Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

नागपुरातील परिचारिकांनी बेमुदत संप सुरू केला, आरोग्य व्यवस्थेवर संकट!

AKAMAR KANE
Jul 18, 2025 10:42:48
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे ------ नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शेकडो परिचारिका आज पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे... काल परिचारिकांकडून एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आले होते.. आज पासून मात्र बेमुद्दत संपाला सुरवात झाली आहे. एक दिवसीय लाक्षणिक संप करून ही प्रशासनाने मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे परिचारिकांनी आजपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू केला आहे.. सातव्या वेतन आयोगमधील वेतन त्रुटी दूर करावी अशी परिचारिकांनी प्रमुख मागणी आहे.. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी विविध सोयी बद्दलच्या मागण्या ही आहेत.. त्यामुळे परिचारिकांकडून संप करण्यात आला आहे.. नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच जीएमसी याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालय या तीन रुग्णालयातील शेकडो परिचारिका संपावर गेल्यामुळे तीनही रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे... काल लाक्षणिक संपाच्या दिवशीही होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या अर्धी झाली होती.. त्यामुळे बेमुदत संपाच्या काळात सर्वसामान्य रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो... ---------------- Byte - नूतन बांते
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top