Back
प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्यावर लक्ष्मण हाकेंचा तीव्र निषेध!
JMJAVED MULANI
FollowJul 17, 2025 12:34:29
Baramati, Maharashtra
JAVED MULANI
SLUG 1707ZT_BARAMATIHAKE
BYTE 3
बारामती_ ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट पॉइंटर
माहिती अधिकारी कार्यकर्ते पोपट धावडे यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे.
माळेगांव नीरा वागज या आजुबाजूच्या गावात ही भेटी दिल्या.
आगामी काळात राज्यातील ओबीसी जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांचा खूप मोठा लढा उभा राहतोय.
अधिवेशन संपताच त्याच्या बैठका राज्यात आम्ही सुरू करीत आहोत.
त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आलो आहे.
*ऑन_प्रवीण गायकवाड*
झालेल्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध करतो
आम्ही लोकशाही मानणारी मानस आहोत.
*संभाजी ब्रिगेडने गेल्या 15 ते 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात हेच केलं आहे ना ? त्यांनी गिरीश कुबेर सारख्या पत्रकारांचं तोंड काळ करण्याचं काम केलं आहे.*
अनेक ग्रंथालय फोडली,पुतळे उकडून फेकले.
*बहुजन समाजातील काही नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलं*
*आज गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बहुजनवर हल्ला झाला,पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला अस पुढे येत पण विधानसभेच्या अगोदर लक्षण हाके यांच्यावर हल्ला का झाला होता ? कोणत्या ब्रिगेडर ने केला होता ? त्यावेळी प्रवीण गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत*
*प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत नाव बहुजनांच घ्यायचं काम मात्र पवार कुटुंब, कोल्हापूर चे महाराज वतनदार झागीरदारंच करायचं संघर्ष करायची वेळ आली की घरात लपून बसायचं*
एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा पाईक आहे दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामांनी पक्ष दिला,निवडणुका लढल्या त्याच्या एकाही मुद्द्याचा फॉलो नाही करायचा.
*कसले तुम्ही पुरोगामी ? काय आहे तुमचा बहुजनवाद*
बहुजनवादात मराठा सोडून इतर कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिले आहे.
मी प्रवीण गायकवाड यांना साहित्यातला खूप मोठा पुरस्कार द्यावा म्हणून शिफारस करतो.
*चॅरिटेबल काम करून परिवर्तन होत नसत त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते*
वतनदारांचे जीवन जगून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत.
बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो.
*ऑन_लोकसभा उमेदवारी*
प्रवीण गायकवाड हे महादेव जानकर,आण्णासाहेब डांगे,शेंडगे कुटुंबाबद्दल बरंच बोलले आहेत.
रासपच्या पक्ष स्थापनेच्या पहिल्या स्टेजवर होतात तर मग नंतर कुठे गेलात ?
एका धनगराच पोरगं पक्ष चालवतेय म्हणून तुम्हाला तिथे जावं अस वाटल नाही
तिथे तुम्ही जात वर्चस्वाची भावना आड आली
*ज्या शरद पवारांची तळी उचलतात ना हे प्रवीण गायकवाड त्यांना सवाल आहे ज्यावेळी सोनिया गांधी बरोबर फारकत घेऊन पवार दिल्लीहून मुंबईत आले त्या विमानतळावर सर्वात पहिला har घालणारे आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते*
त्यावेळी शेंडगे बापूंच स्टेटमेंट होत की मी तमाम धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांना पाठिंबा देतोय.
शरद पवार यांनी शेंडगे यांना काय फळ दिलं तर पुढच्याच निवडणुकीत कवठे महांकाळ मतदार संघात शिवाजी शेंगडे यांचा प्रभाव केला
माढा लोकसभा मतदारसंघात 6 ते 7 लाख लोक होती तुम्ही माझ्या अडीचशे मतावर बोलताय
*मी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता*
महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते त्यांची काय ग्रामपंचायत होती का इथे ? तरी त्यांनी तुम्हाला घाम फोडला होता.
*आम्ही वंचित घटकातील आहोत आमची तेवढी हैशियत असती तर आम्ही तुम्हाला कशाला तिकीट मागायला आलो असतो.*
*प्रवीण गायकवाड बात बहुजनांची करतात पण काम वतनदारांच करतात*
*ऑन_आर एस एस चा कट*
प्रवीण गायकवाड नेहमी मनुवादी भाजपावर टीका करतात
अजित पवार त्याच मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधील खीर वरपण्याचं काम करत आहेत ना?
*अजित पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपत आहेत*
तुम्ही कधी बहुजनांची लढाई लढलात.
या पवारांनी,या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी एकूण बजेट मधील 1 टक्का तरतूद ओबीसी ला केली नाही.
प्रवीण गायकवाड यांनी नेहमी इतिहास उकरून काढला ब्राम्हणांवर टीका केली.कधी माळी तर कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं
महाराष्ट्रात दोन नंबर ला संख्या असणाऱ्या धनगर समाजाचं एकही कारखाना होऊ शकला नाही.
*प्रवीण गायकवाड अभी तो बात सुरू हुई है दूर तक जाएगी*
*ऑन _सामाजिक न्याय विभाग कामकाज नाराजी*
याला जबाबदार अजित पवार आहेत,जातीयवादी अजित पवार
आदिवासी विभागाचा शेकडो कोटींचा निधी, समाजकल्याण चा शेकडो कोटी निधी, ओबीसी च्या महाज्योतीची 150 कोटीचा बॅकलॉक सारथी च्या विद्यार्थ्यांना 8 लाख जमा करणारे हे अजित पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एक रुपया द्यायला तयार नाहीत.
*सोशल जस्टिस म्हणजे काय? अजित पवारांना काय कळत*
*महाराष्ट्रातील लोकांनी कारखानदारांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत*
*अजित पवारांकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही,फडणवीसांवर आच विश्वास,येऊ घातलेल्या काळात मुख्यमंत्री बोलले नाहीत तर संघर्ष पुढचा काळ ओबीसींचा असेल*
*प्रवीण गायकवाड आणि त्याची सर्व संघटना डुप्लिकेट आहे*
*ऑन_धनगर आरक्षण*
2014 ला बारामतीत सात दिवसाच उपोषण झालं त्यातला कार्यकर्ता आहे.
धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही हे सांगीतले कोणी ?
केंद्रामध्ये धनगर हा ओबीसी मध्येच आहे.
त्यामुळं आमच्या ताटातील आरक्षण वाचवणं आमची जबाबदारी आहे.
धनगर समाजाची एस टी ची लढाई चालू राहील पण अगोदर ताटातील वाचवलं पाहिजे.
*ऑन_अजित पवार*
आम्ही हक्क मागितला की जातीय व्देष का ?
अभिजित वंजारी यांनी काल विधानसभेत प्रश्न उभा केला तेव्हा उत्तर द्यायला काय मुख्यमंत्री आले होते का
अर्थमंत्री ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यानेच उत्तर दिल ना
उत्तरदायित्व अजित पवारांकडे आहेत तर आम्ही त्याच्यावरच बोलणार ना ?
नेहमी गुळाला मुंग्या चिकटतात तसं अर्थ खात कशासाठी हवं असतं.
*उत्पादन शुल्क खाते अजित पवारांना यासाठी हवा आहे की जय पवार यांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन एक लाख हजार लिटरचा आहे तो कारखाना चालवायचा आहे*
*त्या कायद्यामध्ये खडाखोड करायचे आहे त्यासाठी त्यांना या गोष्टी लागतात*
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement