Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

आदिवासी जमिनीवर शासनाचा डाव? – आदिवासी काँग्रेसचा इशारा

Sept 24, 2025 09:47:11
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ : महाराष्ट्र शासन आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना भाडेतत्त्वावर देण्यासाठी कायदा आणण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर येताच आदिवासी समाजात संताप उसळला आहे. आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत म्हटले की, “आदिवासींच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत गैरआदिवासींकडे जाणार नाहीत. प्रस्ताव तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.” निवेदनात FRA, PESA, पाचवी अनुसूची व महसूल संहितेचे दाखले देत शासनाचा प्रस्ताव घटनाविरोधी व अवैध असल्याचे नमूद करण्यात आले. आदिवासी काँग्रेसने शासनाकडे मागणी केली की, जमीन संरक्षणाच्या कायद्यांचे काटेकोर पालन व्हावे, ग्रामसभेची संमती बंधनकारक करावी आणि आदिवासी हक्क अबाधित राहतील याची हमी द्यावी.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Sept 24, 2025 12:53:26
Baramati, Maharashtra: JAVEDMULANI SLUG 2409ZT_INDAPURMANGUR FILE 2 इंदापुर तालुक्यातील कालठण गावात बंदी घातलेल्या मांगुर माशांची बेकायदेशीर वाहतूक.. अक्षय पाडुळे यांच्यावर गुन्हा दाखल... Anchor—पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील कालठण गावात पर्यावरणास घातक ठरलेल्या व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने प्रतिबंधित केलेल्या मांगुर माशांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी अक्षय राजेंद्र पाडुळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काळभैरवनाथ मंदिर परिसरात ट्रॅक्टर–ट्रॉलीतून हे मासे वाहतूक करताना तो रंगेहात सापडला. याआधीही मत्स्य विभागाकडून लेखी सूचना देऊनही त्याने आदेश मोडले. त्यामुळे इंदापुर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. अन्न सुरक्षा कायदा व पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 24, 2025 12:52:10
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 24, 2025 12:52:00
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 2409ZT_DAUNDKADU BYTE 1 कानगावमध्ये कांद्याच्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनात *माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला.* ANCHOR:&— कांद्याला प्रति किलो ३५ रुपये हमीभाव व संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे दौंड तालुक्यातील कानगाव येथे धरण आंदोलन सुरू आहे. काल आंदोलनकर्त्यांनी अर्धं नग्न होऊन शासनाच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त केला. यादरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे आंदोलकांचे अभिनंदन केले व आंदोलन राज्यव्यापी होईल याची आशा व्यक्त केली. तसेच २८ ऑक्टोबर रोजी संपूर्ण कर्जमाफीसाठी इंदापूरच्या दिशेने जाण्याचे आवाहन करून त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला...
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 24, 2025 12:51:16
Hingoli, Maharashtra:अँकर- सततच्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे,यंदा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती केली जात आहे, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची स्वप्न बेचिराख झाली आहेत.. चिखलात आपले स्वप्न शोधत असलेले हे आहेत हिंगोलीच्या मेथा येथील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल ग्यानबाराव लोंढे,त्यांच्याकडे 5 एक्कर शेती असून यावर्षी त्यांनी यंदा त्यांच्या शेतात कापूस,सोयाबीन आणि तुरीचे पीक घेतले होते,पीक ही चांगले आले होते, पण यंदा त्यांच्या शेतातून ओढ्याचे दहा पूर गेले,त्यामुळे त्यांच्या शेतात आता सोयाबीनचा चिखोल झालाय,कपाशीची झाडे मोडून पडलीयेत,तर तूर जळून गेलीय,यासाठी त्यांनी एक्करी 35 हजार रुपयांचा खर्च केला आहे,दीड लाख रुपये शेतीत टाकल्यावर त्यांच्या नशिबी आलाय तो दोन दोन फूट चिखोल... बाईट- विठ्ठल लोंढे - शेतकरी व्हीओ- ही परिस्थिती काय एकट्या लोंढे यांची नाहीये,तर सरसगट शेतकर्यांची हीच समतुल्य परिस्थिती आहे. हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी वार्षिक सरासरी 795 मिमी एवढा पाऊस पडतो, पण यंदा वार्षिक सरासरीच्या पुढे जाऊन 865 मिलिमीटर एवढा म्हणजे 114 टक्के एवढा पाऊस झालाय, आवक मंडळात तर चार चार वेळा अतिवृष्टीची नोंद झालीय,पाऊस असा काही पडतोय की तासाभरात जिकडं तिकडं होऊन जातं आहे. शिवाय एलदरी, ईसापूर, आणि सिद्धेश्वर धरणातून सतत नद्यांमध्ये विसर्ग सुरू असल्याने नदी ओढ्या काठची पीक नष्ट झालीयेत. आता पर्यंत पूर परिस्थिती आणि विजापडुन 8 जणांचा मृत्यू झालाय. शिवाय 2 लाख 71 हजार हेक्टर वरील पीक उद्ध्वस्त झाली आहेत. अस सगळं होत असताना पीक विम्याचा ही लाभ मिळणार नसल्याने शेतकरी धर्म संकटात सापडले आहेत. पिकांची आणेवारीवर पीक विम्याचा नवीन नियम केला गेलाय,शेतकरी म्हणतायत,जर आमच्या शेतात पिकच राहणार नसतील तर मग आणेवारी कशाची आणि कशी काढणार,त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज पीक विम्याच्या हिंगोली येथील कार्यालयात तोडफोड केले, बाईट- नामदेव पतंगे- शेतकरी नेते व्हीओ- जर एवढं नुकसान होऊन ही शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडत नसेल तर मग अश्या विमा कवचाची खरच शेतकऱ्यांना गरज आहे का याचा मायबाप सारकारने विचार केला पाहिजेत, ठीक ठीक मोर्चे आंदोलन काढून आता शेतकरी ओला दुष्काळाची मागणी करू लागेल आहेत,त्यामुळे सरकार आता निर्णय घ्याच अशी आर्त हाक विठ्ठल लोंढे यांच्या प्रमाणे लाखो शेतकरी घालीत आहेत... गजानन देशमुख,झी मीडिया,हिंगोली
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 24, 2025 12:49:07
Gadchiroli, Maharashtra:Feed slug :--- 2409ZT_GAD_6_SURRENDER ( single file sent on 2C)  टायटल:-- 06 जहाल वरिष्ठ नक्षल्यानी केले पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण, जहाल नक्षली, डिव्हीसीएम भिमन्ना  कुळमेथे आणि त्याची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिचेसह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील नक्षल्यांचा समावेश, महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 62 लाख रुपयांचे बक्षिस, गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 40 नक्षल्यानी केले आत्मसमर्पण      अँकर:-- 06 जहाल वरिष्ठ नक्षल्यानी  पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या समोर गडचिरोली पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केले. जहाल नक्षली, डिव्हीसीएम भिमन्ना  कुळमेथे आणि त्याची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिचेसह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील नक्षल्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे  एकुण 62 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 40 नक्षल्यानी आत्मसमर्पण केले आहे.   1) भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टिम) वय 58 वर्षे, रा. करंचा ता. अहेरी, जि. गडचिरोली,  2) विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक, (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टिम इंचार्ज), वय 56 वर्ष, रा. मांड्रा, ता. अहेरी, जि. गडचिरोली,  3) कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी, (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम), वय 34 वर्षे, रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली,  4) नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र. 10), वय 39 वर्षे रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.),  5) समीर आयतू पोटाम, (पिपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टिम), वय 24 वर्षे, रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.),  6) नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी, (एसीएम, अहेरी दलम), वय 28 वर्षे, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली  अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्याची नावे आहेत.   रश्मि शुक्ला यांच्या भेटीदरम्यान त्यांनी मागील काही दिवसात  मौजा कवंडे , मौजा कोपर्शी-फुलनार , मौजा मोडस्के जंगल या तिनही अभियानात सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा सत्कार केला.  नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे भेट देऊन त्यांनी पोस्टे कवंडे येथील जवानांच्या अभियानाच्या तयारीची पाहणी केली. तसेच पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ व सी-60 च्या जवानांसोबत संवाद साधला व अशा प्रतिकुल अतिसंवेदनशिल ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापना व त्याच्या संरक्षणाबद्दल केलेल्या प्रयत्नांसाठी जवानांची प्रशंसा केली.           बाईट १) रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 24, 2025 12:48:31
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 2409ZT_INDAPURFISH BYTE 1 इंदापूरच्या भिगवणमध्ये अतिवृष्टीमुळे तालावातील मासे होड्या व जाळे नष्ट.. मच्छिमार संस्थांनी सरकारकडे नुकसानभरपाई मागणी केली... ANCHOR :— यंदाच्या मे व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तलावातील मासे सोडलेले मत्स्यबीज होड्या व जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी मच्छिमार संस्थांनी सरकारकडे भरपाईची मागणी केली असून नुकतेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले. भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, अतिवृष्टीचे पंचनामे महसूल विभागाकडे दाखल असून नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येईल.. अशी माहिती अर्चना शिंदे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग पुणे यांनी दिली.... बाईट— अर्चना शिंदे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग पुणे..
