Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी: लगातार बारिश से वंजारपटी नाका पानी-पानी, लोग नाराज़

UJUmesh Jadhav
Sept 23, 2025 07:06:56
Thane, Maharashtra
भिवंडी... रात्रभर संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे वंजारपटी नाका परिसरात साचले पाणी.. नागरिकांची मात्र उडाली तारांबळ... ॲंकर... दोन‌ दिवसापासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर संततधा कोसळणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहरातील वंजारपटी नाका परिसरात व सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला आहे. या भागात महानगरपालिकेकडून गटारंक्षव नालेसफाई न केल्यानेच गटारात पावसाचे पाणी तुंबुन परिसरामध्ये पाणीच पाणी झाले आहे. पाण्याचा निचारा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यावेळी नागरिकांतून पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.‌ सध्या पावसाने‌ उघडीप घेतल्याने हळूहळू या पाण्याचा निचरा होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 23, 2025 08:51:29
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील शिक्षकी पेशातल्या नराधमाने शिकवणी वर्गातच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा बळी घेतला आहे. संदेश गुंडेकर असे या शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून हा शिक्षक शिकवणी वर्गातच तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करीत होता. यात तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी संदेश गुंडेकरने विद्यार्थीनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, ज्या तिची प्रकृती बिघडली, तिला पुसद येथील रुग्णालयात नेले असता, अवैध गर्भपाताचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विद्यार्थिनीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. खासगी शिक्षकाच्या विकृतीची विद्यार्थिनी शिकार ठरल्याने समाजमन्न सुन्न झाले आहे. संतप्त नागरिकांनी आज ढाणकी बंद ठेवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी व सदरचे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी केली आहे. बाईट : नागरिक
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 23, 2025 08:19:25
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोग आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी आजाद फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पुंगी बजाव' आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी 'पुंगी' वाजवत आपला रोष व्यक्त केला आणि शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदवला.आजाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, त्वरित शासकीय पथक पाठवून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा. Byte : गोपाल पोहरे , शेतकरी.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 08:17:14
Parbhani, Maharashtra:अँकर - परभणी जिल्ह्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पावसामुळे लाखो हेक्टर वरील पिके वाया गेली आहेत. परभणी तालुक्यातील शिर्शी बुद्रुक येथील केदार कुंडलिक स्वप्ने या प्रयोगशील शेतकऱ्याने एकरभर फुलकोबीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना 50 हजार रुपयांचा खर्च आला होता. दीड ते दोन लाख रुपयांचा त्यांना उत्पन्न अपेक्षित होतं. पण या पावसानं त्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळवली आहेत. सदर गोबी चा प्लॉट पूर्णतः सडून प्लॉट खराब झाली असल्याने उपटून फेकायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या शेतातून आढावा घेतलाय. आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 23, 2025 08:03:23
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2309_BHA_BHOYAR_BYTE FILE - 3 VIDEO शरद पवार साहेबांना फक्त सत्तेत राहण्याची सवय......सत्तेशिवाय त्यांना राहून होत नाही.... मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्टरत्या सर्व प्रश्न सोडवले, ते पाहून होत नसल्याने नैराशात जाऊन शरद पवार साहेब अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत..... ANCHOR :- शरद पवार साहेबांना फक्त सत्तेत राहण्याची सवय होती सत्ते शिवाय ते राहू शकून नाही राहिले त्याच्यामुळे ताशेरे ओढण्याशिवाय दुसरे काम ते करू शकत नाहीत... आज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही समाजाच्या प्रश्न सोडवला आहे. आणि इतिहासात नव्हत्या त्या योजना मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या ओबीसीच्या जनतेला दिलेले आहेत. राज्यात कुठेही स्वतंत्र मंत्रालय नव्हतं त्या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची निर्मिती करण्यात आली. अशा अनेक योजना राज्यातील ओबीसी समाजाकरिता मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. सोबतच मराठा बांधवांचा देखील त्यांनी प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे नैराशात जाऊन शरद पवार साहेब अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत.......