Back
जालना: विधिमंडळ आवारात घटनेची चौकशीची मागणी!
NMNITESH MAHAJAN
FollowJul 18, 2025 12:38:44
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1807ZT_TATKARE_JALNA(1 FILE)
जालना : विधिमंडळ आवारात झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
सुनील तटकरे यांची मागणी
ठराविक लोकप्रतिनिधींकडून घडलेल्या घटना दुर्दैवी
लोकांमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनीधींनी सुसंवादाने वागावे अशी जनतेची अपेक्षा आहे असं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.
अँकर : विधिमंडळ आवारात काल झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते.विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतीमार्फत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केल्याचं देखील तटकरे यांनी नमूद केलंय.ठराविक लोकप्रतिनीधींकडून घडलेल्या घटना या दुर्दैवी असल्याचं देखील तटकरे म्हणालेत.
बाईट : सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
10
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 18, 2025 16:00:37Ambernath, Maharashtra:
रेल्वे गाडीतुनच रेल्वेचे साहित्याची चोरी ,
चोरीचा प्रकार सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद,
बदलापूर रेल्वे स्थानकातील भर दुपारच्या मधिल प्रकार
Bdl theft
Anchor बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेची लोखंडी जाळी चोरून लोकल मधूनच पळून जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय , बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या मध्ये पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्यावर लोखंडी जाळी लावण्यात आल्या आहेत, यातील एक जाळी चोरून भर दुपारी एक इसम मुंबई कडे जाणाऱ्या लोकल मधून पळून नेतांनाचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला आहे, हा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय,
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 18, 2025 15:34:14Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - निवासी शाळेतील विद्यार्थी मारहाण प्रकरणी संस्था चालकासह तिघांवर गुन्हे दाखल, शिक्षण विभागाकडून ही चौकशी सुरू..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये एका निवास शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.निवासी विद्यार्थ्यांना शिक्षक व संस्था चालकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे,या घटनेनंतर संतप्त शाळेसमोर शिक्षक व संस्थाचालकांच्या विरोधात आक्रोश करत,
मारहाण प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली असून
संस्थाचालक मोहन माळी व दोन शिक्षकांसह तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कवठेमहांकाळ शहरातील मोहन माळी इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे,याबाबत 18 विद्यार्थ्या व पालकांनी तक्रार नोंदवली आहे.विद्यार्थ्यांना
मारहाण आणि निकृष्ट पद्धतीचे जेवण देण्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणी शिक्षण विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित शाळेची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी अंती मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बाईट - सुनील साळुंखे - पोलीस उपाधीक्षक, कवठेमहांकाळ.
बाईट - मोहन गायकवाड - शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद,सांगली.
.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 18, 2025 15:01:23Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1807ZT_WSM_RAIN_18JULY
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसामुळे तालुक्यातील नद्या-नाले वाहू लागले असून,पाणीपातळी वाढ होणार आहे.या पावसाचा परिणाम शेतीवर सकारात्मक परिणाम होणार आहे.खरीप पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यामुळे विशेषतः सोयाबीन, तूर, उडीद यासारख्या पिकांसाठी सद्यस्थिती अनुकूल आहे.हवामान विभागाकडून जिल्ह्यात दोन दिवसांत अजूनही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
1
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 14:37:14Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME - SAT_KUSGAON_JAM
सातारा - कुसगाव येथे सुरू असलेल्या स्टोन क्रेशर विरोधात कुसगाव येथून मुंबईच्या दिशेने निघालेला लॉंग मार्च आता आक्रमक झाला असून ग्रामस्थांनी खंबाटकी बोगदा जाम केला आहे. यावेळी बोगदात प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या लॉंग मार्च मुळे बोगद्यातील वाहतूक ठप्प झाले असून एकूणच महामार्गावर असणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
5
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 18, 2025 14:35:58Ambernath, Maharashtra:
गाडीत बोनेट मध्ये आढळला कोब्रा साप
तब्बल दोन तासाने सर्पमित्राने सापाची केली सुटका
Bdl snake
Anchor अंबरनाथचया नवरे नगर ऐनकलेव बिल्डिंग मध्ये पार्क केलेल्या एका चार चाकी गाडीच्या बोनेट मध्ये 5 फूट लांबीचा कोब्र साप आढळून आला. गाडीच्या मालकाने सर्प मित्र आकाश गोहील यांना फोन करून बोलवून घेतले त्यानंतर सर्प मित्र गोहिल यांनी गाड़ीच्या बोनेट मध्ये कुंडली मारून बसलेल्या कोब्रा जातीच्या सापाला तब्बल 2 तासाच्या परिश्रमा नंतर बाहेर काढ़ले , त्यानंतर गोहिल यांनी सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिल.
चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
0
Share
Report
CFChandrakant Funde
FollowJul 18, 2025 14:08:40Pune, Maharashtra:
ब्रेक
पुण्यात पुन्हा हाणामारी
पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण
पर्वती पोलीस स्टेशनमध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
जुन्या वादातून तरुणाला टोळक्याकडून मारहाण
मारहाण करणारे आणि फिर्यादी युवक एकाच बिल्डिंगमध्ये वास्तव्यास असून गेल्या अनेक दिवसांपासून यांच्यामध्ये गाडी पार्किंग वरून वाद होता
गाडी पार्किंगच्या वादावरून परवा दिवशी रात्री या सर्व जणांकडून त्या तरुणाला मारहाण करण्यात आली
CCTV मध्ये तरुणांना झालेली मारहाण कैद
पोलिसांकडून सर्वांची चौकशी सुरू
7
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 14:01:56Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_CHP_JIVATI_PRIZE_1_2
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याला नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात सुवर्ण पदक.
अँकर:-- नीती आयोगाने जुलै ते सप्टेंबर 2024 या तीन महिन्यांच्या कालावधीत ‘संपूर्णता अभियान’ देशभरातील 500 आकांक्षित तालुक्यांमध्ये राबवले. या अभियानात आरोग्य, पोषण आहार, मृदा आरोग्य कार्ड, महिला सक्षमीकरण (उमेद), पायाभूत सुविधा आणि वित्तीय समावेशन या सहा निर्देशकांमध्ये 100% कार्यान्वयन साध्य करणे हे उद्दिष्ट होते. महाराष्ट्रातून फक्त जिवती तालुक्याची निवड राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली आणि सहा निर्देशांकांमध्ये 100% कामगिरी केल्याबद्दल सुवर्ण पदक प्राप्त झाले. या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना नीती आयोगाकडून सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. ही कामगिरी जिवती तालुक्यातील प्रशासन, जिल्हा परिषद आणि सर्व पहिल्या फळीच्या कर्मचा-यांच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम असून, महाराष्ट्रातील इतर तालुक्यांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे 28 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 18, 2025 14:01:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - एकाच कुटुंबातील चौघांनी केले विष प्राशन ! सासु-सुनाचा मृत्यू तर बाप-लेकाची प्रकृती गंभीर...
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्रशान केल्याचा प्रकार घडला आहे,यामध्ये दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) व काजल समीर पाटील (वय ३०) असं या सासू-सुनांचे नावे आहेत,तर अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील या दोघा बाप लेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नांगोळे गावांमध्ये ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचं घर आहे.सकाळच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे,या घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरु केला आहे,मात्र हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.तर याबाबत पोलीस तपास करत असून या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
2
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 13:39:48Akola, Maharashtra:
Anchor : राज्य सरकारने दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ केली असून, त्यामुळे दिव्यांगांना आता दर महिन्याला 2500 रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अनेक दिव्यांगांना आर्थिक मदत मिळणार आहेय..प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहेय..या खुशीच्या प्रसंगी अकोल्यात प्रहार कार्यकर्त्यांनी जल्लोष केला..दिव्यांगांच्या हक्कांसाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहेय..
8
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 18, 2025 13:39:27Parbhani, Maharashtra:
अँकर- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज समाजीक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन केले. मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात क्रांतीसूर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून या विरोधात संघटनेने परभणी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात आंदोलन केले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर म्हणाले की, जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर हे सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण लिंगायत समाजात नाराजी आहे. ही केवळ चूक नसून समाजाच्या श्रद्धेला ठेच देणारे वर्तन आहे. मंत्री शिरसाट यांनी जर लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा दिलाय...
बाईट - धन्यकुमार शिवणकर,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस,
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना
1
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 18, 2025 13:33:18Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: कोपरखैरणे पोलिसांनी 2 लाख 42 हजाराचा गुटखा जप्त करत 5 जणांना केली अटक.
कोपरखेरने पुलीस ने पकडा गुटखा
ftp slug - nm koprkherne guthkhaa story
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: मानवी जीवितास हानिकारक असलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा कोपरखैरणे पोलिसांनी जप्त केलाय. शासनाने प्रतिबंधित केले असतानाही विक्री करण्याच्या दृष्टीने स्वतःजवळ गुटखा बाळगणाऱ्या 5 आरोपीना अटक करुन त्यांच्याकडील 2 लाख 42 हजार रुपयांचा गुटखा कोपरखैरणे पोलीसांनी जप्त केलाय. कोपरखैरणे सेक्टर 1 येथील एका खोलीत छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली असून यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
gf-
===============================
3
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 18, 2025 13:12:34Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: दुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्याला वाशी पोलिसांनी केली अटक.
दुबई मे नोकरी करने के बहाने बलात्कार किया
ftp slug - nm vashi reap case
shots-
byet-police babasaheb sangle
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: दुबई मध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेवर जबरदस्ती बलात्कार करणाऱ्या सिराज इद्रीस चौधरी, वय 55 वर्षे, राहणार मुंबई याला वाशी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेवर तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने याबाबत वाशी पोलिस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इद्रीस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.
