Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

वांगणी-बदलापूर के बीच दो म्हशी फँसी, लोकल ट्रेन घंटों रुकी

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 24, 2025 08:02:22
Ambernath, Maharashtra
वांगणी-बदलापूर दरम्यान लोकलखाली दोन म्हशी अडकल्याने अप मार्गावरील वाहतूक ठप्प कर्जतहुन मुंबईकडे निघालेली लोकल तासभर खोळंबली  लोकल खाली अडकलेल्या दोन्ही म्हशी काढल्या नंतर रेल्वे वाहतूक सुरू Bdl train Anchor - वांगणी बदलापूर दरम्यान लोकल खाली दोन म्हशी अडकल्यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानची अप दिशेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईकडे जाणारी लोकल वांगणी बदलापूर दरम्यान गोरेगाव येथे खोळंबली होती. अकरा वाजून सात मिनिटांनी ही लोकल वांगणीहुन मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. त्याचवेळी काही म्हशी रेल्वे ट्रॅकवरून जात होत्या. यातील दोन म्हशी लोकल खाली सापडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सध्या या म्हशी बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते , अखेर रेल्वे प्रशासनाने या म अडकलेल्या म्हशी बाहेर काढल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली चंद्रशेखर भुयार  , बदलापूर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 10:52:56
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2409ZT_JALNA_VADI_LOSS(8 FILES) जालना | जालन्यातील वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी... अँकर: जालन्यातील वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली आहे. जालन्यात मागील काय दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाल. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळी बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार शिवारात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आता ते वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल होत पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिवाळी आधी मदत मिळेल असं आश्वासन दिलं. बाईट - दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 24, 2025 10:51:12
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2409ZT_CHP_UBT_PC ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात उबाठा शिवसेनेचे एकला चलो रे , मनपा- जि प. - पं.स। निवडणुकीसाठी आघाडी झाली तर उत्तम अन्यथा सर्व जागा लढणार, महाराष्ट्रात प्रथमच उबाठा शिवसेनेने अशा प्रकारे जाहीर केली आगामी निवडणुकांबाबत भूमिका अँकर:-- आगामी मनपा, जि. प. आणि पं. स. निवडणूकीत शिवसेना उबाठा ने जिल्हास्तरावर एकला चलो रे चा नारा दिला आहे.  मविआ शी प्राथमिक चर्चा झाली मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.  आघाडी झाली तर उत्तम मात्र आमची तयारी असल्याची भूमिका पुढे मांडण्यात आली आहे. पक्ष श्रेष्ठींनी निवडणूक असलेल्या ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून मनपा मध्ये उत्तम कामगिरी करू असा विश्वास उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.  मनसेशी युतीबाबत पक्षादेश जो असेल तो पाळून पुढे जाऊ असेही मत पदाधिकाऱ्यांनी मांडले. महाराष्ट्रात अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेत उभाठा शिवसेनेने प्रथमच निर्णय जाहीर केला आहे. बाईट १) संदीप गि-हे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 10:49:58
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2409ZT_JALNA_DHANGAR(11 FILES) जालना :ST प्रवर्गात आरक्षण द्या,धनगर समाजाचा जालन्यात विराट मोर्चा गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा अँकर : धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज जालन्यात धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.शहरातील गांधी चमन चौकातून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर धनगर आंदोलकांनी मोर्चात सहभागी होऊन ST प्रवर्गात आरक्षण मिळण्याची मागणी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.दरम्यान धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे बाईट :धनगर आंदोलक
2
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 24, 2025 10:49:00