((दोन्ही समाजामध्ये सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे.....सरकार न्याय दिनाच्या गोष्टी करत आहे मात्र प्रत्यक्षात कृती कधी करतील असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता त्यावर पंकज भोयर बोलत होते)) BYTE 01 :- पंकज भोयर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री (भंडारा) .... .... .... 2 सार्वजनिक कार्यक्रमात कोणालाही रोख लावली जाऊ शकत नाही...... स्थानिक आयोजकांवर ते अवलंबून असेल.... ANCHOR :- हे सगळे कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम आहेत आणि या अशा कार्यक्रमांमध्ये कोणी आलं पाहिजे आणि कोणी नाही आलं पाहिजे अशी रोख लावली जाऊ शकत नाही. शेवटी त्या ठिकाणी स्थानिक आयोजकांवर देखील ते अवलंबून असते त्यामुळे स्थानिक आयोजक यावर निर्णय घेतील......((बजरंग दल - विश्व हिंदू परिषदेने गर्भाच्या कार्यक्रमात आधार कार्ड चेक करूनच एन्ट्री द्यावी गैरधर्मातील लोकांना येऊ न देण्याचा फतवा काढला...... यावर पंकज भोयर बोलत होते)) BYTE 02 :- पंकज भोयर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री (भंडारा) .... .... .... 3 पूरजन्य परिस्थितीत राज्य सरकार अतिशय गंभीर असून सक्रियरित्या जी जी मदत नागरिकांना हवी ती राज्य सरकार मार्फत पुरवण्यात येईल..... ANCHOR :- मराठवाड्याचे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु राज्य सरकार अतिशय गंभीर आणि सक्रिय असून त्या ठिकाणी व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. जीजी मदत त्या ठिकाणी नागरिकांना हवी ती राज्य सरकार मार्फत पुरवण्यात येईल......((मराठवाड्यात सर्वत्र पावसाने हाहाकार केला असून पूरजन परिस्थिती निर्माण झाली आहे यावर पंकज भोयर बोलत होते)) BYTE 03 :- पंकज भोयर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री (भंडारा) .... .... ....
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 08:03:02
Pandharpur, Maharashtra:23092025 Slug- PPR_GORE_ONE2ONE file 01 --- Anchor - माढा तालुक्यातील सीना दारफळ या गावाला सीना नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसलेला आहे गावातील अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेला आहे या गावा शेजारील बरड वस्ती येथे जवळपास 110 लोक या पुराच्या पाण्यामध्ये असणाऱ्या घरामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना सोडवण्यात त्यांच्या जीवाचे रक्षण करणे याला प्रशासनाचे प्राधान्य असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे त्यांच्या सुटकेसाठी संपर्क सुरू असून सध्या मिल्ट्रीच्या चाळीस जवानांची एक तुकडी आणि बोट घेऊन या लोकांची सुटका करण्याचा पहिला प्रयत्न लवकरच होणार आहे वन टू वन पालकमंत्री
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 23, 2025 08:02:27
Kalyan, Maharashtra:रेल्वे प्रशासने शहाड स्टेशन चे हिंदी फलक बदललेले.. राज ठाकरे यांची शहाड बोर्डावर पडली होती नजर.. मनसे कार्यकर्यांना बोर्ड चेंज करायच्या दिल्या होत्या सूचना.. अखेर रेल्वे प्रशासनाने केले फलक चेंज. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची यांची नजर पडली मनसे कार्यकर्त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेला शब्द काढला नंतर शहाड रेल्वे स्टेशन वर लिहिलेला हिंदी सहद स्टेशन हा शब्द रेल्वे प्रशासनाला काढावा लागला. शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर होते. अंबरनाथ हुन कल्याणच्या दिशेने येत असताना शहाड रेल्वे स्टेशन समोर मनसेच्या काही पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. राज ठाकरेंची शहाड रेल्वे स्टेशन समोर त्यांची गाडी आली पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागत केलं याच दरम्यान राज ठाकरे यांची नजर स्टेशनचा वरच्या भागावर गेली. ज्या ठिकाणी मराठीत शहाड आणि हिंदीत सहद असा लिहिलं होतं .राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारले हा काय प्रकार आहे? कार्यकर्त्यांनी सांगितलं मराठीत शहाद लिहिलेला आहे आणि हिंदीमध्ये सहद लिहलेला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हिंदी मध्ये पाहिजे कशाला. एका कार्यकर्त्याने विचारले साहेब हिंदी शब्द काढून टाकू का ? त्यानंतर हिंदी शब्द कार्यकर्त्यांनी त्वरित काढून टाकला त्यानंतर मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी शहाड रेल्वे स्थानकात जाऊन प्रबंधकला दोन दिवसांच्या अल्टिमेटम देऊन हिंदी मध्ये लिहिलेला शब्द काढून टाकायचे अल्टीमीटर दिला अखेर रेल्वे प्रशासनाने हिंदी शब्द सहद हा शब्द काढून मराठीत शहाड शब्द लिहिला आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 23, 2025 08:02:04