बाईट -: बाबासाहेब सांगळे (पोलीस उपनिरीक्षक)
7
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 18, 2025 13:11:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
ब्रेकींग
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ अपघात
सताळा गावाकडे वळण घेणाऱ्या मोटरसायकलला ट्रकची धडक
अपघात तिघांचा जागीच मृत्यू
अपघातात एक जण जखमी
भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू
10 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू
घटनास्थळी पोलीस दाखल
अपघात एवढा भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी जीसीबीचा वापर
मयत गोपाल मंगुसिंग चंदनसे ४५ '
मुलगा रुद्र गोपाल चंदनसे ८ ,
मुलगी अनु गोपाल चंदनसे १० ,
जखमी पत्नी मीना बाई गोपाल चंदनसे ४०,
6
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 18, 2025 13:11:22Parbhani, Maharashtra:
ग्राम रोजगार सेवकाचा फोटो जोडला आहे...
assign by- vishal karole
अँकर- परभणी जिल्हात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय, कुठल्या ही कार्यालयात जा पैसे दिल्याशिवाय नागरिकांचे काम होईनात,साबळे भोगाव येथे तर विहिरी न खोदताच पैसे उचळल्याच प्रकरण ताज असतांना आता पूर्णा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ग्राम रोजगार सेवकाने विहीर,गायगोठा,फळबागेला मंजुरीसाठी थेट फोनपे वरून पैसे स्वीकारण्याचा धडाका लावलाय, विशेष बाब म्हणजे पैसे स्वीकारून ही तो शेतकऱ्यांचे कामे पूर्ण करायला तयार नाहीये,
व्हीओ- परभणी जिल्हा परिषदेतील अनेक विभाग लाचखोरीच्या आरोपावरून चांगलेच गाजतायेत,त्यातल्या त्यात पंचायत विभागात सारा काही सावळा गोंधळ सुरू आहे, परभणी तालुक्यातील साबळे भोगाव येथे तर विहीर न बांधताच पैसे उचलल्याचे प्रकरण गाजत असतांना आता पूर्णा तालुक्यातील खडाळा गावच्या शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर, गायगोठा आणि फळबाग योजनेतून अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले होते,पण योजनांना मंजुरी मिळवून देण्यासाठी आणि कुशलचे बिल काढण्यासाठी 25 पंचवीस हजार रुपयांची मागणी ग्रामरोजगार सेवकाने साहेबांच्या नावाने केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. विशेष बाब म्हणजे या ग्राम रोजगार सेवकाने टप्याटप्याने हे पैसे थेट फोन पे वरून स्वीकारण्याचा पराक्रम केलाय.
बाईट- मोतीराम शिंदे- पीडित शेतकरी
बाईट- गजानन शिंदे- शेतकरी
व्हीओ- या गावात अनेक सिंचन विहिरी,गायगोठा आणि फळबागांना मंजुरी देण्यात आली आहे,या योजनेचे अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवकाकडे असते, पैसे घेऊन ही विहिरींचे अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट परभणी जिल्हा परिषद गाठत पंचायत विभागाच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली. सोबत यूपीआय मार्फत पठवलेल्या पैश्याचे तपशील ही सादर केलेत. यामुळे एकच खळबळ माजली आहे. तर मंत्री मेघना बोर्डीकर यांचे विश्वासू तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुम्बरे यांनी जिल्ह्यातील बीडीओ पैसे घेतल्याशिवाय नागरिकांची कामच करीत नाहीत अशी जिल्हाधिकऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. अश्या बीडीओवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे केली आहे. आम्हाला आम्ही केलेल्या कामाचे अनुदान न मिळाल्यास आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारू असा ईशारा खडाळा येथील शेतकऱ्यांनी दिलाय. याबाबत ग्राम रोजगार सोपान शिंदे यांच म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास नकार दिलाय.
बाईट- सुरेश भुम्बरे - जिल्हाध्यक्ष,भाजपा
बाईट- धोंडिबा शिंदे- पीडित शेतकरी
व्हीओ- मागच्या आठवड्यातच जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात सिंचन विहिरी करून ही 2021 पासून अनुदान मिळत नसल्याने उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात बसून शेतकऱ्यांनी सलग चार तास बोंबमारो आंदोलन केले होते,बांबूच्या करनाम्याने या जिल्ह्यात विहिरी न करता पैसे दिले गेलेत मग ज्या शेतकर्यांनी खरोखर काम केलंय त्यांना अनुदान का मिळत नाहीये,याचा अर्थ येथे पैसे दिल्याशिवाय फाईली पुढे सरकतच नाहीत असा होत नाही का
गजानन देशमुख,झी 24 तास,परभणी
2
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 18, 2025 13:09:08Parbhani, Maharashtra:
अँकर- वन्यजीवांची शिकार करून त्यांचे मास विकणारी टोळी वनविभागाने परभणी अटक केलीय. परभणीच्या मांडाखळी परिसरातील इंद्रायणीच्या माळावर काही लोक काळवीट,डुक्कर आणि निलगायीची शिकार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती,त्यावरून परभणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली असता आरोपी जगदीपसिंग टाक आणि सावनसिंग टाक यांना अटक केलीय,त्यांच्याकडून 15 किलो मास जप्त केले असून पशुवैद्यकीय अधिकार्यांनी याचा पंचनामा केला असता काळविटाच्या पोटात बंदुकीची गोळी सापडलीय. वन्यजीव संरक्षण 1972 नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
0
Share
Report