Back
मराठवाड़ा बाढ़ से भय: केंद्र सहायता कब तक पहुँचेगी?
APAMOL PEDNEKAR
Sept 23, 2025 07:08:57
Mumbai, Maharashtra
*संजय राऊत*
*ऑन मराठवाडा अतिवृष्टी*
संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसाने आणि पुराने जवळ जवळ पाण्याखाली गेलाय,हाहाकार आणि आक्रोश आहे, अनेक भागात पावसाने कहर माजवलेला आहे
ओला दुष्काळ जाहीर कराव अशी परिस्थिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत आहेत, मोनो रेल, मेट्रोचे उद्घाटन ठाण्यात करत आहेत,राजकीय भाषण करत आहेत,निवडणुकीची आखणी करत आहेत, मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी देखील त्यात अडकले आहेत
पण थोडं यातून बाहेर पडून पुढील काही काळ सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे
जिथे जिथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे
केंद्र सरकारने मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे
पंजाबला पूर आला आहे, पंजाब सुद्धा पुरात वाहून चालला आहे,पंजाब सारख्या राज्याला पंतप्रधानांनी अत्यंत्य तुटपुंजी मदत केली, गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे
आम्ही सुद्धा याच देशाचे घटक आहोत आणि प्रधानमंत्री आमचे सुद्धा आहेत असं आम्ही मानतो
मराठवाडा या देशासाठी निजामांविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाहीत
जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी, महाराष्ट्रवर 9 लाख कोटींचे कर्ज करुन ठेवले आहे या लोकांनी त्यामुळे राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत करू शकेल हे सांगता येत नाही म्हणून ही जवाबदारी केंद्राची आहे
*ऑन राज्य मंत्री मंडळ बैठक*
निर्णय घ्यायलाच पाहिजेत, नुकसान भरपायी मिळायला पाहिजे, जी निराधार गुर ढोर वाहून गेली आहेत त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय व्हयला पाहिजे, शाळा वाहून गेल्या आहेत त्याची सोय व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे
याच्यात राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सामील करून याबाबतचा निर्णय घेण गरजेचे आहे, नाहीतर यात सुद्धा सरकार राजकारण करेल हे मला जास्त चिंता वाटते
*ऑन धनंजय मुंडे*
धनंजय मुंडे यांच्यावरती जो आक्षेप आहे तो एक विशिष्ट प्रकरणाचा आहे, पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांच्या पक्षाने त्यांना काय काम द्यावं, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी तो निर्णय घ्यायचा आहे
पक्षाचा जो कार्यकर्ता असतो तो कधीच रिकामा राहत नाही तो स्वतः काम काढत असतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीत बसलेले आहेत
दिल्लीच्या आदेशाने म्हणजेच अमित शहा यांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांना दूर केलेल आहे, यात अजित पवारांची फार भूमिका आहे असं मला वाटत नाही,हे अमित शहा ठरवतात कारण यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत आहेत जे अमित शहा आहेत,धनंजय मुंडेंचं काय करायचं हे दिल्लीतून ठरेल असं मला वाटतं
*ऑन सदा सरवणकर*
या घुमजावला काही अर्थ नाही, सरकारी निधीचा कसा अपव्यय होतोय, एका बाजूला तुम्ही नऊ लाख कोटींचं कर्ज आहे असं सांगता आणि या राज्यामध्ये जी आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे
निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहे ते विरोधी पक्षाचे असल्याने त्यांना निधी मिळत नाही, पण एखाद्या भागातील आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे पण सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे त्याला मात्र मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री हे भरघोस निधी देतात,हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे
तुम्ही ज्या आमदारांचं नाव घेतलं ते छाती पुढे करून सांगतात की मी आमदार नसलो तरी मला वीस कोटींचा निधी मिळतो, मग तिथे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या भागात प्रचंड कामे रखडलेली आहेत, त्या निवडून आलेल्या आमदाराला यासाठी निधी दिला जात नाही कारण त्यांनी सरकारी पक्षातील आमदाराचा पराभव केला
हे जे काय समान निधीच बेकायदेशीर वाटप आहे ती या राज्याची चिंतेची गोष्ट आहे, जे नगरसेवक मिंदे गटात किंवा भाजप मध्ये गेले ते आज नगरसेवक नसतांना सुद्धा त्यांना बैठकीत बोलवून निधी वाटप केला जातो कारण निवडणुका जिंकण्यासाठी
पण जे नगरसेवक आमच्याबरोबर आहेत त्यांना एक रुपया निधी दिला जात नाही, निधी हवा असेल तर पक्षांतर करा, आमच्या पक्षात या असं सांगणं कितपत योग्य आहे
मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार पुढल्या तीन वर्षात संपवू अशी भाषा मुंबईच्या भाजप अध्यक्षाने केलीये, मागच्या साडेतीन वर्षात ही महापालिका भाजप आणि मिंदे पुरस्कृत प्रशासनाच्या हातात आहे, भ्रष्टाचार यात काळात जास्त वाढलेला आहे
मुंबई महानगरपालिकेचे भूखंड मुख्यमंत्र्याच्या बिल्डराला जूहू च्या सफाई कामगारांचा जो भूखंड आहे तू कोणत्या बिल्डरला दिला मुख्यमंत्र्यांनी यावर मुंबई भाजपच्या अध्यक्षाने बोलावं
एसआरए प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या गटातल्या बिल्डरांना कसे मिळतात यावर बोलावं
भ्रष्टाचारावर आपण बोलताय स्वतःच्या घरापासून बोला
*ठाकरे बंधू फार्मुला*
तुम्ही जे फॉर्मुले हवेत पतंग उडवण्यासाठी करत आहात त्याला काही अर्थ नाही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे मी वारंवार सांगत आहे या दोन नेत्यांमधला जो संवाद आहे तो उत्तम प्रकारे सुरू आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत योग्य वेळी त्याची माहिती समोर येईल पतंग कसा करता उडवता आणि अफवा कसा करता उडवतात
मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा भगवा झेंडा फडके हे लक्षात घ्या आणि ठाकरे ब्रँड काय आहे हे मराठी माणूस दाखवेल
जागा वाटप चर्चा झाली असेल तर इथे कशाला सांगू ते सांगण्याची ही हे व्यासपीठ नाही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगायचे प्रथा आणि परंपरा असते
तुम्हाला कळेल आम्ही तुम्हाला सांगू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे द्यायलाच पाहिजे असं नाही
*अन जादूटोणा राजन विचारे*
हे सगळे लाभार्थी आहेत आता लाचार आणि लाभार्थी काय भूमिका घेत असतील तर त्याच्याविषयी मी बोलणार नाही मला जे बोलायचं आहे ते मी बोललो आता हे जे तंत्र मंत्र वगैरे गोष्टी करत आहेत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरुद्ध कायदा आहे तरी त्यानुसार तक्रार दाखल करा मग आजही ठाण्यात तंत्र मंत्र कोण करत भिवंडीच्या जमिनीमध्ये जिवंत बकऱ्या कोण पुरतं तिथे कामाख्या मध्ये रेडे कोण कापतं बदक कोण कापता आणि मग त्या कापलेल्या रेड्याची शिंगे आणून वर्षा बंगल्यावर कोण कशी पुरतं या संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर येतील मागे आणले आहेत
तंत्र मंत्र या गोष्टी शिंदे घाटाने करू नये त्यांचे राजकारण हे जादूटनावर आहे कामाख्या मंदिरात 55 रेडे कापणारी ही लोक आणि कापलेल्या रेड्यांची शिंगे येथे आणून पुरणारे ही लोकं हे आमच्या लोकांमध्ये आरोप करतात ही राजकारणातली हास्य जत्रा आहे एवढेच म्हणून चला हवा येऊ द्या बस झालं
*ऑन धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक*
लोक अर्धी बुडाली तिकडे वाहून गेली मदत घेऊन जाणार म्हणजे काय करणार तिकडे आमचे ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत ते गुडघ्यावर पाण्यामध्ये फिरत आहेत पहा तुम्ही आमचे शिवसैनिक तिथे मदतीला आहेत की शिवसेना आमची तिथे काम करत आहेत
ओम राजे निंबाळकर काम करत आहेतआमचे आमदार आहेत स्वामी ते काम करत आहेत हे उद्या परवा मदत म्हणून निघणार हे काल का नाही गेले काल यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्री यांची चमचेगिरी करायची होती
काल कसलं उद्घाटन झालं ट्रायल झालं त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो घ्यायला हवा होता मुख्यमंत्री यांच्याबरोबर त्याच्यामध्ये लोक धाराशिला वाहून गेले तरी मी उद्या जाईन निर्दयी सरकार आहे
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 10:23:020
Report
JMJAVED MULANI
FollowSept 23, 2025 10:22:540
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:17:460
Report
SKShubham Koli
FollowSept 23, 2025 10:02:030
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 10:01:160
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:39:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:18:140
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 23, 2025 09:17:230
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:17:120
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 23, 2025 09:17:060
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 09:16:520
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 09:16:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 23, 2025 09:15:400
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 23, 2025 09:02:320
Report
KJKunal Jamdade
FollowSept 23, 2025 09:00:560
Report