Back
बाळासाहेब थोरात: महाराष्ट्रात गुंडगिरीचा राजकारणात प्रवेश!
KJKunal Jamdade
FollowJul 18, 2025 08:01:16
Shirdi, Maharashtra
Sangmner News Flash
*काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट पॉइंटर*
महाराष्ट्रात जे घडत आहे ते दुर्देवी..
हत्या, हल्ले यासारख्या अनेक घटना घडल्या आहेत..
कालचा विधानभवनातील प्रकार दहशत निर्माण करण्याचा प्रकार..
गुंडाना आणि वाचाळवीरांना अनिर्बंध मुभा भाजपने दिलीय..
जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजिरवाणे..
आता तर गुंड थेट विधानभवनात येऊन मारहाण करतात..
अन्याय करणाऱ्याला सौरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा..
ही लोकशाहीची अधोगती..
ऑन महायुती सरकार
धर्माच नाव घेऊन राजकारण करण्याचा सोपा फंडा..
अनेक आश्वासन सरकारने दिली..
लाडक्या बहिणींना 2100 देण्या ऐवजी त्यांची संख्या कमी करण्यावर लक्ष..
शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील उभ राहण्यात हलगर्जीपणा सुरू आहे..
आता जनतेने याबाबत आवाज उठवला पाहिजे...
bite - बाळासाहेब थोरात , काँग्रेस नेते
3
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowJul 18, 2025 12:38:44Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1807ZT_TATKARE_JALNA(1 FILE)
जालना : विधिमंडळ आवारात झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
सुनील तटकरे यांची मागणी
ठराविक लोकप्रतिनिधींकडून घडलेल्या घटना दुर्दैवी
लोकांमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनीधींनी सुसंवादाने वागावे अशी जनतेची अपेक्षा आहे असं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.
अँकर : विधिमंडळ आवारात काल झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते.विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतीमार्फत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केल्याचं देखील तटकरे यांनी नमूद केलंय.ठराविक लोकप्रतिनीधींकडून घडलेल्या घटना या दुर्दैवी असल्याचं देखील तटकरे म्हणालेत.
बाईट : सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 12:38:02Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_GAD_JANSURAKSHA
( single file sent on 2C)
टायटल:-- महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या जनसुरक्षा कायद्याची गडचिरोली काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होळी, हे जनसुरक्षा विधेयक विरोधकांचे दमन करण्यासाठी आणले असल्याचा काँग्रेसचा दावा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन
अँकर:-- महाराष्ट्र सरकारने अर्बन नक्षल निर्मूलनासाठी आणलेले जनसुरक्षा विधेयक व त्यातील तरतुदीबाबत काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले आहे. गडचिरोलीत या जनसुरक्षा विधेयकाची काँग्रेसने आज होळी केली. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयापुढे नारेबाजी करत काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. हे जनसुरक्षा विधेयक विरोधकांचे दमन करण्यासाठी आणले असल्याचा दावा काँग्रेसने केला. या विधेयका विरोधात सातत्याने लढा देण्याचा संकल्पही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला.
बाईट १) महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 18, 2025 12:37:30Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण निर्णयाचं शहरवासियांकडुन स्वागत...
अँकर - सांगलीच्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं इस्लामपूर मध्ये स्वागत करण्यात आले आहे.इस्लामपुरच्या ईश्वरापूर नामांतराच्या निर्णयाचा इस्लामपूरकर नागरिकांच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.
बाईट - भगतसिंह पाटील - नागरिक -इस्लामपूर.
बाईट - पै.संग्राम जाधव -नागरिक -इस्लामपूर.
बाईट - प्रवीण परिट - नागरिक -इस्लामपूर.
बाईट - शिवाजी खोत - नागरिक -इस्लामपूर.
बाईट - जगदीश पाटील - वकील,नागरिक -इस्लामपूर.
0
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 18, 2025 12:37:13Kolhapur, Maharashtra:
Kop Triboli Yatra
Feed :- 2C
Anc - कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी मोठा उत्साह अनेक मंडळांमध्ये पाहायला मिळत असतो... जत्रेनिमित्त बकऱ्यांचा बळी देऊन यात्रा साजरी केली जाते. विशेष म्हणजे मंडळाच्या सर्वच सदस्यांना मटणाचे समान वाटे त्यांच्या घरी जाऊन वाटले जातात.. अशाच एका मटणाच्या वाट्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरातल्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये आशा पद्धतीने ही जत्रा साजरी करण्याची प्रथा आहे. आजही इथल्या नागरिकांनी ती परंपरा जपली आहे... मटणाच्या या वाट्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे...
