Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोला कापूस उद्योगाला मिळालं राष्ट्रीय पारितोषिक, शेतकऱ्यांचा आनंद!

JJJAYESH JAGAD
Jul 17, 2025 04:38:24
Akola, Maharashtra
10 फाईल्स आहेत..PKG Note: एक पाणी साठी सुद्धा ही बातमी घेता येईल.. Anchor : ‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी अकोल्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालाय.. पाहू या अकोल्यातील ' पांढऱ्या सोन्याची ' ही खास बातमी... Vo 1 : ‘एक जिल्हा एक उत्पादन 2024’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ' अ ' श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले आहेय..अकोला जिल्ह्याला कापूस प्रक्रिया उद्योग विकासासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले आहेय..महाराष्ट्रातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि अकृषी क्षेत्रातील आपल्या विशेष उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार पटकावले आहेत..नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.. महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांच्या नाविन्यपूर्णतेने, उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले..अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहेय..अकोल्यात सुमारे 100 जीनिंग आणि प्रेसिंग असून 4 सूतगिरण्या आहेत..कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार अकोल्याला मिळाला आहेय.. Byte : अजित कुंभार ,जिल्हाधिकारी अकोला Vo 2 : या पुरस्कारासाठी देशभरातील 577 जिल्ह्यांनी नामांकन भरलं होतं..मात्र अकृषी क्षेत्रात पुरस्कार मिळवणारा अकोला हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहेय..जिल्हा उद्योग केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेत सामूहिक सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली..आणि याद्वारे पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात कापूस प्रक्रिया उद्योगांना भांडवल मिळवून देण्यात आलेय...यामुळे बोरगाव मंजू परिसरात ‘संघा क्लस्टर’ निर्माण झाले असून, त्याचे 103 सदस्य आहेत.. अकोल्याला मिळालेल्या या बहुमानामुळे कापूस ते कपडा निर्मितीपर्यंतचा उद्योग करणाऱ्या या एकमेव उद्योगाला भविष्यात निर्यातीच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेय.. Byte : कश्यप जगताप ,कपडा उद्योजक.. Final Vo : केंद्र शासनातर्फे अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्यामुळे येथील कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय याचा येथील शेतकऱ्यांना आणि स्थानिक उद्योजकांना निश्चितच लाभ होणार आहेय.. जयेश जगड, झी मीडिया, अकोला
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top