Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

उमरखेड पुलिस की बड़ी सफलता – घरफोड़ियों का पर्दाफाश, 2 आरोपी गिरफ्तार, ₹2.83 लाख का माल बरामद

Oct 02, 2025 08:36:38
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रांचने मोठी कारवाई करत 02 घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. आरोपी अर्जुन उत्तम कनकापुरे (32) व अरिहंत उर्फ संतोष दत्तात्रय कस्तुरे (42, दोन्ही रा. ब्राम्हणगाव) यांच्या कडून 04 घरफोड्यांचे गुन्हे उघड झाले असून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 2 लाख 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रांच उमरखेड, सायबर सेल यवतमाळ करीत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Oct 02, 2025 10:50:40
Bhandara, Maharashtra:देशभरातून बाबा साहेबांच्या अस्थी कलसाचे दर्शन घेण्यासाठी उसळला जनसागर ... दीक्षाभूमी परिसरात लाखो अनुयायी. आज 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. आपल्या असंख्य अनुयायी सह या ठिकाणी बाबा साहेब आले होते. अंधारात असलेल्या समाजाला जागं करण्याचं काम बाबा साहेबांनी केलं तसेच समानतेचा मार्ग लोकांनी अवलंबला पाहिजे असे बाबा साहेब यांनी सांगितले. आणि आज याच पवित्र दीक्षाभूमीवर बाबा साहेब अमर रहेचे नारे बौद्ध अनुयायी लावत आहेत. तर याच दीक्षाभूमीवर देशभरातून बौद्ध अनुयायी आले असून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 10:30:12
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण भरले असल्याने, वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने जिल्ह्यावरील जल संकट टळलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट राहून जात होती, मात्र यावर्षी सर्वत्र पावसाने गरजेपेक्षा जास्त हजेरी लावल्यामुळे सर्व धरण भरले आहेत तर नदीन आले ओसंडून वाहत आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला होता त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न उद्भवला होता परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण भरले आहेत.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 02, 2025 10:24:06
Pune, Maharashtra:निलेश लंके ऑन अजित पवार मेळावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांचे होम ग्राउंड असलेल्या पारनेर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सायंकाळी रोजगार मेळावा होत आहे, याबाबत खासदार निलेश लंके यांना विचारले असता प्रत्येक पक्ष हा आपल्या पक्षाचे विचार मांडत असतो...आता मुंबईतही अनेक पक्षाचे दसरा मेळावे होत असतात...मात्र आता आमच्यापुढे एक समस्या आहे की मागच्या आठवडा भरापासून नगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे असं म्हणत निलेश लंके यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला आहे...मेळावा घेण्यापेक्षा या जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे असं निलेश लंके यांनी म्हंटल आहे. निलेश लंके ऑन लाठीचार्ज अहिल्यानगर शहरात पोलिसांकडून मुस्लिम समाजावर झालेल्या लाठी चार्ज झाल्यानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते याबाबत विचारले असता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले की,अहिल्यानगर शहराची शांतता ही कायम राहिली पाहिजे... सध्या नगरचा व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण आहे , अनेक व्यापारी तर आपले व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत...त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 10:23:46
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या नर्मदा नदी काठावर निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळत आहे. सतत च्या मुसळधार पाऊसामुळे नर्मदा नदी दुथडी वाहत आहे. या ठिकाणी नदीच्या पाण्यातून बोटीतून जात असतानाची दृश्य वेगळाच आनंद देणारी आहेत. हिरव्यागार होणार आहे मुळे नर्मदा नदीच्या सौंदर्यात भर पडली आहे. नर्मदा नदीने धारण केलेलं नवं रूप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नर्मदा नदीच्या पाण्याची पातळी अलीकडेच वाढल्यामुळे तिच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून आली आहे. पाण्याखाली गेलेले डोंगर आता छोटे छोटे हिरवे बेटं वाटू लागले आहेत. ही दृश्यं पाहताना एखाद्या चित्रपटातील स्वप्नवत जागेत आल्यासारखं वाटतं. स्थानिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांची संख्या याठिकाणी वाढताना दिसत आहे. लोक येऊन फोटोशूट, शांततेचा अनुभव, आणि निसर्गाची अनुभूती घेत आहेत.