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 18, 2025 12:30:39Shirdi, Maharashtra:
Rahta News Flash
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार येथे अपघात..
आयशर गाडीने सायकलस्वाराला उडवले...
गाडीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू...
राहाता तालुक्यातील कोल्हार गावातील घटना..
अपघातात सलीमभाई पेरूवाले यांचा दूर्दैवाने मृत्यू...
अपघातानंतर पळून जाणा-या वाहनाला गावक-यांनी पकडले...
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी...
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 12:09:55Akola, Maharashtra:
Anchor - अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव-डोणगाव मार्गालगतच्या वसाली बीटमधील वनक्षेत्रात गुरे चारणाऱ्या गुराख्याला अर्धवट पुरलेला मृतदेह दिसून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुराख्याने तात्काळ स्थानिक पोलीस पाटलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत हे ठिकाण चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चान्नीचे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक पाहणीत मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहावर निळ्या रंगाची जीन्स पॅण्ट, कमरेला पट्टा, डोक्यावर लांब केस, तसेच हातात पांढऱ्या कड्या असल्याचे आढळले. त्यामुळे मृत व्यक्ती महिला असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले होते. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी घटनास्थळाजवळील मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले असून, संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. मृतदेह ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी हत्या होऊन मृतदेह गाडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, गुन्हा इतरत्र घडून मृतदेह येथे फेकण्यात आला की घटनास्थळीच गुन्हा घडला, याबाबत तपास सुरु आहे.
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 12:07:43Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_GAD_CONG_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई ,काँग्रेसने लक्ष वेधण्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर केले घंटा नाद आंदोलन
अँकर:-- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई भासत आहे. यामुळे ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांवर संकट ओढविले आहे. याशिवाय खत बी बियाणे यांच्यामध्ये भेसळ, लिंकिंग औषधे घेण्याची बळजबरी व ताज्या अतिवृष्टीचे पंचनामे व नुकसान भरपाई चा प्रश्न या सर्वांसंदर्भात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामुळे काँग्रेसने आज घंटानाद आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने दूर करा अन्यथा या पुढच्या काळात गुराढोरांसह कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करू असा इशाराही काँग्रेसने दिला.
बाईट १) महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 18, 2025 12:02:45Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण निर्णयाचं सकल हिंदू समाजाच्यावतीने जल्लोषात स्वागत..
अँकर - सांगलीच्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं इस्लामपूर मध्ये स्वागत करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारच्या निर्णयाचा जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. फटाक्यांची अतिषबाजी आणि साखर वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करावं,अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांकडून करण्यात आली होती,यावर अधिवेशनामध्ये राज्य सरकारने इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात असल्याची घोषणा केली आहे,यावरून इस्लामपूर मध्ये ईश्वरपूर नामांतराच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. इस्लामपूर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे.
बाईट - प्रवीण परीट - इस्लामपूर - सांगली
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 18, 2025 11:33:38kolhapur, Maharashtra:
2c को बाईट attach किया है
--------
बाईट --ब्रिगेडियर विद्याधर गोळे, डिफेन्स एक्स्पर्ट
---मेरा स्पष्ट मानना है.. किसी भी क्षेत्र मे.. निजी यां टीम, देश के स्तर पर किसी पाकिस्तानी को अपने बराबर का दर्जा देना यह आतंकवादी को अपने बराबर का दर्जा देने के समान है.. यह कभी करना नहीं चाहिए
2
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 11:10:06Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KUSGAON
सातारा - वाई तालुक्यातील कुसगाव येथील ब्लॅक जेम स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या लॉंग मार्चला थांबवण्यासाठी तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हाधिकारी रजेवर असल्यामुळे सोमवारी चर्चा होईल, तोपर्यंत क्रशरवरील सर्व प्रक्रिया थांबवण्याचे लेखी आश्वासन देण्याचे सांगितले.आंदोलनकर्त्यांनी यावर लेखी पत्राची मागणी केली. मात्र तहसीलदारांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या पत्रात फक्त जिल्हाधिकारी सोबतच्या बैठकीचा उल्लेख होता; क्रशरवरील प्रक्रिया थांबवण्याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. हे लक्षात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली आणि लॉंग मार्च सुरू ठेवला.या प्रकारामुळे तहसीलदारांची भूमिका संशयास्पद ठरत असून, आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांची फसवणूक सुरू असतानाच, क्रशरवर उत्खनन सुरुच असल्याने संताप वाढत आहे.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 11:00:42Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_RAJE_BYTE