Baramati, Maharashtra:JAVED MULANI SLUG 2309ZT_INDPURPADLKAR FILE 1 पुण्याच्या इंदापुरात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक.... जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या नंतर इंदापुरात दुग्धाभिषेक Anchor_भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर एकीकडे पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संताप व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे मात्र ओबीसी बांधवांकडून पडळकर यांना समर्थन दर्शवल जात आहे. आज पुण्याच्या इंदापूर शहरात राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला ओबीसी बांधवांच्या वतीने दुग्धाभिषेक घालत त्यांना समर्थन दर्शवण्यात आलं.यावेळी एकच छंद गोपीचंद अशा घोषणाही देण्यात आल्या.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 23, 2025 07:45:23
Baramati, Maharashtra:JAVEDMIULANI SLUG 2309ZT_BARAMATICRIME FILE 5 बारामतीच्या वंजारवाडीत पाच जणांवर कोयत्याने वार.....जुन्या भांडणाच्या कारणातून वार झाल्याची प्राथमिक माहिती.....बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,तिघांना अटक चौघे फरार..... Anchor_बारामती तालुक्यातील वंजारवाडी मध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार झालेत. घटस्थापनेदिवशी काल सायंकाळी रात्री साडेआठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अमोल अण्णा चौधरी याच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर शुभम वाघ,अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या हल्ल्यामध्ये सुनिल गोरख चौधर,अमोल आण्णा चौधर,भारत गोकुळ चौधर,सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार,सोमवारी 22 सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल आण्णा चौधर,भारत गोकुळ चौधर,सागर चंद्रकांत चौधर,आदित्य सर्जेराव चौधर, सुनिल गोरख चौधर हे सर्व व इतर नवरात्र उत्सव चालु असल्याने देवीची ज्योत राशीन येथुन मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेउन आले.मंदिरासमोर पुजा पाठ करून पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करित होते. त्याचवेळी रात्री. साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली. त्यातून मधुन ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे होते. त्यांच्या हातात लोखंडे कोणते चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती. त्यांनी दत्त मंदिरासमोर उभा असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या बंधुंवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे अधिकचा तपास करत आहेत.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 23, 2025 07:33:11
Pimpri-Chinchwad, Maharashtra:ब्रेकिंग वाकड ब्रीज वर हिंकवाडी कडे जाणारी वाहतूक होणार तीन लेन...! pimpri cp kailas puri pune 23-9-25 feed by 2c Anchor - हिंजवडी काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी... पिंपरी चिंचवड हिंजवडी मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्वतः पाहणी करत आढावा घेतला... पाहणीनंतर आयुक्तांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे स्पष्ट केले. सकाळच्या सत्रात पिंपरी चिंचवड मधील आयटी कर्मचारी वाकड ब्रिजवरून मोठ्या प्रमाणात हिंजवडीकडे जात असतात. तीच गोष्ट लक्षात घेत सकाळच्या सत्रात वाकड ब्रिजवर हिंजवडी कडे जाणारी वाहतूक तीन लेन तर हिंजवडी कडून वाकडकडे जाणारी वाहतूक एक लेन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी हिंजवडी कडून वाकडकडे येणारी वाहतूक तीन लेन करण्यात आली असून वाकड कडून हिंजवडी कडे जाणारी वाहतूक एक लेन करण्यात आली आहे. इतरही अनेक उपाययोजना हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी करण्यात येत आहेत. याच संदर्भात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याशी exclusive बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...! kailas 1 to 1 + vis