1
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 10:16:55
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मोठे धरून वाहन चालवावे लागत आहे. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या सोनगीर ते धानोरा राज्य महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली खरी, मात्र खऱ्या अर्थाने काम कधी सुरू होणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अर्धा महामार्गा खोदून ठेवली आहे. मात्र ठेकेदाराला या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. तर दुसरीकडे सोनगीर ते धानोरा या महामार्गाच्या लगत असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केलेली आहे. त्यामुळे या वृक्षांच्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड केली जाणार का? असे देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाच्या कामासाठी हजारोंच्या संख्येने वृक्षांची कत्तल करण्यात आलेली आहे. मात्र नवीन वृक्षांची लागवड झालेली नाही. त्यामुळे सोनगीर ते धानोरा या महामार्गाची देखील तशीच अवस्था होऊ नये अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी कडून व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 10:16:11
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका पपई, मिरची, कापूस, मका, केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात खासदार गोवाल पाडवी यांनी पाहणी केली. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, अशीआहाणी करत पाडवी यांनी सरकारावर गंभीर आरोप केले. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत असून मागील नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई ही अनेक शेतकऱ्यांना भेटली नसून अनेक शेतकरी अजूनही वंचित आहे. आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट आले असताना ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार कायद्यातील पळवाटा शोधत आहे सरकारने आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून बळीराजाला जगण्यासाठी कर्जमाफी करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी खासदार गोवाल पाडवी यांनी केली आहे. यावेळी माजी मंत्री के सी पाडवी, राजेंद्रकुमार गावित कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 02, 2025 10:15:49
Washim, Maharashtra:वाशिम च्या पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्याला धर्मगुरू आमदार बाबुसिंग महाराज, महंत सुनील महाराज, महंत कबीरदास महाराज, आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व अभ्यासक उपस्थित आहेत. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST )आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातील सुमारे दोन हजार कार्यकर्ते या मेळाव्यासाठी एकत्र आले असून आरक्षण लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी यामध्ये विचारमंथन सुरु आहे. बंजारा धर्मपीठावर हा दसरा मेळावा होत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 10:00:57
Dhule, Maharashtra:सोन्याचे दर गगनाला भिडण्याचा परिणाम दसऱ्याच्या निमित्त धुळ्याच्या सराफ बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे. ग्राहकांचा मिश्र प्रतिसाद दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिसून येत आहे. दसऱ्याला ग्राहकांकडून सोन्याचे खरेदी ज्या पद्धतीने होते, तशी होत नसल्याची तक्रार सरफानीं केली आहे. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केलेली आहे. केंद्र सरकारने कर सवलतीचा विचार करावा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सोनं खरेदी करताना अडचण येणार नाही अशी मागणी व्यापारी केलेले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने शुभ मुहुर्त म्हणून सोन्याचे खरेदी केले जाते. मात्र धुळ्याच्या बाजारपेठांमध्ये समिश्र प्रतिसाद दिसून आला. गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी ग्राहकांची गर्दी नसल्याचं चित्र आहे
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 02, 2025 10:00:43
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 02, 2025 09:55:06
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 02, 2025 09:21:17
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 02, 2025 09:03:26
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 02, 2025 08:34:45
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात ३०० हेक्टरवरीलझेंडूच्या फुलांच्या बागा पाण्याखाली आल्याने शेत शिवारातील ७० टक्के फुले सडली. फुलांचा दर्जा घसरल्याने यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर गतवर्षाच्या तुलनेत झेंडूचे दर तिपटीने घटले असून चार किलोचे क्रेट १५० ते २०० रुपयांना मिळत आहे. येणाऱ्या दिवाळी सणाला मात्र झेंडूच्या बाजाराला महागाईची झळ बसणार आहे. कारण दिवाळीसाठी झेंडूची फुलवलेली बाग अद्यापही पाण्याखाली आहे. गेल्यावर्षी चार किलोच्या क्रेटला ४५० ते ६०० रुपयांपर्यंत दर होता. तो यंदा निम्म्यावर आला. यामुळेदेखील दर घसरले नाशिकचा फुल बाजार राज्यात प्रसिद्ध असून नाशिकची फुले सुरत, बडोदा, मुंबई, इंदौर भोपाळ येथील बाजाराला सुगंध देतात. परंतु ३०० टन फुले ओली झाल्याने स्थानिक पातळीवरच त्याची विक्री होत आहे. परिणामी बाजारात मालाची आवक वाढली आणि दर घसरले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 02, 2025 08:30:46
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top