Back
जालना की अतिवृष्टी: सोयाबीन डूब कर बर्बाद, दाम्पत्य बदहाल
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 10:17:44
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2409ZT_JALNA_CROPLOSS_PKG(27 FILES)
जालना :सगळं पीक कामातून गेलं आता खायचं काय.? शेतकरी दांपत्याचा सवाल ,के स्टडी
अँकर : जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचं अतोनात नुकसान झालं आहे.लहान मोठे सगळेच शेतकरी या अतिवृष्टीमुळे भरडले गेलेत.जालन्यातील वाकूळणी गावात राहणाऱ्या एका दाम्पत्याचं साडेतीन एकरावरील सोयाबीन पीक अक्षरशः सडलंय.सगळं पीक सडलंय आता खायचं काय असा सवाल या दाम्पत्यानं केला आहे.
व्हिओ:१:जालन्यातील वाकूळणी गावातील अवघड वयोवृद्ध दाम्पत्यावर या अवघड वयात शेतात येऊन गुडघाभर पाण्यात सडलेली सोयाबीन बघण्याची वेळ आलीय.गेल्या दोन दिवसांपूर्वी वाकूळणी गावात अतिवृष्टी झाली त्यामुळे बाबुराव अवघड आणि जिजाबाई अवघड यांच्या मालकीच्या साडेतीन एकरावरील सोयाबीन तीन फूट पाण्यात बुडालं.तीन दिवस सगळं सोयाबीन पीक पाण्यात होतं. आणि आधी 25 दिवस झालेला पाऊस यामुळे हे सगळं सोयाबीन सडलंय.त्यामुळे जिजाबाईच्या अश्रूंचा बांध फुटलाय.तर त्यांचे पती बाबुराव अवघड यांचेही डोळे पाणावले आहेत.यंदा पेरलेले सगळं सोयाबीन पीक वाया गेल्यानं आता खायचं काय असा सवाल जिजाबाईनी केलाय
बाईट : जिजाबाई अवघड,शेतकरी महिला
व्हिओ :2:अवघड दाम्पत्याकडे एकूण साडेतीन एकर शेतीय. या सर्व साडेतीन एकरातील सोयाबीन पीक पाणी साचून सडलंय. साडेतीन एकर सोयाबीनला पेरणीपासून आतापर्यंत त्यांचा एकरी 25 हजारांचा खर्च झालाय.म्हणजेच साडेतीन एकरावरील सोयाबीनसाठी त्यांचा 87 हजारांचा खर्च झाला.त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी बाबुराव अवघड यांनी केलीय.
बाईट : बाबुराव अवघड,शेतकरी(चष्मा लावलेले)
व्हिओ :३:या अतिवृष्टीनं अवघड दाम्पत्याचं केवळ सोयाबीनचंच नुकसान झालं नाही.तर वाकुळणी गावात झालेल्या अतिवृष्टीत अवघड दांपत्याचा 4 शेळ्यासह एक बोकुड वाहून जाऊन 50 हजारांचं नुकसान झालंय.अवघड दाम्पत्याच्या घराला चारही बाजूंनी तडे गेल्यानं घर कधीही कोसळण्याची शक्यताय.
बाईट : सुरेश अवघड,अवघड दाम्पत्याचा पुतण्या
व्हिओ :४:अवघड दाम्पत्याचं या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्यानं बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही अवघड दाम्पत्याला मदतीचं आश्वासन दिलंय. घराला तडे गेल्यानं 2 घरकुल तसेच शेळ्या वाहून गेल्यानं शेळ्यांचीही भरपाई देण्याचं आश्वासन कुचे यांनी दिलं.
बाईट :नारायण कुचे
व्हिओ :5:जालन्यातील वाकुळणीच्या अवघड दाम्पत्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी बाधित झालेत.आता या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 24, 2025 12:49:070
Report
JMJAVED MULANI
FollowSept 24, 2025 12:48:310
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 24, 2025 12:17:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 24, 2025 12:15:270
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 24, 2025 12:06:282
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 24, 2025 12:03:300
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 24, 2025 11:55:231
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 24, 2025 11:53:210
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 24, 2025 11:50:120
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 24, 2025 11:48:000
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 24, 2025 11:45:160
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 24, 2025 11:40:060
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 24, 2025 11:38:490
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 24, 2025 11:35:430
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 24, 2025 11:32:240
Report