Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर के बार्शी तालुक्य में राती बारिश, चांदणी नदी उफान पर

AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 03:47:53
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्याला रात्री पावसाने झोडपलं, आगळगाव येथील चांदणी नदी झाली ओव्हर फ्लो - बार्शी तालुक्याला रात्री पावसाने झोडपलं, आगळगाव येथील चांदणी नदी झाली ओव्हर फ्लो - आगळगाव येथील चांदणी नदीवरून शेतकरी आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास - चांदणी नदीवर पुराचं पाणी आल्यानंतरही ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून करावी लागत आहे कसरत.. - आगळगाव येथील चांदणी नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. - सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उडीद कांदा पिकाचे मोठे नुकसान..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 06:03:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घ्यावा - मंत्री चंद्रकांत पाटील. अँकर - राज्यावरील नैसर्गिक संकट पाहता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाइन घ्यावा,असा सल्ला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.राष्ट्रवादी शरद पवार पक्षा विरोधातील 1 ऑक्टोबर रोजी सांगलीत पार पडणारी भाजपाची इशारा सभा देखील ऑनलाईन घेणार असून दुपारी याबाबतचा निर्णय होईल, तश्या पध्दतीने उध्दव ठाकरेंनी करावे,पण तो त्यांचा निर्णय,असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 28, 2025 06:03:35
Ambernath, Maharashtra:रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट Bdl wkt rain Anchor - काल रात्रीपासून कोसळणाऱ्या  पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. उल्हास नदीचे पाणी 14 मीटर वरून वाहत असून इशारा पातळी 16.50 मीटर इतकी आहे. उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली गेलीय. हवामान विभागाने दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलय. नागरिकांनीही सतर्क राहण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतय. उल्हास नदीवरून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी चंद्रशेखर भुयार , बदलापुर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 06:03:19
Thane, Maharashtra:ब्रेकिंग शहापूर शहापूरात मुसळधार पाऊस... सापगाव पुलावरून पूराचे पाणी गेल्याने पुल पाण्याखाली... अनेक गावांचा संपर्क तुटला... भातसा धरणाचे पाच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु.... ॲंकर... शहापूर सह तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्रीपासुनच ढगफुटी सद्रुश परिस्थिती निर्माण झाली असुन मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी, नाले व ओढे तुडुंब भरून वाहत असुन पूराचे पाणी बाहेर आल्यामुळे जनजीवण विस्कळीत झाले आहे. भातसा धरणाच्या पाच दरवाज्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग चालु असल्याने भातसा नदीला पुर आला असुन तालुक्यातील रहदारीसाठी महत्वाचा मार्ग असणाऱ्या सापगाव पुलावरून पाणी जाऊ लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवण विस्कळीत झाले आहे. मुलाच्या दोन्ही तिरावर नागरिक अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील प्रती पंढरी समजल्या जाणाऱ्या चरीव मध्ये देखील कानवी नदीला पुर आला असुन डोळखांब, किन्हवली व कसारा भागात देखील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. नदीकाठील गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत असून तालुक्यात महसूल आणि आपत्ती व्यवस्थापण सदर परिस्थितीवर लश्र ठेऊन आहेत. तसेच आणखी चोवीस तास रेड अलर्ट असल्यामुळे नागरीकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडुन तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 28, 2025 06:01:33
Pune, Maharashtra:स्लग :- आमदार संग्राम जगताप परिस्थिती पाहणी Anc- अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले...अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय...नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीये...1996 नंतर पहिल्यांदाचा शहरातील नेप्ती चौकात पाणी आले आहे...अहिल्यानगरच्या सीना नदीच्या शेजारील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे...नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून अतिक्रमणाबाबत अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही संपूर्ण पुराचे परिस्थितीबाबत न्यायालयाला अवगत करून न्यायप्रविष्ठ प्रकरणा संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली पाहिजे असं शहराच्या आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे सोबतच शहरातून वाहणाऱ्या नदीचे पाणी वाढत असल्याने कोणीही फोटो काढण्यासाठी त्या परिसरात जाऊ नये आणि धोका पत्करू नये असं त्यांनी आवाहन केलं आहे. बाईट:- संग्राम जगताप आमदार राष्ट्रवादी AP
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 06:00:56
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 28, 2025 05:46:46
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात काल अति मुसळधार पाऊस झाला काही तासात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले शिवाय गोदावरीच बॅक वॉटर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरल्याने शेती पिकांचं मोठ नुकसान झाल आहे. तर काही भागातील पीक गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे आठ-दहा दिवसापासून पाण्यात आहेत. त्यामुळे सदर पीक सडून जाऊन शेती आणि शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव,माखणी, खळी,सायाळा,सुनेगाव,तर सोनपेठ तालुक्यातील शिरसी बुद्रुक,कानेगाव,थडी पिंपळगाव, लासीना या भागात मोठ्या प्रमाणात शेतात आज ही गोदावरीचे बॅक वाटर आहे, सतत पाणी पिकात राहिल्याने आता पीक वाया गेली आहेत. त्यामुळे गावागावातील शेतकरी पिकात शिरलेल्या पाण्यात उतरून आक्रोश करतांना बघायला मिळत आहेत.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 05:39:21
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- वीज तारेवर जीवाची बाजी... तरुणाची शक्कल, चार जणांचे वाचले प्राण...पुरातून वीजेच्या तारेनं सुटका... AC ::- लातूर तालुक्यातील पोहरेगाव येथे धाडस, शक्कल आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी चक्क वीज तार वापरून सुखरूप बाहेर काढलं आहे . रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील दोन शेतकरी जनावरांना पाणी पाजून शेताकडून परत घराकडे येत असताना अचानक पुलावर पुराचं पाणी वाढलं आणि ते दोघेही अडकले. याची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही ते दोघे बाहेर येऊ शकले नाहीत. एनडीआरएफला कळविण्यात आलं होतं, मात्र ते पोहोचेपर्यंत उशीर होणार होता. अशावेळी गावातील भास्कर हांडगे या तरुणानं भन्नाट शक्कल लढवली. गावातील लाईट बंद करून वीजेची तार तोडण्यात आली आणि त्या तारेच्या साहाय्याने चौघांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.गावकऱ्यांच्या धाडसामुळे आणि भास्कर हांडगेच्या युक्तीमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 05:35:40
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 05:34:40
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top