Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोल्यात गुराख्याला सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह, परिसरात खळबळ!

JJJAYESH JAGAD
Jul 18, 2025 12:09:55
Akola, Maharashtra
Anchor - अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव-डोणगाव मार्गालगतच्या वसाली बीटमधील वनक्षेत्रात गुरे चारणाऱ्या गुराख्याला अर्धवट पुरलेला मृतदेह दिसून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुराख्याने तात्काळ स्थानिक पोलीस पाटलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत हे ठिकाण चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चान्नीचे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक पाहणीत मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहावर निळ्या रंगाची जीन्स पॅण्ट, कमरेला पट्टा, डोक्यावर लांब केस, तसेच हातात पांढऱ्या कड्या असल्याचे आढळले. त्यामुळे मृत व्यक्ती महिला असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले होते. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी घटनास्थळाजवळील मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले असून, संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. मृतदेह ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी हत्या होऊन मृतदेह गाडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, गुन्हा इतरत्र घडून मृतदेह येथे फेकण्यात आला की घटनास्थळीच गुन्हा घडला, याबाबत तपास सुरु आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top