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा झाला कैद anchor उल्हासनगर कॅम्प 4 मधील श्रीराम चौकाजवळील वसीटा कॉलनीमध्ये 70 वर्षीय काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसीटा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे . आरोपी अजय बागुल हा परिसरात नशेचे पदार्थ विकण्यासाठी येत असतो. मंगळवारी सायंकाळी वसीटा यांनी त्याला हटकले असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी अजय बागुल याने कमरेला असलेला कोयता काढून वसीटा यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वसीटा थोडक्यात बचावले.या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अजय बागुल विरोधात जीवेठार मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणी धमकावणे या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. Byte तुलसी वसीटा चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 24, 2025 10:45:59
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2409ZT_CHP_SUICIDE ( single file sent on 2C)  टायटल:-- डॉक्टर व्हायचे नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे १९ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या, एमबीबीएस प्रवेशाला निघण्याच्या दिवशी संपविले जीवन    अँकर:- नीट परीक्षेत यश मिळविल्यानंतरही डॉक्टर व्हायचे नसल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे घडली. अनुराग अनिल बोरकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने आपले जीवन संपविले. मृतक अनुराग बोरकर याने नीट यूजी २०२५ परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून १४७५ वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्येने हे स्वप्न अपूर्णच राहिले. त्याला आज एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतू राहते घरीच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक सुसाईड नोट मिळाल्याची माहिती दिली आहे. बाईट १) कांचन पांडे पोलीस निरीक्षक, सिंदेवाही आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 24, 2025 10:30:37
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदूरबार ला आदिवासींचा मोर्चाला हिंसक वळण मिळाले. यांच्यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आले असून, पोलीस अधिकारी सह कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेक मध्ये हे पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकानी जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आंदोलक आले होते. आंदोलकांना पागविण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रुव दूरच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहे. काही ठिकाणी दगडफेक सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आंदोलनात वीस ते बावीस हजार आंदोलन असण्याची शक्यता आहे. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सोबतच काही आंदोलकांना देखील इजा झाली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. 16 सप्टेंबर रोजी एका आदिवासी तरुणांच्या खून प्रकरणाचा निषेध आणि दोषंवर कठोर कारवाईचे मागणी करण्यासाठी या मोर्चाचा आयोजन करण्यात आला होता सकाळपासून नंदुरबार शहरांमध्ये सर्व आस्थापना 100% बंद आहेत असं असताना आक्रमक आंदोलकांनी वाहनाची तोडफोड करती देगडफेक केली. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 10:17:44
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2409ZT_JALNA_CROPLOSS_PKG(27 FILES) जालना :सगळं पीक कामातून गेलं आता खायचं काय.? शेतकरी दांपत्याचा सवाल ,के स्टडी अँकर : जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचं अतोनात नुकसान झालं आहे.लहान मोठे सगळेच शेतकरी या अतिवृष्टीमुळे भरडले गेलेत.जालन्यातील वाकूळणी गावात राहणाऱ्या एका दाम्पत्याचं साडेतीन एकरावरील सोयाबीन पीक अक्षरशः सडलंय.सगळं पीक सडलंय आता खायचं काय असा सवाल या दाम्पत्यानं केला आहे. व्हिओ:१:जालन्यातील वाकूळणी गावातील अवघड वयोवृद्ध दाम्पत्यावर या अवघड वयात शेतात येऊन गुडघाभर पाण्यात सडलेली सोयाबीन बघण्याची वेळ आलीय.गेल्या दोन दिवसांपूर्वी वाकूळणी गावात अतिवृष्टी झाली त्यामुळे बाबुराव अवघड आणि जिजाबाई अवघड यांच्या मालकीच्या साडेतीन एकरावरील सोयाबीन तीन फूट पाण्यात बुडालं.तीन दिवस सगळं सोयाबीन पीक पाण्यात होतं. आणि आधी 25 दिवस झालेला पाऊस यामुळे हे सगळं सोयाबीन सडलंय.त्यामुळे जिजाबाईच्या अश्रूंचा बांध फुटलाय.तर त्यांचे पती बाबुराव अवघड यांचेही डोळे पाणावले आहेत.यंदा पेरलेले सगळं सोयाबीन पीक वाया गेल्यानं आता खायचं काय असा सवाल जिजाबाईनी केलाय बाईट : जिजाबाई अवघड,शेतकरी महिला व्हिओ :2:अवघड दाम्पत्याकडे एकूण साडेतीन एकर शेतीय. या सर्व साडेतीन एकरातील सोयाबीन पीक पाणी साचून सडलंय. साडेतीन एकर सोयाबीनला पेरणीपासून आतापर्यंत त्यांचा एकरी 25 हजारांचा खर्च झालाय.म्हणजेच साडेतीन एकरावरील सोयाबीनसाठी त्यांचा 87 हजारांचा खर्च झाला.त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी बाबुराव अवघड यांनी केलीय. बाईट : बाबुराव अवघड,शेतकरी(चष्मा लावलेले) व्हिओ :३:या अतिवृष्टीनं अवघड दाम्पत्याचं केवळ सोयाबीनचंच नुकसान झालं नाही.