Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

अतिवृष्टी पीक अनुदान घोटाले: 21 आरोपी फरार, 6 तालुकों की जांच धीमी

NMNITESH MAHAJAN
Dec 05, 2025 02:15:23
Jalna, Maharashtra
अतिवृष्टी पीक अनुदान वितरण गैरव्यवहार प्रकरणी 24 करोड़ 90 लाख 77 हजार 811 रुपयेांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अंबड पोलिसात 28 गुन्हे दाखल झाले. यात 8 जणांना अटक झाली असून उर्वरित 21 जण फरार आहेत. दुसरीकडे, उर्वरित परतूर, मंठा, जालना, बदनापूर व भोकरदन, जाफराबादचा अहवाल 11 महिने उलटूनही प्राप्त नाही. एकीकडे आरोपी फरार आहेत तर दुसरीकडे 6 तालुक्यांची चौकशी थंडावल्यामुळे हिवाळी अधिवेशनातही यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या अतिवृष्टी पीक अनुदान घोटाळ्यात जिल्हा प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Dec 05, 2025 03:00:38
Bhandara, Maharashtra:नागपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने गोंदिया के उप परिवहन कार्यालय में पश्चिम बंगाल से खरीदी गई जेसीबी वाहन के पंजीकरण के लिए आए शिकायतकर्ता से 70 हजार रुपये रिश्वत की मांग करने वाले दो आरोपियों को गिरफ्तार किया। आरोपियों में राजेश केसकर (53), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त प्रभार), और एक निजी व्यक्ति राजेश माहेश्वरी (57), निवासी रामनगर शामिल हैं। गोंदिया उप परिवहन कार्यालय के सामने पश्चिम बंगाल से खरीदी गई जेसीबी वाहन की पंजीकरण प्रक्रिया के दौरान शिकायतकर्ता को रिश्वत देने के लिए प्रेरित किया गया था; शिकायतकर्ता ने रिश्वत देने से इनकार किया और लाचलुचपत विभाग को सूचना दी। सापळा-rk कारवाई के बाद दोनों को गिरफ्तार किया गया है।
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 05, 2025 02:50:56
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्रे बारदाना नसल्याने गेली चार दिवसापासून बंद. जिल्ह्यात नाफेड आणि पणन मंडळाकडून 51 सोयाबीन हमीभाव केंद्रे करण्यात आली होती सुरू. मात्र 1 डिसेंबरपासून बारदान नसल्याने हमीभाव केंद्र पडली ओस. जिल्ह्यात एकूण 16797 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, 1748 शेतकऱ्यांच्या 37 हजार 324 क्विंटल सोयाबीनची खरेदीया केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत झाली. प्रति क्विंटल 5 हजार या 328 भावाने 19 कोटी 88 लाख रुपयांची सोयाबीनची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेले हमीभाव केंद्रे बारदान अभावी बंद असल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय
29
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 05, 2025 02:50:36
Dhule, Maharashtra:आमचोर - सारंखेडा घोडेबाजार पहिल्याच दिवशी महागड्या घोड्यांची खरेदी विक्री झाली. घोडे बाजारात प्रचंड तेजी दिसून येत असून, पहिल्याच दिवशी 40 लाखाची उलाढाल झाली. जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंखेडा घोडेबाजाराला सुरुवात झाली असून घोडेबाजारात पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे. या बाजारात पहिल्याच दिवशी अकरा लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झाला. यावर्षी आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत. अजून पाच दिवसात घोडेबाजारात साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे.
63
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 05, 2025 02:49:18
Dhule, Maharashtra:पिंपळनेर नगरपालिकेत चे मतदान पार पडल्यानंतर अब EVM सुरक्षित रखने को लेकर उम्मीदवारों के बीच चिंता दिखने लगी है. महाविकास आघाडी के उम्मीदवार डॉ प्रतिभा चौरे ने 'ईवीएम सुरक्षा' के बारे में चिंता व्यक्त की है. इसके लिए उन्होंने पुलिस को निवेदन देकर, EVM मशीन की कड़क सुरक्षा व्यवस्था रखने की मांग की है. पिंपळनेर नगरपरिषद की चुनावी प्रक्रिया में महाविकास आघाडी (MVA) ने चुनाव अधिकारी व पुलिस प्रशासन को मतदान पेटीयों (EVMs) की सुरक्षा के बारे में महत्त्वपूर्ण निवेदन प्रस्तुत किया. नगराध्यक्षपद के उम्मीदवार डॉ प्रतिभा चौरे के नेतृत्वाधीन शिष्टमंडल ने ईवीएम रखा स्ट्रांंग रूम के सुरक्षा व्यवस्थे की और मतगणना के अखंड पारदर्शकता की मांग की. सुरक्षा स्टाफ, सीसीटीवी रिकॉर्ड, इमारत की ब्लूप्रिंट, सील के कलर प्रिंट देना तथा स्ट्रॉंग रूम सिर्फ उम्मीदवारों के सामने ही खोलना और मतगणना निरंतर करने की मांग की गई है. महाविकास आघाडी के इस निवेदन से प्रशासन पर चुनाव के आखिरी चरण में सुरक्षा व्यवस्था और कठोर करने का दबाव बढ़ गया है.