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 24, 2025 12:17:38
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_RiverDrone Feed on - 2C ----------------------------- Anchor - धारणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आलाय. 27 दरवाजे उघडून जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नांदेड मधील विष्णुपुरी प्रकल्पापर्यंतच्या सर्वच धरणाचे दरवाजे उघडन्यात आले आहेत. वरच्या भागातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीत मोठया प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी नांदेड मध्ये गोदावरी नदीला पूर आलाय. पात्राबाहेर जाऊन पुराचे नदी काठच्या शेतात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. नदी काठी असलेल्या काही नागरी वसाहतीत देखील पाणी शिरले आहे. गोदावरी नदीच्या पुराचे हे ड्रोन कॅमेऱ्यातील दृश्य. ---------------------------
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 24, 2025 12:06:28
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Drowning Feed on - 2C ----------------------------- Anchor - पुराच्या पाण्यात बुडत असलेल्या आपल्या घरातून सामान काढण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेड शहरातील दुल्हेशाह रहमान नगर येथे आज सकाळी ही घटना घडली. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड शहरातील सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. दुल्हेशाह रहमान नगर या भागात आज सकाळी चार ते पाच फूट पाणी साचले होते. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मिन्हाज खान घरातील सामान बाहेर काढत होता. मात्र पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेच्या वेळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. पंधरा-वीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर मिन्हाजचा मृतदेह सापडला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पुर वाढत असताना प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी केली नाही. शिवाय प्रभावित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नाही. --------------------------------
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 24, 2025 12:03:30
Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* महाराष्ट्र विषयी यांच्या मनात जो द्वेष आहे तो संकट काळामध्ये देखील दिसतो... दहा हजार कोटीची मागणी तत्काळ द्यावी हे उद्धव ठाकरे यांनी सांगितला आहे गुजरातला वाऱ्याने शिंक जरी आली प्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा लष्कराचा विमान घेऊन तत्काळ जातात विमानातूनच पाच पंचवीस हजार कोटीची मदत जाहीर करतात तुफान कुठेही असला तरी गुजरातला पहिली मदत जाहीर करतात मराठवाड्याचा अनेक भाग पाण्यात वाहून गेला आहे पंधरा लोक मरण पावली आहेत पीक नाहीतर शेत जमीन ही वाहून गेली आहे तरी केंद्राच्या काही नेत्याला इथे यावं आणि परिस्थिती बाबत मदत देता येईल का ते पाहावं याची चिंता वाटत नाही याचा अर्थ महाराष्ट्राचे नेतृत्वाचे पाणी त्यांनी चोखले आहे स्वतःच्या फोटोचे बॉक्स घेऊन मदत केला जातात... ३६ लाख शेतकरी ग्रस्त झाला आहे... हे दोन-चार टेम्पो घेऊन काय करणार आहे याला लाजा वाटल्या पाहिजेत आपण राजाचे उपमुख्यमंत्री आहात मंत्री आहात आपल्याला हे शोभत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्राला इंटरेस्ट यासाठी आहे का त्यांना मुंबई उठायची आहे गौतमदाणीच्या मुंबईचा तुर आला असता आणि संकट आलं असतं तर ते आले असते अंबानी अडाणी चे प्रॉपर्टीचा वाहून गेली असती तर कदाचित त्यांना दिल्लीत दुःख झालं असतं पण आमचा गरीब शेतकरी मेला तर जमिनीत अदारीला इंटरेस्ट नाही किती २२२१ रुपये? 36 लाख रुपये शेतकरी म्हणजे त्यांचे कुटुंब... पशुधन शेत वाहून गेला त्याचं काय करणार *पंकजा मुंडे* कृषी मंत्रांना अडवले आहे पर्यावरण, ग्राम विकास मंत्री यांना अडवले आहे ... अजून काही केलं ...त्यांना उदवस्थ शेतकरी यांनी अजून काही केलं तरी वेगळे वाटणार नाही इतका संताप शेतकरी यांच्यात आहे. वोट चोरी च्या माध्यमातून यांचे आमदार निवडून दिले आहेत... byte -- संजय राऊत मनोज कुळकर्णी feed send OB slug -- Shivasena Bhavan sanjay raut byte