तर वाकुळणी गावात झालेल्या अतिवृष्टीत अवघड दांपत्याचा 4 शेळ्यासह एक बोकुड वाहून जाऊन 50 हजारांचं नुकसान झालंय.अवघड दाम्पत्याच्या घराला चारही बाजूंनी तडे गेल्यानं घर कधीही कोसळण्याची शक्यताय. बाईट : सुरेश अवघड,अवघड दाम्पत्याचा पुतण्या व्हिओ :४:अवघड दाम्पत्याचं या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्यानं बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही अवघड दाम्पत्याला मदतीचं आश्वासन दिलंय. घराला तडे गेल्यानं 2 घरकुल तसेच शेळ्या वाहून गेल्यानं शेळ्यांचीही भरपाई देण्याचं आश्वासन कुचे यांनी दिलं. बाईट :नारायण कुचे व्हिओ :5:जालन्यातील वाकुळणीच्या अवघड दाम्पत्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी बाधित झालेत.आता या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 24, 2025 10:07:29
Kolhapur, Maharashtra:Story:- Sol CM Overall Anc Feed:- Live U Anc:- सोलापूर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. यानंतर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त ग्रामस्थ हैरान झाले. गेल्या पाच दिवसापासून अनेकांच्या घरातील पाणी पाठीमागे सरले नाही. त्यामुळे या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्ह्यातील निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या. सुरुवातीला मुख्यमंत्री माढामध्ये दाखल होताच प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून पूरस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री निमगाव मध्ये पोहोचले. त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून पूरग्रस्त भागाची पाहणी केली, ही पाहणी केल्यानंतर दलित वस्तीला भेट देत नुकसान ग्रस्त पूरग्रस्तांशी बातचीत केली. यानंतर ज्या दारफळ मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना एअरलिफ्ट केलं, त्या परिसराला भेट दिली. त्याचबरोबर सीना नदीच्या काठावरून पाहणी केली. यावेळी दारफळ गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना भूमिका मांडण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी दारफळ ग्रामस्थांशी संवाद साधत सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही असं आश्वासन दिले.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 24, 2025 10:06:10
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_RAIN_NUKSAN सातारा - सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव,माण आणि कोरेगाव तालुक्याला पावसाने झोडपून काढलं आहे.मे महिन्यापासून आज पर्यंत तुफान पाऊस झाला आहे.सप्टेंबर महिन्यात देखील सतत पडत असलेल्या पावसामुळे या भागातील शेतीचे नुकसान झाल आहे.अनेक शेतामध्ये तळ्यांचे स्वरूप आल आहे. घेवडा,सोयाबीन, मका,उडीद त्याच बरोबर ऊस पिकाचे देखील मोठे नुकसान झाल आहे. विओ - गेल्या तीन चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरेगाव तालुक्यातील साप गावातील विजय जाधव या शेतकऱ्याचा ऊसाला आणि घेवड्याचा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.आता तोंडाशी आलेले सोयाबीन गेल त्यानंतर त्यांनी घेवडा लावला तो देखील मुसळधार पावसाने कुजून गेलं आहे.त्याच बरोबर दोन एकरातील ऊस देखील झोपून गेला आहे.तर अनेक ठिकाणी ऊस उरमळून पडला आहे त्याच बरोबर शेतातील माती देखील वाहून गेली आहे.त्यामुळे खूप मोठं नुकसान या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. बाईट - 121 विजय जाधव शेतकरी प्रमोद कुंभार शेतकरी विओ 2- अद्याप या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 24, 2025 10:05:38
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2409ZT_CHP_NAMO_MISSION_1_2 ( 2 files sent on 2C)  टायटल:--चंद्रपुरात “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान”, मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिरांची सुरुवात अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या "स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाचा भाग म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम मनपा कार्यक्षेत्रातील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रात राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर पासुन आतापर्यंत 6 शिबिरे यशस्वीरीत्या संपन्न झाली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे "नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान" देखील चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रात दिनांक 24 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे. राज्यव्यापी