106
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 05, 2025 02:49:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड शहरात एसबीआय बँकेच्या एटीएम बुथमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. बसस्थानकासमोर असलेल्या या एटीएममधून अचानक धूर निघू लागल्याने गोंधळ उडाला. एटीएममध्ये दररोज मोठी गर्दी असते. यावेळी एटीएमच्या आतून धूर दिसल्याने तात्काळ हॉटेलमधील आणि बसस्थानकातील लोकांनी धाव घेतली. आत पाहणी केली असता वायरचे घर्षण होत असल्याने ठिणग्या उडत असल्याचं आढळलं आणि आग भडकली. स्थानिकांनी एटीएममध्ये शिरून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वायरचे घर्षण सुरूच असल्याने आग विझवण्यात वेळ गेला. नागरिकांनी तात्काळ ही माहिती बँक प्रशासनाला आणि एटीएम व्यवस्थापनाला दिली. दरम्यान, एटीएममध्ये किती रोकड होती आणि आग रोकडपर्यंत पोहोचली का, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
94
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 05, 2025 02:46:29
80
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 05, 2025 02:46:00
Yeola, Maharashtra:थंडीची चाहूल लागताच बाजारात सुक्या मेव्याला चांगली मागणी वाढली आहे. मात्र या वाढत्या मागणीसोबत सुक्या मेव्याच्या किमतींमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. शरीराला ऊब मिळण्यासाठी घराघरात सुक्या मेव्याचे लाडू बनवले जात असतात. नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारे सुकामेवा व त्यापासून बनणारे लाडू यांची जोरदार मागणी बाजारात दिसत आहे. पण मागणी सोबतच किमतींमध्ये मोठी उसळी दिसून येते आहे. खजूर, जो मागील वर्षी 150 रुपये किलो होता, तो आता थेट 200 रुपये किलो झाला आहे. खोबरे देखील 200 वरून थेट 350 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. दररोजच्या वापरातील काजू 750 रुपयावरून 850 रुपये किलो झाला आहे. तर बदामाचे दर 750 वरून 850 रुपये किलो इतके वाढले आहेत. पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध अंजीर मात्र सर्वाधिक महाग; मागील वर्षी 800 रुपये असलेला अंजीर आता 1000 ते 1200 रुपये किलो दरम्यान विकला जात आहे. आणि बेदाण्याच्याही किमतींमध्ये मोठी उसळी – 220 रुपयांच्या बेदाण्याचा दर आता थेट 550 रुपये किलो झाला आहे.
92
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 05, 2025 02:33:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील पाच मुख्य रस्त्यांचा डीपीआर खासगी एजन्सीकडून करण्यात येत आहे. या कामाच्या खर्चाला स्मार्ट सिटी administration ने १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील निर्णय गुरुवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रस्त्यांचा डीपीआर जवळपास ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जात आहे, हे विशेष. हा निधी शासनाने द्यावा, असा आग्रह मनपा प्रशासन, शहरातील राजकीय मंडळींनी धरला आहे. शहरातील मुख्य रस्ते रुंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. सर्व रस्ते २०० फूट रुंद असावेत यादृष्टीने साडेपाच हजारांहून अधिक मालमत्ता पाडण्यात आल्या.
171
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 05, 2025 02:32:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महसूल पथकाने वाळूची चोरी करणारी पकडलेली काही वाहनेही तहसील कार्यालयातून चोरीला जातात. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात वर्षभरात जप्त केलेले तब्बल १२ पेक्षा अधिक हायवा चोरीला गेले आहेत. ही चोरी थांबवण्यासाठी २४ तास शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त द्यावा, अशा मागणी अपर तहसील कार्यालयाने ३ वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. मात्र त्याला जिल्हा प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सातत्याने या घटना घडत असताना महसूल प्रशासनकडून कोणत्याही खबरदारी घेतली जात नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कार्यालयाच्या आवारामध्ये रात्रीच्या वेळी नशेखोर बसलेले असतात. लाइटची पुरेशी व्यवस्था नाही, सीसीटीव्ही नाहीत आणि सुरक्षा गेटही तुटलेले आहे. त्यामुळे या परिसरातील तहसील कार्यालयासह रजिस्ट्री कार्यालय, बैंक, राज्य माहिती आयोगाचे कार्यालय वाऱ्यावर आहे.
115
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 05, 2025 02:32:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरहून भाचरवाडी गावाकडे एस.टी.बस घेऊन जाणार्‍या बसच्या चालकाला शिवीगाळ करून काठीने मारहाण करणाऱ्याच्या विरोधात पन्हाळा पोलिसात पुन्हा नोंद करण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी इथल्या विनायक विष्णू रेडेकर (वय ३४) याच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी गावाकडे कोल्हापूरहून एस.टी.बस येत असताना समोरून येणार्‍या स्कूल बसला बाजू देण्यासाठी बस काही काळ थांबली होती. त्यावेळी भाचरवाडी इथल्या विनायक विष्णू रेडेकर या युवकाने एस.टी.बसचा चालक कुलदीप दिनकर हिरवे यांना (वय ४२) “ही काय चर्चा करणेची जागा आहे का, रस्ता तुमच्या बापाचा है?” असे म्हणुन शिवीगाळ करून चालकाला मारहाण केली. या मारहाणचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल झाले आहेत.
92
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 05, 2025 02:32:00
111
comment0
Report
Advertisement
Back to top