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 23, 2025 07:17:37
1
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 23, 2025 07:09:24
Kolhapur, Maharashtra:Kop MP Mahadik On Jagavatap Feed:- Live U Anc:- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नेते जागा वाटपावरून दावा प्रतिदावा करत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मागील निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडीचे 34 उमेदवार निवडून आले होते, त्यामुळे त्या जागा आम्ही लढवणारच आहोत, पण ज्या 29 जागा काँग्रेसने जिंकल्या त्यामधील आणखी 12 जागा हव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. इतकच नाही तर मागील निवडणुकीत शिवसेनेचे 4 जागा निवडून आले असताना आमदार राजेश क्षीरसागर हे 30 जागा मागत असतील तर आम्ही किती जागेवर दावा करायचा असा प्रश्न देखील महाडिक यांनी उपस्थित केलाय. हे वक्तव्य करत असताना महाडिक यांनी जागा वाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं देखील स्पष्ट केले आहे. Byte:- खासदार धनंजय महाडिक
2
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 23, 2025 07:08:57
Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* *ऑन मराठवाडा अतिवृष्टी* संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसाने आणि पुराने जवळ जवळ पाण्याखाली गेलाय,हाहाकार आणि आक्रोश आहे, अनेक भागात पावसाने कहर माजवलेला आहे ओला दुष्काळ जाहीर कराव अशी परिस्थिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत आहेत, मोनो रेल, मेट्रोचे उद्घाटन ठाण्यात करत आहेत,राजकीय भाषण करत आहेत,निवडणुकीची आखणी करत आहेत, मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी देखील त्यात अडकले आहेत पण थोडं यातून बाहेर पडून पुढील काही काळ सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जिथे जिथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे केंद्र सरकारने मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे पंजाबला पूर आला आहे, पंजाब सुद्धा पुरात वाहून चालला आहे,पंजाब सारख्या राज्याला पंतप्रधानांनी अत्यंत्य तुटपुंजी मदत केली, गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे आम्ही सुद्धा याच देशाचे घटक आहोत आणि प्रधानमंत्री आमचे सुद्धा आहेत असं आम्ही मानतो मराठवाडा या देशासाठी निजामांविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाहीत जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी, महाराष्ट्रवर 9 लाख कोटींचे कर्ज करुन ठेवले आहे या लोकांनी त्यामुळे राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत करू शकेल हे सांगता येत नाही म्हणून ही जवाबदारी केंद्राची आहे *ऑन राज्य मंत्री मंडळ बैठक* निर्णय घ्यायलाच पाहिजेत, नुकसान भरपायी मिळायला पाहिजे, जी निराधार गुर ढोर वाहून गेली आहेत त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय व्हयला पाहिजे, शाळा वाहून गेल्या आहेत त्याची सोय व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे याच्यात राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सामील करून याबाबतचा निर्णय घेण गरजेचे आहे, नाहीतर यात सुद्धा सरकार राजकारण करेल हे मला जास्त चिंता वाटते *ऑन धनंजय मुंडे* धनंजय मुंडे यांच्यावरती जो आक्षेप आहे तो एक विशिष्ट प्रकरणाचा आहे, पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांच्या पक्षाने त्यांना काय काम द्यावं, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी तो निर्णय घ्यायचा आहे पक्षाचा जो कार्यकर्ता असतो तो कधीच रिकामा राहत नाही तो स्वतः काम काढत असतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीत बसलेले आहेत दिल्लीच्या आदेशाने म्हणजेच अमित शहा यांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांना दूर केलेल आहे, यात अजित पवारांची फार भूमिका आहे असं मला वाटत नाही,हे अमित शहा ठरवतात कारण यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत आहेत जे अमित शहा आहेत,धनंजय मुंडेंचं काय करायचं हे दिल्लीतून ठरेल असं मला वाटतं *ऑन सदा सरवणकर* या घुमजावला काही अर्थ नाही, सरकारी निधीचा कसा अपव्यय होतोय, एका बाजूला तुम्ही नऊ लाख कोटींचं कर्ज आहे असं सांगता आणि या राज्यामध्ये जी आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहे ते विरोधी पक्षाचे असल्याने त्यांना निधी मिळत नाही, पण एखाद्या भागातील आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे पण सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे त्याला मात्र मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री हे भरघोस निधी देतात,हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे तुम्ही ज्या आमदारांचं नाव घेतलं ते छाती पुढे करून सांगतात की मी आमदार नसलो तरी मला वीस कोटींचा निधी मिळतो, मग तिथे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या भागात प्रचंड कामे रखडलेली आहेत, त्या निवडून आलेल्या आमदाराला यासाठी निधी दिला जात नाही कारण त्यांनी सरकारी पक्षातील आमदाराचा पराभव केला हे जे काय समान निधीच बेकायदेशीर वाटप आहे ती या राज्याची चिंतेची गोष्ट आहे, जे नगरसेवक मिंदे गटात किंवा भाजप मध्ये गेले ते आज नगरसेवक नसतांना सुद्धा त्यांना बैठकीत बोलवून निधी वाटप केला जातो कारण निवडणुका जिंकण्यासाठी पण जे नगरसेवक आमच्याबरोबर आहेत त्यांना एक रुपया निधी दिला जात नाही, निधी हवा असेल तर पक्षांतर करा, आमच्या पक्षात या असं सांगणं कितपत योग्य आहे मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार पुढल्या तीन वर्षात संपवू अशी भाषा मुंबईच्या भाजप अध्यक्षाने केलीये, मागच्या साडेतीन वर्षात ही महापालिका भाजप आणि मिंदे पुरस्कृत प्रशासनाच्या हातात आहे, भ्रष्टाचार यात काळात जास्त वाढलेला आहे मुंबई महानगरपालिकेचे भूखंड मुख्यमंत्र्याच्या बिल्डराला जूहू च्या सफाई कामगारांचा जो भूखंड आहे तू कोणत्या बिल्डरला दिला मुख्यमंत्र्यांनी यावर मुंबई भाजपच्या अध्यक्षाने बोलावं एसआरए प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या गटातल्या बिल्डरांना कसे मिळतात यावर बोलावं भ्रष्टाचारावर आपण बोलताय स्वतःच्या घरापासून बोला *ठाकरे बंधू फार्मुला* तुम्ही जे फॉर्मुले हवेत पतंग उडवण्यासाठी करत आहात त्याला काही अर्थ नाही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे मी वारंवार सांगत आहे या दोन नेत्यांमधला जो संवाद आहे तो उत्तम प्रकारे सुरू आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत योग्य वेळी त्याची माहिती समोर येईल पतंग कसा करता उडवता आणि अफवा कसा करता उडवतात मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा भगवा झेंडा फडके हे लक्षात घ्या आणि ठाकरे ब्रँड काय आहे हे मराठी माणूस दाखवेल जागा वाटप चर्चा झाली असेल तर इथे कशाला सांगू ते सांगण्याची ही हे व्यासपीठ नाही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगायचे प्रथा आणि परंपरा असते तुम्हाला कळेल आम्ही तुम्हाला सांगू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे द्यायलाच पाहिजे असं नाही *अन जादूटोणा राजन विचारे* हे सगळे लाभार्थी आहेत आता लाचार आणि लाभार्थी काय भूमिका घेत असतील तर त्याच्याविषयी मी बोलणार नाही मला जे बोलायचं आहे ते मी बोललो आता हे जे तंत्र मंत्र वगैरे गोष्टी करत आहेत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरुद्ध कायदा आहे तरी त्यानुसार तक्रार दाखल करा मग आजही ठाण्यात तंत्र मंत्र कोण करत भिवंडीच्या जमिनीमध्ये जिवंत बकऱ्या कोण पुरतं तिथे कामाख्या मध्ये रेडे कोण कापतं बदक कोण कापता आणि मग त्या कापलेल्या रेड्याची शिंगे आणून वर्षा बंगल्यावर कोण कशी पुरतं या संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर येतील मागे आणले आहेत तंत्र मंत्र या गोष्टी शिंदे घाटाने करू नये त्यांचे राजकारण हे जादूटनावर आहे कामाख्या मंदिरात 55 रेडे कापणारी ही लोक आणि कापलेल्या रेड्यांची शिंगे येथे आणून पुरणारे ही लोकं हे आमच्या लोकांमध्ये आरोप करतात ही राजकारणातली हास्य जत्रा आहे एवढेच म्हणून चला हवा येऊ द्या बस झालं *ऑन धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक* लोक अर्धी बुडाली तिकडे वाहून गेली मदत घेऊन जाणार म्हणजे काय करणार तिकडे आमचे ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत ते गुडघ्यावर पाण्यामध्ये फिरत आहेत पहा तुम्ही आमचे शिवसैनिक तिथे मदतीला आहेत की शिवसेना आमची तिथे काम करत आहेत ओम राजे निंबाळकर काम करत आहेतआमचे आमदार आहेत स्वामी ते काम करत आहेत हे उद्या परवा मदत म्हणून निघणार हे काल का नाही गेले काल यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्री यांची चमचेगिरी करायची होती काल कसलं उद्घाटन झालं ट्रायल झालं त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो घ्यायला हवा होता मुख्यमंत्री यांच्याबरोबर त्याच्यामध्ये लोक धाराशिला वाहून गेले तरी मी उद्या जाईन निर्दयी सरकार आहे
3
comment0
Report
Advertisement
Back to top