विशेष आरोग्य अभियानाचा मुख्य उद्देश राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत डोळ्यांची तपासणी व योग्य उपचार उपलब्ध करून देणे आहे. ग्रामीण व शहरी गरीब लोकसंख्येत डोळ्यांच्या आजारांची योग्यवेळी तपासणी होत नाही, विशेषत: मोतीबिंदूसारखे आजार वेळेत लक्षात न आल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते. हीच गरज लक्षात घेऊन या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या समन्वयाने नेत्र तपासणी शिबिरे राबविण्यात येणार आहे. नेत्रतज्ञांद्वारे नेत्र रोगासंबंधी प्राथमिक तपासणी करण्यात येणार असुन पुढील निदान,उपचार व शस्त्रक्रियेसाठी नेत्र विभाग,सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे संदर्भीत करण्यात येणार आहे.  बाईट १) नयना उत्तरवार, आरोग्य अधिकारी, मनपा, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
Sept 24, 2025 09:54:09
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ : राज्य सरकारच्या २ सप्टेंबरच्या जीआरविरोधात २६ सप्टेंबर रोजी सेलिब्रेशन हॉल, यवतमाळ येथे ओबीसी जागृती परिषद पार पडली. श्री. गोरे यांनी या जीआरमुळे ओबीसींचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय हित धोक्यात आल्याचा आरोप केला. तसेच १० ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस माजी मंत्री विजयराव वेडेंटीवार, माणिकराव ठाकरे, खासदार संजय देशमुख, आमदार अभिजीत वंजारी, सुधाकर अडबले, बाळासाहेब मांगुळकर, संजय देरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष पाटील यांच्यासह विविध नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार पत्रकार परिषदेत डॉ. ज्ञानेश्वर गोरे, इंजि. प्रकाश जानकर, अनिल जिभकाटे, हरीश कुडे, माधवी पंचबुध्ये, विलास काळे, माया गोरे उपस्थित होते
3
comment0
Report
Sept 24, 2025 09:47:11
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ : महाराष्ट्र शासन आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना भाडेतत्त्वावर देण्यासाठी कायदा आणण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर येताच आदिवासी समाजात संताप उसळला आहे. आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत म्हटले की, “आदिवासींच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत गैरआदिवासींकडे जाणार नाहीत. प्रस्ताव तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.” निवेदनात FRA, PESA, पाचवी अनुसूची व महसूल संहितेचे दाखले देत शासनाचा प्रस्ताव घटनाविरोधी व अवैध असल्याचे नमूद करण्यात आले. आदिवासी काँग्रेसने शासनाकडे मागणी केली की, जमीन संरक्षणाच्या कायद्यांचे काटेकोर पालन व्हावे, ग्रामसभेची संमती बंधनकारक करावी आणि आदिवासी हक्क अबाधित राहतील याची हमी द्यावी.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 24, 2025 09:45:16
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_CaseStudy Feed on - 2C ------------------------- Anchor - हे आहेत नांदेड जिल्ह्यातील वांगी या गावचे शेतकरी बालाजी सपुरे. गोदावरी नदिकाठी त्यांची शेती आहे. पाऊस आणि नदीच्या भरवश्यावर त्यांनी आपल्या शेतात यंदा सोयाबीन आणि उसाची लागवड केली होती. सात एकर साठी त्यांना जवळपास दोन लाखाचा खर्च आला. पण पावसाने आणि नदीच्या पुराने होत्याचे नव्हते केले. गेल्या तीन दिवसापासून गोदावरी नदीला मोठा पुर आलाय. सपुरे यांचे पूर्ण शेतच पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि उसाचे पीक करपून गेले आहे. काही दिवसात पीक काढणीला येणार होते. मिळणाऱ्या पैश्यातून त्यांनी अनेक स्वप्न रंगवले होते. पण पुराच्या पाण्याने त्यांच्या सगळ्या स्वप्नावर पाणी फेरले. Byte - बालाजी सपुरे ----------------------------------
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 24, 2025 09:33:43
Kolhapur, Maharashtra:Sol CM Doura Feed:- WhatsApp Anc:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील निमगाव आणि दारफळ गावातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जावे लागले. निमगाव येथे दलित वस्तीमध्ये पूर परिस्थितीची पाहणी करत असताना ग्रामस्थांनी डॉ. आंबेडकरांचा विजय असो अशा जोरदार घोषणा दिल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसमोर पूर परिस्थितीच्या काळात आलेला अनुभव कथन केला. दलित वस्तीकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली. मुख्यमंत्र्यांनी या आक्रमक कार्यकर्त्यांशी बातचीत करून आपले प्रश्न सोडवले जातील असा आश्वासन दिले. Byte:- दलित वस्ती मधील पूरग्रस्त बांधव Byte:- दलित वस्ती मधील पूरग्रस्त महिला
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top