Back
यवतमाळ : आर्णी येथे किरकोळ कारणावरून तरुणाला जीव गमवावा लागला
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबत नसून आता आर्णी शहरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मयत तरुण संभाजीनगर येथील गणेश मंडळात आयोजित महाप्रसादाला गेला होता, जेवण सुरू असताना एका तरुणाने वाद घातला, परिणामी त्याच्या डोक्यात जीवघेणा हल्ला झाला. जिथे तो गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.
1
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
nsk_jaykavadi
feed by 2C
Anhcor नाशिक जिल्ह्यात वेळेवर मान्सूनने दिलेल्या दमदार सलामीने यंदा मराठवाडाविरुद्ध नाशिक विभागात पाणीतंटा निर्माण होणार नाही. गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समूहातून १ जूनपासून आतापर्यंत, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १४ हजार १५२ दशलक्ष घनफूट म्हणजेच १४.१५२ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे वाहून गेले आहे. याबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातून मराठवाड्याकडे पाणी प्रवाही होत असल्याने जायकवाडी धरणात ९८९ दलघमी म्हणजेच ४५.५६ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दरम्यान या धरणात केवळ ४.४० टक्के इतकाच साठा होता.
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचे विद्युत बिल निम्मे करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना मूर्तिजापूरचे उपकार्यकारी अभियंता यांच्या मार्फत रंभापूर गट ग्राम पंचायतचे सदस्य प्रशांत इंगळे यांनी केलीय..ग्रामीण भागातील लाईन गेल्यावर कर्मचारी ती विद्युत सेवा लवकर सुरळीत करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो.. महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विद्युत बिल तात्काळ निम्मे करावे तसेच ग्रामीण भागातील विद्युत पोल पूर्णपणे मोडकळीस आले आहेय त्यांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहेय.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:-नाशिकच्या येवला तालुक्यातील हडपसर गाव येथील शेतकरी सुनील कचरू सोनवणे यांनी आपल्या दोन एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट ची शेती फुलवली आहे उन्हाळ्यामध्ये हडप सावरगाव या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते मात्र या शेतकऱ्याने आधुनिक शेती पद्धतीचा वापर करत ड्रिप व मल्चिंग च्या साह्याने कमी पाण्यावर येणारे ड्रॅगन फ्रुट पिकवले आहे या शेतीमधून त्यांना लाखोचे उत्पन्न मिळायला सुरुवात झाली असून या शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती या ड्रॅगन फ्रुट च्या बागेमुळे सुधारले आहे या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_POLICE_BANDOBST
feed.on 2c
file 02
-----
Anchor - आषाढी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 8 हजार 117 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यामध्ये एक पोलीस अधिक्षक, चार अप्पर पोलीस अधिक्षक, 24 पोलीस उपअधिक्षक, 76 पोलीस निरिक्षिक, 312 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 4 हजार 850 पोलीस अंमलदार व 2 हजार 850 होमगार्ड तसेच 05 एसआरपीएफ कंपनी, 7 बीडीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी चार पथके, आपत्कालिन परिस्थिती हातळण्यासाठी प्रशिक्षित 14 कार्ट पथके आहेत
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड यासह आदी ठिकाणी 12 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन करण्यात आली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 300 सीसीटीव्ही कॅमेरॅच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे.
----
byte - डॉ अर्जुन भोसले, dysp
0
Share
Report
Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Ganesh Khind
File:02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यातील गणेश खिंड परिसरातील निसर्ग वैभव बहरलंय उंचकड्याच्या डोंगरावरती टेकलेले ढग हिरवागार निसर्ग सोसाट्याचा वारा कोसळणारा मुसळधार पाऊस हे सार निसर्ग वैभव मन प्रसन्न करून टाकतय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0407ZT_GAD_BRIDGE_ISSUE
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या दुर्गम तालुक्यात पुलाचे बांधकाम संथगतीने, पर्यायी मार्ग वाहून गेल्याने नागरिकांची कसरत, गुंडेनूर नाल्यावर कारमपल्लीजवळ दोरीच्या सहाय्याने पाण्यातून करावे लागतेय वाहतूक, जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्याना पूर
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या कारमपल्ली जवळ पूल बांधकाम सुरू असताना तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेल्याने नागरिकांची अडचण झाली. गुंडेनूर नाल्याच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग ओलांडावा लागल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे. एका साध्या दोरीच्या सहाय्याने नागरिक एका तिरावरून दुसऱ्या तीरावर जात आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने भामरागड तालुक्यासह जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. अशा पद्धतीने पुराच्या पाण्यातून वाहने काढणे धोकादायक असताना दुसरा कुठलाही मार्ग नसल्याने धोका पत्करूनही नागरिकांना यातून वाट काढावी लागत आहे.
--------नागरिक पुरातून वाट काढत असलेले vis----
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn police raid av
Feed attched
छत्रपती संभाजीनगर राजकीय नेत्याच्या भावाकडून सुरू असलेल्या औरंगपुऱ्यातील पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेने रात्री छापा मारला. यात २३ जुगाऱ्यांना ताब्यात घेत सिटीचौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असलेले विष्णू तनवानी हा क्लब चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. औरंगपुरा ते गुलमंडी रस्त्यावरील नाश्त्याच्या दुकानात सुरू असलेल्या या क्लबवर गुन्हे शाखेने रात्री ११ वाजता छापा मारला. २३ जुगारी पैसे व कॉइनवर जुगार खेळत होते.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn maha palika av
Feed attached
दुभाजकांवर कचरा टाकणाऱ्यांकडून दंड वसूल करा, प्लास्टिक बॅग विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना महापालिका आयुक्त, प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिल्या आहेत. हा दंड १ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिका 'स्वच्छता अपनाओ, बीमारी भगाओ' ही मोहीम राबवणार आहे. या राष्ट्रव्यापी स्वच्छता अभियानाची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. ही मोहीम 'स्मार्ट सिटी' सोबत संयुक्तपणे राबवली जाईल. शहराच्या विविध भागात नागरिक दुभाजकावर कचरा टाकतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. हा दंड १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत असेल. या मोहिमेत शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn balgruh update av
Feed attached
संभाजी नगरच्या विद्यादीप बालगृहातील अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. याच कारणांमुळे मुलींनी न्यायालय गाठत बालगृह प्रशासन आणि बालकल्याण समितीवर अविश्वास दाखवला. 'पोलिसांकडेच आम्ही म्हणणे मांडू' असा आग्रह त्यांनी धरला. याची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. त्यांनी तत्काळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पीडित मुलींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र तीन महिला अधिकाऱ्याची समिती नेमली आहे. या महिला अधिकारी मुलींचा जबाब नोंदवणार आहेत.
३० जून रोजी या बालगृहातून ९ मुलींनी पळ काढत विद्यादीप बालगृहात आमच्यावर अन्याय होतो असा आरोप करत थेट सत्र न्यायालय गाठले होते. त्यानंतर या बालगृहात होणारे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. बालगृहातील मुलींना असुविधा मिळतात, काही मुलींना हा त्रास असह्य झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हातावर काचेने जखमाही केल्या होत्या...
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ( WKT )
- सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
- बार्शी तालुक्यात 62 हजार 782 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली खरिपाची पेरणी
- मात्र मागील पंधरा दिवसांपासून सतत वाढत असणारे तापमान आणि जोराचे वारे यामुळे जमिनीतील ओलावा झाला कमी
- जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Share
Report