपयांचे सौंदर्य प्रसाधने, सुके खजूर जप्त करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आलेय. gf- photo ====================
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 17, 2025 08:48:38
4
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 17, 2025 08:45:22
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग पीकपाणी *बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ..... सिंदखेडराजा तालुक्यात शेतीला तलावाचे स्वरूप ....* *शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी साचलेल्या पाण्यात आंदोलन सुरू..* *जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी...* Anchor - सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सततधार पाऊस कोसळत आहे तर काही दिवसापासून ढगफुटी झालि आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेताना तलावाचे स्वरूप आले आहे , पळसखेड चक्का या गाव परिसरा तील शेताला तलावाच स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरु केलाय... शेतीच मोठ नुकसान झालंय... कापूस पिक नष्ट झाले आहे .. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय..ताटडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे... बाईट - बालाजी सोसे, शेतकरी..
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 17, 2025 08:35:29
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध, शिवसैनिकांनी केले आंदोलन Anchor - मुंबईतील दादर येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातही शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी "मीनाताई ठाकरे अमर रहे" च्या घोषणा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले की, "ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. मीनाताई ठाकरे या महाराष्ट्राच्या मातेसमान आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे." या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. byte - शिवसैनिक
4
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 17, 2025 08:32:45
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव ब्रेकिंग DHARA_BREAKING_R2 धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण गावात गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून रुग्णालयात दाखल करण्याचा थरारक प्रसंग. मध्यरात्री अंधारात गावकऱ्यांनी डबक्याची नाव बनवून गर्भवती महिलेला दिला जीवदान. ग्रामस्थांच्या धाडसी प्रयत्नामुळे महिलेचे वाचले प्राण. अतिवृष्टीमुळे गावात निर्माण झालेल्या पुरस्थितीत महिलेला आली प्रसूती वेदना, संकटात सापडले गावकरी. तत्काळ ग्रामस्थांनी एकजुटीने पुराच्या पाण्यातून मार्ग काढत महिलेला पोचवलं मुख्य रस्त्यापर्यंत. महिलेवर परंडा ग्रामीण रुग्णालयात सुरू उपचार, महिला सुरक्षित. गावकऱ्यांच्या धाडसाचे आणि एकजुटीचे सर्वत्र होत आहे कौतुक.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 17, 2025 08:31:33
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Alamatti Dam PKG Feed:- 2C Anc:- कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढ करण्यासंदर्भात कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचा विरोध असतानाही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर पट्ट्यात संताप व्यक्त केला जात आहे. GFX in अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात निर्धार अलमट्टी उंची वाढवण्यासाठी 70 हजार कोटीची केली तरतूद. अलमट्टी धरणाची उंची 519. 6 मीटर वरून 524. 256 मीटर इतकी उंची वाढणार अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी 1 लाख 33 हजार इतक्या जमिनीचे होणार भूसंपादन 40 हजार एकर बागायत शेती आणि 30 हजार एकर नापीक शेती भूसंपादित केली जाणार. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी बागलकोट जिल्ह्यातील वीस गावांचे आणि अकरा वॉर्डचे विस्थापित केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गावांना देखील अलमट्टीच्या उंचीचा फटका बसणार.. महाराष्ट्र शासनाचा विरोध डावलून कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी 70 हजार कोटीची केली तरतूद .. आत्ता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष. GRX Out:- VO 1:- कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे. काही महिन्यापूर्वी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत अलमट्टीच्या प्रस्तावित उंची वाढीला विरोध दर्शवण्यासाठी बैठक झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निवेदन दिले. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयात महापूराचे संकट अतिगंभीर होवू शकते तर कित्येक भूभाग कायमचा पाण्याखाली जावू शकतो हेही पटवून सांगितले. पण कर्नाटक सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर शिक्का मोर्तब होवून तब्बल 70 हजार कोटीची तरतूद केली. कर्नाटक सरकारला केंद्रीय लवादाने धरणाची उंची वाढवण्यास हिरवा कंदिल दिला असला तरी अलमट्टीची उंची वाढवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कर्नाटक सरकारला खडसावून सांगण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. . इतकच न्हवे तर अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी कर्नाटक सरकारच्या हालचालीवरून राजू शेट्टी चांगलेच संतापले आहेत. Byte :- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना VO 2:- अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रश्‍न आता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, महाराष्ट्र सरकारने यापूर्वी धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही निर्णय दिलेला नाही. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू नये, किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भिती निर्माण होईल अशी कृती करू नये अशी अपेक्षा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. Byte:- पूरग्रस्त भागातील शेतकरी VO 3:- एकीकडे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राला मात्र याचा धसका बसलाय.. अशा परिस्थितीत राज्य सरकार कशा प्रकारचे पावले उचलून कृती करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 08:05:44
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_SEVA_ABHIYAN ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा प्रारंभ, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, या सेवा पंधरवड्यात गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचे केले आवाहन      अँकर:--चंद्रपुरात मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची याप्रसंगी उपस्थिती होती. या सेवा पंधरवड्यात गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उत्कृष्ट कामगिरीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या पुरस्कार योजनेस मान्यता दिली आहे.  यंदा हे अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गावा-गावात विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे व गावांना आत्मनिर्भरतेकडे नेणे हा आहे. ग्रामपंचायतींच्या मूल्यमापनात लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, जलसमृद्धी, स्वच्छता, शिक्षण, महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे, डिजिटल सेवा, कर आणि पाणीपट्टीची 100 टक्के वसुली, मतदार नागरिकांचे ऍप, आयुष्यमान भारत कार्ड व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आकर्षक प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांकांना 15 लाख, 12 लाख व 8 लाख, जिल्हास्तरावर 50 लाख, 30 लाख व 20 लाख, विभागस्तरावर 1 कोटी, 80 लाख, 60 लाख व राज्यस्तरावर 5 कोटी, 3 कोटी व  2 कोटी रुपये अशी बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायती सक्षम करणे, तळागाळापर्यंत योजनांची पोहोच वाढविणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे या उद्दिष्ट्यांनी या अभियानाचे गुणांकन केले जाणार आहे.  बाईट १) प्रा. डॉ. अशोक उईके, पालकमंत्री, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 17, 2025 08:03:50
Navi Mumbai, Maharashtra:story slug - मंगलप्रभात लोढा ऑन राहुल गांधी FTP slug - panvel mangalprbhat lodha shots- reporter - swati naik navi mumbai anchor - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ पनवेलमधील गव्हाण ग्रामपंचायतीतून करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. तर आयटीआय मधील विद्यार्थ्यांद्वारे ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जात आहे. बाईट पॉइंटर्स ऑन नरेंद्र मोदी वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर त्यांना दीर्घायुष्य द्यावा व त्यांचे नेतृत्व आम्हाला लाभावे अशी प्रार्थना ऑन पाकिस्तान शाहिद आफ्रिदी शाहिद आफ्रिदीला राहुल गांधी यांना कोणते पंतप्रधान बनवायचे ते विचारा, भारतामध्ये तर काही चान्स नाही त्यांचा ऑन राज भेट राज ठाकरेंसोबत अशी कोणतीही भेट झाली नाही, मंगलप्रभात लोढा यांनी राज भेटीवर बोलण टाळल बाईट - मंगलप्रभात लोढा
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 17, 2025 08:01:32
Washim, Maharashtra:वाशीम: FILE2:1709ZT_WSM_BANJAR_MORCHA_WKT WSM_BANJAR_MORCHA_SHOTS अँकर:मनोज जरांगे पाटील यांच्या मुबंईतील आंदोलनानंतर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा केला.ओबीसी आरक्षणाची दारे खुली झाल्यानंतर आता याच गॅझेटला आधार मानून राज्यातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात येतं आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरातील पंचायतसमिती पासून तहसील कार्यालयापर्यंत हा बंजारा समाजाकडून मोर्चा काढला काढण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले असून या मोर्चाद्वारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.याच बाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
0
comment0
Report
Advertisement
Back to top