Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला: अग्रसेन चौक-रेलवे मार्ग पर दुभाजक काम धीमे, दुर्घटनाओं का खतरा बढ़ा

JJJAYESH JAGAD
Sept 28, 2025 02:47:56
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहरातील अग्रसेन चौक ते रेल्वे स्टेशन या मार्गावर केबल टाकून दुभाजकाचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कामामुळे गेल्या काही दिवसांत या ठिकाणी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावर लावण्यात आलेला एक विद्युत पोल उलटून पडला.सुदैवाने हा पोल सरळ खोदकामातच कोसळल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. तथापि, दुभाजकाच्या कामामुळे पोल पडला की विद्युत पोल उभारताना निष्काळजीपणा झाला, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दररोज मोठी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर अपघाताचा धोका कायम असून, प्रशासनाने तातडीने या कामाची गती वाढवून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 28, 2025 04:46:43
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात सर्व 115 महसूल मंडळात मोठा पाऊस झाला असून सर्व पिके फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या याद्या ग्रामपंचायत मध्ये लावाव्या व आक्षेप असल्यास प्रशासनाने त्याची तात्काळ पडताळणी करावी असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला, काही जीवितहानी देखील झालेली आहे, जनावरांचा ही मृत्यू झाला आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त सर्वांना तत्काळ मदत देण्याची शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. बाईट : संजय राठोड : पालकमंत्री
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 28, 2025 04:46:29
Akola, Maharashtra:Anchor : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे सेवा पंधरवडा निमित्त अकोला महानगरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे व आमदार वसंतभाऊ खंडेलवाल यांचे मार्गदर्शन लाभले.मॅरेथॉनची सुरुवात वसंत देसाई क्रीडागण येथून करण्यात आली. यानंतर दिवाणी न्यायालय गेट समोर, टिळक पार्क, सातव चौक, जठार पेठ चौक, दुर्गा चौक, कारमेल शाळा चौक असा मार्ग पार करत पुन्हा वसंत देसाई क्रीडागण येथे समारोप करण्यात आला.या स्पर्धेत अकोल्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हजारोंच्या संख्येने धाव घेतली. क्रीडा संस्कृतीला चालना देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उद्देश या मॅरेथॉनमागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 28, 2025 04:33:13
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_HELP तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट कडून पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत, भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची माहिती anchor धाराशिव -तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे, ज्यांचे अतीव नुकसान झाले आहे त्यांना देखील वेगळी मदत मंदिर संस्थान आणि तेरणा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे यंदा मराठवाड्यावर अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. यावेळी तेरणा ट्रस्ट आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला धावून आलं आहे. Byte आमदार राणा जगजितसिंह पाटील
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 28, 2025 04:32:50
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 28, 2025 04:18:53
Pandharpur, Maharashtra:28092025 Slug - PPR_MORINGA_CROP file 02 --- Anchor - मागील दोन-तीन दिवसांपासून पंढरपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे अनेक शेती पिकांचे मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये अत्यंत संवेदनशील असलेल्या शेवगा पिकाला सर्वात मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे पिराची कुरोली येथील शेतकरी उद्धव कौलगे यांच्या चार एकर शेवगा पिकाचे जवळपास 16 ते 17 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेवगा पिकात त्यांच्या गुडघाभर पाणी साचले आहे त्यामुळे काढणीस आलेल्या शेवगा शेंगा बरोबरच फुल आणि कळ्या गळून पडले आहेत. तर शेवग्याची झाडे उध्वस्त झाले आहेत.सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी उद्धव कौलगे यांनी केली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 28, 2025 04:01:36
Amravati, Maharashtra:Feed slug :– AMT_FARMER_BYTE तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या आणि सातबारा कोरा करा अन्यथा लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही; शेतकऱ्यांचा सरकारला इशारा अँकर :- अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना परिसरात मुसळधार पावसाने शेतकऱ्यात पाणी साचले आहे. या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, मुंग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: कापणीला आलेले सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी करत हेक्टरी ५० हजार रुपये मदत व सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे. पावसामुळे संपूर्ण सोयाबीन खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. जर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर तालुक्यातील शेतकरी आमदार-खासदारांना गावात फिरू देणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. बाईट :- शेतकरी
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 28, 2025 04:01:25
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 28, 2025 03:49:53
Washim, Maharashtra:वाशिम : File:2809ZT_WSM_TRUCK_PICKUP_ACCIDENT रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गच्या चॅनल क्रमांक २१३ जवळ घडली. नागपूरकडे टोमॅटो घेऊन जात असलेल्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली.या धडकेत पिकअपमधील दोन जण जागीच ठार झाले. तर ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.प्रथमिक माहितीनुसार, पिकअप वाहन नागपूरकडे जात होते,तर ट्रक छत्तीसगडच्या दिशेने जात होता. भरधाव ट्रकच्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असून कारंजा पोलीस घटनेचा तपास करीत आहे.
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 28, 2025 03:48:17
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 03:47:53
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top