*उदयनराजे बाईट पॉईंटर*
आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर उदयनराजेंनी असा वाद होऊ नाही असं मत व्यक्त करून हा वाद कोणामुळे झाला कोणी केला यापेक्षा लोक तुम्हाला निवडून देतात त्यांच्या अपेक्षा असतात. लोकप्रतिनिधींकडून कामे झाले पाहिजेत. अशा फालतुगिरी बाजूला ठेवून या लोकांनी विकास कामावर जोर दिला पाहिजे... कोणाची चूक आहे याच्यापेक्षा हे घडलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चुकीची मांडणी करत असल्याचे उदयनराजे म्हणाले
बाईट- उदयनराजे भोसले
मी उदयनराजे भोसले बोलतोय असे सांगून आमिर खान यांची फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील अली अमानत शेख या अज्ञात व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी "आमिर खान माझे चांगले मित्र आहेत कोणीही असं वागू नये. जर वागत असतील तर या मागचा हेतू नेमका काय आहे.. हे पोलीस तपासामध्ये समोर येणे गरजेचे आहे. एखादं कर्तुत्व बनवायला वेळ लागतो. जे कोणी माझ्या नावाचा गैरवापर करत असतील त्यांना शासन झालं पाहिजे. असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलंय
बाईट -उदयनराजे भोसले
आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन बसाव अशी माझी मनापासून इच्छा असल्याचे स्पष्ट करत हा निर्णय मी एकटा घेणार नाही. स्थानिक पातळीवर राजकारण आणू नये. मी कधी आयुष्यात राजकारण केलेले नाही.मी जास्तीत जास्त लोकांची सेवा केली आहे. राजकारण करायला अक्कल लागत नाही. नगरपालिकेच्या साठी मनोमिलन झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे. पण सध्या शिवेंद्रराजे बिझी आहेत कारण ते मिनिस्टर आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी उदयनराजेंनी दिली
बाईट - उदयनराजे भोसले
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 18, 2025 10:42:48kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे
------
नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शेकडो परिचारिका आज पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे... काल परिचारिकांकडून एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आले होते.. आज पासून मात्र बेमुद्दत संपाला सुरवात झाली आहे. एक दिवसीय लाक्षणिक संप करून ही प्रशासनाने मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे परिचारिकांनी आजपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू केला आहे.. सातव्या वेतन आयोगमधील वेतन त्रुटी दूर करावी अशी परिचारिकांनी प्रमुख मागणी आहे.. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी विविध सोयी बद्दलच्या मागण्या ही आहेत.. त्यामुळे परिचारिकांकडून संप करण्यात आला आहे.. नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच जीएमसी याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालय या तीन रुग्णालयातील शेकडो परिचारिका संपावर गेल्यामुळे तीनही रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे... काल लाक्षणिक संपाच्या दिवशीही होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या अर्धी झाली होती.. त्यामुळे बेमुदत संपाच्या काळात सर्वसामान्य रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो...
----------------
Byte - नूतन बांते
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 10:41:10Pandharpur, Maharashtra:
18072025
slug - PPR_MANDAP_HOUSE
feed on 2c
file 01
------
Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दर्शन रांग टेंडर घोटाळ्याचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. आर्थिक देवाणघेवाण ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली तरीही मंदिर समिती कडून फक्त तक्रार आली नाही या कारणावरून कोणतीही कारवाई केली जात नाही असा मुद्दा उपस्थित केला
-----
sound clip - आमदार अभिजीत पाटील
2
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 10:40:58Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KAAS
सातारा - सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेवक आणि महिला पदाधिकारी यांच्या हस्ते आज कास तलावाचे ओटी भरण करण्यात आले.या कास तलावाची उंची सातारा नगरपालिकेच्या वतीने वाढविण्यात आली आहे त्यामुळे याची पाणी पातळी देखील वाढली आहे.जून महिन्यातच हा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 18, 2025 10:40:38Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1807_BHA_RAIN
FILE - 3
भंडाऱ्यात पुन्हा पावसाची हजेरी..... शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात आठवडाभरा आधी दमदार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आता भंडारा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात रोवणीच्या कामाला लागला असल्याने पावसाची आवश्यकता होती आणि अशा दमदार पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीवर्ग सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
Share
Report