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:55:23
Nashik, Maharashtra: Anchor - नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरनंतर वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील पार्किंग व्यवस्थेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. रोपवे पार्किंगवर पत्रकारांनाच नव्हे तर सर्वसामान्य भाविकांनाही अवाजवी पैसे आकारले जात असल्याचे समोर आले. दिल्या जाणाऱ्या पावतीवर ना कंपनीचे नाव आहे, ना रजिस्ट्रेशन नंबर, इतकेच नव्हे तर किती रक्कम घेतली याची माहितीही नसल्याचे दिसून आले. आज टीव्ही 9 चे पत्रकार मनोहर शेवाळे, लोकशाही न्यूजचे विशाल मोरे, पुढारी न्यूजचे प्रदीप पाटील यांना देखील या अरेरावीचा अनुभव आला. त्र्यंबकेश्वरनंतर आता सप्तश्रृंगी गडावरील पार्किंग कर्मचाऱ्यांचीही उद्धट वागणूक समोर आली आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांवरील अशा बेकायदेशीर पार्किंग आणि कर्मचाऱ्यांच्या अरेरावीवर तातडीने अंकुश आणण्याची मागणी होत आहे.
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:53:21
Nashik, Maharashtra:Nashik breaking - *नाशिकच्या वडनेर गेट परिसरात चिमुकल्याचा मृतदेह आढळला काल संध्याकाळी करण्यात आला होता पुन्हा बिबट्याचा एका लहान मुलावर हल्ला* - *वडिलांसोबत घराबाहेर खेळत असताना बिबट्याने दोन वर्षीय श्रुतीक वर हल्ला करत नेले होते उचलून* - लहान मुलावर बिबट्याने हल्ला करत उचुलन नेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश - वडिलांसमोर बिबट्याने या लहान मुलाला उचलून नेल्याने परिसरात होते भीतीचे वातावरण - रात्री उशिरापर्यंत श्रुतीक चे शोध वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक घेत होते - श्रुतीकचे वडील आर्मी मध्ये कार्यरत आहेत त्यामुळे आर्मीचे जवान देखील रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम करत होते - या आधी देखील या परिसरात लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करत नेले आहे उचलून
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:50:12
Nashik, Maharashtra:Nashik break - नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गावगुंडांचा हैदोस - *कोयत्याने एकावर केला हल्ला तर कोयता नाचवत केला सेल्फी व्हिडिओ* - देवळाली परिसरात कोयता गॅंगने दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - संतोष जाधव यांना रस्त्यात थांबवत केली पैशाची मागणी; पैसे देण्यास नकार दिल्याने गावगुंडांनी केला कोयत्याने हल्ला - संतोष जाधव यांच्या खिशातील 3600 रुपये बळजबरीने काढत केली मारहाण - संतोष जाधव यांच्यावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात उपचार सुरू - संशयित योगेश जाधव, ऋषिकेश लोखंडे, यश मोरे यांचा विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - भर रस्त्यात कोयता नाचवत मारहाण केल्याने नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण - नाशिक पोलिसांचा धाक राहिला नसल्याची नागरिकांची ओरड
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:45:16
Nashik, Maharashtra: Anchor - हैद्राबाद गॅझेटियर नुसार एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज हुतात्मा चौक ते नवीन तहसील कार्यालय, नांदगाव येथे सकल बंजारा समाजाकडून विराट मोर्चा काढण्यात आला..या मोर्चात बंजारा समाजाचा पारंपरिक पेहराव घालून मोठ्या संख्येने महिला तर हातात सफेद झेंडे घेऊन तरुणाई देखील मोठ्या संख्येने सहभागी झाली.. तहसील कार्यालय परिसरात सभेचे आयोजन करण्यात येऊन बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली..दरम्यान, आरक्षण न मिळाल्यास आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबई, मंत्रालय व दिल्लीत धडक मारण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आला..
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top